Tuesday, October 3, 2023

गोवा धनगर समाज सेवा संघ तर्फे धोंड मंडप धनगरवाडा माळोली येथे महात्मा गांधी जयंती साजरी

गोवा धनगर समाज सेवा संघ तर्फे धोंड मंडप धनगरवाडा माळोली येथे महात्मा गांधी जयंती साजरी

Goa Dhangar Samaj Seva Sangh Sattari संघटनेच्या वतीने धोंड मंडप धनगरवाडा माळोली येथे महात्मा गांधी जयंती साजरी करण्यात आली. प्रमुख पाहुणे सरकारी स्कूल भुईपाल शाळेचे शिक्षक श्री अनंतराव राणे सर, सरकारी प्राथमिक शाळा माळोली शाळेचे शिक्षक श्री रुपेश पोळेकर सर, पद्मश्री श्री जयन फातर्पेकर, संघटनेचे अध्यक्ष धुळू शेळके, माजी सरपंच रामा खरवत, सचिव चंद्रकांत पावणे, खजिनदार जानू पिंगळे, उपाध्यक्ष लक्ष्मण झोरे, उपखजिनदार विठोबा बोडके, उपखजिनदार राम काळे, माजी उपखजिनदार मुला हुमाणे, निता हुमाणे आणि माळोली गावातील इतर युवा वर्ग उपस्थित कार्यक्रम झाला. सुत्रसंचलन राम काळे यांनी केले. सुरूवातीला दिप प्रज्वलन करून पाहुण्यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले. सचिव चंद्रकांत पावणे याने पाहुण्यांची ओळख करुन दिली.खजिनदार जानू पिंगळे आपले मनोगत व्यक्त केले. 

अध्यक्ष धुळू शेळके यांनी बोलताना सांगितले की २ ऑक्टोबर या दिवशी महात्मा गांधी आणि भारताचे माजी पंतप्रधान लालबहादूर शास्त्री यांची जयंती आहे या दोन्ही महापुरुषांच्या जयंती निमित्त हार्दिक शुभेच्छा दिल्या. गांधीजींच्या विषयावर व्याख्यान पुढे राणे सर करणार आहे. माजी पंतप्रधान लालबहादूर शास्त्री यांच्या विषयी थोडक्यात बोलताना सांगितले एखाद्या मानुस आपल्या हातून महान कार्य पार पाडतो किंवा घडवितो. लालबहादूर शास्त्री हे आपल्या देशाचे पंतप्रधान होते. त्यांच्या अंगी असलेले कर्तृत्ववान आणि कमी कारकिर्दीत आपल्या अंगच्या गुणवत्ता मुळे मोठी किर्ती मिळविली. त्यांच्या विषयी आपण  वाचाल तर आपणास आर्दश घेण्याकरिता खुपच्या गोष्टी आहेत. 

माजी सरपंच रामा खरवत यांनी गोवा धनगर समाज सेवा संघ सत्तरी संघटनेच्या वतीने माळोली गावात गांधी जयंती निमित्त कार्यक्रम आयोजित करण्यात आल्याबद्दल संघटनेचे अभिनंदन केले. आणि यापुढे ही असे उपक्रम राबविले जावेत अशी विनंती केली. शिक्षक रुपेश पोळेकर सरांनी सांगितले माणूस म्हणून आम्ही पहिल्यांदा आपल्या पासून वाईट गुण काढून टाकले पाहिजे आणि आपले शरीर पहिली निवळले पाहिजे प्रत्येक जण व्यसनापासून दूर होतील तोच खरा आमच्या विकास होणार आहे. 

जयन फातर्पेकर यांनी सांगितले आमच्या भारत देशाचे लाडके पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांनी भारत देशभर २ ऑक्टोबर गांधी जयंतीच्या निमित्ताने स्वच्छता मोहीम राबविण्यात येते. आपण सर्वांनी आपल्या गावा गावांतून स्वच्छता ठेवावी हिच खरी गांधीजींना श्रद्धांजली ठरेल. हेच स्वप्न पंतप्रधान मोदीजींचे आहे.

 प्रमुख पाहुणे अनंतराव राणे सरांनी भाषणाची सुरुवात आपल्या सर्वांसह रगुपती राघव राजाराम, पतित पावन सिताराम टाळ्यां वाजवत गाण्याची सुरूवात केली. गांधीजींच्या बालपण आणि शिक्षणाच्या विषयावर सांगितले, परदेशी ब्रिटिशने आपल्या या देवभूमीत प्रवेश केला. भारतीय लोक मुळात फार गरीब स्वभावाचे होते याचा अंदाज घेऊन ते इथेच राहून व्यापार करू लागले सुरूवातीला गोड गोड बोलून त्यांनी भारतीय लोकांच्या गरीब व भोळ्या लोकांचा विश्वास संपादन केला आणि काही काळानंतर आपले खरे रूप दाखविण्यात सुरूवात केली. आणि संपूर्ण भारताला आपला पंखाखाली घेतले. येथील लोकांना गुलामगिरीची वागणूक देण्यात सुरू झाली. पण असे असले तरी भारत भूमीत अनेक महान पुरुषांनी जन्म घेऊन भूमीचा उध्दार केला. गांधीजींच्या लंडन येथील प्रवास ते मायदेशी परतले, आफ्रिकेला प्रयाण ते मायदेशी परतले, गांधी युगाचा आरंभ, असहकार आंदोलन, दांडीयात्रा, चले जाव आंदोलन, स्वातंत्र्य सूर्य उगवला आणि महात्म्याचा अस्त असा विषयावर व्याख्यान केले. 

उपाध्यक्ष लक्ष्मण झोरे यांनी सर्व मान्यवरांचे आभार मानले तसेच माळोली गावातील युवक धुळो खरवत, सुजय वरक, विशाल खरवत, शैलेश हुमाणे मितेश वरक कार्यक्रम आयोजित करण्यासाठी व्यवस्था केल्याबद्दल आभार मानले.

No comments:

Post a Comment

चागंले संस्कार टिकविण्यासाठी वाचन संस्कृतीची गरज : डॉ. शंकर स्वामी वडेपुरीकर

चागंले संस्कार टिकविण्यासाठी वाचन संस्कृतीची गरज : डॉ. शंकर स्वामी वडेपुरीकर ‌पु.अहिल्यादेवी वाचनालयात " वाचन संकल्प महाराष्ट्राचा...