Friday, February 16, 2024

देशातील काँग्रेस आणि भाजपची मक्तेदारी मोडीत काढणे, हाच रासपचा अजेंडा

देशातील काँग्रेस आणि भाजपची मक्तेदारी मोडीत काढणे, हाच रासपचा अजेंडा 

पत्रकार परिषदेत बोलताना महादेव जानकर, बाजूस एस. एल. अक्कीसागर

पत्रकार परिषदेत रासप संस्थापक राष्ट्रीय अध्यक्ष महादेव जानकर यांची घोषणा 

बेळगावी(२५/१/२४) :  "या देशावर रासपची सत्ता आणणे, घराणेशाही मोडीत काढणे, उपेक्षितांना अपेक्षित ठिकाणी सत्ता मिळाली पाहिजे. काँग्रेस आणि भाजपची मक्तेदारी मोडीत काढायची, हाच रासपचा अजेंडा आहे, असे प्रतिपादन रासपचे संस्थापक राष्ट्रीय अध्यक्ष महादेव जानकर यांनी पत्रकार परिषदेत केले. कन्नड साहित्य भवन येथे कर्नाटक राष्ट्रीय समाज पक्ष तर्फे पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी कर्नाटकचे सुपुत्र, रासपचे भूतपूर्व राष्ट्रीय अध्यक्ष एस. एल. अक्कीसागर उपस्थित होते. मा. जानकर  यांनी हिंदी मराठीत तर मा. अक्कीसागर यांनी कन्नड भाषेत पत्रकार परिषदेला सामोरे गेले.

पत्रकार परिषदेत बोलताना महादेव जानकर पुढे म्हणाले, भारतात सर्वच लोकसभा मतदारक्षेत्रात राष्ट्रीय समाज पक्ष उमेदवार निवडणुकीच्या आखाड्यात उतरवणार आहे. आम्ही स्वतंत्र लढणार आहे. कर्नाटकात आमची कुणाशीही युती नाही. गुलबर्गा, विजयपुर, बेळगांव, बिदर, चिकोडी येथे रासपकडून लढण्यास अनेकजण इच्छुक आहेत. महाराष्ट्र, गुजरात, मध्यप्रदेश, कर्नाटक, उत्तर प्रदेश येथे रासपच्या जन स्वराज यात्रेस चांगला प्रतिसाद मिळत आहे. १७ राज्यात राष्ट्रीय समाज पक्षाचे संघटन आहे. कलेकलेने पक्ष वाढत असल्याने, याचा आम्हाला सार्थ अभिमान आहे. दोन दिवसांपूर्वी हावेरी, बागलकोट, बेळगांव जिल्ह्याचा दौरा पूर्ण केला. 

आजच तिकिट देतो : जानकर

पत्रकारांना म्हणाले, तुमच्यापैकी कुणास खासदार होण्याची इच्छा असल्यास आजच तिकीट देतो, अशी मिश्किल टिप्पणी श्री. जानकर यांनी केली.]

No comments:

Post a Comment

विश्वाचा यशवंत नायक माहे : जून 2025

विश्वाचा यशवंत नायक माहे : जून 2025