देशावर सम्राट अशोकाचे शासन आणण्यासाठी यशवंत नायक काम करेल
विश्वाचा यशवंत नायक ३० वा वर्धापनदिन उत्सहात साजरा
कळंबोली (२९/९/२०२३) : मासिक विश्वाचा यशवंत नायक अंकास २९ वर्ष पूर्ण होऊन, ३० व्या वर्षांत पदार्पण केल्याने यशवंत नायकचे कार्यकारी संपादक श्री. आबासो पुकळे यांनी हॉटेल मॅकडोनालड हॉटेल येथे उपस्थितांना पेढे भरवून आनंद व्यक्त केला. वर्धापन दिनानिमित्त हितचिंतक यांना शुभेच्छा दिल्या. भारत देशावर सम्राट अशोकाचे शासन आणण्यासाठी यशवंत नायक काम करेल, असे उदगार कार्यकारी संपादक यांनी काढले. यावेळी यशवंत नायकचे छायाचित्रकार श्री. ऋषिकेश जरग, वाचक चैतन्य जरग, अंकुर जरग, शशिकांत मोरे यांनी यशवंत नायक अंकातील लेखन, बातम्या वाचून यशवंत नायकला पुढील वाटचालीस शुभेच्छ्या दिल्या. तसेच क्षणाचाही विचार न करता रोख व आँनलाईन पैसे भरून यशवंत नायक अंकाचे सभासदही झाले. कळंबोली कॉलनीत पुढे यशवंत नायकचे वाचक प्रा. श्री. दत्ता अनुसे सर यांनी यशवंत नायक वर्धापन दिनाच्या शुभेच्छा देऊन, पंचवार्षिक सभासदत्वही स्वीकारले. रासेफ परिवार, रासप पदाधिकारी/कार्यकर्ते, यशवंत नायक परिवारातील सदस्य यांच्याकडून काल दिवसभर शुभेछ्यांचा वर्षाव झाला. येथून पुढेही असेच प्रेम राहू द्या. यशवंत नायक मोठ्या उमेदिने स्पर्धेच्या युगात आपले काम जोमाने करेल, असा विश्वास वाटतो. तत्पूर्वी कुलस्वामीनी आई चिंचणी मायाक्कादेवी चरणी यशवंत नायक अंक अर्पण केला व मंदिराचे पूजारी श्री.कोळेकर यांना यशवंत नायक अंक भेट दिला.
No comments:
Post a Comment