Thursday, October 26, 2023

यशवंत नायक ऑक्टोबर: २०२३

 





🐎यशवंत नायक – ऑक्टोबर 2023🐎

*वाचक मित्रानो, 🙏*

*या अंकात काय वाचाल...*

पान १

_*राजकीय जाण (Political Sense) नसलेला समाज आर्थिक, सामाजिक, शैक्षणिक क्षेत्रात मागे राहिल्याने 'गुलाम समाज' बनला.*_

पान -२

_*राजकीय जागृती (Political awareness) असलेला समाज आर्थिक संपदा आणि सामाजिक प्रतिष्ठा मिळवून 'स्वआधीन समाज' बनतो.*_

पान -३

_*राजकीय सत्ता (Political Power) असलेला समाज आपले, आपल्या समजाचे, आपल्या देशाचे सर्वगामी कल्याण साधून 'प्रगत समाज' बनतो.*_

*मुख्य बातम्या –*

पान १

@ जुन्नर (यशवंत नायक ब्यूरो) : *छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचाराच राज या देशावर यावे : महादेव जानकर*

> *किल्ले शिवनेरी येथून निघालेल्या जन स्वराज यात्रेस जनतेचा तुफान प्रतिसाद* 

> *रासपचे सरकार १० मिनिटात मराठा, धनगर समाज आरक्षण प्रश्न सोडवेल*

@ सांगली (यशवंत नायक ब्यूरो) : *काँगेस आणि भाजपला पाणी पाजल्याशिवाय जतला  पाणी मिळणार नाही : महादेव जानकर*

> *काँग्रेस आणि भाजपला मत दिल्यास विकास होणार नाही, तर भकास होईल*

@ न्हावरे -शिरूर (यशवंत नायक ब्यूरो) : *राष्ट्रीय समाज पक्ष सत्तेत आल्यावर दुसऱ्याला आरक्षण मागावे लागणार नाही : महादेव जानकर*

> *देशाचे प्रधानमंत्री ज्यांच्यावर महाराष्ट्रात ७० हजार कोटींचा घोटाळ्याचा आरोप करतात, चार दिवसाने त्यांच्यासोबतच सत्ता स्थापन करतात.

पान : २

@ बेळगाव - कर्नाटक (यशवंत नायक ब्यूरो) : *सर्व वंचित घटकांनी संघटित होऊन संविधानिक अधिकार मिळवले पाहीजेत : सिद्धरामय्या, मुख्यमंत्री कर्नाटक*

> *दिल्लीची सर्वोच्च सत्ता ताब्यात घेऊनच उपेक्षित समाजाचे प्रश्न सोडवता येतील : महादेव जानकर*

> *शेफर्ड इंडीया इंटरनॅशनलचे अधिवेशनात १० ठराव मांडले*

@ मंगळवेढा (यशवंत नायक ब्यूरो) : *राष्ट्रीय समाज पक्षाचे उमेदवार निवडून आणा : महादेव जानकर*

> *ठिकठिकाणी नोटांचे हार घालून महादेव जानकर यांचे स्वागत*

@ कोल्हार - अहमदनगर (यशवंत नायक ब्यूरो) : *आरक्षण मिळविण्यासाठी आमदार खासदार वाढवणे गरजेचे : महादेव जानकर*

> *कोल्हार मातेच दर्शन घेऊन शिर्डी लोकसभा मतदार क्षेत्रात राष्ट्रीय समाज पक्षाची जन स्वराज यात्रा*

@ पारडा - हिंगोली (यशवंत नायक ब्यूरो) : *शेतकऱ्याना उभारी मिळण्यासाठी; पिकविमा देण्याची राष्ट्रीय समाज पक्षाची मागणी*

पान : ३ 

@ कळंबोली - नवी मुंबई (यशवंत नायक ब्यूरो) : *देशावर सम्राट अशोकाचे शासन आणण्यासाठी यशवंत नायक काम करेल*

> *विश्वाचा यशवंत नायकचा ३० वा वर्धापन दिन सभासद नोंदणी व पेढे वाटून उत्सहात साजरा*

@ मुंबई - राष्ट्रीयालय : (यशवंत नायक ब्यूरो)

*मेंढपाळ पुत्र निघाला इंगलंडला; राष्ट्रीय समाज पक्षाने दिल्या शुभेच्छा*

@  बंगळुरू : *शेफर्ड इंडीया इंटरनॅशनलच्या राज्य आणि केंद्र सरकारला द्यायच्या निवेदन व मसुदा समितीचे अध्यक्षपदी एस. एल. अक्कीसागर यांची निवड*

@ मुंबई (यशवंत नायक ब्यूरो) : *रासेफ परिवार तर्फे यशवंत नायकच्या वाचक, हितचिंतक यांना वर्धापन दिनाच्या शुभेच्छा*

पान : ४

@ अक्कलकोट (यशवंत नायक ब्यूरो) : *भाजप पासून एक एक मित्र बाहेर पडत आहे, त्यांना पद्धतशीर उत्तर देऊ : महादेव जानकर*

> *सोलापूर लोकसभा मतदार क्षेत्रात जन स्वराज यात्रेचे जंगी स्वागत*

> *सुनिलदादा बंडगर यांनी विधानसभेची तयारी करावी*

@ धाराशिव (यशवंत नायक ब्यूरो) : *महाराष्ट्र राज्याच्या विकासासाठी राष्ट्रीय समाज पक्षाला सत्तेत स्थान द्या : महादेव जानकर*

> *धाराशिव लोकसभा मतदार क्षेत्रात राष्ट्रीय समाज पक्षाची जन स्वराज यात्रा धूमधडाक्यात*

> *भाजप सरकार धनगर बांधवांनी आरक्षण मागीतल्यास आदिवासींना भडकवते तर मराठा बांधवांनी आरक्षण मागितल्यास ओबीसींना भडकवते*

@ नेवासा (यशवंत नायक ब्यूरो) : *राष्ट्रीय समाज पक्ष असली सोनं आहे, त्यास साथ द्या : महादेव जानकर*

> *जनता हीच मायबाप, नेवासा विधानसभा मतदारसंघात तयारीला लागा*

_*यशवंत नायक वाचा म्हणजे वाचाल*_

_*यशवंत नायक आपला खरा आणि प्रथम प्रतिनिधि आहे*_

_*यशवंत नायक आपला राष्ट्र आणि समाज प्रतिनिधि आहे...*_


_ सिद्ध - सागर

कार्यकारी संपादक

Monday, October 23, 2023

विषबाधा झालेली मेंढरं वाचवण्यासाठी राष्ट्रीय समाज पक्षाचे सर्वोत्परी प्रयत्न

विषबाधा झालेली मेंढरं वाचवण्यासाठी राष्ट्रीय समाज पक्षाचे सर्वोत्परी प्रयत्न

खालापूर : यशवंत नायक ब्यूरो 

वनवटे ता - खालापूर जि- रायगड येथे मेंढपाळांच्या बकऱ्यांना विषबाधा झाली  होती.  शेळ्या मेंढ्या धरणीवर कोसळत असल्याने मेंढपाळांवर मोठे संकट उभे ठाकले होते. त्याप्रसंगी  रासपच्यावतीने सर्वतोपरी प्रयत्न करून मेंढपाळांना मोठ्या आर्थिक संकटातून वाचवण्यासाठी कळपाकडे धाव घेऊन, तातडीने बाधित मेंढ्यावर वैद्यकीय उपचार करण्यासाठी पशुसंवर्धन विभागाची रायगड  जिल्ह्याची संपूर्ण टीम पाचारण केली. विषबाधित झालेल्या मेंढरांवर वैद्यकीय उपचार करून त्यांना जीवदान दिले. यावेळी पत्रकार, तहसील ऑफिसमधील प्रतिनिधी व पशुसंवर्धन विभागाचे सर्व वैद्यकीय अधिकारी व पशुसंवर्धन उपायुक्त श्री. काळे साहेब व श्री. लाळगे साहेब व त्यांचे सर्व सहकारी तसेच राष्ट्रीय समाज पक्षाच्या पक्षाच्यावतीने सर्व श्री. भगवान ढेबे साहेब - प्रदेश कार्यकारणी सदस्य, श्री. संपत ढेबे रायगड जिल्हा अध्यक्ष, कु. विजय ढेबे युवा आघाडी उपाध्यक्ष, रासप  नेते अरुण मोरे खालापूर तालुका खजिनदार व सर्व पदाधिकारी  सदर प्रसंगी उपस्थित होते.  कठीण संकटमयप्रसंगी केलेल्या सहकार्याबद्दल मेंढपाळ श्री कोकरे आणि परिवार यांनी सर्वांचे आभार मानले.

