Sunday, February 25, 2024

ओबीसी आरक्षण के संरक्षक पेरियार रामस्वामी नायकर

ओबीसी आरक्षण के संरक्षक पेरियार रामस्वामी नायकर 

*ओबीसीओं भूलो मत...*
*आरक्षण लाभार्थिओ भूलो मत...*
*पेरियार रामस्वामी नायकर को भूलो मत...*
*पेरियार रामस्वामी नायकर ही है, जिनकी बदौलत* 
*ब्रिटिश भारत* मे आरक्षण लागु था... और
*स्वतंत्र भारत* मे ओबीसी आरक्षण सुरक्षित है...
*वो* बीसी जो इस देश का आधा अंग 52 % है...
*Tribute to, 🌹💐👏🏿🙏*
*DECEMBER 24 (1973)*
*REMEMBRANCE DAY of Social Revolutionary Periyar.*
*The revolutionary who fought for social justice that resulted in the first constitutional amendment enabling the Governments to provide reservation in Education.*
*ब्राह्मणेतर जाती समुह / वर्ग के न्याय्य प्रतिनिधित्व का मुद्दा पेरियार रामस्वामी नायकर के मिशन का सबसे बडा, महत्व पूर्ण तथा अहम अजेंडा था.* इस आरक्षण को लेकर ही पेरियार रामस्वामी नायकर ने कांग्रेस को छोडा था और बाद में ओबीसी आरक्षण को लेकर भारतीय संघराज्य से बाहर जाने की घोषणा की थी. *इससे, इस मुद्दे पर पेरियार कितने संवेदनशील थे, इसका स्प‍ष्ट दर्शन होता है. पेरियार और आरक्षण का अतुट संबंध है. और उससे भी जादा ओबीसी आरक्षण से पेरियार का संबंध अतुट है.*
लेखन - एस.एल. अक्कीसागर



नेता, मतधारक, मतविक्री आणि आमदार

नेता, मतधारक, मतविक्री आणि आमदार 




20 वर्षा पूर्वी महाराष्ट्रातील प्रमुख राजकीय पक्ष

 *यशवंत नायक : ऑगस्ट 2023*☝🏾

*20 वर्षा पूर्वी*

*महाराष्ट्रातील प्रमुख राजकीय पक्ष*  

*मराठा कुणबी ओबीसींचा राजकाणातील सहभाग*

☝🏾

*आधार*

*राज्यशास्त्र व लोकप्रशासन विभाग*

*पुणे विद्यापीठ*



भारताचा आद्य स्वातंत्र्य सेनानी संगोळी रायन्ना नायक

भारताचा आद्य स्वातंत्र्य सेनानी संगोळी रायन्ना नायक

साभार  : यशवंत नायक जानेवारी 2012




यशवंत नायक : जानेवारी २०२४







*यशवंत नायक – जानेवारी 2024*

*वाचक मित्रानो, 🙏*

*या अंकात काय वाचाल...*

पान १

_*कुळ कुलीन का म्हणून मिरवतो! मुळ कुळाचे कोणी का जाणतो : संत कणकदास*_

पान -२

_*संत संगाचा आनंद मिळता, तीर्थक्षेत्राची भटकंती कशाला! सत्यबोध झाले मनाला, दु:ख कशाचे असेल तयाला : संत कणकदास*_

पान -३

_*हा- तो माझे हित करील, यावर विसंबून राहू नको! पित्यावर विसंबून राहिला, प्रल्हाद ही फसला : संत कणकदास*_

*मुख्य बातम्या – पान 1* 

@ कळंबोली : यशवंत नायक ब्यूरो

*प्रस्थापित पक्ष कितीही मोठे असले तरी, मी राष्ट्रीय समाज पक्षातूनच खासदार होणार : महादेव जानकर*

> *काँग्रेसने जपलेला जुना जातीयवाद भाजप चालवत असल्याचा महादेव जानकर यांचा गंभीर आरोप*

> *गोरगरिबांच्या हिताचं कायदा करण्यासाठी राष्ट्रीय समाज पक्षाचे सरकार सत्तेत बसवा*

पान : २

@ भिवंडी : यशवंत नायक ब्यूरो

*देशात मागासवर्गीय (BC) समाजावर अन्याय झाला : महादेव जानकर*

> *५२ % ओबीसींची शासन, प्रशासनात भागीदारी कुठाय?*

पान : ३

@ नागपूर : *दीक्षा भूमी येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर महापरिनिर्वाण दिनानिमित्त अभिवादन*

@ शांहजापुर : *उत्तर प्रदेशात राष्ट्रीय समाज पक्ष ८० जागांवर लढणार : बाळकृष्ण लेंगरे*

@ दिल्ली : *राष्ट्रीय समाज पक्षाचे दिल्लीत कार्यकर्ता संमेलन*

@ *आधुनिक भारताचे राष्ट्रपिता महात्मा ज्योतिबा फुले यांच्या प्रतिमेस अभिवादन करताना राष्ट्रीय समाज पक्ष पदाधिकारी*

@ राहुरी : यशवंत नायक प्रतिनिधी

*कै. नानासाहेब जगताप यांच्या आठवणीने जानकर साहेब झाले भावूक*

@ बेळगांव : कर्नाटक यशवंत नायक ब्यूरो 

*बेळगावला राष्ट्रीय समाज पक्ष राष्ट्रीय कार्यकारणी व राज्य कार्यकारणी बैठक*

@ पंढरपुर : यशवंत नायक ब्यूरो

*भुजबळ साहेब, जोपर्यंत तुम्ही पक्ष काढणार नाही तोपर्यंत न्याय मिळणार नाही : जानकर*

पान : ४

*राष्ट्रीय समाज पक्ष तर्फे क्रांतिवीर संगोळी रायण्णा १६ वा राज्याभिषेक वार्षिकोत्सवाचे आयोजन*

> रासप राष्ट्रीय कार्यकारणी व विविध राज्य कार्यकारणीतील पदाधिकारी राहणार उपस्थित

> ९ : ०० वाजता राज्याभिषेक होणार; रासप सूत्रांची माहिती 

> *सांगोळी रायन्ना राज्याभिषेक का?*

*यशवंत नायक वाचा म्हणजे वाचाल*

*यशवंत नायक आपला खरा आणि प्रथम प्रतिनिधि आहे*

*यशवंत नायक आपला राष्ट्र आणि समाज प्रतिनिधि आहे...*

_सिद्ध - सागर

कार्यकारी संपादक

बिहारमध्ये राष्ट्रीय समाज पक्षाचे प्रत्येक जिल्ह्यात संघटन : गोपाल पाठक

बिहारमध्ये राष्ट्रीय समाज पक्षाचे प्रत्येक जिल्ह्यात संघटन : गोपाल पाठक

मधुबनी (१४/१२/२३) : बिहार राज्यात यापूर्वी राष्ट्रीय समाज पक्षाने सार्वत्रिक विधानसभा निवडणुक लढवली आहे. मी एक वर्षापासून राष्ट्रीय समाज पक्षाचे काम चालू केले आहे. राष्ट्रीय समाज पक्षाचे प्रत्येक जिल्ह्यात संघटन उभे केले असल्याचे, बिहार राज्य प्रभारी गोपाल पाठक यांनी स्थानिक वृत्त वाहिनिशी बोलताना सांगितले. 

