संगोळी रायण्णा जयंती संसदेत साजरी व्हावी : महादेव जानकर
राष्ट्रीय समाज पक्ष तर्फे आद्य स्वातंत्र्यवीर संगोळी रायन्ना १६ वा राज्याभिषेक वार्षिकोत्सव
नंदगड (२६/१/२०२४) : राष्ट्रीय समाज पक्ष तर्फे आद्य स्वातंत्र्यवीर संगोळी रायन्ना यांचा १६ वा राज्याभिषेक वार्षिकोत्सवाचा कार्यक्रम पार पडला. राष्ट्रीय समाज पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष महादेव जानकर, माजी मंत्री महाराष्ट्र राज्य यांच्या नेतृत्वात देशभरातील राष्ट्रीय समाज पक्ष पदाधिकारी कार्यकर्ते, संगोळी रायन्नाप्रेमी यांच्या प्रमुख उपस्थितीत शुक्रवारी सकाळी ७ वाजता आद्य स्वातंत्र्यवीर संगोळी रायन्ना यांच्या समाधीस्थळी विशेष पूजा करून राज्याभिषेक करण्यात आला. समाधीस्थळापासून रायनांच्या पुतळ्यापर्यंत भव्य मिरवणूक काढण्यात आली. महादेव जानकर यांच्या शुभहस्ते पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून ध्वजारोहण करण्यात आले. महादेव जानकर यांच्यासह रासप पदाधिकारी कार्यकर्ते यांनी संगोळी रायन्ना फाशीस्थळावर जाऊन अभिवादन केले.
संगोळी रायण्णा पुतळ्यासमोर महादेव जानकर आपल्या भाषणात म्हणाले, गेली सोळा वर्षापासून राष्ट्रीय समाज पक्ष नंदगड या ठिकाणी राष्ट्रीय कार्यक्रम घेत आहे. नंदगड भूमीचे नाव सुवर्ण अक्षरांनी लिहावे. संगोळी रायण्णा यांच्या आशीर्वादाने राष्ट्रीय समाज पक्षाचा पहिला आमदार विजयी झाला. मी मंत्री झालो, लवकरच मी खासदार होऊन येईल. कर्नाटकात सत्तेवर आलेल्या सर्वच राज्य सरकारला रासपच्या चळवळीमुळे संगोळी रायण्णा क्रांतीक्षेत्राचा विकास करण्यास भाग पडले. संगोळी रायण्णा केवळ धनगरवीर वा कन्नडवीर नसून राष्ट्रवीर आहेत. त्यांच्या कार्याचा प्रचार आणि प्रसार देशभर रासप करत आहे. संगोळी रायण्णा जयंती दिल्लीच्या संसदेत साजरी व्हावी. जोपर्यंत मी जिवंत आहे, तोपर्यंत 26 जानेवारी प्रजासत्ताकदिनी नंदगडला येत राहील. संगोळी रायण्णा देशासाठी लढले. यावेळी रासेफ राष्ट्रीय अध्यक्ष एस. एल. अक्कीसागर यांनी 'कन्नड'मध्ये मा. जानकर यांच्या भाषणाचा गोषवारा मांडला.
यावेळी राष्ट्रीय उपाध्यक्ष शिवलिंगप्पा किन्नुर, राष्ट्रीय संघटक बाळकृष्ण लेंगरे, गोविंदराव शुरनर, राष्ट्रीय महासचिव कुमार सुशील, भूतपूर्व राष्ट्रीय सचिव गणेश देवासी, राष्ट्रीय कार्यकारिणी सदस्य मनोज निगडकर, कर्नाटक राज्य अध्यक्ष धर्मांन्ना तोंटापूर, कर्नाटक राज्य प्रभारी सुनील किन्नुर, महाराष्ट्र राज्य अध्यक्ष काशिनाथ शेवते, कर्नाटक राज्य महासचिव बसवराज दोड्डमनी, महाराष्ट्र राज्य सचिव ओमप्रकाश चितळकर, कल्याण कर्नाटक अध्यक्ष शरणप्पा पुजारी, उत्तर कर्नाटक प्रभारी सुनील बंडगर, संगोळी रायन्ना प्राधिकरण अध्यक्ष श्रीमलेशप्पा, तहसीलदार प्रकाश गायकवाड, पोलीस अधिकारी श्री. पाटील, संगोळी रायन्ना समिती नंदगड अध्यक्ष शंकर सोनोळी, कन्नड रक्षक वेदिका अध्यक्ष संजय वडेकर, पत्रकार सुरेश दलाल, संभाजी पाटील, रासेफ दिल्ली अध्यक्ष विर पाल, उत्तर प्रदेश रासप अनुसूचित जाती जमाती आघाडी अध्यक्ष नरेश कुमार वाल्मिकी, महाराष्ट्र विदर्भ उपाध्यक्ष तोसिफ शेख, महाराष्ट्र राज्य कार्यकारणी सदस्य भाऊसाहेब वाघ, अश्रुबा कोळेकर, सातारा जिल्हाध्यक्ष खंडेराव सरक, सोलापूर जिल्हा अध्यक्ष रणजित सुळ, प. महाराष्ट्र युवक आघाडी अध्यक्ष अजित पाटील, शिरूर लोकसभा प्रभारी सचिन गुरव, प. महाराष्ट्र संघटक कालिदास गाढवे, गुलबर्गा जिल्हाध्यक्ष देवेंद्र चीगरहल्ली, बेळगांव जिल्हाध्यक्ष हनुमंत पुजेर, विजयपुर अनिल पुजारी, तिकोटा तालुका अध्यक्ष सिद्राम, लक्ष्मी पुजारी, नंदगड ग्रामपंचायत सरपंच, मार्केटिंग सोसायटी, वविध संघ संस्थांचे पदाधिकारी, शासकीय अधिकारी याशिवाय रासेफ महाराष्ट्रचे महावीर सरक आणि सहकारी तसेच सौ. सुनंदा अक्कीसागर, सौ. विजयमाला तिप्पनावर, सतीश सनदी बेळगाव रासपा महासचिव यांच्यातर्फे संगोळी रायन्ना समाधीस्थळी अभिवादन करण्यात आले. दुपारी १२ ते रात्री १०.०० पर्यंत सर्वांना जेवणाची व्यवस्था करण्यात आली होती. दिवसभरात लाखो लोकांनी समाधीचे दर्शन घेतले.
No comments:
Post a Comment