Sunday, February 25, 2024

प्रस्थापित पक्ष कितीही मोठे असले तरी, मी राष्ट्रीय समाज पक्षातूनच खासदार होणार : महादेव जानकर

प्रस्थापित पक्ष कितीही मोठे असले तरी, मी राष्ट्रीय समाज पक्षातूनच खासदार होणार : महादेव जानकर

कळंबोली (१४/१/२४) : आबासो पुकळे 

प्रस्थापित भाजप, काँग्रेस, राष्ट्रवादी, उद्धव ठाकरेची शिवसेना, शिंदेची शिवसेना हे मोठे पक्ष आहेत, पण मी आज चॅलेंज देऊन सांगतो, मी राष्ट्रीय समाज पक्षातूनच खासदार होणार. ज्यावेळेस मी खासदार होईल, त्यावेळेस महाराष्ट्रात राष्ट्रीय समाज पक्षाचे 25 आमदार असतील, असा विश्वास राष्ट्रीय समाज पक्षाचे संस्थापक/राष्ट्रीय अध्यक्ष महादेव जानकर यांनी व्यक्त केला. महाराष्ट्र राज्य कोषाध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल सुदामशेठ जरग यांच्या सत्कार सोहळ्याचे आयोजन केले होते. यावेळी महादेव जानकर यांनी  उपस्थितीत जनतेशी संवाद साधताना  सामजिक राजकीय जागृतीवर भाष्य करताना काही थेट राजकिय विधाने केली आहेत. 

महादेव जानकर यांचे भाषण ऐकण्यासाठी इथे क्लिक करा > महादेव जानकर संपूर्ण भाषण

महादेव जानकर आपल्या भाषणात म्हणाले, आज सत्कार सोहळा ठेवला, त्या माणसाला माझ्याकडून काही अपेक्षा नव्हती. कारण मंत्री झाल्यानंतर मंत्री पैसे देतो, पण हा कार्यकर्ता माझ्याकडे पैसे नाहीत, असं कळल्यावर माझ्याकडे पैसे घेऊन आला, असा हा सुदामशेठ जरग आहे. मी नव्हते सांगितले त्याला पद द्यायला, मला माहितही नाही. पण मी अभिनंदन करेन काशिनाथ शेवते आणि ज्ञानेश्वर सलगर यांचे, मला त्यांनी विचारले सुद्धा नाही. दिल्लीला जाताना एकदा चर्चा झाली होती, तो मुलगा चांगला आहे. प्रामाणिक आहे. पद द्या, अगर नका देऊ, दोन वर्षापूर्वी चर्चा झाली होती. कुणी ५ रुपये, १० रुपये, हजार रुपये दिले असतील, तुमच्या सर्वांच्याकृपेमुळे 13 कोटी जनतेचा मी मंत्री झालो. तुमच्या सहकार्यामुळे झालो. सारच मी केलं असं म्हणणार नाही. असं एकट्याने काहीच होत नाही. सर्व शक्य होत नाही. मी इंजिनियर झालो. काही केल. असत हो, संसार केला असता, एक-दोन मुलीच झाल्या असत्या मला. सातारला बंगला बांधला असता. विरकरवाडीत किंवा बनगरवाडीतच मुली दिल्या असत्या. यापेक्षा काय दिवा लावला असता. कोण इंजिनियरला खातेय. पायलीच पाचशे इंजिनियर मिळाय लागलत. 