राष्ट्रीय समाज पक्षाच्या नावातच राष्ट्रीय समाज आहे. देशातील सर्व समाजाला एक राष्ट्रीय समाज म्हणून ओळख आमचे राष्ट्रीय अध्यक्ष महादेव जानकर यांनी दिली आहे. थोर महामानवाच्या विचारांचा राष्ट्रीय समाज घडवणे हा पक्षाचा मुख्य उद्देश आहे. राष्ट्रीय समाज पक्ष सर्व समाजाला सोबत घेऊन चालणारी पार्टी आहे. इथल्या राजकीय पक्षांचा इतिहास खराब राहिला आहे. 

मधुबनी जिल्हाध्यक्ष रोहित शर्मा म्हणाले, पहिल्यादांच मी राष्ट्रीय समाज पक्षांमुळे राजकारणात आलो. भाजपसारखे धर्मांध, भगवादारी, रामभक्त असल्याचे सांगून मते मिळवतात, पण हे खोटारडे पक्ष आहे. आरजेडी यदूवंशी असल्याचे सांगून मते मिळवतात, पण हे खूप जातीयवादी पक्ष आहे. येत्या लोकसभा निवडणुकीत मधुबनी मतदारसंघातून निवडणूक लढवण्यास इच्छुक आहे. यावेळी जिल्हा सचिव गगन झा, मनोजकुमार साहा, हरीशंकर चौधरी, महिला आघाडी नेत्या नूतन देवी, आचार्य आस्तिक कु. झा, अभिनंदन प्रसाद यादव आदी उपस्थित होते.

नेता नव्हे राष्ट्रीय समाज पक्षाचा निष्ठावंत कार्यकर्ता

नेता नव्हे राष्ट्रीय समाज पक्षाचा निष्ठावंत कार्यकर्ता  म्हणजे काशिनाथ शेवते 

पक्षाचा प्रदेशाध्यक्ष असलो म्हणून काय झाले, मी प्रथम राष्ट्रीय समाज पक्षाचा कार्यकर्ता आहे. असं नेहमी सांगणारे काशिनाथ शेवते माढा लोकसभा विजय निर्धार सभेचे पोस्टर चिकटवतात. पक्षाचे झेंडे तयार करताना दिसतात. हाच महादेव जानकर व इतर राजकीय नेत्यांच्या सैनिकामध्ये फरक आहे. निष्ठा कशी असावी तर ती राष्ट्रीय समाज पक्षाचे कार्यकर्ते सारखी, असे विचारवंत अक्कीसागर साहेब सांगतात.

बिहार रासपची मधेपुरा व सहरसा लोकसभा मतदार क्षेत्रात मोर्चेबांधणी

बिहार रासपची मधेपुरा व सहरसा लोकसभा मतदार क्षेत्रात मोर्चेबांधणी 

मधेपुरा - बिहार  : लोकसभा निवडणूकिसाठी राष्ट्रीय समाज पक्षाने मोर्चेबांधणी करण्यास सुरुवात केली आहे. मधेपुरा व सहरसा लोकसभा मतदार क्षेत्रात राष्ट्रीय समाज पक्ष मजबुतीने रणागंणात उतरणार आहे. बिहारच्या प्रस्थापित राजकारणाला कंटाळून राष्ट्रीय समाज पक्षात नागरिकांनी प्रवेश करण्यास सुरुवात केली आहे, असे बिहार राज्य प्रभारी गोपाल पाठक यांनी सांगितले.

भाजप, काँग्रेसने देशाची वाट लावली : महादेव जानकर

भाजप, काँग्रेसने देशाची वाट लावली : महादेव जानकर


अहमदनगर दक्षिण लोकसभा मतदार संघातून रासपचे रविंद्र कोठारी लढणार

अहमदनगर (३/२/२४) : भाजप आणि काँग्रेस या दोन्ही पक्षांनी देशाची वाट लावली. भाजपबरोबर आम्ही युती केली, मात्र त्यांनी आमचा तोंडाला पाने पुसली. आगामी काळात राष्ट्रीय समाज पक्ष लोकसभा निवडणूक स्वबळावर लढणारे असल्याचे पक्षाचे अध्यक्ष महादेव जानकर यांनी सांगितले.

रासपचे संस्थापक अध्यक्ष महादेव जानकर, माजी मंत्री यांच्या उपस्थितीत नगर लोकसभा मतदारसंघाचा मेळावा नगर शहरात आयोजित करण्यात आला होता. त्यावेळी आ. जानकर बोलत होते. यावेळी त्यांनी पक्षाने नगरसह बारामती, शिरूर, परभणी, माढा, नंदुरबार आदी जागांवर लोकसभा निवडणुकीची तयारी केल्याचे सांगताना नगरमधून रवींद्र कोठारी यांची उमेदवारी जाहीर केली. त्यांना विजयी करण्याचे आवाहन जानकर यांनी केले. भाजपने दोन जागा दिल्या तरच 'रासप' त्यांच्याशी युती करण्याचा विचार करेल, अन्यथा शरद पवार तीन जागा देण्यास तयार आहेत, असाही दावा जानकर यांनी केला. शिर्डीच्या जागेसाठी भाऊसाहेब वाकचौरे माझ्या संपर्कात येताच त्यांना उद्धव ठाकरे यांनी बोलावून लोकसभेचे तिकीट देत असल्याचे सांगितले. माजी आमदार भाऊसाहेब कांबळे हे देखील माझ्या संपर्कात आहेत असाही दावा त्यांनी केला. 

भाजपकडे आज ईडी, सीबीआय, निवडणूक आयोग, न्यायालय आहेत, मात्र आमच्याकडे जनता आहे. भाजपला रोखायचे असेल तर त्यांचा आमदार मत मागायला आल्यानंतर त्यांना तुम्ही आमच्यासाठी काय केले, असा प्रश्न विचारा असे आवाहन जानकर यांनी केले. यावेळी पक्षाचे राज्य सचिव रवींद्र कोठारी, राज्य कार्यकारणी सदस्य डॉक्टर प्रल्हाद पाटील, शरद बाचकर, जिल्हा सरचिटणीस शहाजी कोरडकर, महिला आघाडी जिल्हाध्यक्षा सुवर्णा जऱ्हाड, मंदाकिनी बडेकर, जिल्हाध्यक्ष नानासाहेब जुंधारे आदी उपस्थित होते.

