लोकसभा निवडणुकिपूर्वी बूथपर्यंत संघटन मजबूत करावे : महादेव जानकर
![]() |
शिवपुरी लोकसभा मतदार क्षेत्रात राष्ट्रीय समाज पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष महादेव जानकर यांचे जोरदार स्वागत करण्यात आले. |
शिवपुरी लोकसभा मतदार क्षेत्रात राष्ट्रीय समाज पक्ष जन स्वराज यात्रा
शिवपुरी - मध्य प्रदेश (२१/१/२४) :
लोकसभा निवडणुकीपूर्वी युवक, महिला आघाडी सह सर्व आघाड्यांच्या कार्यकारण्या पुर्ण कराव्यात. बूथ पर्यंत संघटन मजबूत करावे, असे आवाहन रासपचे राष्ट्रीय अध्यक्ष महादेव जानकर यांनी केले. रासपचे राष्ट्रीय अध्यक्ष माननीय महादेव जानकर साहेब यांच्या प्रमुख उपस्थितीत शिवपुरी लोकसभा मतदारक्षेत्रात राष्ट्रीय समाज पक्ष तर्फे जन स्वराज यात्रा काढण्यात आली, यावेळी ते बोलत होते. जनस्वराज यात्रेचे पुष्पवृष्टी करत स्वागत करण्यात आले. रासपच्या जन स्वराज यात्रेत युवक मोठ्या प्रमाणात सहभागी झाले होते. उपस्थितांना महादेव जानकर यांनी मार्गदर्शन करताना पक्षाची ध्येय धोरणे सांगितली.
जन स्वराज यात्रेत आदिवासी नेता दौलतराम रावत, राष्ट्रीय महासचिव कुमार सुशील, गिरिराज पहलवान, प्रदेश प्रभारी प्राणसिंह पाल, ज्येष्ठ नेते दादामिठ्ठन लाल वंशकार, शहडोल रासप अध्यक्ष रामविशाल कोली, रामपाल पाल, रामविशाल पाल, वरिष्ठ नेते रामकृष्ण विश्वकर्मा उपस्थित होते. कार्यक्रमाचे आयोजन शिवपुरी जिल्हाध्यक्ष तथा लोकसभा गुना शिवपुरीचे उमेदवार एड. डी. एस चौहान, पिछोर रासप अध्यक्ष महेंद्र पुरोहित, कोलारस रासप अध्यक्ष प्रतापसिंह बघेल, किरार समाजाचे नेते रामविलास किरार, शिवपुर जिल्हा उपाध्यक्ष शीशपाल जिद्दी, ब्लॉक अध्यक्ष पिछोर युवा आघाडी अध्यक्ष सरजिल कुरैशी, पिछोर विधानसभा प्रभारी सिंगर सतीश, पिछोर शहर अध्यक्ष अखिलेश, युवा नेता आनंदपाल, दतिया रासपचे अखिलेश पाल, बबीना रासपचे रामसिंह पाल, पोहरी रासपचे रामलखन पाल, नरवरचे सरपंच सुरेश बघेल यांनी केले होते.
No comments:
Post a Comment