Wednesday, October 18, 2023

शेफर्ड इंडिया इंटरनॅशनलच्या राज्य आणि केंद्र सरकारला द्यावयाच्या निवेदन मसुदा समिती अध्यक्षपदी एस एल अक्कीसागर यांची निवड

शेफर्ड इंडिया इंटरनॅशनलच्या राज्य आणि केंद्र सरकारला द्यावयाच्या निवेदन मसुदा समिती अध्यक्षपदी  एस एल अक्कीसागर यांची निवड 

१० ठराव युक्त निवेदन मुख्यमंत्री सिद्धरामय्याकडे केले सुपूर्द

बंगळुरू : यशवंत नायक ब्यूरो 

देशभरातील मेष- पशुपालकांसाठी स्थापन झालेल्या सर्वोच्च संघटनेच्या राज्य आणि केंद्र सरकारला द्यावयाच्या निवेदन मसुदा समितीवर एस. एल. अक्कीसागर यांची सर्वानुमते निवड करण्यात आली.  थोर विचारवंत, सामाजिक, राजकीय सांस्कृतिक अभ्यासक अशी ओळख एस. एल अक्कीसागर यांची राहिली आहे. श्री. शेफर्ड इंडिया इंटरनॅशनलच्या स्थापनेपासून काम करत आहेत. शेफर्ड इंडिया इंटरनॅशनलचे संथापक अध्यक्षतेखाली झालेल्या विशेष सभेत ही नेमणूक झाली.  त्यांच्या समवेत कर्नाटक मागासवर्गीय आयोगाचे माजी अध्यक्ष व विद्यमान कोपल विद्यापीठाचे बी. के. रावी, श्री एम जयप्पा, श्री बि. के कोन्नूर, श्रीमती प्रेमलथा यांची सुद्धा निवड झाली होती.  १० ठराव युक्त निवेदन संघटनेकडे सुपूर्द केला.  मसुदा समितीची बेंगळुरू येथे खास बैठक झाली. बेळगाव येथे पार पडलेल्या महाअधिवेशनात ठराव मांडण्यात आले आणि एकमताने मंजूर झाले. खास सन्मानीत मुख्यमंत्री श्री सिद्दरामय्या यांचेकडे ठराव युक्त  निवेदन सुपूर्द करण्यात आले.

देशावर सम्राट अशोकाचे शासन आणण्यासाठी यशवंत नायक काम करेल

देशावर सम्राट अशोकाचे शासन आणण्यासाठी यशवंत नायक काम करेल

विश्वाचा यशवंत नायक ३० वा वर्धापनदिन उत्सहात साजरा

कळंबोली (२९/९/२०२३) : मासिक विश्वाचा यशवंत नायक अंकास २९ वर्ष पूर्ण होऊन, ३० व्या वर्षांत पदार्पण केल्याने यशवंत नायकचे कार्यकारी संपादक श्री. आबासो पुकळे यांनी हॉटेल मॅकडोनालड हॉटेल येथे उपस्थितांना पेढे भरवून आनंद व्यक्त केला. वर्धापन दिनानिमित्त  हितचिंतक यांना शुभेच्छा दिल्या. भारत देशावर सम्राट अशोकाचे शासन आणण्यासाठी यशवंत नायक काम करेल, असे उदगार कार्यकारी संपादक यांनी काढले. यावेळी यशवंत नायकचे छायाचित्रकार श्री. ऋषिकेश जरग, वाचक चैतन्य जरग, अंकुर जरग, शशिकांत मोरे यांनी यशवंत नायक अंकातील लेखन, बातम्या वाचून यशवंत नायकला पुढील वाटचालीस शुभेच्छ्या दिल्या. तसेच क्षणाचाही विचार न करता रोख व आँनलाईन पैसे भरून यशवंत नायक अंकाचे सभासदही झाले. कळंबोली कॉलनीत पुढे यशवंत नायकचे वाचक प्रा. श्री. दत्ता अनुसे सर यांनी यशवंत नायक वर्धापन दिनाच्या शुभेच्छा देऊन, पंचवार्षिक सभासदत्वही स्वीकारले.  रासेफ परिवार, रासप पदाधिकारी/कार्यकर्ते, यशवंत नायक परिवारातील सदस्य यांच्याकडून काल दिवसभर शुभेछ्यांचा वर्षाव झाला. येथून पुढेही असेच प्रेम राहू द्या. यशवंत नायक मोठ्या उमेदिने स्पर्धेच्या युगात आपले काम जोमाने करेल, असा विश्वास वाटतो. तत्पूर्वी कुलस्वामीनी आई चिंचणी मायाक्कादेवी चरणी यशवंत नायक अंक अर्पण केला व मंदिराचे पूजारी श्री.कोळेकर यांना यशवंत नायक अंक भेट दिला.













वाराणसी लोकसभा मतदार क्षेत्रात राष्ट्रीय समाज पक्षाची जन स्वराज यात्रा

वाराणसी लोकसभा मतदार क्षेत्रात राष्ट्रीय समाज पक्षाची जन स्वराज यात्रा

वाराणसी : उत्तर प्रदेश|यशवंत नायक ब्यूरो 

वाराणसी लोकसभा मतदार क्षेत्रात राष्ट्रीय समाज पक्ष निवडणूक ताकदीने लढणार आहे. पदाधिकारी कार्यकर्ते यांनी तयारीला लागा, असे आवाहन राष्ट्रीय समाज पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष महादेव जानकर यांनी केले. दरम्यान राष्ट्रीय समाज पक्षचे संस्थापक महादेवजी जानकर साहेब यांचे वाराणसी लोकसभा जन स्वराज यात्रेसाठी लालबहादुर शास्त्री विमानतल बाबतपुर वाराणसी येथे आगमन झाल्यावर राष्ट्रीय समाज पक्षचे उत्तर प्रदेश प्रदेशाध्यक्ष श्री चंद्रपालजी - कानपुर, रमाशंकर पाल - जौनपुर, शिवकुमार पाल - वाराणसी, राजाराम पाल - भदोही, रामजीत व अन्य स्थानिक पदाधिकारी यांनी स्वागत केले.

ज्यांना वाचता येत नाही, त्यांनी यशवंत नायक सांभाळला : एस एल अक्कीसागर

ज्यांना वाचता येत नाही, त्यांनी यशवंत नायक सांभाळला  :  एस. एल. अक्कीसागर

मुंबई : (२६/९/२३) यशवंत नायक ब्यूरो

यशवंत नायक अंकाच्या घड्या घालण्यासाठी रिक्षावाले, कष्टकरी लोक येत होते. सुशिक्षित वर्ग हा छोट्या-मोठ्या सत्तेच्या मागे गेला. समाजाचे वाटोळ होण्यास समाजाचे नेते जबाबदार आहेत. ज्यांना वाचता येत नाही, त्यांनी यशवंत नायक सांभाळला, असे प्रतिपादन यशवंत नायकचे कार्यकारी संपादक एस एल अक्कीसागर यांनी केले. रासेफ व यशवंत नायक यांच्यातर्फे मासिक विश्वाचा यशवंत नायक अंकास २९ वर्षे पूर्ण होऊन ३० व्या वर्षांत पदार्पण करत असल्याने वर्धापन दिनाचे आयोजन करण्यात आले होते. 

यशवंत नायकचे मुख्य कार्यकारी संपादक मार्गदर्शक एस. एल अक्कीसागर यांनी उपस्थितांसमोर यशवंत नायकचा आजवरचा प्रवास मांडताना आपल्या भाषणात म्हणाले, आज यशवंत नायकला 30 वर्षे पूर्ण होऊन 31 वर्षात पदार्पण होत असल्याने मला आनंद होत आहे आणि त्याचा गर्व ही आहे. एकदा लोकसत्तेत बातमी आली. यशवंत सेनेत फूट? त्यावेळी मी भांडुप येथे राहत होतो. नंतर कुर्ला येथे जानकर साहेबांची भेट झाली. 15 मार्च 1994 चा दिवस दादर शिवाजी पार्क येथे बहुजन समाजाचा दिवस होता. जानकर साहेबांनी माझी यशवंत सेनेच्या सरचिटणीसपदी घोषणा केली. त्यावेळेस मला वाटलं आपला एक पत्रक असाव. त्या अगोदर बहुजन संघटकचा वाचक होतो, त्यात सर्व बहुजन समाजाची लोक होती. 1920 साली 'मूकनायक' डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी सुरू केला, त्यानंतर बहिष्कृत भारत, पुढे प्रबुद्ध भारत बनला. तोच वारसा पुढे घेऊन यशवंत नायक नाव दिले. आम्हाला त्यावेळेस वाचायला छोटासा कागद देखील मिळत नव्हता. म्हसवड येथे कांशीराम यांच्याहस्ते यशवंत नायक हस्तलिखित अंकाचे प्रकाशन झाले. यशवंत नायकमध्ये सर्व समाजाचे लोक होते. पुढे यशवंत सेना विकसित होत गेली. प्रजा समाजाला राजा समाज बनवणे हे यशवंत सेनेचे ध्येय होते. वाचक समाजाला लेखक समाज बनवणे हे यशवंत नायकचे ध्येय होते. आज वाचक समाज लेखक समाज बनताना दिसतो आहे. राजकिय सत्तेकडे वाटचाल चालू झाली आहे. महादेव जानकर साहेब दूरदृष्टी असणारा नेता आहे. आज राष्ट्रीय समाज पक्षाचे संघटन 17 राज्यात पोचले आहे. चार राज्यात ताकद आहे. सन 1995- 96 साली मोटार सायकलवर यशवंत नायक घेऊन कार्यकर्ते वाटत होते. लिहत होते. ज्ञान सत्ता हे सगळ्यात मोठी आहे. सत्य माहीत नसताना प्रबोधन करू लागले तर गोंधळ होतो.  मराठा समाज सत्तेत असताना रस्त्यावर उतरावा लागत असेल तर इतर समाजाची काय अवस्था असेल? देश स्वतंत्र होत असताना सत्ता कोणाकडे होती. आरक्षण हा भागीदारीचा मुद्दा आहे. आज शिक्षणाचे बाजारीकरण झाले. पाकिस्तान मुस्लिमांचे राज्य बनले. पण भारत हिंदूचे सेक्युलर बनले. घटना स्वीकारत असताना धनगर बहुजन प्रतिनिधी नव्हते, पण बाबासाहेब आंबेडकर तळागळतून आले असल्याने त्यांनी सगळ्यांचा विचार केला आणि ओबीसींना ३४० वे कलम दिले. या देशात महादेव जानकर यांनी किमया केली आहे, मर्यादित साधना असताना कठीण काम केलेले आहे. यावर्षी एप्रिल, मे  आणि जून महिन्याच्या अंक निघाला नाही. यशवंत नायकमुळे अनेक पत्रकार लेखक घडले पण यशवंत नायकसाठी कोणी काम केले नाही, अशी खंत व्यक्त करून म्हणाले, गेली ७ वर्षापासून आबासो पुकळे हा युवक माझा उजवा हात बनून यशवंत नायकसाठी काम करतोय. यशवंत नायकने नेहमीच दर्जेदार लिखाण केले आहे. यशवंत नायकला एकदा पोस्टाचे तिकिटे पाहिजे होते, मोहन माने यांनी भरपूर तिकिटे आणून दिली. अशा प्रकारे अनेकांनी यशवंत नायकला सांभाळले आहे. 

