रासपचे भूतपूर्व राष्ट्रीय अध्यक्ष एस एल अक्कीसागर यांच्या डोळ्यावरील शस्त्रक्रिया यशस्वी
मुंबई : राष्ट्रीय समाज पक्षाचे भूतपूर्व राष्ट्रीय अध्यक्ष एस एल अक्कीसागर यांच्या दोन्ही डोळ्यांवरील शस्त्रक्रिया यशस्वी झाले असल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांकडून देण्यात आली. एस एल अक्कीसागर हे गत अनेक वर्षांपासून डोळ्यांनी त्रस्त होते. त्यांना डाव्या डोळ्याने फारसे दिसत नव्हते. अक्कीसागर यांनी मासिक 'यशवंत नायक'च्या कामात स्वतःला गुंतवून घेतले होते. संगणक हाताळणे, नोट्स काढणे, विविध विषयावर दर्जेदार लेखन करणे आदी कामात त्यांनी झोकून दिले. निरनिराळ्या नामांकित दैनिकात स्फुट लेखन केलेले आहे. त्यांचा बराचसा भार हा एका डोळ्यावरच होता. कित्येक वर्षांपासून त्यांना डोळ्यांची समस्या उद्भवली होती, परंतु त्यांनी त्याकडे दुर्लक्ष करून पक्ष, यशवंत नायकच्या कामात सतत लक्ष ठेवले. अलीकडे त्यांनी रासेफचे काम हाती घेतले आहे. नुकतीच त्यांच्यावर पनवेल येथील खासगी रुग्णालयात डोळ्यांवर शस्त्रक्रिया करण्यात आली. अलीकडे त्यांच्या डाव्या डोळ्यांची शस्त्रक्रिया बरी होत असून, लवकरच त्यांची उजव्या डोळ्याची शस्त्रक्रिया देखील बरी होईल, असा आशावाद नातेवाईक यांनी व्यक्त केला.
डोळ्यांवरील शस्त्रक्रिया यशस्वी होते न होते तोच अक्कीसागर यांचा कर्नाटक दौरा निश्चित
आपल्या दोन्ही डोळ्यांची शस्त्रक्रिया यशस्वी होते न होते तोच लगेचच येणाऱ्या २९ मार्च २०२३ रोजी कर्नाटक राज्याच्या दौऱ्यावर जाण्याचे श्री. अक्कीसागर यांनी निश्चित केले आहे. शस्त्रक्रिया होऊन देखील त्यांनी कोणत्याही प्रकारचा आराम विश्रांती न घेता आपले काम चालूच ठेवले होते. देशभरातील कार्यकर्ते यांच्यासाठी संदेश लिहिणे, सर्वांशी सुसंवाद साधणे हे सर्व काम त्यांचे सुरूच होते. राष्ट्रीय समाज पक्ष व नेता महादेव जानकर यांच्यापाठीशी विचारांचे भक्कम पाठबळ उभे केले आहे आणि ते अंखंडपणे करताहेत. यशवंत नायकच्या माध्यमातून त्यांनी राष्ट्रीय समाज पक्षाचा पाया तयार करताना नवीन विषय, नवीन अजेंडा, राष्ट्रीय समाजाचा विचार पेरण्याचे काम केले आहे.
No comments:
Post a Comment