महादेव जानकर गुवाहटीला पोहचले; कामाख्या मातेचे दर्शन घेतले
गुवाहटी : राष्ट्रीय समाज पक्षाचे संस्थापक राष्ट्रीय अध्यक्ष महादेव जानकर हे आसाम राज्याच्या दौऱ्यावर आले होते. महादेव जानकर यांनी गुवाहटीत कामाख्या मातेचे दर्शन घेतले. तसेच त्यांनी आसाम राज्याच्या दौऱ्यात चहाच्या मळ्यांना भेट देऊन पाहणी केली. समाज माध्यमाद्वारे महादेव जानकर यांनी सांगितले की, आसाम राज्यातील रासपच्या कार्यकर्त्यांच्या गाठीभेटी घेऊन बैठकाही पार पडल्या. यशवंत नायकला मिळालेल्या माहितीनुसार आसाम राज्याचे रासप अध्यक्ष गोपाल कहार हे दीबुगढ येथे राहतात.
No comments:
Post a Comment