श्री. जानकर पुढे म्हणाले, 2004 ला देखील मी इथं मत मागाय तुम्हाला आलतो. बोनेटवर उभे राहून भाषण केलं होतं. माणस त्यावेळेस हसायची आम्हाला, जानकर काहीतरी घेऊन आलेत. त्यावेळेस आम्ही सांगितलं होतं, काँग्रेसला झेंडा धरायला देखील माणूस मिळणार नाही. आज काँगेसची देशात काय अवस्था चाललेय बघा. आम्ही आमचा पक्ष काढला. मला भाजप किंवा काँग्रेसमध्ये कधीच जायचं नव्हतं. स्वतःचाच पक्ष तयार करायचा होता. मला काँग्रेसचा मंत्री होता आलं असत, भाजपचा मंत्री होता आल असता, पण नाही. कुठल्या पक्षाचा चमचा म्हणून वागणार नाही, तर ज्या गोरगरीब लोकांनी मला दहा दहा रूपये दिलेत, त्या लोकांचा मालक म्हणून नाहीतर सेवक म्हणून राहणार आहे. मी 2003 ला अहिल्याबाई होळकर यांच्या जन्म गावात पक्ष काढला, आज या पक्षाला चार राज्यात मान्यता मिळाली. उत्तर प्रदेशात शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांच्या पक्षापेक्षा माझ्या पक्षाला मतदान जास्त आहे. गुजरात मध्ये जाती-धर्माचे राष्ट्रीय समाज पक्षाचे 28 नगरसेवक आहेत.  तरीही मीडियाची लोक धनगर समाजाचे नेते महादेव जानकर असे टाकतात. माझी आई धनगर आहे. बाप धनगर आहे, त्यात मी काय करू. मी धगनर समाजात जन्मलोय. कोकणातील कार्यकर्त्यांना माझी विनंती आहे, सर्व समाजाच्या लोकांना सोबत घेऊन चला. सर्व समाजाला घेतलं तर पक्ष बनेल. पक्ष बनला तर आपण पंतप्रधान होऊ, मुख्यमंत्री होऊ. आज राष्ट्रीय समाज पक्षाला चांगले दिवस येत आहेत. शिवसेना आणि राष्ट्रवादीमध्ये भेद झाल्यामुळे आपला फायदा होत चालला आहे. आपल्या कार्यकर्त्यांनी पोलिंग बूथ, कार्यकारण्या तयार केल्या पाहिजेत. तरच दिवस चांगले येणार आहेत. 

मला नुसत आमदार, खासदार व्हायचं नाही, तर गोरगरिबांच्या हिताचं कायदे करण्यासाठी देशात आणि राज्यात आपली सरकार स्वतःच्या पक्षाची बनवायचे आहेत. आपल्या विचाराचे सरकार बनवायचे आहेत, आणि ते सोपे आहे. आम्ही पक्ष काढला तेव्हा लोक म्हणायचे सरपंच नाही, जानकर साहेब पंतप्रधानाची भाषा करतात. आज सांगू इच्छितो, खासदार सोडून सर्व निवडणुकात राष्ट्रीय समाज पक्षाने विजय मिळवला आहे. बांधवांनो, घर बांधताना त्रास होतो, पण स्वतःची झोपडी मालक बनवते. नेहरूंनी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना त्यांचा पक्ष विलीन करायला सांगितला, पण बाबासाहेबांनी सांगितले, मला राष्ट्रपती जरी केलं तरी मी पक्ष विलीन करणार नाही. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा स्वत:चा पक्ष होता, म्हणून 340, 341, 342 कलम लिहल. मराठा समाजाचे सारे मुख्यमंत्री झाले असताना, मराठा समाजाला आरक्षण का मिळत नाही? कारण मराठा मुख्यमंत्री त्यांच्या पातीचे नव्हते. म्हणून तुम्हाला पात धरावी लागेल. एखादा जातीचा मंत्री झाला, आमदार झाला, म्हणून जात सुधारत नाही. भाजप धनगर समाजाला आदिवासीची सवलत देणार नाही. दिल्लीत महादेव जानकर गेल्यानंतर, त्यांच्या बापाला देखील आरक्षण द्यावे लागेल, असा खणखणीत इशारा महादेव जानकर यांनी दिला. 