मुस्लीम आणि ओबीसी समाजाने मतपेटीचा व्यवहार करावा : महादेव जानकर

मुस्लीम आणि ओबीसी समाजाने मतपेटीचा व्यवहार करावा : महादेव जानकर



भुजबळ, जानकर, पाटील यांच्याहस्ते मंडलनामा पुस्तकाचे प्रकाशन 


मुंबई (८/२/२४) : राष्ट्रीय समाजातील बहुसंख्य मुस्लिम आणि ओबीसी समाजाने रोटीबेटीचा व्यवहार नाही केला तरी चालेल, पण या दोन्ही समाजाने मतपेटीचा व्यवहार करावा, असे प्रतिपादन राष्ट्रीय समाज पक्षाचे संस्थापक अध्यक्ष आ. महादेव जानकर यांनी व्यक्त केले. मंडलनामा पुस्तक प्रकाशन प्रसंगी महादेव जानकर बोलत होते.

आ. जानकर पुढे म्हणाले, मुस्लीम ओबीसी समाजाचे माईलस्टोन नेते शब्बीर अन्सारी यांनी मुस्लिम ओबीसी समाजासाठी जी भूमिका केली, ती समाज हिताची होती. जोपर्यंत तुम्ही राजकारण करणार नाही, तोपर्यंत समाजाचं भल कुणीही करणार नाही. भुजबळ साहेब सत्तेत असूनही आम्ही जो संघर्ष करतोय, तो आम्ही आमच्या पोराबाळासाठी नाही. रोटीबेटीचा व्यवहार नाही झाला तरी चालेल, पण मतपेटीचा व्यवहार झाला तर राज्यात आणि देशात सरकार आणू. आपल सरकार आल तर दिलीपकुमार यांना भारतरत्नची मागणी करावी लागणार नाही. समाजाचा नेता मिडिया ठरवत असेल, समाजाची दयनीय अवस्था होत असेल तर आपल्याला राजकीय भूमिका घ्यावी लागेल. शिकलेला वर्ग म्हणतो, राजकारण नको, पण राजकारण केलं तरच समाजाच भल होईल. आम्ही महात्मा फुलेवाद सांगतो. त्यात फातिमा शेखचा धडा नाही म्हणून पुन्हा रडगाण गात बसतो, यांच्यावर चिंतन आणि मनन झालं पाहिजे. 

बहुसंख्य समाजाला ९ टक्के देखील वाटा मिळाला नाही, ही आमच्या देशाची लोकशाही आहे का? असा प्रश्न महादेव जानकर यांनी उपस्थित केला. राष्ट्रीय ओबीसी आणि मुस्लिम समाजाने मतपेटीचा व्यवहार करावा. नुसत मोठ बोलून उपयोग नाही. विधानसभा आणि लोकसभागृहात आपली लोक पाहिजेत तरच आपले प्रश्न सुटतील. मुस्लिमांनी तुमचा नेता तयार करावा. जोपर्यंत तुमचा नेता तयार होणार नाही, तोपर्यंत तुमचं कुणीही भलं करू शकणार नाही.

यावेळी मंचावर शब्बीर अंसारी साहेब  जीवनवृत्तांत "मंडलनामा"  पुस्तकाचा प्रकाशन सोहळाप्रसंगी छगन भुजबळ - कॅबिनेटमंत्री, भालचंद्र मुंनगेकर - माजी खासदार, पदमश्री डॉ झकेरिया- चेयरमैन अंजुमन इस्लाम संस्था, कपिल पाटिल- विधानपरिषद सदस्य, उद्योगपति श्री. पाटनकर आणि पुस्तकाचे लेखक देवदत्त वाघमारे यांच्या उपस्थितीत पार पडला.

जौनपुर - उत्तर प्रदेश लोकसभा मदारसंघांत रासपची समीक्षा बैठक

जौनपुर - उत्तर प्रदेश लोकसभा मदारसंघांत रासपची समीक्षा बैठक 

जौनपुर(१३/२/२४) :  राष्ट्रीय समाज पक्षाची  समीक्षा बैठक जौनपुर जिल्हाध्यक्ष एड. विजय बहादुर पाल यांच्या नेतृत्वात संपन्न झाली. समीक्षा बैठकीचे आयोजन श्री राम राज मेमोरियल हॉस्पिटल दीवानी कार्यालय जौनपुर येथे केले होते.  बैठकीसाठी मुख्य अतिथी रासपचे राष्ट्रीय संघटनमंत्री/उत्तर प्रदेश प्रभारी बाळकृष्ण लेंगरे, विशिष्ट अतिथी म्हणून राष्ट्रीय समाज पक्षाचे उत्तर प्रदेश प्रांत अध्यक्ष चंद्रपाल उपस्थित होते.  जन स्वराज यात्रा जौनपुर लोकसभा मदारसंघांत काढण्याविषयी चर्चा करण्यात आली.  संजय त्रिवेदी- कानपूर, पूर्वांचल महासचिव रमा शंकर पाल, पूर्वांचल संयोजक डॉ. डी एन पाल, युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष राजेश्वर पाल, चिकित्सक संघ जिल्हाध्यक्ष डॉक्टर राधेश्याम पाल, चिकित्सक संघ जिल्हाउपाध्यक्ष डॉक्टर सुरेश पाल, राजेश कुमार पाल, संदीप कुमार पाल, अखिलेश पाल, अंकित पाल, जिल्हा उपाध्यक्ष सुनील पाल, प्रबंधक सुजीत पाल, विकास पाठक, किसान मंच जिल्हाध्यक्ष राकेश पाल, जिल्हा उपाध्यक्ष सतेन्द्र पाल, जय प्रकाश पाल, विजेंद्र यादव , राजेश पाल, धर्मेंद्र पाल, परविंदर कुमार पाल, अर्जुन पाल प्रधान आदी सहभागी झाले होते.

