ज्यांना वाचता येत नाही, त्यांनी यशवंत नायक सांभाळला : एस. एल. अक्कीसागर
मुंबई : (२६/९/२३) यशवंत नायक ब्यूरो
यशवंत नायक अंकाच्या घड्या घालण्यासाठी रिक्षावाले, कष्टकरी लोक येत होते. सुशिक्षित वर्ग हा छोट्या-मोठ्या सत्तेच्या मागे गेला. समाजाचे वाटोळ होण्यास समाजाचे नेते जबाबदार आहेत. ज्यांना वाचता येत नाही, त्यांनी यशवंत नायक सांभाळला, असे प्रतिपादन यशवंत नायकचे कार्यकारी संपादक एस एल अक्कीसागर यांनी केले. रासेफ व यशवंत नायक यांच्यातर्फे मासिक विश्वाचा यशवंत नायक अंकास २९ वर्षे पूर्ण होऊन ३० व्या वर्षांत पदार्पण करत असल्याने वर्धापन दिनाचे आयोजन करण्यात आले होते.
यशवंत नायकचे मुख्य कार्यकारी संपादक मार्गदर्शक एस. एल अक्कीसागर यांनी उपस्थितांसमोर यशवंत नायकचा आजवरचा प्रवास मांडताना आपल्या भाषणात म्हणाले, आज यशवंत नायकला 30 वर्षे पूर्ण होऊन 31 वर्षात पदार्पण होत असल्याने मला आनंद होत आहे आणि त्याचा गर्व ही आहे. एकदा लोकसत्तेत बातमी आली. यशवंत सेनेत फूट? त्यावेळी मी भांडुप येथे राहत होतो. नंतर कुर्ला येथे जानकर साहेबांची भेट झाली. 15 मार्च 1994 चा दिवस दादर शिवाजी पार्क येथे बहुजन समाजाचा दिवस होता. जानकर साहेबांनी माझी यशवंत सेनेच्या सरचिटणीसपदी घोषणा केली. त्यावेळेस मला वाटलं आपला एक पत्रक असाव. त्या अगोदर बहुजन संघटकचा वाचक होतो, त्यात सर्व बहुजन समाजाची लोक होती. 1920 साली 'मूकनायक' डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी सुरू केला, त्यानंतर बहिष्कृत भारत, पुढे प्रबुद्ध भारत बनला. तोच वारसा पुढे घेऊन यशवंत नायक नाव दिले. आम्हाला त्यावेळेस वाचायला छोटासा कागद देखील मिळत नव्हता. म्हसवड येथे कांशीराम यांच्याहस्ते यशवंत नायक हस्तलिखित अंकाचे प्रकाशन झाले. यशवंत नायकमध्ये सर्व समाजाचे लोक होते. पुढे यशवंत सेना विकसित होत गेली. प्रजा समाजाला राजा समाज बनवणे हे यशवंत सेनेचे ध्येय होते. वाचक समाजाला लेखक समाज बनवणे हे यशवंत नायकचे ध्येय होते. आज वाचक समाज लेखक समाज बनताना दिसतो आहे. राजकिय सत्तेकडे वाटचाल चालू झाली आहे. महादेव जानकर साहेब दूरदृष्टी असणारा नेता आहे. आज राष्ट्रीय समाज पक्षाचे संघटन 17 राज्यात पोचले आहे. चार राज्यात ताकद आहे. सन 1995- 96 साली मोटार सायकलवर यशवंत नायक घेऊन कार्यकर्ते वाटत होते. लिहत होते. ज्ञान सत्ता हे सगळ्यात मोठी आहे. सत्य माहीत नसताना प्रबोधन करू लागले तर गोंधळ होतो. मराठा समाज सत्तेत असताना रस्त्यावर उतरावा लागत असेल तर इतर समाजाची काय अवस्था असेल? देश स्वतंत्र होत असताना सत्ता कोणाकडे होती. आरक्षण हा भागीदारीचा मुद्दा आहे. आज शिक्षणाचे बाजारीकरण झाले. पाकिस्तान मुस्लिमांचे राज्य