जोपर्यंत पंतप्रधानाची खुर्ची, मुख्यमंत्र्याची खुर्ची हलवणार नाही, तोपर्यंत तुमच्या समाजाचे भलं होणार नाही. वसंतराव नाईक मुख्यमंत्री होते, पण आजही बंजारा समाजाला आरक्षण नाही, कारण त्यांना कृष्ण सांगितलं होतं आम्ही आरक्षणाच्या विरोधात आहे. भारतीय जनता पार्टी ही चांगली पार्टी नाही. भाजप म्हणतात आम्ही जानकरांना मंत्री केलं, पण आम्ही तुम्हाला मुख्यमंत्री केलं ना? अशा शब्दात महादेव जानकर यांनी सुनावत आपला पैरा फिटल्याचे सांगितले. 

यापूर्वी मला कोणी कोणी काय दिलं याची सर्व यादी माझ्याजवळ आहे. मी तुम्हाला विसरून मोठे होणार नाही. त्यामुळे माझी तुम्हाला विनंती आहे, आपलं घर राष्ट्रीय समाज पक्ष मोठे करा. असाल तुम्ही दुसऱ्याच्या घरात, पण त्या घराचा तुम्ही मालक नाहीत. आमदार प्रशांत ठाकूर देखील घराचा मालक नाही. घराचा मालक दुसराच आहे. प्रशांत ठाकूर जर घराचा मालक असता, तर मंत्री झाला असता. प्रशांत माझा मित्रच आहे. माझ्याकडे मराठा समाजाचे दोन आमदार झाले, आताचा आमदार वंजारी समाजाचा आहे. राष्ट्रीय समाज पक्ष टाटा बिर्ला उद्योगपतींच्या पैशावर चालत नाही तर सर्वसामान्यांच्या जनतेच्या पैशावर चालतो. त्यामुळे मला ईडी बिडीची भीती नाही. स्वच्छ चारित्र्य ठेवून चाललोय बांधवांनो, मला हजारो पोरं आमदार खासदार करायचेत. एकटा महादेव जानकर मंत्री नाही होणार. येत्या वीस वर्षात महादेव जानकर यांच्या राष्ट्रीय समाज पक्षाचा शिक्का चालणार आहे. मोठे पक्ष सत्ता मिळेपर्यंत छोट्या पक्षांना विचारतात, सत्ता मिळाली की लाथ मारतात. त्यामुळे मोठ्या पक्षांनादेखील लाथ मारायला शिकलं पाहिजे. ज्यावेळेस आपला नेता सांगतो, की त्यावेळेस ऐकलं पाहिजे. मला काही बायका, पोरं, काही नाही. माझं कोणीही नातेवाईक राजकारणात येणार नाही. जो चांगलं काम करेल, त्याला चांगले दिवस येतील. 

आपण राजकारणात आलं पाहिजे. आपल्याला सांगितलं जातं, राजकारण वाईट आहे, पण आमदाराचाच पोरगा परत आमदार होणार. खासदाराचाच पोरगा खासदार होणार, आपण केवळ मतेच देत राहणार. त्यांनाच मदत करणार, हे कुठेतरी बंद केले पाहिजे. राजकारणात ताकद असते. शेठकडे पैसा असेल आणि सत्ता नसेल तर शेठ पद कामाचं नाही. सत्तेशिवाय तुमचं भलं होणार नाही. आज आम्ही माथाडी कामगाराची पोर आहे, गरीब समाजाची पोर आहे, तुम्ही तुमची पोरगा आणि पोरगी इंग्लिश मीडियमला टाका, स्पर्धापरीक्षाना बसवा. राजकारण फार चांगले असते. राजकारण वाईट असतं तर नेहरूंनी स्वतःच्या पोरीला राजकारणात आणल असत का? पवार साहेबांनी सुप्रियाताईला राजकारणात आणल असत का? मग तुमच्या डोक्यात का घतलय खुळ. तुम्ही राजकारण करायला शिकले पाहिजे. कधी करायचे ते समजले पाहिजे. वर्षभर विरोध करतो आणि शेवटच्या दिवसी विकलो जातो. स्वतःची झोपडी मजबूत करा. सन्मानाने रहा. तरच तुम्हाला किंमत आहे. नाहीतर काही नाही. आपण बंगल्यात राहिले पाहिजे. हेलिकॉप्टरमध्ये फिरले पाहिजे. गरिबीत जन्म घेणे हा तुमचा दोष नाही, पण गरिबीत मरणार हा तुमचा दोष आहे.  


