Sunday, February 25, 2024

मुस्लीम आणि ओबीसी समाजाने मतपेटीचा व्यवहार करावा : महादेव जानकर

मुस्लीम आणि ओबीसी समाजाने मतपेटीचा व्यवहार करावा : महादेव जानकर



भुजबळ, जानकर, पाटील यांच्याहस्ते मंडलनामा पुस्तकाचे प्रकाशन 


मुंबई (८/२/२४) : राष्ट्रीय समाजातील बहुसंख्य मुस्लिम आणि ओबीसी समाजाने रोटीबेटीचा व्यवहार नाही केला तरी चालेल, पण या दोन्ही समाजाने मतपेटीचा व्यवहार करावा, असे प्रतिपादन राष्ट्रीय समाज पक्षाचे संस्थापक अध्यक्ष आ. महादेव जानकर यांनी व्यक्त केले. मंडलनामा पुस्तक प्रकाशन प्रसंगी महादेव जानकर बोलत होते.

आ. जानकर पुढे म्हणाले, मुस्लीम ओबीसी समाजाचे माईलस्टोन नेते शब्बीर अन्सारी यांनी मुस्लिम ओबीसी समाजासाठी जी भूमिका केली, ती समाज हिताची होती. जोपर्यंत तुम्ही राजकारण करणार नाही, तोपर्यंत समाजाचं भल कुणीही करणार नाही. भुजबळ साहेब सत्तेत असूनही आम्ही जो संघर्ष करतोय, तो आम्ही आमच्या पोराबाळासाठी नाही. रोटीबेटीचा व्यवहार नाही झाला तरी चालेल, पण मतपेटीचा व्यवहार झाला तर राज्यात आणि देशात सरकार आणू. आपल सरकार आल तर दिलीपकुमार यांना भारतरत्नची मागणी करावी लागणार नाही. समाजाचा नेता मिडिया ठरवत असेल, समाजाची दयनीय अवस्था होत असेल तर आपल्याला राजकीय भूमिका घ्यावी लागेल. शिकलेला वर्ग म्हणतो, राजकारण नको, पण राजकारण केलं तरच समाजाच भल होईल. आम्ही महात्मा फुलेवाद सांगतो. त्यात फातिमा शेखचा धडा नाही म्हणून पुन्हा रडगाण गात बसतो, यांच्यावर चिंतन आणि मनन झालं पाहिजे. 

बहुसंख्य समाजाला ९ टक्के देखील वाटा मिळाला नाही, ही आमच्या देशाची लोकशाही आहे का? असा प्रश्न महादेव जानकर यांनी उपस्थित केला. राष्ट्रीय ओबीसी आणि मुस्लिम समाजाने मतपेटीचा व्यवहार करावा. नुसत मोठ बोलून उपयोग नाही. विधानसभा आणि लोकसभागृहात आपली लोक पाहिजेत तरच आपले प्रश्न सुटतील. मुस्लिमांनी तुमचा नेता तयार करावा. जोपर्यंत तुमचा नेता तयार होणार नाही, तोपर्यंत तुमचं कुणीही भलं करू शकणार नाही.

यावेळी मंचावर शब्बीर अंसारी साहेब  जीवनवृत्तांत "मंडलनामा"  पुस्तकाचा प्रकाशन सोहळाप्रसंगी छगन भुजबळ - कॅबिनेटमंत्री, भालचंद्र मुंनगेकर - माजी खासदार, पदमश्री डॉ झकेरिया- चेयरमैन अंजुमन इस्लाम संस्था, कपिल पाटिल- विधानपरिषद सदस्य, उद्योगपति श्री. पाटनकर आणि पुस्तकाचे लेखक देवदत्त वाघमारे यांच्या उपस्थितीत पार पडला.

No comments:

Post a Comment

चागंले संस्कार टिकविण्यासाठी वाचन संस्कृतीची गरज : डॉ. शंकर स्वामी वडेपुरीकर

चागंले संस्कार टिकविण्यासाठी वाचन संस्कृतीची गरज : डॉ. शंकर स्वामी वडेपुरीकर ‌पु.अहिल्यादेवी वाचनालयात " वाचन संकल्प महाराष्ट्राचा...