बनले. पण भारत हिंदूचे सेक्युलर बनले. घटना स्वीकारत असताना धनगर बहुजन प्रतिनिधी नव्हते, पण बाबासाहेब आंबेडकर तळागळतून आले असल्याने त्यांनी सगळ्यांचा विचार केला आणि ओबीसींना ३४० वे कलम दिले. या देशात महादेव जानकर यांनी किमया केली आहे, मर्यादित साधना असताना कठीण काम केलेले आहे. यावर्षी एप्रिल, मे आणि जून महिन्याच्या अंक निघाला नाही. यशवंत नायकमुळे अनेक पत्रकार लेखक घडले पण यशवंत नायकसाठी कोणी काम केले नाही, अशी खंत व्यक्त करून म्हणाले, गेली ७ वर्षापासून आबासो पुकळे हा युवक माझा उजवा हात बनून यशवंत नायकसाठी काम करतोय. यशवंत नायकने नेहमीच दर्जेदार लिखाण केले आहे. यशवंत नायकला एकदा पोस्टाचे तिकिटे पाहिजे होते, मोहन माने यांनी भरपूर तिकिटे आणून दिली. अशा प्रकारे अनेकांनी यशवंत नायकला सांभाळले आहे.
"आतापर्यंत मी मोबाईलवर यशवंत नायक अंक टाईप करत होतो. असे करत असतानाच दोन मोबाईल कायमचे बंद पडले. कौटुंबिक जबादाऱ्या पार पडत असताना, आर्थिक अडचणीमुळे नवीन मोबाईल घेऊ शकलो नाही. अलीकडे जयसिंग राजगे सर यांनी मदत केल्यामुळेच यशवंत नायक अंक नियमित लिखाण करत आहे, मात्र तीन अंक लिहू न शकल्याबद्दल यशवंत नायकप्रेमिंचा दिलगीर आहे. दैनिक केसरीत उपसंपादक होतो, पण यशवंत नायकमुळे स्वतंत्रपणे लिहू शकलो. यशवंत नायकने आत्मसन्मान जागा केला", अशा मोजक्या शब्दांत आबासो पुकळे यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.
रासपचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष शरद काशिनाथ शेवते म्हणाले, यशवंत नायकमुळे राजकीय क्रांती झाल्याशिवाय राहणार नाही. रासेफचे महाराष्ट्र अध्यक्ष सतिश नजरकर यांनी यशवंत नायकमधील अग्रलेख वाचून खूप प्रभावित झाल्याचे सांगत काही वाचनीय लेखांचा उल्लेख केला. रासेफचे महासचिव जयसिंग राजगे सर यांनी उत्तम सूत्रसंचालन केले. बोरिवली येथील रिक्षाचालक महावीर वाघमोडे हे यशवंत नायक अंकाच्या घड्या घालण्यासाठी यशवंत नायक कार्यालयात उपस्थित राहतात. कोणत्याही संघटना, समाजाला मुखपत्राची गरज असते असे सांगितले. यशवंत नायकला जाहिरात देऊन सर्वांनी सहकार्य करावे, असे आवाहन राजगे सर यांनी केले. जगात मुखपत्रामुळे जगात अनेक क्रांती झालेल्या आहेत, असे उदगार यशवंत नायकचे हितचिंतक, वाचक गोविंदराव शूरनर यांनी काढले. परभणी जिल्हा यशवंत नायक प्रतिनिधी ब्रिजेश गोरे म्हणाले, यशवंत नायकच्या सेवेला मर्यादा येत आहेत, यशवंत नायक प्रोफेशनल करावा असे सांगितले. यावेळी प. महाराष्ट्र रासेफ अध्यक्ष महावीर सरक, शशिकुमार जरग, रासेफ खजिनदार राजेंद्र कोकरे, सुदर्शन अक्कीसागर, रामधारी पाल, प्रशांत साळवे, धनंजय गडदे व अन्य उपस्थित होते.
No comments:
Post a Comment