कुठलाही धर्म वाईट नसते. जगातील सर्व धर्म चांगले आहेत. हिंदू आम्ही आहे तर शंभर वर्षात आमचा खासदार का झाला नाही. हिंदू आम्ही आहे. तर सुप्रीम कोर्टाचा जज का आमचा झाला नाही. हिंदू आम्ही आहे तर केंद्रात आमचा मंत्री का नाही. आम्ही माखुबाई, बिरोबाला मानतो. आमच्या देवाला ते मानतात का? त्यांच्या घरात नागोबा, बिरोबाचा फोटो आहे का? याचा आपण विचार केला पाहिजे.  बांधवांनो दलित आणि मुसलमान आपला शत्रू नाही. दलित आणि मुसलमानांनी अपल काही घेतले नाही. किती  मुसलमानांची पोर आयएस, आयपीएस आहेत.? किती साखरकारखाने, किती सूतगिरण्या आहेत? काहीच नाही. एका गावातून दुसऱ्या गावात गेलं तर राम राम पाव्हण बोलतोय. राम आमच्या हृदयात आहे. रामाच्या नावानं राजकारण  होत असेल तर आपल्यातील बुध्दीजिवि लोकांनी याचा अभ्यास केला पाहिजे. कुणाचा फायदा कोण घेतय. कुणाची पोळी भाजून घेतय. आज विकास चांगला चाललाय. जरूर रस्ते झाले पाहिजेत. जरूर एअरपोर्ट झाले पाहिजेत. विकास होत असताना आपली माणस संपत असतील, आपल्याला आपला राजकिय वाटा मिळत नसेल तर असली सत्ता आपल्या कामाची नाही बांधवांनो. विमानतळ जरूर बनले पाहिजे, पण विमानतळाचा ठेका कुणाला मिळतोय? मंत्री म्हणून कोण येतोय, याचा आपण जरुर विचार केला पाहिजे.  तुमचा वाटा कुठे आहे ? तुमचा वाटा चोरलेली माणस शोधले पाहिजेत व त्याचा अभ्यास केला पाहिजे. राष्ट्रिय समाज पक्ष आपला म्हणून संभाळा. आपला भाऊ म्हणून सर्वांना सोबत घेतले पाहिजे.  शेतकऱ्यांसाठी सर्वात जास्त दुधाचे दर वाढवणारा मंत्री होतो. बरेच लोक म्हणतात धनगर समाजासाठी जानकर साहेबांनी काय केलं. जगात माझ्यासारखी योजना कुणीच आणलेली नाही, हे धनगर समाजाने लक्षात ठेवावे. आदिवासीच्या तेरा योजना महादेव जानकर यांनी दिलेले आहेत. दुर्दैवाने आमचं सरकार नसल्याने त्या योजनेला निधी अजित पवारांनी दिला नाही. माझं सरकार येऊ द्या, राष्ट्रिय समाज पक्षाच,  मग 1 हजार कोटी नाही तर एक 1 लाख कोटी रुपये देतो. जोपर्यंत तिजोरीचा मालक होणार नाही, तोपर्यंत तुमची प्रगती होणार नाही. 


