Tuesday, October 17, 2023

विघ्नेश अनुसे या हॉकी खेळाडूचे राष्ट्रीय समाज पक्षाने केले अभिनंदन..!

विघ्नेश अनुसे या हॉकी खेळाडूचे राष्ट्रीय समाज पक्षाने केले अभिनंदन..!

विघ्नेश अनुसे यांचे अभिनंदन करताना रासपच्या विद्यार्थी आघाडी शाखेचे महाराष्ट्र प्रांत अध्यक्ष शरदभाऊ दडस व इतर मान्यवर.

हॉकी खेळात विघ्नेशने दादा किशन पाल यांचा वारसा पुढे न्यावा : शरदभाऊ दडस 

नवी मुंबई : १५/१०/२०२३|यशवंत नायक ब्यूरो

विघ्नेश अनुसे या गुणवान खेळाडूने नुकतेच पुणे येथे झालेल्या राज्यस्तरीय हॉकी स्पर्धेत घवघवीत यश मिळवले आहे. विघ्नेशची राष्ट्र स्तरावर १६ वर्षाखालील हॉकी संघात निवड झाली आहे. त्याच्या यशाबद्दल राष्ट्रीय समाज पक्षाचे विद्यार्थी आघाडी प्रदेश अध्यक्ष शरदभाऊ दडस यांनी त्याचा राहत्या घरी जाऊन शाल पुषगुच्छ देऊन अभिनंदन केले. विघ्नेश याने अधिक जोमाने आपल्या खेळात चुणूक दाखवून राष्ट्रीय स्तरावर दादा किशन पाल यांचा हॉकी खेळात वारसा पूढे न्यावा, असे प्रतिपादन याप्रसंगी शरदभाऊ दडस यांनी व्यक्त केले. यावेळी यशवंत नायक कार्यकारी संपादक शेफर्ड ए. एस.पी, प्रा. दत्ता अनुसे, ऋषिकेश जरग, नानासाहेब अनुसे, सुहास अनुसे आदी उपस्थित होते. 

विघ्नेशची विचारपूस करून मार्गदर्शन करताना  राष्ट्रीय समाज पक्ष विद्यार्थी आघाडी प्रदेशाध्यक्ष शरदभाऊ दडस.

विघ्नेश हा कोपरखैराणे च्या सेंट लॉरेन्स हायस्कूल मध्ये इयत्ता ९ वी च्या वर्गात शिक्षण घेत आहे. विघ्नेशचे वडील विलास अनुसे हे स्वतः एक चांगले खेळाडू आहेत, असे त्यांच्या गावातील नागरिकांचे म्हणणे आहे. विघ्नेशचे मूळ गाव सांगली जिल्हयातील आटपाडी तालुक्यात अनुसेवाडी असून, सद्या तो  आई वडीलांसोबत कोपरखैराणे येथे राहत आहे. कोणत्याही प्रकारच हॉकी खेळाच प्रशिक्षण घेतले नसताना, विघ्नेशने शाळेतील शिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली यश मिळवले आहे. विघ्नेश हा शाळेच्या मैदानावर सराव करत आहे.

No comments:

Post a Comment

चागंले संस्कार टिकविण्यासाठी वाचन संस्कृतीची गरज : डॉ. शंकर स्वामी वडेपुरीकर

चागंले संस्कार टिकविण्यासाठी वाचन संस्कृतीची गरज : डॉ. शंकर स्वामी वडेपुरीकर ‌पु.अहिल्यादेवी वाचनालयात " वाचन संकल्प महाराष्ट्राचा...