"आतापर्यंत मी मोबाईलवर  यशवंत नायक अंक टाईप करत होतो. असे करत असतानाच दोन मोबाईल कायमचे बंद पडले. कौटुंबिक जबादाऱ्या पार पडत असताना, आर्थिक अडचणीमुळे नवीन मोबाईल घेऊ शकलो नाही. अलीकडे जयसिंग राजगे सर यांनी मदत केल्यामुळेच यशवंत नायक अंक नियमित लिखाण करत आहे, मात्र तीन अंक लिहू न शकल्याबद्दल यशवंत नायकप्रेमिंचा दिलगीर आहे. दैनिक केसरीत उपसंपादक होतो, पण यशवंत नायकमुळे स्वतंत्रपणे लिहू शकलो. यशवंत नायकने आत्मसन्मान जागा केला", अशा मोजक्या शब्दांत आबासो पुकळे यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. 

रासपचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष शरद काशिनाथ शेवते म्हणाले, यशवंत नायकमुळे राजकीय क्रांती झाल्याशिवाय राहणार नाही. रासेफचे महाराष्ट्र अध्यक्ष सतिश नजरकर यांनी यशवंत नायकमधील अग्रलेख वाचून खूप प्रभावित झाल्याचे सांगत काही वाचनीय लेखांचा उल्लेख केला. रासेफचे महासचिव जयसिंग राजगे सर यांनी उत्तम सूत्रसंचालन केले. बोरिवली येथील रिक्षाचालक महावीर वाघमोडे हे यशवंत नायक अंकाच्या घड्या घालण्यासाठी यशवंत नायक कार्यालयात उपस्थित राहतात. कोणत्याही संघटना, समाजाला मुखपत्राची गरज असते असे सांगितले. यशवंत नायकला जाहिरात देऊन सर्वांनी सहकार्य करावे, असे आवाहन राजगे सर यांनी केले. जगात मुखपत्रामुळे जगात अनेक क्रांती झालेल्या आहेत, असे उदगार यशवंत नायकचे हितचिंतक, वाचक गोविंदराव शूरनर यांनी काढले. परभणी जिल्हा यशवंत नायक प्रतिनिधी ब्रिजेश गोरे म्हणाले, यशवंत नायकच्या सेवेला मर्यादा येत आहेत, यशवंत नायक प्रोफेशनल करावा असे सांगितले. यावेळी प. महाराष्ट्र रासेफ अध्यक्ष महावीर सरक, शशिकुमार जरग, रासेफ खजिनदार राजेंद्र कोकरे, सुदर्शन अक्कीसागर, रामधारी पाल, प्रशांत साळवे, धनंजय गडदे व अन्य उपस्थित होते.

शेतकऱ्यांना उभारी मिळवण्यासाठी सरसकट पीक विमा देण्याची हिंगोली जिल्हा रासपची मागणी

शेतकऱ्यांना उभारी मिळवण्यासाठी सरसकट पीक विमा देण्याची हिंगोली जिल्हा रासपची मागणी


पारडा- हिंगोली :(९/१०/२३) यशवंत नायक ब्यूरो

शेतकऱ्यांना उभारी मिळवण्यासाठी, सरसकट विमा देण्याचे मागणी, राष्ट्रीय समाज पक्षाचे हिंगोली जिल्हाध्यक्ष डॉक्टर अनिल पौळ यांनी केली आहे. पौळ म्हणाले, हिंगोली जिल्ह्यातील शेतकऱ्यांची अतिवृष्टीच्या पावसामध्ये विविध पिके जळून गेले आहेत. सद्यस्थितीत सोयाबीन पिकाचे येलो, मोझक रोगांनी मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याने शेतकऱ्यांचा खरीप हंगाम पूर्णपणे धोक्यात आला आहे. त्यामुळे तात्काळ पंचनामे करून नुकसान भरपाई द्यावी, अन्यथा राष्ट्रीय समाज पक्ष तीव्र आंदोलन करेल.

Tuesday, October 17, 2023

विघ्नेश अनुसे या हॉकी खेळाडूचे राष्ट्रीय समाज पक्षाने केले अभिनंदन..!

विघ्नेश अनुसे या हॉकी खेळाडूचे राष्ट्रीय समाज पक्षाने केले अभिनंदन..!

विघ्नेश अनुसे यांचे अभिनंदन करताना रासपच्या विद्यार्थी आघाडी शाखेचे महाराष्ट्र प्रांत अध्यक्ष शरदभाऊ दडस व इतर मान्यवर.

हॉकी खेळात विघ्नेशने दादा किशन पाल यांचा वारसा पुढे न्यावा : शरदभाऊ दडस 

नवी मुंबई : १५/१०/२०२३|यशवंत नायक ब्यूरो

विघ्नेश अनुसे या गुणवान खेळाडूने नुकतेच पुणे येथे झालेल्या राज्यस्तरीय हॉकी स्पर्धेत घवघवीत यश मिळवले आहे. विघ्नेशची राष्ट्र स्तरावर १६ वर्षाखालील हॉकी संघात निवड झाली आहे. त्याच्या यशाबद्दल राष्ट्रीय समाज पक्षाचे विद्यार्थी आघाडी प्रदेश अध्यक्ष शरदभाऊ दडस यांनी त्याचा राहत्या घरी जाऊन शाल पुषगुच्छ देऊन अभिनंदन केले. विघ्नेश याने अधिक जोमाने आपल्या खेळात चुणूक दाखवून राष्ट्रीय स्तरावर दादा किशन पाल यांचा हॉकी खेळात वारसा पूढे न्यावा, असे प्रतिपादन याप्रसंगी शरदभाऊ दडस यांनी व्यक्त केले. यावेळी यशवंत नायक कार्यकारी संपादक शेफर्ड ए. एस.पी, प्रा. दत्ता अनुसे, ऋषिकेश जरग, नानासाहेब अनुसे, सुहास अनुसे आदी उपस्थित होते. 

विघ्नेशची विचारपूस करून मार्गदर्शन करताना  राष्ट्रीय समाज पक्ष विद्यार्थी आघाडी प्रदेशाध्यक्ष शरदभाऊ दडस.

विघ्नेश हा कोपरखैराणे च्या सेंट लॉरेन्स हायस्कूल मध्ये इयत्ता ९ वी च्या वर्गात शिक्षण घेत आहे. विघ्नेशचे वडील विलास अनुसे हे स्वतः एक चांगले खेळाडू आहेत, असे त्यांच्या गावातील नागरिकांचे म्हणणे आहे. विघ्नेशचे मूळ गाव सांगली जिल्हयातील आटपाडी तालुक्यात अनुसेवाडी असून, सद्या तो  आई वडीलांसोबत कोपरखैराणे येथे राहत आहे. कोणत्याही प्रकारच हॉकी खेळाच प्रशिक्षण घेतले नसताना, विघ्नेशने शाळेतील शिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली यश मिळवले आहे. विघ्नेश हा शाळेच्या मैदानावर सराव करत आहे.

Monday, October 16, 2023

सर्व वंचित घटकांनी संघटित होऊन संविधानिक अधिकार मिळवले पाहिजेत : सिद्धरामय्या

विराट मेळाव्यात बोलताना कर्नाटकचे मुख्यमंत्री सिदधरामय्या.

सर्व वंचित घटकांनी संघटित होऊन संविधानिक अधिकार मिळवले पाहिजेत : सिद्धरामय्या

बेळगांव :  विराट मेळाव्यात बोलताना राष्ट्रीय समाज पक्षाचे राष्ट्रीय नेते महादेव जानकर, मंचावर विराजमान कर्नाटक मुख्यमंत्री सिद्धरामय्या, हरियाणा राज्यपाल बंडारू दत्तात्रेय.


दिल्लीची सर्वोच्च सत्ता ताब्यात घेऊनच उपेक्षित समजाचे प्रश्न सोडवता येतील : महादेव जानकर

बेळगाव : (०३/१०/२३) यशवंत नायक ब्यूरो 

बेळगाव येथे शेफर्ड्स इंडिया इंटरनेशनलचे आयोजित शेफर्ड्स/ धनगर पाल बघेल गडरिया समाजाचे ९ वे महा अधिवेशन पार पडले. कर्नाटक मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांचा सत्कार करण्यात आला. राष्ट्रीय समाज पक्ष तर्फे महादेव जानकर यांनी सत्कार करून अभिनंदन केले. सिद्धरामय्या यांच्यानंतर महादेव जानकर यांचे भाषण गाजले, व ते अतिशय महत्वपूर्ण होते, अशी प्रतिक्रिया उपस्थितांमधून यशवंत नायक ब्यूरो जवळ पोहचली.

