राष्ट्रीय समाज पक्ष सत्तेत आल्यास दुसऱ्याला आरक्षण मागावे लागणार नाही : महादेव जानकर
न्हावरे ता- शिरूर येथे बोलताना रासप राष्ट्रीय नेते महादेव जानकर. फुलेपिठावर शिवाजीराव कुऱ्हाडे, संजय माने पाटील, गोविंदराव शुरनर, ज्ञानेश्वर सलगर, पिंगळे ताई, सुवर्णाताई जऱ्हाड. |
न्हावरे : (१७/९/२०२३) यशवंत नायक ब्यूरो
आपल्या विचाराचा पक्ष वाढला. सत्तेत आला तर दुसऱ्याला आरक्षण मागावे लागणार नाही, असे प्रतिपादन संस्थापक अध्यक्ष आ. महादेव जानकर यांनी न्हावरे येथे शिरूर लोकसभा जन स्वराज यात्रा सांगता सभेत केले.
आ. महादेव जानकर आपल्या भाषणात म्हणाले, मागच्या निवडणुकीत शिरूर विधानसभेत दुसऱ्यासाठी परिवर्तन केलं. पण आता आपल्या राष्ट्रीय समाज पक्षाचा स्वतःचा झेंडा आणि स्वाभिमान उभा राहिला पाहिजे. राष्ट्रीय समाज पक्षात सर्व समाजाची लोक आहेत. भाजप, काँगेस, राष्ट्रवादी, शिवसेना यांच्यावरील जनतेचा विश्वास उडाला आहे. देशाचे प्रधानमंत्री भोपाळमध्ये राष्ट्रवादी पक्षाने 70 हजार कोटीचा घोटाळा केल्याचे सांगतात आणि चार दिवसांनी त्यांच्याबरोबरच सत्ता स्थापन करतात. तुम्ही गप, आम्ही गप असा प्रस्तापित पक्षांचा छुपा अजेंडा आहे. पण आम्ही राष्ट्रीय समाज पक्ष गप्प नाही. जनतेसाठी जनतेच्या हितासाठी आम्ही काम करतो. स्वतःसाठी काही करत नाही. बाकीचे पक्ष स्वतःच्या मुलाबाळासाठी काम करतात. महादेव जानकरला पुतण्यासाठी काही करायचे नाही, या देशातील तमाम जनतेसाठी करायच आहे.
आपल्या पोरांनी केंद्रातल्या परीक्षा दिल्या पाहिजेत. आपल्याला आरक्षण देतील पण सगळीकडे आता खाजगीकरण केले आहे. मोदींनी डायरेक्ट थेट कलेक्टर करायचं धोरण स्वीकारल आहे. भारताच्या लोकसभेचे सभापती ओम बिर्ला यांच्या मुलीला मोदी साहेबांनी डायरेक्ट कलेक्टर केलेल आहे. आपल्या मुलांना चांगल शिक्षण द्या. अमेरिकेत नोबेल मिळतात. आपले पीएचडी मिळवतात तेही नीट नसतात. पाट्या टाकायचं काम प्राध्यापक करतो. तुमचा मंत्री नाही, टिव्ही चॅनल नाही, दैनिक नाही, प्राध्यापक नाही. ही अवस्था आहे.
शाहू महाराजांनी या देशात पहिला आरक्षण दिलं, त्या शाहू महाराजांच्या समाजाला आरक्षण मागावे लागते ही शोकांतिका आहे. मुख्यमंत्री, मंत्री, कारखाना, सूतगिरण्या दूधसंघ त्यांचं आणि वॉचमन आमच अस असताना तरी आरक्षण मागावे लागतेय. हे समजून घ्या. आज मत मागण्यासाठी आलो नाही. ज्यांना मत दिली, त्यांनी धोका कसा दिला, हे सांगण्यासाठी जनस्वराज यात्रा राष्ट्रीय समाज पक्षाची घेऊन आलो आहे. शिरूर लोकसभा मतदारसंघ राष्ट्रीय समाज पक्ष जिंकू शकतो, हा आत्मविश्वास देण्यासाठी आलो आहे. आपलं साधन, आपला पैसा, आपला झेंडा, आपला दांडा असेल तरच दिल्ली आणि मुंबईत आपण सत्तेत बसू शकतो.
यावेळी महात्मा फुले पिठावर राष्ट्रीय समाज पक्षाचे राष्ट्रीय महासचिव कुमार सुशील, राष्ट्रीय संघटक गोविंदराव शुरनर, महाराष्ट्र राज्य महासचिव ज्ञानेश्वर सलगर, पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष एड. संजय माने, उपाध्यक्ष सुनील बंडगर, पुणे जिल्हाध्यक्ष विनायक रुपनवर, रामकृष्ण बिडगर, संजय बारहाते, सुनिताताई कीरवे, सुवर्णाताई जऱ्हाड, शिवाजीराव कुऱ्हाडे, भरत गडदे, पिंगळेताई, पै. जांभळकर आदी उपस्थित होते.
No comments:
Post a Comment