भुजबळ साहेब तुम्ही मुख्ममंत्री व्हा : महादेव जानकर

भुजबळ साहेब तुम्ही मुख्ममंत्री व्हा : महादेव जानकर

बीड (१३/१/२४) : येथे ओबीसींची एल्गार महासभा पार पडली.  ओबीसी नेते आणि माजी मंत्री महादेव जानकर यांनी महासभेत बोलताना मंत्री छगन भुजबळ यांनी ओबीसींचं नेतृत्व करावे अशी विनंती केली. छगन भुजबळ हे महाराष्ट्राचे हुंकार आहेत. लोकनेते गोपीनाथ मुंडेंनी मला मानसपुत्र मानले. आज मुंडे साहेब हयात नाहीत. भुजबळ साहेबांनी दिवंगत नेते गोपिनाथ मुंडे यांची जागा भरू काढावी. महात्मा फुलेंच्या विचाराने काढायची आहे. नो भाजप नो काँगेस. भुजबळ साहेब तुम्ही मुख्यमंत्री व्हा, आम्ही तुम्हाला वडीलधारे म्हणून पाहत आहे, आम्ही मागणारे नाही तर देणारे आहोत, तुमचा मुख्यमंत्री म्हणून जन्म व्हावा, यासाठी आम्ही जिवाचं रान करू,  असं म्हणत थेट भुजबळ यांचे पाय धरत त्यांना साकडे घातले.

प्रयागराज - उत्तर प्रदेश येथे रासपची समीक्षा बैठक

प्रयागराज - उत्तर प्रदेश येथे रासपची समीक्षा बैठक

प्रयागराज (१२-२-२४) : येथे रासपचे जिल्हाध्यक्ष एड. कृपाशंकर पाल यांच्या निवासस्थानी राष्ट्रीय समाज पक्षाची समीक्षा बैठक पार पडली. मुख्यअतिथी राष्ट्रीय संघटनमंत्री तथा उत्तर प्रदेश प्रभारी बालकृष्ण लेंगरे,  विशेष अतिथी म्हणून रासपा यूपीचे प्रदेश अध्यक्ष चन्द्रपाल उपस्थितीत होते. आगामी लोकसभा निवडणुकीसाठी चर्चा करण्यात आली. राष्ट्रीय समाज पक्ष तळागाळात पोहचण्यासाठी पदाधिकारी कार्यकर्त्यांनी मेहनत घ्यावी, असे आवाहन श्री. लेंगरे मामा यांनी केले. यावेळी संजय त्रिवेदी - कानपूर, प्रयागराज जिल्हा संयोजक राम लखन, कौशाम्बी जिल्हा संयोजक राम लाल, मंडल अध्यक्ष एड. इन्द्रजीत, जिल्हा प्रभारी आशीषकुमार पाल अंशु, जिल्हासचिव रामसनेही, तालुका अध्यक्ष एड. राकेश कुमार, विधानसभा अध्यक्ष रमेश, ब्लाक सचिव रोहित कुमार, विनोद पाल आदी पदाधिकारी उपस्थित होते.

बारामतीत लोकसभेसाठी रासप स्वतंत्रपणे लढणार

बारामतीत लोकसभेसाठी रासप स्वतंत्रपणे लढणार 

बारामती(१०/२/२४)  : लोकसभा निवडणूकीचे वातावरण तापू लागले असतानाच राष्ट्रीय समाज पक्षाने बारामती लोकसभा मतदारसंघातून स्वतंत्रपणे निवडणूक लढविण्याचे जाहीर केले आहे. बारामतीत रासपच्या झालेल्या बैठकीत आगामी लोकसभा निवडणूकीत एकमताने स्वतंत्र उमेदवार उभा करण्याचे निश्चित झाले. 

पक्षाचे संस्थापक अध्यक्ष महादेव जानकर यांच्या सूचनेनुसार बूथ तेथे कार्यकर्ता हे अभियान राबविण्यात येणार आहे. बूथनिहाय कार्यकर्त्यांच्या बैठका घेऊन कामाचे नियोजन करण्याचे निश्चित करण्यात आले. मतदारांशी संपर्क साधण्यासाठी सर्व प्रकारच्या माध्यमांचा वापर करणे, बूथ समिती स्थापन करणे, रासपचे विचार मतदारांपर्यंत पोहोचविणे, पक्षाची ध्येयधोरणे लोकांना समजून सांगणे अशा बाबी याबैठकीत ठरविल्या गेल्या.

या बैठकीस जिल्हा नियोजन समिती सदस्य तानाजी शिंगाडे, किरण गोफणे, बारामती तालुकाध्यक्ष एड. अमोल सातकर, विठ्ठल देवकाते, शैलेश थोरात, दादा भिसे, महादेव कोकरे, काकासाहेब बुरूंगले, एड. दिलीप धायगुडे, लखन कोळेकर, विजय मोटे, नवनाथ मलगुंडे, दशरथ आटोळे, प्रमोद धायगुडे, अनिवाश मासाळ, शाम घाडगे, किशोर सातकर, प्रकाश देवकाते उपस्थित होते.

रासपच्या जन स्वराज यात्रेत शेकडो गाड्यांचा ताफा, कन्नौज शहर बनले रासपमय

रासपच्या जन स्वराज यात्रेत शेकडो गाड्यांचा ताफा, कन्नौज शहर बनले रासपमय 



कन्नौज - उत्तरप्रदेश (११-०२-२४) : राष्ट्रीय समाज पक्षाची जन स्वराज यात्रा राष्ट्रीय अध्यक्ष महादेव जानकर यांच्या मार्गदर्शनात कन्नौज लोकसभा मतदार क्षेत्रात राष्ट्रीय संघटनमंत्री बालकृष्ण लेंगरे यांच्या नेतृत्वात काढण्यात आली. जन स्वराज यात्रेचे शेवटी सभेत रूपांतर झाले. रासपचे विचार तळागाळात रुजवावेत. संघटन भक्कम करावे. याबाबत चर्चा करण्यात आली. जन स्वराज यात्रेत शेकडो गाड्यांचा ताफा सहभागी होता. तसेच कन्नौज शहर रासपमय झाले होते.

जन स्वराज यात्रेत प्रांत अध्यक्ष चंद्रपाल, प्रदेश संघटनमंत्री प्रदीप सिंह तोमर, प्रदेश प्रभारी अनुपम पाल, प्रदेश सचिव श्याम पाल, प्रदेश प्रवक्ता मनोजकुमार पाल, जिल्हाउपाध्यक्ष लखीमपुरखीरी श्रीकान्त वर्मा, सीतापुर जिल्हाध्यक्ष रामसिंह पाल, उपाध्यक्ष सचिन पाल, औरैया जिल्हाध्यक्ष रजत बघेल, दिनेश बघेल यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. जन स्वराज यात्रा यशस्वी करण्यासाठी मंडल अध्यक्ष विष्णु पाल, अंकित, दीपक, प्रमोद, राधेश्याम, आलोक, पुष्पेंद्र, पूर्वप्रधान रामनरेश पाल, प्रधान हरपालसिंह, आशीष पाल, विपिन, विवेक पाल, प्रो. अजय पाल, अर्पित भदौरिया, वृजेश विक्रम रावत, शिवकुमार यादव, शिवदीप सिंह, कादिर खा, अमरसिंह यादव, आदित्य सिंह, फौजी रामसनेही, संजय त्रिवेदी, फौजी सुरेश, राजकुमार, बाबूराम, जितेंद्र, अशोक, प्रेमचंद, एड. धीरेंद्र, धीरराज सहभागी झाले होते.

