शेफर्ड इंडिया इंटरनॅशनलच्या राज्य आणि केंद्र सरकारला द्यावयाच्या निवेदन मसुदा समिती अध्यक्षपदी एस एल अक्कीसागर यांची निवड
१० ठराव युक्त निवेदन मुख्यमंत्री सिद्धरामय्याकडे केले सुपूर्द
बंगळुरू : यशवंत नायक ब्यूरो
देशभरातील मेष- पशुपालकांसाठी स्थापन झालेल्या सर्वोच्च संघटनेच्या राज्य आणि केंद्र सरकारला द्यावयाच्या निवेदन मसुदा समितीवर एस. एल. अक्कीसागर यांची सर्वानुमते निवड करण्यात आली. थोर विचारवंत, सामाजिक, राजकीय सांस्कृतिक अभ्यासक अशी ओळख एस. एल अक्कीसागर यांची राहिली आहे. श्री. शेफर्ड इंडिया इंटरनॅशनलच्या स्थापनेपासून काम करत आहेत. शेफर्ड इंडिया इंटरनॅशनलचे संथापक अध्यक्षतेखाली झालेल्या विशेष सभेत ही नेमणूक झाली. त्यांच्या समवेत कर्नाटक मागासवर्गीय आयोगाचे माजी अध्यक्ष व विद्यमान कोपल विद्यापीठाचे बी. के. रावी, श्री एम जयप्पा, श्री बि. के कोन्नूर, श्रीमती प्रेमलथा यांची सुद्धा निवड झाली होती. १० ठराव युक्त निवेदन संघटनेकडे सुपूर्द केला. मसुदा समितीची बेंगळुरू येथे खास बैठक झाली. बेळगाव येथे पार पडलेल्या महाअधिवेशनात ठराव मांडण्यात आले आणि एकमताने मंजूर झाले. खास सन्मानीत मुख्यमंत्री श्री सिद्दरामय्या यांचेकडे ठराव युक्त निवेदन सुपूर्द करण्यात आले.
No comments:
Post a Comment