कर्नाटक मुख्यमंत्री सिद्धारमैया म्हणाले, कर्नाटक राज्यात कुरुबा  नावाने ओळखले जाणारे धनगर समाज व अन्य समाजाची शिफारस राज्य सरकारने केंद्र सरकारकडे पाठवली आहे. केंद्राकडून मंजूर करन्यासाठी पाठपुरावा करू. धनगर समाजाला सांस्कृतिक वारसा आहे. राजकीय इतिहास आहे. संघटना नसती तर कागिनेली गुरुपीठ संस्थान बनले नसते. हक्काबुक्का पासून अहिल्याबाई होळकर यांच्यापर्यंत ऐतिहासिक वारसा आहे. समाजातील सर्व वंचित घटकांनी संघटित होऊन संविधानिक अधिकार मिळवले पाहिजेत. प्रत्येक समाजाचा आर्थिक, सामजिक आणि राजकिय विकास झाला तरच समानता शक्य आहे. प्रत्येकाला त्यांचा वाटा आणि संधी मिळाली पाहिजे. 

राष्ट्रीय समाज पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष महादेव जानकर यांनी आद्य स्वातंत्र्यवीर संगोळी रायन्ना यांच्या भूमीत शेफर्ड इंडिया इंटरनॅशनलच्या राष्ट्रीय संम्मेलनास शुभेच्छ्या दिल्या. महादेव जानकर आपल्या जोषपूर्ण भाषणात म्हणाले, काँग्रेस, भाजपने मुख्यमंत्री राज्यपाल केले तरीही दिल्लीची सत्ता ताब्यात घेतल्याशिवाय धनगर, पाल, बघेल, गडरिया, गायरी, कुरुबा, कुरुमान, रबारी, देवासी, रायका, मालधरी, भरवाड, चांगपा, बकरवाल आदी समाजाच्या समस्या सुटणार नाहीत.  मुख्यमंत्री पदाबरोबरच समाजाचा प्रधानमंत्री बनला पाहिजे.  प्रधानमंत्री बनण्यासाठी राजकिय ताकदही तयार करावी लागेल. पशुपालक समाजाची ओळख फक्त शेळी मेंढी पाळणारे एवढीच नसून अखंड भारतावर राजा बनून राज्य करणारी होती. आपल्या हातात सत्ता ताब्यात घेऊन देशाला सुजलाम सुफलाम बनवण्याची ताकद आमच्यात आहे आणि ती वेळ आली आहे.

शेफर्ड्स इंडिया इंटरनेशनलचे अध्यक्ष विश्वनाथ म्हणाले, प्रत्येक क्षेत्रात प्रगतीपथावर राहून सर्वच क्षेत्रात भरारी घेतली पाहिजे. या कार्यक्रमास काश्मीर पासून केरळ पर्यंत वेगवेगळ्या राज्यातून मान्यवर सहभागी झाले आहेत. पुढचे दहावे संमेलन दिल्लीच्या रामलीला मैदानात आयोजीत केले जाईल. गोव्याचे माजी उपमुख्यमंत्री बाबू कवळेकर यांनी राजकीय बांधिलकी कोणत्याही पक्षाकडे असली तरी आपल्या समाजाच्या उन्नतीसाठी सर्वांनी एकत्र येण्याचे आवाहन केले.

यावेळी कनकगुरुपीठाचे सर्व स्वामी आणि शेफर्ड समाजाचे सर्व प्रतिनिधी उपस्थित यांचे स्वागत केले. राष्ट्रीय समाजाचे सर्वोच्च संस्था शैफर्ड इंडिया इंटरनेशनलचे स्थापना दिवस सोहळ्यास बेलगांव, कर्नाटक आयोजित विराट सभेत कर्नाटक मुख्यमंत्री सिद्धारमैया, शेफर्ड इंडिया इंटरनॅशनलचे अध्यक्ष ए. एच. विश्वनाथ, उपाध्यक्ष एच एम रेवन्ना, शेफर्ड इंडीया इंटर नॅशनलचे संस्थापक सदस्य सिध्दप्पा अक्कीसागर, कनकपीठाचे स्वामी श्री श्री निरंजनानंद पूरीजी, स्वामी श्री श्री ईश्वरानंद पूरीजी, स्वामी श्री श्री सिद्धरामानंद पुरीजी, श्री साधी माताजी पीठचे स्वामी अर्जुनभाई पूरी स्वामीजी, हरियाणाचे गवर्नर  श्री दत्तात्रेय बंगारू लक्ष्मण, श्री सतीश जारकीहोली बांधकाम मंत्री कर्नाटक, श्रीमती लक्ष्मी हेब्बलकर महिला बाल विकास मंत्री कर्नाटक, डॉ. बी के रवी - कुलगुरू कोप्पल विश्वविद्यालय, गोवा राज्यचे पूर्व उपमुख्यमंत्री श्री चंद्रकांत कावलेकर, श्री गोरोनांटला माधव खासदार आंध्रप्रदेश, श्री सागर रायका पूर्व खासदार गुजरात, डॉ विकास महात्मे पूर्व खासदार महाराष्ट्र, दिनेश मोहनिया आमदार दिल्ली, येग्गे मल्लेश्याम आमदार आंध्रप्रदेश, गणेश हाक्के, सतीश पाल उ.प्र, राकेश पाल उ.प्र, अत्तरसिंह पाल दिल्ली, राजेंद्र पाल हरियाणा, निकेत राज प्रवक्ता कांग्रेस कर्नाटका तथा भारतभर वेगवेगळ्या प्रदेशातून लोक आले होते.

राष्ट्रीय समाज पक्षाचे उमेदवार निवडून आणा : महादेव जानकर

राष्ट्रीय समाज पक्षाचे उमेदवार निवडून आणा : महादेव जानकर

जन स्वराज यात्रेत महादेव जानकर यांच्यावर लक्ष्मी दहीवडी ता - मंगळवेढा येथे जेसीबी द्वारे पुष्पवृष्टी करण्यात आली.

मंगळवेढा : (६/५/२३) यशवंत नायक ब्यूरो 

सत्यशोधन, समाज प्रबोधन, राष्ट्र संघटन या विचाराने उपेक्षित गोरगरीब जनतेच्या अडीअडचणी समजून घेण्यासाठी राष्ट्रीय समाज पक्षाने जन स्वराज यात्रा काढली. येत्या पंचायत समिती, जिल्हा परिषद,विधानसभा व लोकसभा निवडणुकीत राष्ट्रीय समाज पक्षाचे उमेदवारांना निवडून द्या. भाजप, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसला मते देऊ नका, असे आवाहन राष्ट्रीय समाज पक्षाचे संस्थापक अध्यक्ष महादेव जानकर यांनी केले. आ. महादेव जानकर हे राष्ट्रीय समाज पक्षाच्यावतीने जन स्वराज यात्रेत नंदेश्वर येथे बोलत होते. राष्ट्रीय समाज पक्षाची सोलापूर लोकसभा मतदार क्षेत्र जनस्वराज यात्रा ही संत दामाजीपंत समाधीचे दर्शन घेऊन मंगळवेढ्यातून सकाळी आठ वाजता राष्ट्रीय समाज पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष महादेव जानकर यांच्या नेतृत्वाखाली सुरुवात करण्यात आली. 

मोहोळ जि- सोलापूर येथे महिला भगिनींनी राष्ट्रनायक आ. महादेव जानकर यांचे औक्षण करून पैशांचा हार घालून स्वागत केले.

पुढील गावातून जन स्वराज यात्रा पोहचली. मरवडे, हुलजंती, सलगर खुर्द, सलगर बुद्रुक, मारोळी, हुन्नूर, भोसे, नंदेश्वर, पाटकळ, आंधळगाव, लक्ष्मीदहिवडी, गुंजेगाव, धनाळी, तपकिरी शेटफळ, कासेगाव, अनवली चौक, रांजणी, निपतगाव, ओझेवाडी, दामाजी कारखाना चौक, उंचीठाण, बठाण, आंबेचिंचोली, शंकरगाव, पुळूज टाकळी, सिकंदर चौक इत्यादी गावातून पुढे मोहोळकडे रॅली रवाना झाली. यावेळी राष्ट्रीय महासचिव कुमार सुशील, केंद्रीय संघटनमंत्री बाळकृष्ण लेंगरे, गोविंदराव शुरनर, महाराष्ट्र राज्य मुख्य महासचिव ज्ञानेश्वर सलगर, राज्य सरचिटणीस तथा सोलापूर जिल्हा नियोजन समितीचे सदस्य सोमनाथ मोटे, प. महाराष्ट्र अध्यक्ष एड. संजय माने, प. उपाध्यक्ष सुनीलदादा बंडगर, प. महाराष्ट्र युवक आघाडी अध्यक्ष अजित पाटील, विद्यार्थी आघाडी अध्यक्ष पंकज देवकाते, सोलापूर जिल्हाध्यक्ष अशोक ढोणे, युवक जिल्हाध्यक्ष दामाजी मेटकरी, परमेश्वर पुजारी, महाळाप्पा खांडेकर, संजय लवटे, बाळासाहेब लवटे, अण्णासाहेब गरंडे, नितीन मेटकरी, मनीषा ठोंबरे आदी कार्यकर्ते उपस्थित होते.

भाजपपासून एक एक मित्र बाहेर पडत आहे - महादेव जानकर

भाजपपासून एक एक मित्र बाहेर पडत आहे - महादेव जानकर 

अक्कलकोट जि- सोलापूर येथे क्रेन द्वारे पैशांचा हार व पुष्पहार आ. महादेव जानकर यांना घालून स्वागत करन्यात आले. समवेत सुनिल बंडगर, अशोक ढोणे, दत्तात्रय माडकर, अशोक ढोणे, कालिदास गाढवे.