काँग्रेस आणि भाजप एकेक मंत्रीपद देते, पण तिथं जात आडवी येते. जुनी जातीयता काँग्रेस आणि भाजपने जपली आहे, असा घणाघाती आरोप महादेव जानकर यांनी केला. ते मते मिळवण्यासाठी पिवळा झेंडा वापरतात. मते मिळवण्यासाठी निळा झेंडा वापरतात. येथूनपुढे काँग्रेस आणि भाजपला पिवळा झेंडा वापरू देऊ नका कुठल्या पक्षांना, हे सांगण्यासाठी माझी आजची सभा आहे. प्रस्थापित पक्षांना विचारायचं आमचा वाटा कुठे आहे?, माझा पक्ष वाढला की, काँग्रेस आणि भाजप कुठल्यातरी धनगराला बुजगावन म्हणून उभ करणार. पण मी तुमच्या पुढचा आहे, तुम्ही त्या रोडने चाललायना, मग मी तुमच्या पुढच्या रोडणे चालणार. मुलायम सिंह यादव यांनी यादवांचा पक्ष काढला की, इंदिरा गांधीनी काँग्रेसचा एक यादव मुख्यमंत्री केला. पण मुलायमसिंह म्हणले, तो चमचा म्हणून येईल पण मी मालक बनून येणार. शिवाजीराजे आमचाय. शिवाजीसाठी आम्ही मेलोय. नाव शिवाजीचं घ्यायचं आणि काम ठाकरेच करायचं हा धंदा बंद करा. शिवाजीच वारसदार आम्ही आहोत, पण शिवाजीच्या नावावर राजकारण करून, आम्हाला सत्तेत वाटा मिळत नसेल तर आपल्याला त्या पक्षाचा विचार केला पाहिजे. काँग्रेस तुम्हाला विचारत नव्हत. तीन एम एकत्र यायचे आणि निर्णय घ्यायचे, तुमची काय गरज नाही म्हणायचे. गोपीनाथ मुंडे होते म्हणून आम्ही भाजप बरोबर युती केली. आमचे विचारधारा फुलेवादाची आहे आणि भाजपची विचारधारा दीनदयाळ उपाध्यायची, उच्चवर्णीयांची आहे. आम्ही म्हटल ठीक आहे. जे फुले, शाहू, आंबेडकर यांचे नाव घ्यायचे ते आम्हाला कधी जवळ करत नव्हते. बीडमध्ये रासपची एक जिल्हा परिषदेत जागा निवडून आली होती. मुंडे साहेब म्हणले, महादेवराव आपले जिल्ह्यापुरती युती करूया. आमच्यामुळे भाजपचा जिल्हा परिषद अध्यक्ष बनला. नंतर मुंडे साहेब म्हणले, महादेवराव आपण राज्यात युती करूया. आम्ही ठरवलं. आपली चळवळ गरीबाची आहे, पण राजकारण उजव्याबरोबर करू. भाजपची सत्ता आली नव्हती. मी, राजू शेट्टी, रामदास आठवले त्यांच्याबरोबर गेल्यावर भाजपला सरकार बनवताना जी मते कमी पडत होती, ती आमच्यामुळे मिळाल्यावर भाजपचा देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाला. आम्हाला त्यांनी डावलल की त्यांची अवस्था काय झाली बघा महाराष्ट्रात. आम्ही त्यागी माणस आहोत. भोगी माणस नाहीत. आम्हाला नाकारलं तर तुम्हाला जनतेच्या दारबारात नाकारल्याशिवाय आम्ही स्वस्थ बसणार नाही. म्हणून आपला पक्ष आपलं घरटं वाढवण्याचा प्रयत्न करा.

तुम्ही कुठल्याही पक्षात सत्तेत जावा, पण तुमचं दुसर तिसर कुणी भल करणार नाही. हा पट्ट्या महादेव जानकरच भलं करणार आहे. आम्ही भ्रष्टाचार केला नाही. जनतेच्या वर्गणीतुनच पक्ष चालवत आहे. राष्ट्रीय समाज पक्षाला टाटा बिर्लाचा सहारा नकोय, सामान्य जनतेचा सहारा पाहिजे. मराठा, आगरी, कोळी, दीनदलित, मुसलमान या लोकांनी आम्हाला पैसे दिले. त्यातून आम्ही स्वतःच घर चालवतोय. आपल्या पक्षाला दोन कार्यालये मिळालीत. तुम्ही जर थोडी साथ दिली तर आपल्याला कायमचा बंगला मिळेल. खासदार असू नाहीतर नसू मालक म्हणून सर्व पक्षांच्या अध्यक्षांशी बोलू शकतो. माझ्या संपर्कात सर्व पक्षांचे अध्यक्ष आहेत. तुमची मान खाली जाईल, असे कोणतेही कृत्य करणार नाही. जगात देखील माझा कार्यकर्ता सन्मानाने राहील अशीच भुमिका करण्याचा प्रयत्न करील. सुदामशेठच्या  शेठला सांगितलं या माणसाला सांभाळा, एक दिवस या माणसाला मंत्री करून तुमच्या ऑफिसला पाठवेन. 


