एड. उमेश पाल हत्याकांड प्रकरणी उत्तर प्रदेशात राष्ट्रीय समाज पक्ष आक्रमक
बदायु, वाराणसी, कानपूर, गाझियाबाद, मिर्झापूर सह राज्यभरात आंदोलने, मोर्चे, निदर्शने
कानपूर : |प्रा. आबासो पुकळे
प्रयागराज येथे खुलेआम गोळीबार करून एड. उमेश पाल हत्याकांड प्रकरणी बदायु शहरात राष्ट्रीय समाज पक्षाचे कार्यकर्ते आक्रमक झाले. संशयित आरोपींचा पुतळा जाळून निषेधाच्या घोषणा देत मुख्य चौकात एक तास रस्ता रोखून चक्काजाम केला. ज्ञानपुर दुर्गागंज येथे शोकसभा घेऊन रासप कार्यकर्त्यांनी भदोही पोलीस यांना निवेदन दिले. जनपद इटावा जिल्हाध्यक्ष राजीव पाल यांच्या नेतृत्वात आयुक्त यांना निवेदन दिले. कानपूर येथे प्रदेशाध्यक्ष चंद्रपाल यांच्या उपस्थितीत जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यात आले. निषेधाच्या घोषणा देत निदर्शने करण्यात आली. नरेश कुमार वाल्मिकी यांच्या नेतृत्वात गाझियाबाद येथे शेकडो कार्यकर्त्यांनी एकत्र येऊन विविध मागण्यांचे निवेदन जिल्हाधिकारी यांचेकडे सोपवले. शाहजांपुर येथे जिल्हाध्यक्ष एड. मनोज पाली यांच्या नेतृत्वात जोरदार निदर्शने करून जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यात आले. मिर्झापूर येथे जिल्हाध्यक्ष अनिलकुमार पाल यांच्या नेतृत्वात निषेधाच्या घोषणा देत आरोपींचे एन्काऊंटर करून हत्याकांडातील मृत सुरक्षारक्षक यांच्या घरातील एका सदस्याला नोकरी द्यावी अशा मागणीचे निवेदन जिल्हाधिकारी यांचेमार्फत मुख्यमंत्री यांना पाठवले.
वाराणसी येथे जिल्हाध्यक्ष शिवकुमार पाल यांच्या नेतृत्वात जिल्हाधिकारी यांना निवेदन देऊन पीडित कुटुंबीयांना कमीत एक करोड रुपयांची मदत करावी अशी मागणी करण्यात आली. जौनपुर येथे जिल्हाध्यक्ष रमाशंकर पाल यांच्या नेतृत्वात निदर्शने करत लवकरात लवकर पीडित कुटुंबीयांना न्याय देण्यात यावे अशी मागणीचे जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यात आले.
"हत्येच्या निषेधार्थ कोणताही राजकीय नेता घटनास्थळी पोहचला नाही. प्रदेशाध्यक्ष या नात्याने घटनास्थळी भेट देऊन पीडित कुटुंबीयांना धीर दिला. हत्याकांडाचा निषेध करत आतापर्यंत १८ जिल्ह्यात राष्ट्रीय समाज पक्षाचे कार्यकर्ते रस्त्यावर उतरले."- चंद्रपाल, अध्यक्ष उत्तर प्रदेश रासप.
No comments:
Post a Comment