सोलापूर लोकसभा मतदार क्षेत्रात रासपच्या जन स्वराज यात्रेचे ठिकठिकाणी जंगी स्वागत

अक्कलकोट :  यशवंत नायक ब्यूरो

देशात जेव्हा भाजपची सत्ता आली तेव्हा त्यांनी मित्र पक्षांची वाट लावण्याची उद्योग सुरू केले. आता त्यांच्यापासून एकेक मित्र पक्ष बाहेर पडत आहेत. त्यामुळे आगामी निवडणुकीत त्यांना पद्धतशीर उत्तर देऊ, असा इशारा राष्ट्रीय समाज पक्षाचे संस्थापक /राष्ट्रीय अध्यक्ष आ. महादेव जानकर यांनी दिला.

शनिवारी येथील श्री मल्लिकार्जुन मंदिराच्या प्रांगणामध्ये महादेव जानकर यांनी सुरू केलेल्या सोलापूर जनस्वराज यात्रेचा समारोप जाहीर सभेद्वारे करण्यात आला.  फुलेपीठावर राष्ट्रीय समाज पक्षाचे राष्ट्रीय महासचिव कुमार सुशील, राष्ट्रीय संघटक गोविंदराव शूरनर, बाळकृष्ण लेंगरे मामा, महाराष्ट्र मुख्य महासचिव माऊली सलगर,  प. महाराष्ट्र अध्यक्ष संजय माने पाटील, प. महाराष्ट्र उपाध्यक्ष सुनील बंडगर, युवक आघाडीचे अध्यक्ष अजितकुमार पाटील, सोलापूर जिल्हाध्यक्ष अशोक  ढोणे, जिल्हा संपर्क श्रीमंत हाक्के,  सुवर्णाताई जराड, माजी तालुकाध्यक्ष दत्तात्रय माडकर, तालुकाध्यक्ष राजशेखर बिराजदार उपस्थित होते.

आ. जानकर पुढे म्हणाले, सध्या राज्यात आणि देशात भाजपचे वापरा आणि फेकून द्या हे धोरण सुरू आहे. आमच्या जोरावर भाजपने सत्ता मिळवली आणि आम्हाला सत्तेत वाटा देतो म्हणून फसवले. केवळ फसवलेच नाही तर आमच्यासारख्या छोट्या पक्षांना गिळंकृत करण्याचे पाप ते करत आहेत. मला सत्तेत ज्यावेळी सहभागी करून घेतले, त्यावेळी माझ्या पक्षाचे काही आमदार होते. त्यानंतर आमच्याच पक्षाचे आमदार त्यांनी फोडले आणि आमच्याच पक्षाच्या आमदाराच्या पत्नीला उमेदवारी देऊन पक्ष खिळखिळा करण्याचा डाव केला. महादेव जानकर स्वाभिमानी आहे. आमदार खासदार करण्याची फॅक्टरी म्हणजे राष्ट्रीय समाज पक्ष आहे. आम्हाला काही फरक पडत नाही, पण पुढच्या वेळेस 2024 च्या निवडणुकीत मात्र भाजपच्या खेळ खंडोबा केल्याशिवाय राहणार नाही. राज्यातील सत्ता समीकरणाबाबत बोलताना ते म्हणाले की, काँग्रेस आणि भाजप हे दोघे एका माळेचे मणी आहेत. स्वतःचे पाप धुण्यासाठी कोणाच्या तरी वलचणीला जाणाऱ्यापैकी मी नाही. आज कोण सत्ताधारी, कोण विरोधक हे कळायला तयार नाही. भाजपच्या विरोधात असणारे अजितदादा त्यांना मिठ्या मारत आहेत. नेमके राज्यात काय चालले आहे, असा सवाल त्यांनी केला. 543 लोकसभा मतदारसंघात जन स्वराज यात्रा फीरणार आहे.

अक्कलकोट येथे उपस्थित समुदायासमोर बोलताना आ. महादेव जानकर

मत कुणाला द्या, हे सांगण्यासाठी आलेले नाही तर मते कोणाला द्यायची हे ठरवायला मी आलोय. राज्यात देखील विधानसभा निवडणुकीत आमची ताकद दाखवून देऊ. काही ठिकाणी पडू. काही ठिकाणी पाडू आणि काही ठिकाणी विजयी होऊ, असा संकल्प आम्ही केला आहे. जातीनिहाय जनगणना करा, अशी आमची प्रमुख मागणी आहे. सामाजिक आणि आर्थिक विकास त्याशिवाय होणार नाही. जन स्वराज यात्रेच्या माध्यमातून जनतेला सावध करण्याचे काम सध्या सुरू आहे. मोठ्या पक्षापासून मात्र सावध रहा, असे आवाहन आ. जानकर यांनी केले.

बंडगर यांनी अक्कलकोट विधानसभेची तयारी करावी

तालुक्याच्या ग्रामीण भागात रस्ते, पाणी, विजेचा प्रश्न मोठा आहे. देशाला स्वातंत्र्य मिळून 77 वर्षे उठून गेले तरीही 'जैसे ते अवस्था' आहे. त्यामुळे आगामी काळात रासप हा जनतेसाठी पर्याय आहे. त्यामुळे सुनील बनगर यांनी अक्कलकोट मधून विधानसभा निवडणुकीची तयारी करावी, अशी सूचना महादेव जानकर यांनी जाहीर सभेत केली 

सभास्थळी आ.जानकर यांचे आगमन होताच क्रेनने 21 हजार रुपयांच्या नोटांची माळ तसेच फुलांचा मोठा हार घालून जंगी स्वागत करण्यात आले. अक्कलकोट शहरातून देखील जनस्वराज यात्रा काढून जनतेचे लक्ष वेधून घेतले. दिवसभरात सोलापूर लोकसभा मतदारसंघातील कुंभारी, वळसंग, दहीठणेवाडी, चपळगाव वाडी, चिपळगाव, चुंगे किनी, बादोले, सापळे, किनी मोड, शिरवळ, बदलापूर सलगर, तोरणी, तळेवाड, कलापवाडी, सातनदुधनी, गलोरणी, मैंदर्गी शहरातील ठिकाणी जेसीबीने पुष्पहार घालून रस्त्याच्या दुतर्फा कार्यकर्त्यांनी उत्साहात जन स्वराज यात्रेचे स्वागत केले.

श्री. हाक्के म्हणाले, राष्ट्रीय समाज पक्षाची जन स्वराज रॅली ही बहुजनांच्या हितासाठी आहे. या समाजावर आतापर्यंत इतरांनी राज्य केले, पण आम्ही मात्र स्वतःचे पैसे खर्च करून राष्ट्रीय समाजाला आधार देण्याचे काम राष्ट्रीय समाज पक्षाच्या माध्यमातून करत आहोत. जिल्हाध्यक्ष अशोक ढोणे, अजित पाटील यांची भाषणे झाली. सभेचे सूत्रसंचालक दत्तात्रय माडकर यांनी केले. यावेळी सोलापूर लोकसभा मतदारसंघातील तसे अक्कलकोट विधानसभा मतदारसंघातील पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

मेंढपाळपुत्र निघाला इंगलंडला, राष्ट्रीय समाज पक्षाने दिल्या शुभेच्छा

मेंढपाळपुत्र निघाला इंगलंडला, राष्ट्रीय समाज पक्षाने दिल्या शुभेच्छा

मुंबई : यशवंत नायक ब्यूरो

राष्ट्रीय समाज पक्ष केंद्रीय कार्यालय  मुंबई येथे मेंढपाळाच पोर सौरभ हटकर यांचा सत्कार करण्यात आला. विद्यार्थी दशेमध्ये स्वतःची मेंढपाळपुत्र आर्मी संघटना काढून मेंढपाळांमध्ये जागृती करण्याचे काम करणारा एक युवक इजिनिअर बनतो आणि पीएचडीसाठी चक्क इंग्लंडला प्रवेश मिळवतो. सौरभ हटकर यांचा राष्ट्रीय समाज पक्ष कार्यालयात कर्यालय प्रमुख  मोहन माने व युवा नेते अजित पाटील यांनी सत्कार केला. पीएचडीसाठी युनिव्हर्सीटी ऑफ इडिनबर्ग येथे शासनाची दीड कोटीची शिष्यवृत्ती मंजूर झाली आणि मेंढपाळाचा जागृत पुत्र स्कॉटलंडला निघाला ही खरंच एक अभिमानाची आणि कौतुकाची सोबत आत्मविश्वास वाढवणारी बाब आहे. सौरभ यांना त्यांच्या पुढील शैक्षणिक सामाजिक आयुष्यासाठी मनापासून राष्ट्रीय समाज पक्षाच्या वर्तीने शुभेच्छा..!

महाराष्ट्र राज्याच्या विकाससाठी राष्ट्रीय समाज पक्षाला सत्तेत स्थान द्या : महादेव जानकर

महाराष्ट्र राज्याच्या विकाससाठी राष्ट्रीय समाज पक्षाला सत्तेत स्थान द्या : महादेव जानकर 


धाराशिव लोकसभा मतदार क्षेत्रात  राष्ट्रीय समाज पक्ष जन स्वराज यात्रा धूमधडाक्यात 


भूम : (५/१०/२०२३) यशवंत नायक ब्यूरो

महाराष्ट्र राज्याच्या विकासासाठी, जनतेच्या हितासाठी, राष्ट्रीय समाज पक्षाला सत्तेत स्थान द्यावे, असे आवाहन राष्ट्रीय समाज पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष माजी मंत्री महादेव जानकर यांनी गुरुवारी भूम येथे केले. 'आमच्या मागे ईडी, पिडी लावा, आम्ही कोणाला घाबरत नाही. भाजप मित्र पक्षाला जवळ घेत मातीत घालण्याचे काम करत आहे, असा आरोप जानकर यांनी यावेळी केला.

