महामानवाचे भक्त न बनता त्यांच्या विचाराचे शिष्य बनावे : प्रबोधनकार गोविंदराम शूरनर
जयंती कार्यक्रमांत बोलताना प्रबोधनकार गोविंदराम शुरनर व अन्य मान्यवर. |
नांदेड (प्रतिनिधी) : पुण्यश्लोक अहिल्यादेवी सार्वजनिक वाचनालय होळकरनगर सिडको नांदेड येथे महात्मा बसवेश्वर, महात्मा जोतीराव फुले, भारत रत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साजरी करण्यात आली. या कार्यक्रमाचे अध्यक्ष गोविंदराम शूरनर आपल्या अध्यक्षीय भाषणात म्हणाले, या महापुरूषानी जे कार्य केले ते कोण्या एका समाजासाठी नाही तर सर्व मानवाच्या उद्धारासाठी केले याचा विसर पडू देवू नका, त्यांच्या कार्यामुळेच सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतीक, राजकिय बदल झालेला दिसून येतो. नविन पिडिने या महापुरुषांचे भक्त न बनता त्यांच्या विचारांचे शिष्य बनावे असे प्रतिपादन केले.
प्रमुख पाहुणे डॉ. शंकर स्वामी वडेपुरीकर म्हणाले, बाराव्या शतकात महात्मा बसवेश्वरानी आंतरजातीय विवाह घडवून जांतीअंताचा लढा देवून समतेचा संदेश दिले, तेच कार्य महात्मा जोतीराव फुले नी आंतरजातीय विवाह घडवून आणले, यापूढे जाऊन शैक्षणिक कार्याची सुरूवात करून मानसाला मानुस बनविले, तेच कार्य डॉ बाबासाहेबांनी संविधानाव्दारे आपणाला स्वातंत्र्य मिळवून दिले यांची जाणिव नविन पिडिनी ठेवली तरच लोकशाही टिकेल असे बोलले. केरबा जेटेवाड, डॉ. गणपत जिरोनेकर, मारोती पवार यांची भाषणे झाली. या कार्यक्रमाला व्हि. जंगले, शेषराव कांबळे, शिरसेकर सर, सौ. सावित्री शूरनर, शंकर रघुजीवार, नरेन्द्र शंकर, सौ. ज्योती कसनकर , सौ.वनिता राठोड, विजयकुमार कदम यांची प्रमुख उपस्थिती होती. कार्यक्रमाचे शेवटी ग्रंथपाल मदनेश्वरी देवकते यांनी सर्वांचे आभार मानले.
No comments:
Post a Comment