Monday, October 16, 2023

राष्ट्रीय समाज पक्ष असली सोनं आहे, त्यास साथ द्या : महादेव जानकर

राष्ट्रीय समाज पक्ष असली सोनं आहे, त्यास साथ द्या : महादेव जानकर

नेवासा येथे आ. महादेव जानकर साहेब यांना  पैशांचा नोटांचा हार घालून जन स्वराज यात्रेचे स्वागत केले. मंचावर राष्ट्रीय संघटक बाळकृष्ण लेंगरे, ज्ञानेश्वर सलगर, रविंद्र कोठारी, संतोष काळे- पाटील.

नेवासा : (२४/९/२३) यशवंत नायक ब्यूरो 

शेतकरी, कामगार, युवक, विद्यार्थी, महिला यांच्यासाठी राष्ट्रीय समाज पक्ष लढत आहे.राष्ट्रीय समाज पक्ष असली सोनं आहे. त्यास साथ द्यावी, असे आवाहन राष्ट्रीय समाज पक्षाचे संस्थापक राष्ट्रीय अध्यक्ष महादेव जानकर यांनी केले. शिर्डी लोकसभा जन स्वराज यात्रा नेवासा तालुक्यात पाचेगाव येथे आली. नंतर इमामपूर, गोणेगाव, निंभारी, करजगाव, तामसवाडी, माळीचिंचोरा, भानसहिवरा, भेंडे, कुकाणे, तरवडी, वाकडी, गेवराई, शिरसगाव, सलाबतपुर, खडका, नेवासे फाटा मार्गे निघालेल्या जन स्वराज यात्रेचे जोरदार स्वागत करण्यात आले.

नगरपंचायत चौक येथे झालेल्या सांगता सभेत आ. जानकर पुढे म्हणाले, शिर्डी लोकसभा मतदारसंघाची जागा रासप पूर्ण ताकतीने लढवणार असून, नेवासा मतदारसंघात जिल्हा परिषद, नगरपंचायत, पंचायत समितीचे खाते खोला. नेवासा ही संत ज्ञानेश्वरांची नगरी आहे. मला हिंदकेसरी खेळायची सवय आहे, त्यामुळे नेवासा मतदार संघात लढायची तयारी ठेवा.  आपण नेवासा विधान मतदारसंघात हे बंदोबस्त चांगला करू. मी राष्ट्रवादी किंवा भाजपचा चमच्या म्हणून येथे आलो नाही. माझ्या पक्षाचा आमदार म्हणून येथे आलो आहे. याठिकाणी राष्ट्रीय समाज पक्षाचे खाते उघडा. जनतेचे प्रश्न घेऊन, जनतेच्या दरबारात जावा. तुमच्या पाठीशी खंबीरपणे ताकद उभी केल्याशिवाय राहणार नाही. ३३ वर्षे घरी गेलो नाही. जनता हीच मायबाप आहे. देशभर फिरून काम करतोय. मराठा, दलित, मुस्लीम, ओबीसी समाजाने स्वागत केले. रासपच्या जन स्वराज यात्रेत आलेल्या गाड्या कार्यकर्त्यांचा आहेत. हाच कार्यक्रम भाजप, काँगेसला घ्यायचा असता तर कारखान्यावरून बॉक्स आले असते. पण आमची स्वाभिमानाची माणस आहेत. येथे स्थानीक स्वराज्य संस्थाच्या निवडणुका जिंकल्या पाहिजेत. गावागावांत राष्ट्रीय समाज पक्ष पोहचला पाहिजे. ज्यांना वाटतया, आपण खासदार होऊ, त्यांना घरी बसवायची ताकद राष्ट्रीय समाज पक्षाकडे आहे.

यावेळी राज्य महासचिव कुमार सुशील, राज्य सचिव रविंद्र कोठारी, उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष शरद बाचकर, जिल्हाध्यक्ष नानासाहेब जुंधारे, शशिकांत मतकर सय्यदबाबा शेख, डॉ. प्रल्हाद पाटील, संतोष काळे - पाटील, सुवर्णा जऱ्हाड आदी उपस्थित होते.

No comments:

Post a Comment

चागंले संस्कार टिकविण्यासाठी वाचन संस्कृतीची गरज : डॉ. शंकर स्वामी वडेपुरीकर

चागंले संस्कार टिकविण्यासाठी वाचन संस्कृतीची गरज : डॉ. शंकर स्वामी वडेपुरीकर ‌पु.अहिल्यादेवी वाचनालयात " वाचन संकल्प महाराष्ट्राचा...