भूम जि - धाराशिव येथे जाहीर सभेत बोलताना रासप नेते महादेव जानकर, फुलेपिठावर बसलेले गोविंदराव शुरनर, बाळकृष्ण लेंगरे, कुमार सुशील, ज्ञानेश्वर सलगर, अश्रुबा कोळेकर, विकास पाटील.

रासपचे अध्यक्ष जानकर यांची जनस्वराज यात्रा भूम येथे आली. यावेळी नगरपालिका समोर झालेल्या सभेत ते बोलत होते. यात्रेच्या माध्यमातून मतदारांच्या समस्या व सद्यस्थितीत निर्माण झालेली शेतकऱ्यांची दोलायमान स्थिती विचारात घेत संवाद साधण्यासाठी भूम येथे आलो आहे. भाजप सरकार धनगर बांधवांनी आरक्षण मागितले की, आदिवासी बांधवांना भडकवते तर मराठा बांधवांनी आरक्षण मागितले की ओबीसींना भडकवते. भाजप जाती-जातीमध्ये भांडणे लावून खाजगीकरण करत आहे. परंतु तुम्ही भांडण करू नका, तुम्ही उद्योग नोकरी करा. नाहीतर ते तुमचे ते वाटोळे करणार आहेत. निवडणुकीत पैसे घेऊन मतदान करू नका. माझ्या पक्षाचे उमेदवार जर पैसे दिले तर बुटाने हाना. तसेच व्यसनापासून लांब राहा. सरकारने शेतकऱ्यांना वेळेवर वीज, पिकांना चांगला भाव द्यावा. सभेला संबंधित करण्याअगोदर जानकर मंचासमोरील शेतकऱ्यांमध्ये बसले होते. यावेळी राष्ट्रीय महासचिव कुमार सुशील, राष्ट्रीय संघटक बाळकृष्ण लेंगरे, गोविंदराव शूरनर, राज्य महासचिव ज्ञानेश्वर सलगर, रासपचे मराठवाडा अध्यक्ष प्रा. विष्णू गोरे, राज्य कार्यकारणी सदस्य आश्रुबा कोळेकर, नानासाहेब मदने, जिल्हाध्यक्ष एड.विकास पाटील, तालुकाध्यक्ष गजानन सोलंकर, पंडित मरकड, गणेश जगदाळे, सचिन देवकते, मनोज पाडूळे, सचिन जगताप, व रासपचे पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.

राष्ट्रीय समाज पक्ष असली सोनं आहे, त्यास साथ द्या : महादेव जानकर

राष्ट्रीय समाज पक्ष असली सोनं आहे, त्यास साथ द्या : महादेव जानकर

नेवासा येथे आ. महादेव जानकर साहेब यांना  पैशांचा नोटांचा हार घालून जन स्वराज यात्रेचे स्वागत केले. मंचावर राष्ट्रीय संघटक बाळकृष्ण लेंगरे, ज्ञानेश्वर सलगर, रविंद्र कोठारी, संतोष काळे- पाटील.

नेवासा : (२४/९/२३) यशवंत नायक ब्यूरो 

शेतकरी, कामगार, युवक, विद्यार्थी, महिला यांच्यासाठी राष्ट्रीय समाज पक्ष लढत आहे.राष्ट्रीय समाज पक्ष असली सोनं आहे. त्यास साथ द्यावी, असे आवाहन राष्ट्रीय समाज पक्षाचे संस्थापक राष्ट्रीय अध्यक्ष महादेव जानकर यांनी केले. शिर्डी लोकसभा जन स्वराज यात्रा नेवासा तालुक्यात पाचेगाव येथे आली. नंतर इमामपूर, गोणेगाव, निंभारी, करजगाव, तामसवाडी, माळीचिंचोरा, भानसहिवरा, भेंडे, कुकाणे, तरवडी, वाकडी, गेवराई, शिरसगाव, सलाबतपुर, खडका, नेवासे फाटा मार्गे निघालेल्या जन स्वराज यात्रेचे जोरदार स्वागत करण्यात आले.

नगरपंचायत चौक येथे झालेल्या सांगता सभेत आ. जानकर पुढे म्हणाले, शिर्डी लोकसभा मतदारसंघाची जागा रासप पूर्ण ताकतीने लढवणार असून, नेवासा मतदारसंघात जिल्हा परिषद, नगरपंचायत, पंचायत समितीचे खाते खोला. नेवासा ही संत ज्ञानेश्वरांची नगरी आहे. मला हिंदकेसरी खेळायची सवय आहे, त्यामुळे नेवासा मतदार संघात लढायची तयारी ठेवा.  आपण नेवासा विधान मतदारसंघात हे बंदोबस्त चांगला करू. मी राष्ट्रवादी किंवा भाजपचा चमच्या म्हणून येथे आलो नाही. माझ्या पक्षाचा आमदार म्हणून येथे आलो आहे. याठिकाणी राष्ट्रीय समाज पक्षाचे खाते उघडा. जनतेचे प्रश्न घेऊन, जनतेच्या दरबारात जावा. तुमच्या पाठीशी खंबीरपणे ताकद उभी केल्याशिवाय राहणार नाही. ३३ वर्षे घरी गेलो नाही. जनता हीच मायबाप आहे. देशभर फिरून काम करतोय. मराठा, दलित, मुस्लीम, ओबीसी समाजाने स्वागत केले. रासपच्या जन स्वराज यात्रेत आलेल्या गाड्या कार्यकर्त्यांचा आहेत. हाच कार्यक्रम भाजप, काँगेसला घ्यायचा असता तर कारखान्यावरून बॉक्स आले असते. पण आमची स्वाभिमानाची माणस आहेत. येथे स्थानीक स्वराज्य संस्थाच्या निवडणुका जिंकल्या पाहिजेत. गावागावांत राष्ट्रीय समाज पक्ष पोहचला पाहिजे. ज्यांना वाटतया, आपण खासदार होऊ, त्यांना घरी बसवायची ताकद राष्ट्रीय समाज पक्षाकडे आहे.

यावेळी राज्य महासचिव कुमार सुशील, राज्य सचिव रविंद्र कोठारी, उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष शरद बाचकर, जिल्हाध्यक्ष नानासाहेब जुंधारे, शशिकांत मतकर सय्यदबाबा शेख, डॉ. प्रल्हाद पाटील, संतोष काळे - पाटील, सुवर्णा जऱ्हाड आदी उपस्थित होते.

राष्ट्रीय समाज पक्ष सत्तेत आल्यास दुसऱ्याला आरक्षण मागावे लागणार नाही : महादेव जानकर

राष्ट्रीय समाज पक्ष सत्तेत आल्यास दुसऱ्याला आरक्षण मागावे लागणार नाही : महादेव जानकर

न्हावरे ता- शिरूर येथे बोलताना रासप राष्ट्रीय नेते महादेव जानकर. फुलेपिठावर शिवाजीराव कुऱ्हाडे, संजय माने पाटील, गोविंदराव शुरनर, ज्ञानेश्वर सलगर, पिंगळे ताई, सुवर्णाताई जऱ्हाड.

न्हावरे : (१७/९/२०२३) यशवंत नायक ब्यूरो 

आपल्या विचाराचा पक्ष वाढला. सत्तेत आला तर दुसऱ्याला आरक्षण मागावे लागणार नाही, असे प्रतिपादन संस्थापक अध्यक्ष आ. महादेव जानकर यांनी न्हावरे येथे शिरूर लोकसभा जन स्वराज यात्रा सांगता सभेत केले. 

आ. महादेव जानकर आपल्या भाषणात म्हणाले, मागच्या निवडणुकीत शिरूर विधानसभेत दुसऱ्यासाठी परिवर्तन केलं. पण आता आपल्या राष्ट्रीय समाज पक्षाचा स्वतःचा झेंडा आणि स्वाभिमान उभा राहिला पाहिजे. राष्ट्रीय समाज पक्षात सर्व समाजाची लोक आहेत. भाजप, काँगेस, राष्ट्रवादी, शिवसेना यांच्यावरील जनतेचा विश्वास उडाला आहे. देशाचे प्रधानमंत्री भोपाळमध्ये राष्ट्रवादी पक्षाने 70 हजार कोटीचा घोटाळा केल्याचे सांगतात आणि चार दिवसांनी त्यांच्याबरोबरच सत्ता स्थापन करतात. तुम्ही गप, आम्ही गप असा प्रस्तापित पक्षांचा छुपा अजेंडा आहे. पण आम्ही राष्ट्रीय समाज पक्ष गप्प नाही. जनतेसाठी जनतेच्या हितासाठी आम्ही काम करतो. स्वतःसाठी काही करत नाही. बाकीचे पक्ष स्वतःच्या मुलाबाळासाठी काम करतात. महादेव जानकरला पुतण्यासाठी काही करायचे नाही, या देशातील तमाम जनतेसाठी करायच आहे. 