बांधवांनो, तुमच्यामुळे मी मोठा झालो आहे, माझ्या घरचं आणून काय मी केलं नाही. त्यामूळे घरचीही माझ्यावर अवलंबून नाहीत. त्यामूळे मी त्यांना रुपयाची मदत करत नाही. आमची सून डिवाएसपी होती, आई मला सारखं सांगत होती, तिची बदली कर म्हणून, मी तिचं नावही घेतल नाही. शेवटी माझ्या पिए जोशीने सूनची बदली केली, मात्र मी नाही केली. माझ्या जीवावर ती अवलंबून नाहीत. मी त्यांना सांगितलं माझ्या जीवावर तुम्ही अवलंबून राहायचं नाही. मी तुमचं घरचं काही घेतल नाही. मला मोठे केले, ते तमाम जनतेने मोठे केले.  मी या लोकांसाठीच वाटून जाणार आहे. तुम्ही काय माझ्या जीवावर उड्या मारायचा प्रयत्न करू नका. म्हणून बांधवांनो, घराणेशाही हटवा आणि सामान्य माणसाला सत्तेत बसवा ही राष्ट्रीय समाज पक्षाची भूमिका आहे, हे राष्ट्रिय समाज पक्षाचे धोरण. आज भारतात जे नेता आहे त्याचाच पोरग आमदार खासदार होतय. बाकीच्यांनी काय करायचं. क्षमता असती पण तो माणूस घाबरतो. काही नाही माझं उदरहन ठेवा. जे लोक मला हसायची तिचं लोक फुल घेऊन स्वागताला हजर राहतात. जे हसत होते मला तेच लोक जेसीबी लावून फुल व्हायला तयार आहेत. म्हणून इतिहास घडवणारा माणूस तयार केला पाहिजे. निर्माता बनल पाहिजे. तुम्हाला संघर्ष करावा लागेल. व्यसनापासून बाजूला जावं लागल. लग्नावर लय खर्च करू नका. तो शिक्षणावर खर्च करा. उद्योगधंद्यावर खर्च करा. आपल्यात ह्याला साडी, त्याला साडी, मेव्हणीला अंगठी. यातच दोन्हीकडचे वडील ते फेडत बसतात. पाच वर्ष वर येत नाहीत. हे धंदे बंद करा. कशाला पाहिजे. त्यापेक्षा  तोच पैसा उद्योगात टाका. महादेव जानकरला कोणतच व्यसन नाही. मी अगोदर स्वतःवर कंट्रोल केलं. आता मला जग कंट्रोल करायचं आहे. सुदामशेठ दुसरा पक्ष अशी संधी कधीच देणार नाही. या पदाचा नीट वापर केला तर तुमचं सोनं होईल, नाहीतर कधी पद जाईल, सांगताही येणार नाही. स्वतःला फसवू नका. समाज मोठा करा. सर्व समाजाला जोडा. राष्ट्रिय समाज पक्षात सर्व समाजाने काम का करावे हे सांगता आले पाहिजे. कार्यकर्त्यांनी पक्ष कसा वाढवायचा, माणसे जोडता कशी येतील, हे सांगता आले पाहिजे. तुम्हाला खासदार बनले पाहिजे. समाजहिताचे कायदे दिल्लीला बनले जातात, मुबईला नाही. आमचं पहिल्यापासून दिल्ली ध्येय आहे. दिल्लीत सर्वात मोठी तिजोरी आहे. जे संख्येने कमी आहेत त्यांनी बहुसंख्याकाचे हानल तरी आम्ही खुशीत गाजर खातोय. आमच्या राष्ट्रिय समाज पक्षाने जातीनिहाय जनगणनेसाठी दिल्लीत मोर्चा काढला. मोदींना पत्र दिलं. मोदींच्या केंद्रीय गृहमंत्र्यांने सभागृहात जतनिहाय गणना करणार नाही असे सांगीतले. काँग्रेसच्या नेहरूंनी जातगणनेला विरोध केला. आता राहुल गांधी बोलायला लागलेत, आम्ही ओबीसीला पाठिंबा देतो. एसटी गेल्यावर हात करून उपयोग नाही. काँग्रेसच्या प्रणव मुखर्जींनी जातगणना होऊ दिली नाही. आमची लढाई मोठ्यांसाठी आहे, छोट्यासाठी नाही. मोठ्या तिजोरीच्या चाव्या तुम्हाला मिळाल्याशिवाय आपल भल होणार नाही. 