लोकसभा निवडणुकिपूर्वी बूथपर्यंत संघटन मजबूत करावे : महादेव जानकर

लोकसभा निवडणुकिपूर्वी बूथपर्यंत संघटन मजबूत करावे : महादेव जानकर

शिवपुरी लोकसभा मतदार क्षेत्रात राष्ट्रीय समाज पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष महादेव जानकर यांचे जोरदार स्वागत करण्यात आले.

शिवपुरी लोकसभा मतदार क्षेत्रात राष्ट्रीय समाज पक्ष जन स्वराज यात्रा 

शिवपुरी - मध्य प्रदेश (२१/१/२४) : 

लोकसभा निवडणुकीपूर्वी युवक, महिला आघाडी सह सर्व आघाड्यांच्या कार्यकारण्या पुर्ण कराव्यात. बूथ पर्यंत संघटन मजबूत करावे, असे आवाहन रासपचे राष्ट्रीय अध्यक्ष महादेव जानकर यांनी केले.  रासपचे राष्ट्रीय अध्यक्ष माननीय महादेव जानकर साहेब यांच्या प्रमुख उपस्थितीत शिवपुरी लोकसभा मतदारक्षेत्रात राष्ट्रीय समाज पक्ष तर्फे जन स्वराज यात्रा काढण्यात आली, यावेळी ते बोलत होते. जनस्वराज यात्रेचे पुष्पवृष्टी करत स्वागत करण्यात आले. रासपच्या जन स्वराज यात्रेत युवक मोठ्या प्रमाणात सहभागी झाले होते. उपस्थितांना महादेव जानकर यांनी मार्गदर्शन करताना पक्षाची ध्येय धोरणे सांगितली. 

जन स्वराज यात्रेत आदिवासी नेता दौलतराम रावत, राष्ट्रीय महासचिव कुमार सुशील, गिरिराज पहलवान, प्रदेश प्रभारी प्राणसिंह पाल, ज्येष्ठ नेते  दादामिठ्ठन लाल वंशकार, शहडोल रासप अध्यक्ष रामविशाल कोली, रामपाल पाल, रामविशाल पाल, वरिष्ठ नेते रामकृष्ण विश्वकर्मा उपस्थित होते. कार्यक्रमाचे आयोजन शिवपुरी जिल्हाध्यक्ष तथा लोकसभा गुना शिवपुरीचे उमेदवार एड. डी. एस चौहान, पिछोर रासप अध्यक्ष महेंद्र पुरोहित, कोलारस रासप अध्यक्ष प्रतापसिंह बघेल, किरार समाजाचे नेते रामविलास किरार,  शिवपुर जिल्हा उपाध्यक्ष शीशपाल जिद्दी, ब्लॉक अध्यक्ष पिछोर युवा आघाडी अध्यक्ष सरजिल कुरैशी, पिछोर विधानसभा प्रभारी सिंगर सतीश, पिछोर  शहर अध्यक्ष अखिलेश,  युवा नेता आनंदपाल, दतिया रासपचे अखिलेश पाल, बबीना रासपचे रामसिंह पाल,  पोहरी रासपचे रामलखन पाल, नरवरचे सरपंच सुरेश बघेल यांनी केले होते.

कर्नाटक, महाराष्ट्र, उत्तर प्रदेश सहित संपूर्ण देशात जास्तीत जास्त जागा रासपा स्वबळावर लढविणार ! : महादेव जानकर

कर्नाटक, महाराष्ट्र, उत्तर प्रदेश सहित संपूर्ण देशात जास्तीत जास्त जागा रासपा स्वबळावर लढविणार ! : महादेव जानकर

राष्ट्रीय कार्यकारणी बैठकीत मार्गदर्शन करताना रासप सुप्रीमो महादेव जानकर, बाजूस मंचावर शिवलिंगप्पा किन्नुर, एस. एल. अक्कीसागर

रासप राष्ट्रीय कार्यकारणी व कर्नाटक राज्य कार्यकारणी बैठक उत्साहात संपन्न







बेळगावी(२५/१/२४) : राष्ट्रीय समाज पक्ष राष्ट्रीय कार्यकारणी व कर्नाटक राज्य कार्यकारिणीची बैठक दुपारी २ वाजता कन्नड साहित्य भवन, राणी चेन्नमा सर्कल, बेळगावी येथे पार पडली. बैठकीत लोकसभा निवडणुकीसाठी महादेव जानकर यांना सर्वाधिकार देण्याचे एकमताने ठरले.  त्याशिवाय सर्व समाजाची जातीनिहाय जनगणना त्वरित अंमलबजावणी आणि संगोळी रायन्ना स्मृतीस्थळ नंदगड राष्ट्रीय स्मारक आणि राष्ट्रीय पर्यटनस्थळ बनावे यासहित अनेक ठराव मंजूर करण्यात आले.  यामध्ये कर्नाटक राज्य मागासवर्गीय आयोगाने सामाजिक आणि आर्थिक सर्व्हेक्षण केले आहे (कांथराज आयोग) स्वीकारून त्याची अंमलबजावणी करावी, वीर तानाजी मालुसरे यांची स्मृतीस्थान सिंहगड येथे रोपवे निर्माण करावे आदी ठराव होते. अध्यक्षस्थानी एस. एल अक्कीसागर होते. कर्नाटक राज्यप्रभारी सुनील किन्नुर यांनी स्वागत केले.  राष्ट्रीय महासचिव कुमार सुशील यांनी प्रास्तविक केले. 2024 हे लोकसभा निवडणुकीचे वर्ष असल्याचे सांगून संघटन बांधणी आणि प्रचार रणनीती याचा ऊहापोह केला. सर्व आघाडी आणि बूथ, गाव, तालुका, जिल्हा लोकसभा ते राज्यकार्यकारिणी त्वरित नेमण्याचे आदेश दिले.  परभणी, माढा बारामती, सांगली, शिर्डी, मिर्जापुर, बेळगाव यावर विशेष लक्ष्य केंद्रित करण्याचे आदेश दिले.  रासपा संस्थापक अध्यक्ष महादेव जानकर यांचे मुख्य मार्गदर्शन झाले. ते म्हणाले, मुख्य निवडणूक आयोगाच्या नियमानुसार राष्ट्रीय समाज पक्षाच्या वर्षात दोन राष्ट्रीय कार्यकारिणी बैठका होतात. वर्षाच्या सुरवातीला बेळगाव येथे पाहिली राष्ट्रीय कार्यकारिणी  बैठक होत आहे. लोकसभा निवडणुक 2024 च्या पार्श्वभूमीवर ही बैठक होत असल्याने या बैठकीला अनन्यसाधारण महत्व असल्याचे जानकर यांनी नमूद केले. पुढे मार्गदर्शन करताना ते म्हणाले, 2003 पक्षाची स्थापना केली. त्याच वर्षी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूका लढवल्या. 2004 साली सार्वत्रिक लोकसभा निवडणूक महाराष्ट्र आणि कर्नाटक या राज्यातून लढवली, विधानसभा लढवली. 2019 ची लोकसभा कर्नाटक सहित 6 राज्यात लढविली. यावेळी कर्नाटक महाराष्ट्र उत्तर प्रदेश सहित संपूर्ण देशात जास्तीत जास्त जागा स्वबळावर लढविणार आहोत.  सर्व समाजाला आम्ही भागीदारी देऊ. संपूर्ण राष्ट्रीय विकास आणी समान राष्ट्रीय भागीदारी आमचा मुख्य अजेंडा आहे. मुख्य कायदा आणि अर्थ सत्ता दिल्लीत आहे, म्हणून दिल्ली संसद भवन रासपचे लक्ष्य आहे. माझे पदाधिकारी आणि कार्यकर्त्याच्या माध्यमातून मतधारक जनतेकडे जाऊ आणि जनमताचा अवमान करणाऱ्या जनतंत्र विरोधी सत्ताधारी यांचा बुरखा फाडून, त्यांचा खरा चेहरा दाखवून जास्तीत जास्त खासदार निवडुन आणू. मी स्वतः महाराष्ट्र आणि उत्तर प्रदेश येथुन निवडणूक लढवून संसद भवनमध्ये जाणार म्हणजे जाणारच. परंतु कार्यकर्ते आणि पदाधिकारी हितचिंतक यांनी हे वर्ष निवडणूक वर्ष याची खुणगाठ बांधावी आणि रात्रीचा ही दिवस करून काम करावे. असे मी नम्र परंतु आग्रही आवाहन करीत आहे.

