मुख्यमंत्री नव्हे तर प्रधानमंत्री व्हायचे आहे : महादेव जानकर
दिल्ली : इन्सेटमध्ये संत कनकदास जयंती कार्यक्रमात बोलताना महादेव जानकर, मंचावर इतर मान्यवर. |
दिल्ली : आबासो पुकळे
दि. १२/३/२३ रोजी कर्नाटक संघ भवन दिल्ली येथे क्रांतीविर संगोळी रायन्ना संघ तर्फे संतश्रेष्ठ कनकदास यांच्या ५३५ व्या जयंतीचे आयोजन केले होते. मंचावर कनकगुरू महापिठाचे महास्वामी श्री. सिद्धरामनंद विराजमान होते. राष्ट्रीय समाज पक्षाचे संस्थापक अध्यक्ष, माजी मंत्री महादेव जानकर म्हणाले, कर्नाटकात मुख्यमंत्रीपदाची चर्चा चालू आहे, परंतु आता मुख्यमंत्री नव्हे तर प्रधानमंत्री बनण्याचे ठरवले पाहिजे. आपणाला प्रधानमंत्री बनायचे आहे. आज जिकडे पहावे तिकडे राष्ट्रीय समाजाला मारले, दाबले जात आहे. नेहमी दानशूर असा देनेवला राष्ट्रीय समाज आज कुठे नोकरी, कुठे प्रस्थापित पक्षाकडे तिकिटाचे भिक मागत आहे. मालक न बनता चमचा बनून काम करत आहे. संत कनकदास जयंतीनिमित्त असा पण करावा, 'मागणाऱ्या समाजाला पुन्हा देणारा समाज बनवू'. राजकीय भागीदारी वाढली पाहिजे. आज येथे खासदार नाही बसलेलेपैकी माझ्यासह आमदारच आहेत.
दिल्लीची सत्ता काबीज करण्यासाठी व प्रधानमंत्री बनवण्यासाठी संत कणकदास यांचे थ्री डी - डीटरमिनेशन - डीवोशन आणि डेडीकेशन शिकले पाहिजे, असे उदगार श्री. जानकर यांनी काढले. कार्यक्रमासाठी गुजरातचे माजी खासदार सागर रायका, कर्नाटकचे माजी आमदार एच के रेवणा, तेलंगणाचे आमदार येगे मल्लेश्यम, शेफर्ड इंडिया इंटरनॅशनलचे राष्ट्रीय उपाध्यक्ष श्री. राम पाल व अन्य उपस्थित होते.
No comments:
Post a Comment