कार्ली ग्रामपंचायत सदस्यांच्या आमरण उपोषणाला रासपचे जाहीर समर्थन
उपोषणस्थळी पाठिंबा देताना प्रदीप गावंडे उपाध्यक्ष अकोला जिल्हा राष्ट्रीय समाज पक्ष |
अकोला : मूर्तिजापूर तालुक्यातील कार्ली गावाचा पाणीपुरवठा पूर्ववत करण्याकरिता नवीन विहिरीचे खोदकाम केले. या खोदकामात भ्रष्टाचार झाला असून, त्याची सखोल चौकशी तात्काळ करण्यात यावी, अशी मागणी करत कार्ली ग्रामपंचायतच्या उपसरपंच प्रभाबाई वानखेडे, ग्रामपंयात सदस्य सुरज निघोट व देवानंद किर्दक यांनी गटविकास अधिकारी मूर्तिजापूर यांना निवेदन दिले आहे. चौकशीच्या मागणीसाठी बेमुदत आमरण उपोषण सुरु केले आहे. राष्ट्रीय समाज पक्षाचे अकोला जिल्हा उपाध्यक्ष प्रदीप गावंडे यांनी उपोषणस्थळी भेट देवून उपोषणकर्त्यास जाहीर पाठिंबा दिला.
No comments:
Post a Comment