Sunday, February 4, 2024

महाराष्ट्रात राष्ट्रीय समाज पक्ष तर्फे लोकसभा निवडणुकीची मोर्चेबांधणी

महाराष्ट्रात राष्ट्रीय समाज पक्ष तर्फे लोकसभा निवडणुकीची मोर्चेबांधणी 


मुंबई : राष्ट्र भारती द्वारा 

आगामी 2024 च्या सार्वत्रिक लोकसभा निवडणुकीसाठी राष्ट्रीय समाज पक्षाचे पदाधिकारी कार्यकर्ते मोर्चेबांधणी लागले आहेत. महाराष्ट्रातील परभणी, माढा, बारामती, सांगली, अहमदनगर, शिर्डी, लोकसभा मतदारसंघ राष्ट्रीय समाज पक्षाने पिंजून काढण्यास सुरुवात केली आहे. राष्ट्रीय समाज पक्षाचे कार्यकर्ते लोकसभा मतदारसंघातील प्रत्येक गाव टू गाव जाऊन भेट देण्यावर जोर दिला आहे. घोंगडी बैठकाद्वारे जनतेचे प्रश्न समजावून घेत, राष्ट्रीय समाज पक्षाची भूमिका मांडत आहेत. राष्ट्रीय समाज पक्षाचे शीर्ष नेतृत्व महादेव जानकर यांनी परभणी, माढा, बारामती लोकसभा यापैकी एक व उत्तर प्रदेशातून एका मतदारसंघातून लढण्याचे जाहीर केले आहे. बीड येथे छत्रपती शिवाजी महाराज मैदानातून बोलताना, महादेव जानकर यांनी आपण 'इंडिया' व 'महायुती' सोबत राष्ट्रीय समाज पक्ष नसणार असल्याचे जाहीर केले आहे. महायुतीने आयोजित केलेल्या महामेळाव्याकडे राष्ट्रीय समाज पक्षाने पाठ फिरवली आहे. भाजपने आजवर काय भागीदारी दिली, याचा हिशोब मांडल्याशिवाय कसल्याही प्रकारची चर्चा करणार नसल्याचे निक्षून सांगितले आहे. अहमदनगर दक्षिण लोकसभा मतदार संघातून रविंद्र कोठारी व सांगली लोकसभा मतदार संघातून उच्च शिक्षित युवा नेते कालिदास गाढवे यांची उमेदवारी जाहीर करून स्वबळावर लोकसभा निवडणूक लढण्याचे संकेत दिले आहेत. २०२४ मिशन लोकसभा निवडणूकद्वारे राष्ट्रीय समाज पक्ष आपला आपला स्वतंत्र मतदारकौल जाणून घेईल का? हे काही दिवसातच स्पष्ट होईल. 

No comments:

Post a Comment

चागंले संस्कार टिकविण्यासाठी वाचन संस्कृतीची गरज : डॉ. शंकर स्वामी वडेपुरीकर

चागंले संस्कार टिकविण्यासाठी वाचन संस्कृतीची गरज : डॉ. शंकर स्वामी वडेपुरीकर ‌पु.अहिल्यादेवी वाचनालयात " वाचन संकल्प महाराष्ट्राचा...