आपल्या पोरांनी केंद्रातल्या परीक्षा दिल्या पाहिजेत. आपल्याला आरक्षण देतील पण सगळीकडे आता खाजगीकरण केले आहे. मोदींनी डायरेक्ट थेट कलेक्टर करायचं धोरण स्वीकारल आहे. भारताच्या लोकसभेचे सभापती ओम बिर्ला यांच्या मुलीला मोदी साहेबांनी डायरेक्ट कलेक्टर केलेल आहे. आपल्या मुलांना चांगल शिक्षण द्या. अमेरिकेत नोबेल मिळतात. आपले पीएचडी मिळवतात तेही नीट नसतात. पाट्या टाकायचं काम प्राध्यापक करतो. तुमचा मंत्री नाही, टिव्ही चॅनल नाही, दैनिक नाही, प्राध्यापक नाही. ही अवस्था आहे.

शाहू महाराजांनी या देशात पहिला आरक्षण दिलं, त्या शाहू महाराजांच्या समाजाला आरक्षण मागावे लागते ही शोकांतिका आहे. मुख्यमंत्री, मंत्री, कारखाना, सूतगिरण्या दूधसंघ त्यांचं आणि वॉचमन आमच अस असताना तरी आरक्षण मागावे लागतेय. हे समजून घ्या. आज मत मागण्यासाठी आलो नाही. ज्यांना मत दिली, त्यांनी धोका कसा दिला, हे सांगण्यासाठी जनस्वराज यात्रा राष्ट्रीय समाज पक्षाची घेऊन आलो आहे.  शिरूर लोकसभा मतदारसंघ राष्ट्रीय समाज पक्ष जिंकू शकतो, हा  आत्मविश्वास देण्यासाठी आलो आहे. आपलं साधन, आपला पैसा, आपला झेंडा, आपला दांडा असेल तरच दिल्ली आणि मुंबईत आपण सत्तेत बसू शकतो.

यावेळी महात्मा फुले पिठावर राष्ट्रीय समाज पक्षाचे राष्ट्रीय महासचिव कुमार सुशील, राष्ट्रीय संघटक गोविंदराव शुरनर, महाराष्ट्र राज्य महासचिव ज्ञानेश्वर सलगर, पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष एड. संजय माने, उपाध्यक्ष सुनील बंडगर, पुणे जिल्हाध्यक्ष विनायक रुपनवर, रामकृष्ण बिडगर, संजय बारहाते, सुनिताताई कीरवे, सुवर्णाताई जऱ्हाड, शिवाजीराव कुऱ्हाडे, भरत गडदे, पिंगळेताई, पै. जांभळकर आदी उपस्थित होते.

काँग्रेस आणि भाजपला पाणी पाजल्याशिवाय जतला पाणी मिळणार नाही : महादेव जानकर

काँग्रेस आणि भाजपला पाणी पाजल्याशिवाय जतला पाणी मिळणार नाही : महादेव जानकर 

सलगरे ता - मिरज जि- सांगली येथे जन स्वराज यात्राप्रसंगी आ. महादेव जानकर यांचे ग्रामस्थांनी स्वागत केले.

सांगली : (२०/८/२३) यशवंत नायक ब्यूरो

काँग्रेस आणि भाजपला पाणी पाजल्याशिवाय जतला पाणी मिळणार नाही, असे प्रतिपादन राष्ट्रीय समाज पक्षाचे संस्थापक राष्ट्रीय अध्यक्ष आ. महादेव जानकर यांनी केले. संख ता - जत जिल्हा - सांगली येथे जन स्वराज यात्रेच्या सांगता सभेत आ. जानकर बोलत होते. दिनांक १९ ऑगस्ट २०२३ रोजी संत चोखामेळा यांच्या प्रतिमेस अभिवादन करून सांगली लोकसभा मतदार क्षेत्रात राष्ट्रीय समाज पक्ष जन स्वराज प्रारंभ आटपाडी - विटा- कडेगाव - तासगाव - सांगली- मिरज - कवठेमहांकाळ - जत मार्गे संख येथे समारोप करण्यात आला.

जन स्वराज यात्रेच्या सांगता सभेत आ. जानकर पुढे म्हणाले, ज्यांनी आत्तापर्यंत सत्ता भोगली ते निवडणुकीच्या तोंडावर पाण्याची घोषणा करत होते. काँग्रेस बदलल्यानंतर भाजप न्याय देईल, पण या दोन्ही पार्ट्यांची नियत जत तालुका बद्दल सारखीच राहिलेली आहे. मतशक्तीची ताकद दाखवल्याशिवाय तुम्हाला कुणीही विचारनार नाही. आमच्याकडे फार मोठी सत्ता आहे असे काही नाही, पण जनतेचा जनरेटा उभा करून भारताचे केंद्र सरकार असेल किंवा महाराष्ट्राचे राज्य सरकारची खुर्ची हलवण्याची ताकद राष्ट्रीय समाज पक्षात जरूर आहे. पिण्याच्या पाण्याची साधी मागणी आहे. इंग्रज आल्यानंतर देखील अडचण झाली नव्हती, पण हे काळे इंग्रज आमच्या डोक्यावर बसलेत. त्यांची आजही जतला पाणी द्यायची नियत नाही. दोन तीन गावचे सरपंच म्हणाले, साहेब आम्हाला कर्नाटकला जावे लागेल. नियत असती तर दहा मिनिटात प्रश्न सोडवला असता. जत तालुक्याच्या जनतेने सावध राहावं. काँग्रेसवाल्यांना प्रश्न विचारा, पंडित नेहरू, इंदिरा गांधी पासून सत्तेत आहात का आम्हाला प्यायला पाणी देऊ शकला नाही. आम्ही भाजप बरोबर युती केली, पण भाई और बहनो शिवाय दुसर काय केलं नाही. म्हणून यांना बदलायसाठी जनतेची स्वराज यात्रा सुरू केलेली आहे. आपली पोरं देखील राजकीय सत्तेत घुसली पाहिजेत. समाजाच्या हिताच कायदे लोकसभेत आणि विधानसभेत होतात. काँग्रेस आणि भाजपला पाणी पाजा, त्याशिवाय जत तालुक्याला पाणी मिळणार नाही. राष्ट्रीय समाज पक्ष जतला पाणी दिल्याशिवाय राहणार नाही. राष्ट्रीय समाज पक्षाचा लढा पिण्याच पाणी बरोबर शेतीला देखील पाणी मिळावं यासाठी लढा आहे. रस्ते, आरोग्य, वीज या मोठया समस्या आहेत.  चांगले शिक्षण व्यवस्था राष्ट्रीय समाज पक्ष देऊ शकतो. काँगेस भाजपला मत देऊन तुमचा विकास होणार नाही, तर तुमचा भकास होईल. जनतेला जागं करण्यासाठी आम्ही फिरत आहे. चुकीच्या ठिकाणी मत दिल्याने वाटोळं झालं.  हे कसल स्वातंत्र्य आहे? सगळ्यात मोठी तिजोरी दिल्लीत आहे आणि छोटी तिजोरी मुंबईत आहे. आपल तिकडे लक्ष नाही. आपण गावगाड्यात हाणामारी करत बसलो आहे. जतच्या जनतेने शपथ घ्यावी, येथून पुढे माझं पोरग ऊस तोडनार नाही तर तुमचं प्रस्थपितांच राजकारण तोडन्यासाठी जिवाचं रान करू. आगामी निवडणुकीत मत विकू नका.

यावेळी फुलेपिठावर महंत तुकाराम महाराज, माजी राष्ट्रीय अध्यक्ष एस. एल. अक्कीसागर, राष्ट्रीय संघटक बाळकृष्ण लेंगरे मामा, राष्ट्रीय महासचिव कुमार सुशील, महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष काशिनाथ शेवते, राज्य महासचिव ज्ञानेश्वर सलगर, पश्चिम महाराष्ट्र उपाध्यक्ष सुनिलदादा बंडगर, सांगली जिल्हाध्यक्ष आप्पासाहेब थोरात, लक्ष्मण सरगर, प. महाराष्ट्र युवक अध्यक्ष अजित पाटील, जत तालुकाध्यक्ष बंडू डोंबाळे, जत शहराध्यक्ष भूषण काळगी, अखिल नगारजी आदी उपस्थित होते.

छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांच राज या देशावर यावे : महादेव जानकर

छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांच राज या देशावर यावे : महादेव जानकर 

छत्रपती शिवाजीराजे यांना अभिवादन करून जन स्वराज यात्रेची भूमिका मांडताना रासप सुप्रीमो महादेव जानकर
 

किल्ले शिवनेरी येथून निघालेल्या रासपच्या जन स्वराज यात्रेस जनतेचा तुफान प्रतिसाद 

जुन्नर : (१६/९/२३)| यशवंत नायक ब्यूरो 

छत्रपती शिवाजी महाराजांचा आदर्श घेऊन, छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचाराचं समतामूलक राष्ट्रीय समाजाच राज्य या देशावर आणण्याचा निश्चय करून किल्ले शिवनेरी पासून शिरूर लोकसभा मतदार क्षेत्रात राष्ट्रीय समाज पक्षाच्या जन स्वराज यात्रेस सुरूवात केली आहे, असे मत पत्रकारांशी बोलताना आ. महादेव जानकर यांनी व्यक्त केले.

आ. जानकर पुढे म्हणाले, नारायणगाव येथे रासपच्या जन स्वराज यात्रेचे स्वागत करण्यात आले. शेतकरी राजा आहे. शेतकऱ्यांना उत्तम बियाणे, खत, पाणी उपलब्ध करून देणे आवश्यक आहे. आज शेतकरी टाहो फोडत आहे, त्यांच्या  प्रश्नाकडे राज्यकर्ते डोळेझाक करत आहे. शेतकरी, युवक, महिला यांच्या बाजूने राष्ट्रीय समाज पक्ष आहे. शेतकऱ्यांनी मोठ्या पार्ट्यांना मत न देता राष्ट्रीय समाज पक्षाला मत दिल्यास रासपचे आमदार खासदार वाढवल्यास शेतकऱ्यांच्या मनातील सरकार बनवू.

