कर्नाटक, महाराष्ट्र, उत्तर प्रदेश सहित संपूर्ण देशात जास्तीत जास्त जागा रासपा स्वबळावर लढविणार ! : महादेव जानकर
राष्ट्रीय कार्यकारणी बैठकीत मार्गदर्शन करताना रासप सुप्रीमो महादेव जानकर, बाजूस मंचावर शिवलिंगप्पा किन्नुर, एस. एल. अक्कीसागररासप राष्ट्रीय कार्यकारणी व कर्नाटक राज्य कार्यकारणी बैठक उत्साहात संपन्न |
बेळगावी(२५/१/२४) : राष्ट्रीय समाज पक्ष राष्ट्रीय कार्यकारणी व कर्नाटक राज्य कार्यकारिणीची बैठक दुपारी २ वाजता कन्नड साहित्य भवन, राणी चेन्नमा सर्कल, बेळगावी येथे पार पडली. बैठकीत लोकसभा निवडणुकीसाठी महादेव जानकर यांना सर्वाधिकार देण्याचे एकमताने ठरले. त्याशिवाय सर्व समाजाची जातीनिहाय जनगणना त्वरित अंमलबजावणी आणि संगोळी रायन्ना स्मृतीस्थळ नंदगड राष्ट्रीय स्मारक आणि राष्ट्रीय पर्यटनस्थळ बनावे यासहित अनेक ठराव मंजूर करण्यात आले. यामध्ये कर्नाटक राज्य मागासवर्गीय आयोगाने सामाजिक आणि आर्थिक सर्व्हेक्षण केले आहे (कांथराज आयोग) स्वीकारून त्याची अंमलबजावणी करावी, वीर तानाजी मालुसरे यांची स्मृतीस्थान सिंहगड येथे रोपवे निर्माण करावे आदी ठराव होते. अध्यक्षस्थानी एस. एल अक्कीसागर होते. कर्नाटक राज्यप्रभारी सुनील किन्नुर यांनी स्वागत केले. राष्ट्रीय महासचिव कुमार सुशील यांनी प्रास्तविक केले. 2024 हे लोकसभा निवडणुकीचे वर्ष असल्याचे सांगून संघटन बांधणी आणि प्रचार रणनीती याचा ऊहापोह केला. सर्व आघाडी आणि बूथ, गाव, तालुका, जिल्हा लोकसभा ते राज्यकार्यकारिणी त्वरित नेमण्याचे आदेश दिले. परभणी, माढा बारामती, सांगली, शिर्डी, मिर्जापुर, बेळगाव यावर विशेष लक्ष्य केंद्रित करण्याचे आदेश दिले. रासपा संस्थापक अध्यक्ष महादेव जानकर यांचे मुख्य मार्गदर्शन झाले. ते म्हणाले, मुख्य निवडणूक आयोगाच्या नियमानुसार राष्ट्रीय समाज पक्षाच्या वर्षात दोन राष्ट्रीय कार्यकारिणी बैठका होतात. वर्षाच्या सुरवातीला बेळगाव येथे पाहिली राष्ट्रीय कार्यकारिणी बैठक होत आहे. लोकसभा निवडणुक 2024 च्या पार्श्वभूमीवर ही बैठक होत असल्याने या बैठकीला अनन्यसाधारण महत्व असल्याचे जानकर यांनी नमूद केले. पुढे मार्गदर्शन करताना ते म्हणाले, 2003 पक्षाची स्थापना केली. त्याच वर्षी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूका लढवल्या. 2004 साली सार्वत्रिक लोकसभा निवडणूक महाराष्ट्र आणि कर्नाटक या राज्यातून लढवली, विधानसभा लढवली. 2019 ची लोकसभा कर्नाटक सहित 6 राज्यात लढविली. यावेळी कर्नाटक महाराष्ट्र उत्तर प्रदेश सहित संपूर्ण देशात जास्तीत जास्त जागा स्वबळावर लढविणार आहोत. सर्व समाजाला आम्ही भागीदारी देऊ. संपूर्ण राष्ट्रीय विकास आणी समान राष्ट्रीय भागीदारी आमचा मुख्य अजेंडा आहे. मुख्य कायदा आणि अर्थ सत्ता दिल्लीत आहे, म्हणून दिल्ली संसद भवन रासपचे लक्ष्य आहे. माझे पदाधिकारी आणि कार्यकर्त्याच्या माध्यमातून मतधारक जनतेकडे जाऊ आणि जनमताचा अवमान करणाऱ्या जनतंत्र विरोधी सत्ताधारी यांचा बुरखा फाडून, त्यांचा खरा चेहरा दाखवून जास्तीत जास्त खासदार निवडुन आणू. मी स्वतः महाराष्ट्र आणि उत्तर प्रदेश येथुन निवडणूक लढवून संसद भवनमध्ये जाणार म्हणजे जाणारच. परंतु कार्यकर्ते आणि पदाधिकारी हितचिंतक यांनी हे वर्ष निवडणूक वर्ष याची खुणगाठ बांधावी आणि रात्रीचा ही दिवस करून काम करावे. असे मी नम्र परंतु आग्रही आवाहन करीत आहे.
राष्ट्रीय कार्यकारणी व कर्नाटक राज्य कार्यकारणी बैठकीप्रसंगी उपस्थित रासप राष्ट्रीय अध्यक्ष महादेव जानकर समवेत अन्य पदाधिकारी. |
बैठकीसाठी राष्ट्रीय उपाध्यक्ष शिवलिंगप्पा कीन्नुर, राष्ट्रीय संघटक बाळकृष्ण लेंगरे, राष्ट्रीय संघटक गोविंदराव शुरनर, राष्ट्रीय कार्यकारिणी सदस्य मनोज निगडकर, कर्नाटक राज्य अध्यक्ष धर्मन्ना तोंटापुर, कर्नाटक राज्य निवडणूक प्रभारी सुनील कीन्नुर, कर्नाटक राज्य सचिव बसवराज दोड्डमनी, उत्तर कर्नाटक प्रभारी सुनील बंडगर, बेंगळुरू प्रभारी बसवराज मुक्का, बेळगाव जिल्हा प्रभारी बलराम कामन्नावर, बेळगाव जिल्हा अध्यक्ष हनुमंत पूजेर आणि अन्य पदाधिकारी उपस्थित होते. यानंतर राज्य कार्यकारिणीची बैठक झाली. दरम्यान पत्रकार परिषद झाली. आजी माजी अध्यक्ष मा. महादेव जानकर आणि एस एल अक्कीसागर त्याला सामोरे गेले. मा. जानकर यांनी हिंदी, मराठी तर अक्कीसागर यांनी कन्नड मध्ये संबोधन केले. वृत्तपत्र आणि इलेक्ट्रॉनिक मेडियानी दखल घेतली आणि प्रसारण केले.
No comments:
Post a Comment