Monday, October 16, 2023

महाराष्ट्र राज्याच्या विकाससाठी राष्ट्रीय समाज पक्षाला सत्तेत स्थान द्या : महादेव जानकर

महाराष्ट्र राज्याच्या विकाससाठी राष्ट्रीय समाज पक्षाला सत्तेत स्थान द्या : महादेव जानकर 


धाराशिव लोकसभा मतदार क्षेत्रात  राष्ट्रीय समाज पक्ष जन स्वराज यात्रा धूमधडाक्यात 


भूम : (५/१०/२०२३) यशवंत नायक ब्यूरो

महाराष्ट्र राज्याच्या विकासासाठी, जनतेच्या हितासाठी, राष्ट्रीय समाज पक्षाला सत्तेत स्थान द्यावे, असे आवाहन राष्ट्रीय समाज पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष माजी मंत्री महादेव जानकर यांनी गुरुवारी भूम येथे केले. 'आमच्या मागे ईडी, पिडी लावा, आम्ही कोणाला घाबरत नाही. भाजप मित्र पक्षाला जवळ घेत मातीत घालण्याचे काम करत आहे, असा आरोप जानकर यांनी यावेळी केला.

भूम जि - धाराशिव येथे जाहीर सभेत बोलताना रासप नेते महादेव जानकर, फुलेपिठावर बसलेले गोविंदराव शुरनर, बाळकृष्ण लेंगरे, कुमार सुशील, ज्ञानेश्वर सलगर, अश्रुबा कोळेकर, विकास पाटील.

रासपचे अध्यक्ष जानकर यांची जनस्वराज यात्रा भूम येथे आली. यावेळी नगरपालिका समोर झालेल्या सभेत ते बोलत होते. यात्रेच्या माध्यमातून मतदारांच्या समस्या व सद्यस्थितीत निर्माण झालेली शेतकऱ्यांची दोलायमान स्थिती विचारात घेत संवाद साधण्यासाठी भूम येथे आलो आहे. भाजप सरकार धनगर बांधवांनी आरक्षण मागितले की, आदिवासी बांधवांना भडकवते तर मराठा बांधवांनी आरक्षण मागितले की ओबीसींना भडकवते. भाजप जाती-जातीमध्ये भांडणे लावून खाजगीकरण करत आहे. परंतु तुम्ही भांडण करू नका, तुम्ही उद्योग नोकरी करा. नाहीतर ते तुमचे ते वाटोळे करणार आहेत. निवडणुकीत पैसे घेऊन मतदान करू नका. माझ्या पक्षाचे उमेदवार जर पैसे दिले तर बुटाने हाना. तसेच व्यसनापासून लांब राहा. सरकारने शेतकऱ्यांना वेळेवर वीज, पिकांना चांगला भाव द्यावा. सभेला संबंधित करण्याअगोदर जानकर मंचासमोरील शेतकऱ्यांमध्ये बसले होते. यावेळी राष्ट्रीय महासचिव कुमार सुशील, राष्ट्रीय संघटक बाळकृष्ण लेंगरे, गोविंदराव शूरनर, राज्य महासचिव ज्ञानेश्वर सलगर, रासपचे मराठवाडा अध्यक्ष प्रा. विष्णू गोरे, राज्य कार्यकारणी सदस्य आश्रुबा कोळेकर, नानासाहेब मदने, जिल्हाध्यक्ष एड.विकास पाटील, तालुकाध्यक्ष गजानन सोलंकर, पंडित मरकड, गणेश जगदाळे, सचिन देवकते, मनोज पाडूळे, सचिन जगताप, व रासपचे पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.

No comments:

Post a Comment

चागंले संस्कार टिकविण्यासाठी वाचन संस्कृतीची गरज : डॉ. शंकर स्वामी वडेपुरीकर

चागंले संस्कार टिकविण्यासाठी वाचन संस्कृतीची गरज : डॉ. शंकर स्वामी वडेपुरीकर ‌पु.अहिल्यादेवी वाचनालयात " वाचन संकल्प महाराष्ट्राचा...