आंबेगाव येथे पत्रकारांशी संवाद साधताना आ. महादेव जानकर 

जन स्वराज यात्रेचे शनिवार दिनांक १६ सप्टेंबर रोजी आंबेगाव तालुक्यातील मंचर येथे सर्व जाती धर्माच्या कार्यकर्त्यांनी जोरदार स्वागत केले.  मराठा, मुस्लीम व धनगर या समाजाच्या आरक्षणाचा प्रश्न सत्तेत आल्यानंतर दोनच दिवसांत मार्गी लावण्यात येईल, अशी ग्वाही त्यांनी दिली. जानकर यांनी या वेळी काँग्रेस आणि भाजपवर सडकून टीका केली.

जानकर म्हणाले की, काँग्रेस आणि भाजप कधीही आरक्षण देणार नाहीत. कारण, या पक्षांनी जनतेला गेली अनेक वर्षे झुलवत ठेवण्याचे काम केले आहे. मागील निवडणुकीत आम्ही भाजपबरोबर होतो. पण त्यांना आता छोट्या पक्षाची गरज वाटत नाही, त्यामुळे आम्ही विविध राज्यात रथयात्रेच्या माध्यमातून राष्ट्रीय समाज बळकट करण्याचा प्रयत्न करत आहोत. गावोगावी आम्हाला लोकांचा प्रतिसादही चांगला मिळत आहे. आम्ही स्वबळाचा मार्ग निवडला आहे. सर्व जाती धर्माच्या लोकांना बरोबर घेऊन रासपची पक्षसंघटना मजबूत करण्याचे काम करण्यात येत आहे. आम्हाला विचारल्याशिवाय राज्यात व देशात सत्ता स्थापन होऊ शकणार नाही, असे संख्याबळ आम्हाला तयार करायचे आहे, असेही त्यांनी नमूद केले.

बुर्केगाव ता- हवेली जि- पुणे येथे जन स्वराज यात्रेत आ. महादेव जानकर साहेब यांचे ग्रामस्थांनी स्वागत केले.

उरळी कांचन येथे आ. महादेव जानकर यांची घोड्यावरून मिरवणूक काढली. लोणी काळभोर येथे जेसीबीच्या सहाय्याने पुष्वृष्टी करण्यात आली. चाकण येथे राष्ट्रीय समाज पक्षाचे शाखेचे उद्घघाटन करण्यात आले. ठिकठिकाणी स्वागत करण्यात आले. यावेळी राष्ट्रीय समाज पक्षाचे राष्ट्रीय महासचिव कुमार सुशील, राष्ट्रीय संघटक गोविंदराव शुरनर, ज्ञानेश्वर  सलगर, युवक आघाडी अध्यक्ष अजित पाटील, शिरुर लोकसभा प्रभारी सचिन गुरव, अॅड. संजय माने, पुणे जिल्हाध्यक्ष विनायक रुपनवर, सचिन लोंढे, भाऊसाहेब घोडे, योगेश धरम, गोविंद गोरे आदी उपस्थित होते.



Tuesday, October 3, 2023

गोवा धनगर समाज सेवा संघ तर्फे धोंड मंडप धनगरवाडा माळोली येथे महात्मा गांधी जयंती साजरी

गोवा धनगर समाज सेवा संघ तर्फे धोंड मंडप धनगरवाडा माळोली येथे महात्मा गांधी जयंती साजरी

Goa Dhangar Samaj Seva Sangh Sattari संघटनेच्या वतीने धोंड मंडप धनगरवाडा माळोली येथे महात्मा गांधी जयंती साजरी करण्यात आली. प्रमुख पाहुणे सरकारी स्कूल भुईपाल शाळेचे शिक्षक श्री अनंतराव राणे सर, सरकारी प्राथमिक शाळा माळोली शाळेचे शिक्षक श्री रुपेश पोळेकर सर, पद्मश्री श्री जयन फातर्पेकर, संघटनेचे अध्यक्ष धुळू शेळके, माजी सरपंच रामा खरवत, सचिव चंद्रकांत पावणे, खजिनदार जानू पिंगळे, उपाध्यक्ष लक्ष्मण झोरे, उपखजिनदार विठोबा बोडके, उपखजिनदार राम काळे, माजी उपखजिनदार मुला हुमाणे, निता हुमाणे आणि माळोली गावातील इतर युवा वर्ग उपस्थित कार्यक्रम झाला. सुत्रसंचलन राम काळे यांनी केले. सुरूवातीला दिप प्रज्वलन करून पाहुण्यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले. सचिव चंद्रकांत पावणे याने पाहुण्यांची ओळख करुन दिली.खजिनदार जानू पिंगळे आपले मनोगत व्यक्त केले. 

अध्यक्ष धुळू शेळके यांनी बोलताना सांगितले की २ ऑक्टोबर या दिवशी महात्मा गांधी आणि भारताचे माजी पंतप्रधान लालबहादूर शास्त्री यांची जयंती आहे या दोन्ही महापुरुषांच्या जयंती निमित्त हार्दिक शुभेच्छा दिल्या. गांधीजींच्या विषयावर व्याख्यान पुढे राणे सर करणार आहे. माजी पंतप्रधान लालबहादूर शास्त्री यांच्या विषयी थोडक्यात बोलताना सांगितले एखाद्या मानुस आपल्या हातून महान कार्य पार पाडतो किंवा घडवितो. लालबहादूर शास्त्री हे आपल्या देशाचे पंतप्रधान होते. त्यांच्या अंगी असलेले कर्तृत्ववान आणि कमी कारकिर्दीत आपल्या अंगच्या गुणवत्ता मुळे मोठी किर्ती मिळविली. त्यांच्या विषयी आपण  वाचाल तर आपणास आर्दश घेण्याकरिता खुपच्या गोष्टी आहेत. 

माजी सरपंच रामा खरवत यांनी गोवा धनगर समाज सेवा संघ सत्तरी संघटनेच्या वतीने माळोली गावात गांधी जयंती निमित्त कार्यक्रम आयोजित करण्यात आल्याबद्दल संघटनेचे अभिनंदन केले. आणि यापुढे ही असे उपक्रम राबविले जावेत अशी विनंती केली. शिक्षक रुपेश पोळेकर सरांनी सांगितले माणूस म्हणून आम्ही पहिल्यांदा आपल्या पासून वाईट गुण काढून टाकले पाहिजे आणि आपले शरीर पहिली निवळले पाहिजे प्रत्येक जण व्यसनापासून दूर होतील तोच खरा आमच्या विकास होणार आहे. 

जयन फातर्पेकर यांनी सांगितले आमच्या भारत देशाचे लाडके पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांनी भारत देशभर २ ऑक्टोबर गांधी जयंतीच्या निमित्ताने स्वच्छता मोहीम राबविण्यात येते. आपण सर्वांनी आपल्या गावा गावांतून स्वच्छता ठेवावी हिच खरी गांधीजींना श्रद्धांजली ठरेल. हेच स्वप्न पंतप्रधान मोदीजींचे आहे.

 प्रमुख पाहुणे अनंतराव राणे सरांनी भाषणाची सुरुवात आपल्या सर्वांसह रगुपती राघव राजाराम, पतित पावन सिताराम टाळ्यां वाजवत गाण्याची सुरूवात केली. गांधीजींच्या बालपण आणि शिक्षणाच्या विषयावर सांगितले, परदेशी ब्रिटिशने आपल्या या देवभूमीत प्रवेश केला. भारतीय लोक मुळात फार गरीब स्वभावाचे होते याचा अंदाज घेऊन ते इथेच राहून व्यापार करू लागले सुरूवातीला गोड गोड बोलून त्यांनी भारतीय लोकांच्या गरीब व भोळ्या लोकांचा विश्वास संपादन केला आणि काही काळानंतर आपले खरे रूप दाखविण्यात सुरूवात केली. आणि संपूर्ण भारताला आपला पंखाखाली घेतले. येथील लोकांना गुलामगिरीची वागणूक देण्यात सुरू झाली. पण असे असले तरी भारत भूमीत अनेक महान पुरुषांनी जन्म घेऊन भूमीचा उध्दार केला. गांधीजींच्या लंडन येथील प्रवास ते मायदेशी परतले, आफ्रिकेला प्रयाण ते मायदेशी परतले, गांधी युगाचा आरंभ, असहकार आंदोलन, दांडीयात्रा, चले जाव आंदोलन, स्वातंत्र्य सूर्य उगवला आणि महात्म्याचा अस्त असा विषयावर व्याख्यान केले. 

उपाध्यक्ष लक्ष्मण झोरे यांनी सर्व मान्यवरांचे आभार मानले तसेच माळोली गावातील युवक धुळो खरवत, सुजय वरक, विशाल खरवत, शैलेश हुमाणे मितेश वरक कार्यक्रम आयोजित करण्यासाठी व्यवस्था केल्याबद्दल आभार मानले.

चागंले संस्कार टिकविण्यासाठी वाचन संस्कृतीची गरज : डॉ. शंकर स्वामी वडेपुरीकर

चागंले संस्कार टिकविण्यासाठी वाचन संस्कृतीची गरज : डॉ. शंकर स्वामी वडेपुरीकर ‌पु.अहिल्यादेवी वाचनालयात " वाचन संकल्प महाराष्ट्राचा...