राष्ट्रीय कार्यकारणी व कर्नाटक राज्य कार्यकारणी बैठकीप्रसंगी उपस्थित रासप राष्ट्रीय अध्यक्ष महादेव जानकर समवेत अन्य पदाधिकारी.


बैठकीसाठी राष्ट्रीय उपाध्यक्ष शिवलिंगप्पा कीन्नुर, राष्ट्रीय संघटक बाळकृष्ण लेंगरे, राष्ट्रीय संघटक गोविंदराव शुरनर, राष्ट्रीय कार्यकारिणी सदस्य मनोज निगडकर, कर्नाटक राज्य अध्यक्ष धर्मन्ना तोंटापुर, कर्नाटक राज्य निवडणूक प्रभारी सुनील कीन्नुर, कर्नाटक राज्य सचिव बसवराज दोड्डमनी, उत्तर कर्नाटक प्रभारी सुनील बंडगर, बेंगळुरू प्रभारी बसवराज मुक्का,  बेळगाव जिल्हा प्रभारी बलराम कामन्नावर, बेळगाव जिल्हा अध्यक्ष हनुमंत पूजेर आणि अन्य पदाधिकारी उपस्थित होते. यानंतर राज्य कार्यकारिणीची बैठक झाली. दरम्यान पत्रकार परिषद झाली. आजी माजी अध्यक्ष मा. महादेव जानकर आणि एस एल अक्कीसागर त्याला सामोरे गेले. मा. जानकर यांनी हिंदी, मराठी तर अक्कीसागर यांनी कन्नड मध्ये संबोधन केले. वृत्तपत्र आणि इलेक्ट्रॉनिक मेडियानी दखल घेतली आणि प्रसारण केले.

संगोळी रायण्णा जयंती संसदेत साजरी व्हावी : महादेव जानकर

संगोळी रायण्णा जयंती संसदेत साजरी व्हावी : महादेव जानकर


राष्ट्रीय समाज पक्ष तर्फे आद्य स्वातंत्र्यवीर संगोळी रायन्ना १६ वा राज्याभिषेक वार्षिकोत्सव 

नंदगड (२६/१/२०२४) : राष्ट्रीय समाज पक्ष तर्फे आद्य स्वातंत्र्यवीर संगोळी रायन्ना यांचा १६ वा राज्याभिषेक वार्षिकोत्सवाचा कार्यक्रम पार पडला. राष्ट्रीय समाज पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष महादेव जानकर, माजी मंत्री महाराष्ट्र राज्य यांच्या नेतृत्वात देशभरातील राष्ट्रीय समाज पक्ष पदाधिकारी कार्यकर्ते, संगोळी रायन्नाप्रेमी यांच्या प्रमुख उपस्थितीत शुक्रवारी सकाळी ७ वाजता आद्य स्वातंत्र्यवीर संगोळी रायन्ना यांच्या समाधीस्थळी विशेष पूजा करून राज्याभिषेक करण्यात आला. समाधीस्थळापासून रायनांच्या पुतळ्यापर्यंत भव्य मिरवणूक काढण्यात आली. महादेव जानकर यांच्या शुभहस्ते पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून ध्वजारोहण करण्यात आले. महादेव जानकर यांच्यासह रासप पदाधिकारी कार्यकर्ते यांनी संगोळी रायन्ना फाशीस्थळावर जाऊन अभिवादन केले.

संगोळी रायण्णा पुतळ्यासमोर महादेव जानकर आपल्या भाषणात म्हणाले, गेली सोळा वर्षापासून राष्ट्रीय समाज पक्ष नंदगड या ठिकाणी राष्ट्रीय कार्यक्रम घेत आहे. नंदगड भूमीचे नाव सुवर्ण अक्षरांनी लिहावे. संगोळी रायण्णा यांच्या आशीर्वादाने राष्ट्रीय समाज पक्षाचा पहिला आमदार विजयी झाला. मी मंत्री झालो, लवकरच मी खासदार होऊन येईल. कर्नाटकात सत्तेवर आलेल्या सर्वच राज्य सरकारला रासपच्या चळवळीमुळे संगोळी रायण्णा क्रांतीक्षेत्राचा विकास करण्यास भाग पडले.  संगोळी रायण्णा केवळ धनगरवीर वा कन्नडवीर नसून राष्ट्रवीर आहेत. त्यांच्या कार्याचा प्रचार आणि प्रसार देशभर रासप करत आहे. संगोळी रायण्णा जयंती दिल्लीच्या संसदेत साजरी व्हावी. जोपर्यंत मी जिवंत आहे, तोपर्यंत 26 जानेवारी प्रजासत्ताकदिनी नंदगडला येत राहील.  संगोळी रायण्णा देशासाठी लढले. यावेळी रासेफ राष्ट्रीय अध्यक्ष एस. एल. अक्कीसागर यांनी 'कन्नड'मध्ये मा. जानकर यांच्या भाषणाचा गोषवारा मांडला.


