राष्ट्रीय समाज पक्षाचे उमेदवार निवडून आणा : महादेव जानकर
जन स्वराज यात्रेत महादेव जानकर यांच्यावर लक्ष्मी दहीवडी ता - मंगळवेढा येथे जेसीबी द्वारे पुष्पवृष्टी करण्यात आली. |
मंगळवेढा : (६/५/२३) यशवंत नायक ब्यूरो
सत्यशोधन, समाज प्रबोधन, राष्ट्र संघटन या विचाराने उपेक्षित गोरगरीब जनतेच्या अडीअडचणी समजून घेण्यासाठी राष्ट्रीय समाज पक्षाने जन स्वराज यात्रा काढली. येत्या पंचायत समिती, जिल्हा परिषद,विधानसभा व लोकसभा निवडणुकीत राष्ट्रीय समाज पक्षाचे उमेदवारांना निवडून द्या. भाजप, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसला मते देऊ नका, असे आवाहन राष्ट्रीय समाज पक्षाचे संस्थापक अध्यक्ष महादेव जानकर यांनी केले. आ. महादेव जानकर हे राष्ट्रीय समाज पक्षाच्यावतीने जन स्वराज यात्रेत नंदेश्वर येथे बोलत होते. राष्ट्रीय समाज पक्षाची सोलापूर लोकसभा मतदार क्षेत्र जनस्वराज यात्रा ही संत दामाजीपंत समाधीचे दर्शन घेऊन मंगळवेढ्यातून सकाळी आठ वाजता राष्ट्रीय समाज पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष महादेव जानकर यांच्या नेतृत्वाखाली सुरुवात करण्यात आली.
मोहोळ जि- सोलापूर येथे महिला भगिनींनी राष्ट्रनायक आ. महादेव जानकर यांचे औक्षण करून पैशांचा हार घालून स्वागत केले. |
पुढील गावातून जन स्वराज यात्रा पोहचली. मरवडे, हुलजंती, सलगर खुर्द, सलगर बुद्रुक, मारोळी, हुन्नूर, भोसे, नंदेश्वर, पाटकळ, आंधळगाव, लक्ष्मीदहिवडी, गुंजेगाव, धनाळी, तपकिरी शेटफळ, कासेगाव, अनवली चौक, रांजणी, निपतगाव, ओझेवाडी, दामाजी कारखाना चौक, उंचीठाण, बठाण, आंबेचिंचोली, शंकरगाव, पुळूज टाकळी, सिकंदर चौक इत्यादी गावातून पुढे मोहोळकडे रॅली रवाना झाली. यावेळी राष्ट्रीय महासचिव कुमार सुशील, केंद्रीय संघटनमंत्री बाळकृष्ण लेंगरे, गोविंदराव शुरनर, महाराष्ट्र राज्य मुख्य महासचिव ज्ञानेश्वर सलगर, राज्य सरचिटणीस तथा सोलापूर जिल्हा नियोजन समितीचे सदस्य सोमनाथ मोटे, प. महाराष्ट्र अध्यक्ष एड. संजय माने, प. उपाध्यक्ष सुनीलदादा बंडगर, प. महाराष्ट्र युवक आघाडी अध्यक्ष अजित पाटील, विद्यार्थी आघाडी अध्यक्ष पंकज देवकाते, सोलापूर जिल्हाध्यक्ष अशोक ढोणे, युवक जिल्हाध्यक्ष दामाजी मेटकरी, परमेश्वर पुजारी, महाळाप्पा खांडेकर, संजय लवटे, बाळासाहेब लवटे, अण्णासाहेब गरंडे, नितीन मेटकरी, मनीषा ठोंबरे आदी कार्यकर्ते उपस्थित होते.
No comments:
Post a Comment