यात्रा जोतिबा देवाची ! सांगता अखंड हरिनाम सप्ताहाची !!
कुलदैवत श्री जोतिबा देवाची यात्रा मोठ्या उत्साहात दिनांक 5 एप्रिल 2023 रोजी कोल्हापूर येथे पार पडली. तत्पूर्वी दिनांक 2 एप्रिल 2023 रोजी पुकळेवाडी येथून श्री रतन नंदी सोबत नगारा घेऊन भाविक भक्त मोठ्या उत्साहाने जोतिबा डोंगराच्या दिशेने रवाना झाले. दिनांक 4 एप्रिल सायंकाळी पाच वाजता रतन नंदीसह भक्तांनी जोतिबा डोंगराकडे पायथ्याकडून शिखराकडे प्रस्थान केले. चांगभले बोलत तासाभराच्या अवधीतच नंदीसह यात्रेकरूंचे डोंगरावर आगमन झाले. मंदिर परिसरात भेट देऊन रतन नंदीसह यात्रेकरू पुजाऱ्यांच्या घरी आश्रयस्त झाले. दिनांक 5 एप्रिलला पालखीवर गुलाल खोबरे उधळून भक्तानी यात्रेचा आनंद लुटला. सायंकाळी आठ वाजता ज्योतिबा डोंगरावरून रतन नंदिसह पुकळेवाडी ग्रामस्थ गावाकडे मार्गस्थ झाले. वारणा, कृष्णा, येरळा नदीचे पाणी पिऊन यात्रेकरू दिनांक ८ एप्रिल रोजी पुकळेवाडीत दाखल झाले. 9 एप्रिल रोजी विसावा तर दहा एप्रिल रोजी देव बोळवण्याचा कार्यक्रम पार पडला, यावेळी पोलीस दलात पदोन्नती मिळवलेले वरिष्ठ पोलीस अधिकारी श्री भास्कर पुकळे व महाराष्ट्र लोकसेवा आयोगात प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण झालेले सचिन पुकळे सर व सामाजिक कार्य केल्याबद्दल राहुल दादा पुकळे यांचा जाहीर नागरी सत्कार पार पडला. प्रदक्षिणा घालून तसेच गुलाल उधळत देव बोळवण्याचा कार्यक्रम पार पडला, त्यात गजनृत्यही पार पडले. जोतिबा यात्रेनिमित्त होत असलेल्या पारायणचे दि. 11 एप्रिल रोजी अखंड हरिनाम सप्ताहाची सांगता थाटामाटात पार पडली. जोतिबा यात्रेत गजनृत्य, धनगरी ओव्या, गीत आदी कार्यक्रम पार पडले.
अखंड हरिनाम सप्ताहाची सांगता : ११ एप्रिलचा दिवस
सकाळ सकाळी बाल गोपाळ जोतिबा मंदिराच्या आवारात जमले होते. बाल गोपाळ यांनी पताके हातात घेतले होते, बाहेर गावावरून आलेले महाराज मंडळी अभंग म्हणत होते तर टाळकरी टाळ वाजवत होते. मृदुंगमणी पखवाजाचे ताण काढत होते. गावातील तरुण मुलं पालखीची सजावट करत होते. काल्याच्या कीर्तनाची दहीहंडी बांधण्यात काहीजण गुंतले होते. राम कृष्ण हरी, ज्ञानबा तुकाराम चे गोड स्वर उमटू लागले आणि पालखीतील गावकऱ्यांची भाऊ गर्दी वाढू लागली. विठू नामाचा गजर करत पालखी हळूहळू विष्णूबुवा यांच्या घराजवळ आली. वारकऱ्यांचा वैष्णवांचा डाव रंगला आणि गजी नृत्याची घाई पार पडली. दरम्यान पालखी सिद्धनाथ मंदिरात आली. गज नृत्याच्या घाईने वारकऱ्यांच्या तालासुरातील लयबद्ध फुगड्यांनी उपस्थिता नागरिकांचे लक्ष वेधले. ग्रामस्थ महिला मंडळी अगदी लहानथोर अवघे अवघे फुगड्या खेळण्यात दंग झाले होते आनंदाचा भर आला होता तर इकडे तरुण पोरांनी उपस्थित भक्तांना ताक, लशी देऊन उन्हाने कोरड पडलेल्या घशाला गारवा निर्माण केला. फुगड्यांचा खेळ संपला रे वारकरी ज्योतीराम मंदिराकडे काल्याच्या कीर्तनासाठी एकत्र आले. वडगाव स्वामी जयराम स्वामी मठाधिपती ह भ प विठ्ठल महाराज यांचे काल्याचे किर्तन पार पडले. वारकरी पंथामध्ये, क्षेत्रामध्ये लहान थोर स्त्री-पुरुष जात वर्गातील भेदभावास स्थान नसल्याचं विठ्ठल स्वामी महाराजांनी ठणकावून सांगितले. पशुपालक संस्कृतचा गौरोद्गार काढताना महाराज म्हणाले, पशुपालकांना जपले पाहिजे पुकळेवाडी गाव तसं संस्कृती जपणारे गाव आहे. विशेष : महाप्रसाद भोजनासाठी दोन व्यक्तींचे हात राबले... १) महादेव बापू पुकळे.. २) नारायण बाबा पुकळे
No comments:
Post a Comment