यावेळी राष्ट्रीय उपाध्यक्ष शिवलिंगप्पा किन्नुर, राष्ट्रीय संघटक बाळकृष्ण लेंगरे, गोविंदराव शुरनर, राष्ट्रीय महासचिव कुमार सुशील, भूतपूर्व राष्ट्रीय सचिव गणेश देवासी,  राष्ट्रीय कार्यकारिणी सदस्य मनोज निगडकर, कर्नाटक राज्य अध्यक्ष धर्मांन्ना तोंटापूर, कर्नाटक राज्य प्रभारी सुनील किन्नुर,  महाराष्ट्र राज्य अध्यक्ष काशिनाथ शेवते, कर्नाटक राज्य महासचिव बसवराज दोड्डमनी, महाराष्ट्र राज्य सचिव ओमप्रकाश चितळकर, कल्याण कर्नाटक अध्यक्ष शरणप्पा पुजारी, उत्तर कर्नाटक प्रभारी सुनील बंडगर,  संगोळी रायन्ना प्राधिकरण अध्यक्ष श्रीमलेशप्पा, तहसीलदार प्रकाश गायकवाड, पोलीस अधिकारी श्री. पाटील, संगोळी रायन्ना समिती नंदगड अध्यक्ष शंकर सोनोळी, कन्नड रक्षक वेदिका अध्यक्ष संजय वडेकर, पत्रकार सुरेश दलाल, संभाजी पाटील, रासेफ दिल्ली अध्यक्ष विर पाल, उत्तर प्रदेश रासप अनुसूचित जाती जमाती आघाडी अध्यक्ष नरेश कुमार वाल्मिकी, महाराष्ट्र विदर्भ उपाध्यक्ष तोसिफ शेख, महाराष्ट्र राज्य कार्यकारणी सदस्य भाऊसाहेब वाघ, अश्रुबा कोळेकर, सातारा जिल्हाध्यक्ष खंडेराव सरक, सोलापूर जिल्हा अध्यक्ष रणजित सुळ, प. महाराष्ट्र युवक आघाडी अध्यक्ष अजित पाटील, शिरूर लोकसभा प्रभारी सचिन गुरव, प. महाराष्ट्र संघटक कालिदास गाढवे, गुलबर्गा जिल्हाध्यक्ष देवेंद्र चीगरहल्ली, बेळगांव जिल्हाध्यक्ष हनुमंत पुजेर, विजयपुर अनिल पुजारी, तिकोटा तालुका अध्यक्ष सिद्राम, लक्ष्मी पुजारी, नंदगड ग्रामपंचायत सरपंच, मार्केटिंग सोसायटी, वविध संघ संस्थांचे पदाधिकारी, शासकीय अधिकारी याशिवाय रासेफ महाराष्ट्रचे महावीर सरक आणि सहकारी तसेच सौ. सुनंदा अक्कीसागर, सौ. विजयमाला तिप्पनावर, सतीश सनदी बेळगाव रासपा महासचिव यांच्यातर्फे संगोळी रायन्ना समाधीस्थळी अभिवादन करण्यात आले.  दुपारी १२ ते रात्री १०.०० पर्यंत सर्वांना जेवणाची व्यवस्था करण्यात आली होती. दिवसभरात लाखो लोकांनी समाधीचे दर्शन घेतले.

दिल्लीत राष्ट्रीय समाज पक्षाचे कार्यकर्ता संमेलन

दिल्लीत राष्ट्रीय समाज पक्षाचे कार्यकर्ता संमेलन

दिल्ली : राष्ट्रभारती द्वारा 

दिनांक २४ डिसेंबर २०२३ रोजी राष्ट्रीय समाज पार्टी तर्फे कार्यकर्ता सम्मेलन दिल्ली येथे पार पडले. संमेलनाचे आयोजक दिल्ली प्रदेश अध्यक्ष नरेंद्र पाल /सोनू , उत्तर पूर्व दिल्ली लोकसभा उमेदवार जगदीश भगतजी व राष्ट्रीय समाज एम्प्लॉइज फेडरेशन दिल्ली अध्यक्ष इंजि. वीर पाल आदी होते. संमेलनाचे प्रमुख पाहुणे राष्ट्रीय महासचि कुमार सुशील, उत्तर प्रदेश अध्यक्ष चन्द्रपाल होते. विविध मान्यवरांनी मनोगत व्यक्त केली.

संमेलनात बिहार प्रदेश अध्यक्ष गोपाल पाठक, हरियाणा प्रदेश अध्यक्ष भगवानदास महाराज, अनुसूचित मोर्चा राष्ट्रीय अध्यक्ष नरेश बाल्मीकि, प्रदेश महासचिव एस एस पाल, प्रदेश सचिव श्याम पाल, प्रदेश सचिव अवध विजय पाल, प्रदेश प्रवक्ता अभिषेक धनगर, युवा संगठनमंत्री जनपद आगरा उमेश धनगर, दिल्लीतील कार्यकर्ते उपस्थित होते.

मिर्झापूर उत्तर प्रदेशात रासपतर्फे सावित्रीबाई फुले जयंती साजरी

मिर्झापूर उत्तर प्रदेशात रासपतर्फे सावित्रीबाई फुले जयंती साजरी 

मिर्झापूर (३/१/२४) : राष्ट्रभारती द्वारा 

राष्ट्रीय समाज पक्षाची समीक्षा बैठक भरपुरा चौक मां शारदा लॉन येथे पार पडली. यावेळी राष्ट्रीय समाज पक्ष तर्फे सावित्रीबाई फुले जयंती साजरी करण्यात आली. जिल्हाध्यक्ष अनिल कुमार पाल यांनी मिशन लोकसभा 2024 निवडणूक डोळ्यासमोर ठेवून कार्यकर्त्यांशी संवाद साधला व निवडणुकीच्या अनुशंगाने जोषपूर्ण भाषण केले. यावेळी नागरिकांनी रासपमध्ये प्रवेश केला. कार्यक्रमास जिलाध्यक्ष अनिल कुमार पाल, महिला मोर्चा जिलाध्यक्ष अर्चना मिश्रा, महिमा पाल, जिला प्रभारी जयशंकर पाल, जिला महामंत्री संजयसिंह विनीत, जिला उपाध्यक्ष राजेश कुमार, जिला सचिव पंकजकुमार बिंद, जिला उपाध्यक्ष सत्यनारायण पाल, युवा नेता संदीप पाल, श्याम नारायण, रामविलास धनगर, अनिल मौर्य, अतुल पाल, चिंता लाल, निरहुआ लल्लू, विनोद बिना, नागेंद्र कुमार पाल, नीतीश कृष्ण, कुमार शर्मा, संजय शेष, मणिपाल, विजय पाल व अन्य कार्यकर्ते उपस्थित होते.

