भुजबळ साहेब, जोपर्यंत तुम्ही पक्ष काढणार नाही तोपर्यंत न्याय मिळणार नाही : महादेव जानकर
पंढरपूर (६/१/२४) : राष्ट्र भारती द्वारा
मंत्री छगन भुजबळ यांच्या उपस्थितीत पंढरपूर येथे ओबीसी एल्गार महामेळावा पार पडला. या मेळाव्यात राष्ट्रीय समाज पक्षाचे सर्वेसर्वा महादेव जानकर म्हणाले, या राज्यात ओबीसिंची अतिशय भेदरलेली परिस्थिती होती. महाराष्ट्रात विधानसभा आणि प्रशासनात आवाज उठवण्याच काम सर्वप्रथम छगन भुजबळ यांनी केले, त्याबद्दल त्यांचे अभिनंदन केले पाहिजे. त्यांनी कुठल्याही समाजाच्या विरोधातले बोलले नाहीत. किंवा इथे आलेली मंडळी कुणाच्या विरोधात बोलत नाही. फक्त आमचं म्हणन एवढं आहे, ज्यांना अजून काही मिळालाच नाही, त्यांच्या ताटातली भाकरी काढू नये, एवढं साधं सोपं गणित आहे. म्हणून या मेळाव्याच्या माध्यमातून दिलासा देण्याचं काम आम्ही मंडळी करतोय. आमच्या लिंगे साहेबांनी सांगितले, तसे झाले तरच आम्हा ओबीसींना न्याय मिळणार आहे. यश मिळणार आहे. तुमची ओबीसींची फार मोठी ताकद आहे. आम्ही ८५ टक्के आहे म्हणतोय. विचार करतोय, आपण किती लोक येतोय. याचही चिंतन झालं पाहिजे. इथून स्टेजच्या खाली गेलो की, आपआपल्या पक्षात जाणार. म्हणून भुजबळ साहेब माझं तुम्हाला पुन्हा साकड आहे, जोपर्यंत तुम्ही पक्ष काढणार नाही, तोपर्यंत तुम्हाला न्याय मिळणार नाही. आमचं म्हणन आहे, आपण सार करतोय, जर आपला देणारा माणूस नसेल तर करायचं काय. म्हणून याचा विचार झाला पाहिजे. भुजबळ साहेब या मुद्याशी मी तुमच्या बरोबर आहे. राष्ट्रीय समाज पक्ष ताकतीने तुमच्याबरोबर असेल, एवढे आम्ही सांगू इच्छितो. क्रांती होत असेल तर हे होणार आहे. उद्या आपल्याला पंतप्रधान व्हावं लागल. मुख्यमंत्री व्हावं लागलं. आरक्षण कुणाला मागायचे आपण. जर देणारच माणूस आपला नसेल तर करायचं काय. तुमच्या जागृतीच मतात रूपांतर झालं पाहिजे. भुजबळ साहेब पूर्ण हयात तुमच्याबरोबर असेल, असा विश्वास देतो. जय भारत.
No comments:
Post a Comment