Sunday, February 25, 2024

बिहारमध्ये राष्ट्रीय समाज पक्षाचे प्रत्येक जिल्ह्यात संघटन : गोपाल पाठक

बिहारमध्ये राष्ट्रीय समाज पक्षाचे प्रत्येक जिल्ह्यात संघटन : गोपाल पाठक

मधुबनी (१४/१२/२३) : बिहार राज्यात यापूर्वी राष्ट्रीय समाज पक्षाने सार्वत्रिक विधानसभा निवडणुक लढवली आहे. मी एक वर्षापासून राष्ट्रीय समाज पक्षाचे काम चालू केले आहे. राष्ट्रीय समाज पक्षाचे प्रत्येक जिल्ह्यात संघटन उभे केले असल्याचे, बिहार राज्य प्रभारी गोपाल पाठक यांनी स्थानिक वृत्त वाहिनिशी बोलताना सांगितले. 

राष्ट्रीय समाज पक्षाच्या नावातच राष्ट्रीय समाज आहे. देशातील सर्व समाजाला एक राष्ट्रीय समाज म्हणून ओळख आमचे राष्ट्रीय अध्यक्ष महादेव जानकर यांनी दिली आहे. थोर महामानवाच्या विचारांचा राष्ट्रीय समाज घडवणे हा पक्षाचा मुख्य उद्देश आहे. राष्ट्रीय समाज पक्ष सर्व समाजाला सोबत घेऊन चालणारी पार्टी आहे. इथल्या राजकीय पक्षांचा इतिहास खराब राहिला आहे. 

मधुबनी जिल्हाध्यक्ष रोहित शर्मा म्हणाले, पहिल्यादांच मी राष्ट्रीय समाज पक्षांमुळे राजकारणात आलो. भाजपसारखे धर्मांध, भगवादारी, रामभक्त असल्याचे सांगून मते मिळवतात, पण हे खोटारडे पक्ष आहे. आरजेडी यदूवंशी असल्याचे सांगून मते मिळवतात, पण हे खूप जातीयवादी पक्ष आहे. येत्या लोकसभा निवडणुकीत मधुबनी मतदारसंघातून निवडणूक लढवण्यास इच्छुक आहे. यावेळी जिल्हा सचिव गगन झा, मनोजकुमार साहा, हरीशंकर चौधरी, महिला आघाडी नेत्या नूतन देवी, आचार्य आस्तिक कु. झा, अभिनंदन प्रसाद यादव आदी उपस्थित होते.

No comments:

Post a Comment

चागंले संस्कार टिकविण्यासाठी वाचन संस्कृतीची गरज : डॉ. शंकर स्वामी वडेपुरीकर

चागंले संस्कार टिकविण्यासाठी वाचन संस्कृतीची गरज : डॉ. शंकर स्वामी वडेपुरीकर ‌पु.अहिल्यादेवी वाचनालयात " वाचन संकल्प महाराष्ट्राचा...