Monday, October 16, 2023

छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांच राज या देशावर यावे : महादेव जानकर

छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांच राज या देशावर यावे : महादेव जानकर 

छत्रपती शिवाजीराजे यांना अभिवादन करून जन स्वराज यात्रेची भूमिका मांडताना रासप सुप्रीमो महादेव जानकर
 

किल्ले शिवनेरी येथून निघालेल्या रासपच्या जन स्वराज यात्रेस जनतेचा तुफान प्रतिसाद 

जुन्नर : (१६/९/२३)| यशवंत नायक ब्यूरो 

छत्रपती शिवाजी महाराजांचा आदर्श घेऊन, छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचाराचं समतामूलक राष्ट्रीय समाजाच राज्य या देशावर आणण्याचा निश्चय करून किल्ले शिवनेरी पासून शिरूर लोकसभा मतदार क्षेत्रात राष्ट्रीय समाज पक्षाच्या जन स्वराज यात्रेस सुरूवात केली आहे, असे मत पत्रकारांशी बोलताना आ. महादेव जानकर यांनी व्यक्त केले.

आ. जानकर पुढे म्हणाले, नारायणगाव येथे रासपच्या जन स्वराज यात्रेचे स्वागत करण्यात आले. शेतकरी राजा आहे. शेतकऱ्यांना उत्तम बियाणे, खत, पाणी उपलब्ध करून देणे आवश्यक आहे. आज शेतकरी टाहो फोडत आहे, त्यांच्या  प्रश्नाकडे राज्यकर्ते डोळेझाक करत आहे. शेतकरी, युवक, महिला यांच्या बाजूने राष्ट्रीय समाज पक्ष आहे. शेतकऱ्यांनी मोठ्या पार्ट्यांना मत न देता राष्ट्रीय समाज पक्षाला मत दिल्यास रासपचे आमदार खासदार वाढवल्यास शेतकऱ्यांच्या मनातील सरकार बनवू.

आंबेगाव येथे पत्रकारांशी संवाद साधताना आ. महादेव जानकर 

जन स्वराज यात्रेचे शनिवार दिनांक १६ सप्टेंबर रोजी आंबेगाव तालुक्यातील मंचर येथे सर्व जाती धर्माच्या कार्यकर्त्यांनी जोरदार स्वागत केले.  मराठा, मुस्लीम व धनगर या समाजाच्या आरक्षणाचा प्रश्न सत्तेत आल्यानंतर दोनच दिवसांत मार्गी लावण्यात येईल, अशी ग्वाही त्यांनी दिली. जानकर यांनी या वेळी काँग्रेस आणि भाजपवर सडकून टीका केली.

जानकर म्हणाले की, काँग्रेस आणि भाजप कधीही आरक्षण देणार नाहीत. कारण, या पक्षांनी जनतेला गेली अनेक वर्षे झुलवत ठेवण्याचे काम केले आहे. मागील निवडणुकीत आम्ही भाजपबरोबर होतो. पण त्यांना आता छोट्या पक्षाची गरज वाटत नाही, त्यामुळे आम्ही विविध राज्यात रथयात्रेच्या माध्यमातून राष्ट्रीय समाज बळकट करण्याचा प्रयत्न करत आहोत. गावोगावी आम्हाला लोकांचा प्रतिसादही चांगला मिळत आहे. आम्ही स्वबळाचा मार्ग निवडला आहे. सर्व जाती धर्माच्या लोकांना बरोबर घेऊन रासपची पक्षसंघटना मजबूत करण्याचे काम करण्यात येत आहे. आम्हाला विचारल्याशिवाय राज्यात व देशात सत्ता स्थापन होऊ शकणार नाही, असे संख्याबळ आम्हाला तयार करायचे आहे, असेही त्यांनी नमूद केले.

बुर्केगाव ता- हवेली जि- पुणे येथे जन स्वराज यात्रेत आ. महादेव जानकर साहेब यांचे ग्रामस्थांनी स्वागत केले.

उरळी कांचन येथे आ. महादेव जानकर यांची घोड्यावरून मिरवणूक काढली. लोणी काळभोर येथे जेसीबीच्या सहाय्याने पुष्वृष्टी करण्यात आली. चाकण येथे राष्ट्रीय समाज पक्षाचे शाखेचे उद्घघाटन करण्यात आले. ठिकठिकाणी स्वागत करण्यात आले. यावेळी राष्ट्रीय समाज पक्षाचे राष्ट्रीय महासचिव कुमार सुशील, राष्ट्रीय संघटक गोविंदराव शुरनर, ज्ञानेश्वर  सलगर, युवक आघाडी अध्यक्ष अजित पाटील, शिरुर लोकसभा प्रभारी सचिन गुरव, अॅड. संजय माने, पुणे जिल्हाध्यक्ष विनायक रुपनवर, सचिन लोंढे, भाऊसाहेब घोडे, योगेश धरम, गोविंद गोरे आदी उपस्थित होते.



No comments:

Post a Comment

चागंले संस्कार टिकविण्यासाठी वाचन संस्कृतीची गरज : डॉ. शंकर स्वामी वडेपुरीकर

चागंले संस्कार टिकविण्यासाठी वाचन संस्कृतीची गरज : डॉ. शंकर स्वामी वडेपुरीकर ‌पु.अहिल्यादेवी वाचनालयात " वाचन संकल्प महाराष्ट्राचा...