तुम्ही उद्योजक व्हा. आरक्षण जरी मिळालं तरी तुम्हाला नोकऱ्या लागणार नाहीत. कारण देशातल्या आणि राज्यातल्या सरकारने खासगीकरण करून टाकले आहे. आरक्षणाशिवाय देखील आम्हाला आमची लायकी वाढवता आली पाहिजे, हे राष्ट्रिय समाजाने लक्षात ठेवले पाहिजे. छोट्यातुनच तुम्ही मोठे होणार आहे. 


तुमच्यामुळेच राष्ट्रिय समाज पक्ष मोठा होत चाललेला आहे. जनतेचा आशीर्वाद हीच आमची शक्ती आहे. आचारसंहिता लागल्याने, मी माझ्या वाढदिवसाला येऊ शकलो नाही, म्हणून आज सुदामशेठच्या सत्काराला आलोय. सर्वपक्षीय लोकांची उपस्थिती पाहून महादेव जानकर म्हणाले, तुम्ही ज्या पक्षात आहेत. त्याच पक्षात रहावा, पण तुमची भाऊ बहीण आमच्या पक्षात द्या, कारण आम्ही इतिहास निर्माण करणारी माणस आहोत. इयत्ता ९ वीच्या पुस्तकात राष्ट्रिय समाज पक्षाचे नाव आहे, हा महादेव जानकरचा इतिहास आहे. माझं अंतिम ध्येय दिल्ली आहे. माझा देह दिल्लीत जावा, यासाठी प्रयत्न करत आहे. जरी माझं काही बर वाईट झालं तरी मला दिल्लीतच जागा मिळाली पाहिजे. महिलांनी राजकारणात पुढे आल पाहिजे. जपान मातृसत्ताक आहे. म्हणून जपान पुढे आहे. शेठ बनायचे असेल तर उद्योगधंद्यात आलं पाहिजे आणि राजा बनायचे असेल तर राजकारणात आलं पाहिजे.

यावेळी मंचावर भूतपूर्व राष्ट्रीय अध्यक्ष एस. एल. अक्कीसागर, राष्ट्रीय महासचिव कुमार सुशील, राष्ट्रीय खजिनदार मोहन माने, राज्य सचिव जिवाजी लेंगरे, पनवेल महानगरपालिका नगरसेवक मोनिकाताई महानवर, कोकण महिला आघाडी अध्यक्षा मनिषाताई ठाकुर, श्रीकांत भोईर, प. महाराष्ट्र युवक आघाडी अध्यक्ष अजित पाटील व अन्य मान्यवर उपस्थित होते. एस. एल. अक्कीसागर , कुमार सुशील, अजित पाटील, शरद दडस यांची भाषणे झाली. रासप कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहत महादेव जानकर यांचे कळंबोली नवी मुंबई शहरात जोरदार स्वागत केले.

No comments:

Post a Comment

चागंले संस्कार टिकविण्यासाठी वाचन संस्कृतीची गरज : डॉ. शंकर स्वामी वडेपुरीकर

चागंले संस्कार टिकविण्यासाठी वाचन संस्कृतीची गरज : डॉ. शंकर स्वामी वडेपुरीकर ‌पु.अहिल्यादेवी वाचनालयात " वाचन संकल्प महाराष्ट्राचा...