येणाऱ्या निवडणुकीत जिंकण्यासाठीचा विडा उचललाय : संपतराव ढेबे
खालापूर : यशवंत नायक ब्यूरो
येणाऱ्या निवडणुकीत रायगड जिल्ह्यात जिंकण्यासाठीचा विडा राष्ट्रीय समाज पक्षाने उचललाय, असे मत रासपचे उत्तर रायगड जिल्हा अध्यक्ष संपतराव ढेबे यांनी व्यक्त केले. श्री. ढेबे पुढे म्हणाले, राष्ट्रीय समाज पक्षाच्या माध्यमातून खालापूर, कर्जत तालुक्यामध्ये पक्ष वाढीसाठी सर्व कार्यकर्त्यांची मोठी पायपीट चालू आहे. राष्ट्रीय समाज पक्ष हा येणाऱ्या निवडणुकीला सामोरे जाण्यासाठी विजयाचा विडा उचलून मोठ्या संख्येने पक्ष बांधणीसाठी अहोरात्र प्रयत्न करीत आहे. नवनवीन कार्यकर्ते पक्षप्रवेश करून राष्ट्रीय समाज पक्ष वाढविण्यासाठी रात्रंदिवस प्रयत्न करीत आहेत.
अशोक सिताराम पवार यांची खोपोली शहर अध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे. तसेच सुरज सोमासे यांची देखील कर्जत खालापूर युवा विधानसभा अध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे. या नियुक्तीवेळी पक्षाचे कार्यकर्ते यांनी पूर्णपणे पक्ष वाढीचा विचार करून नियुक्ती केली आहे. पक्षाचे उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष श्री. संपतराव ढेबे, पक्षाचे ज्येष्ठ कार्यकर्ते प्रदीप कोचरे, गजानन चंदने त्याचप्रमाणे राष्ट्रीय समाज पक्षाचे खालापूर तालुका अध्यक्ष आर आर बर्गे, युवा आघाडी उपाध्यक्ष लक्ष्मण हिरवे, युवा कार्यकर्ते विजय ढेबे रायगड जिल्हा सदस्य आनंद हिरवे आदी कार्यकर्ते उपस्थित होते.
No comments:
Post a Comment