कै. नानासाहेब जगताप यांच्या आठवणीने जानकर साहेब झाले भावूक

कै. नानासाहेब जगताप यांच्या आठवणीने जानकर साहेब झाले भावूक 

राहुरी : राष्ट्रभारती द्वारा 

आदरणीय महादेवजी जानकर साहेब यांनी, राष्ट्रीय समाज पक्ष अहदनगर शेतकरी आघाडी जिल्हाध्यक्ष  कै. नानासाहेब जगताप यांच्या घरी सांत्वन पर भेटी दीली. मी नेहमीच, तुमच्या परीवारासोबत असेल, असा विश्वास जानकर साहेब यांनी दीला. 

यावेळी जानकर साहेबांनी, स्वर्गीय नानासाहेब जगताप यांच्या सोबतच्या आठवणींना उजाळा दीला. कोवीड काळात सोबत असलेल्या, नानासाहेब जगताप यांच्या आठवणी साहेबांनी सांगीतल्या. आणि हे सांगत असताना जानकर साहेब भावूक देखील झाले. जगताप नानांच्या जाण्याने, पक्षात एक पोकळी निर्माण झाली आहे.. माझ्या आठवणीतील जगताप नाना सांगायचेच म्हंटल तर, एक अघळ पघळ नेतृत्व म्हणजे जगताप नाना. कधीच कुठल्या मोठ्या पणाची अपेक्षाच नाही. आदरणीय जानकर साहेब यांच्यावर विशेष प्रेम ,जगताप नानांच्या बोलण्यातून, कृतीतून जाणवायच. साहेबांना आठवणीने फोन करणार, विचारपूस करणार. खरचच काही माणस, आपल्या मनाला आपलेपणा निर्माण करतात. जगताप नाना म्हणजे, घरातील जेष्ठ व्यक्तीमत्व वाटायचे..  जगताप नानांच्या जाण्याने, कुठतरी एक पोकळी निर्माण झाली आहे.. रासप परीवारातील एक जेष्ठ पितृतुल्य व्यक्तीमत्व आपल्यात नसल्याची खंत नेहमीच असेल. स्वर्गीय जगताप नाना नेहमीच आठवणीत राहतील. नानांच्या स्मृतीस राष्ट्रीय समाज पक्ष व यशवंत नायक परिवाराच्यावतीने भावपुर्ण श्रध्दांजली..!

प्रस्थापित पक्ष कितीही मोठे असले तरी, मी राष्ट्रीय समाज पक्षातूनच खासदार होणार : महादेव जानकर

प्रस्थापित पक्ष कितीही मोठे असले तरी, मी राष्ट्रीय समाज पक्षातूनच खासदार होणार : महादेव जानकर

कळंबोली (१४/१/२४) : आबासो पुकळे 

प्रस्थापित भाजप, काँग्रेस, राष्ट्रवादी, उद्धव ठाकरेची शिवसेना, शिंदेची शिवसेना हे मोठे पक्ष आहेत, पण मी आज चॅलेंज देऊन सांगतो, मी राष्ट्रीय समाज पक्षातूनच खासदार होणार. ज्यावेळेस मी खासदार होईल, त्यावेळेस महाराष्ट्रात राष्ट्रीय समाज पक्षाचे 25 आमदार असतील, असा विश्वास राष्ट्रीय समाज पक्षाचे संस्थापक/राष्ट्रीय अध्यक्ष महादेव जानकर यांनी व्यक्त केला. महाराष्ट्र राज्य कोषाध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल सुदामशेठ जरग यांच्या सत्कार सोहळ्याचे आयोजन केले होते. यावेळी महादेव जानकर यांनी  उपस्थितीत जनतेशी संवाद साधताना  सामजिक राजकीय जागृतीवर भाष्य करताना काही थेट राजकिय विधाने केली आहेत. 

महादेव जानकर यांचे भाषण ऐकण्यासाठी इथे क्लिक करा > महादेव जानकर संपूर्ण भाषण

महादेव जानकर आपल्या भाषणात म्हणाले, आज सत्कार सोहळा ठेवला, त्या माणसाला माझ्याकडून काही अपेक्षा नव्हती. कारण मंत्री झाल्यानंतर मंत्री पैसे देतो, पण हा कार्यकर्ता माझ्याकडे पैसे नाहीत, असं कळल्यावर माझ्याकडे पैसे घेऊन आला, असा हा सुदामशेठ जरग आहे. मी नव्हते सांगितले त्याला पद द्यायला, मला माहितही नाही. पण मी अभिनंदन करेन काशिनाथ शेवते आणि ज्ञानेश्वर सलगर यांचे, मला त्यांनी विचारले सुद्धा नाही. दिल्लीला जाताना एकदा चर्चा झाली होती, तो मुलगा चांगला आहे. प्रामाणिक आहे. पद द्या, अगर नका देऊ, दोन वर्षापूर्वी चर्चा झाली होती. कुणी ५ रुपये, १० रुपये, हजार रुपये दिले असतील, तुमच्या सर्वांच्याकृपेमुळे 13 कोटी जनतेचा मी मंत्री झालो. तुमच्या सहकार्यामुळे झालो. सारच मी केलं असं म्हणणार नाही. असं एकट्याने काहीच होत नाही. सर्व शक्य होत नाही. मी इंजिनियर झालो. काही केल. असत हो, संसार केला असता, एक-दोन मुलीच झाल्या असत्या मला. सातारला बंगला बांधला असता. विरकरवाडीत किंवा बनगरवाडीतच मुली दिल्या असत्या. यापेक्षा काय दिवा लावला असता. कोण इंजिनियरला खातेय. पायलीच पाचशे इंजिनियर मिळाय लागलत. 

श्री. जानकर पुढे म्हणाले, 2004 ला देखील मी इथं मत मागाय तुम्हाला आलतो. बोनेटवर उभे राहून भाषण केलं होतं. माणस त्यावेळेस हसायची आम्हाला, जानकर काहीतरी घेऊन आलेत. त्यावेळेस आम्ही सांगितलं होतं, काँग्रेसला झेंडा धरायला देखील माणूस मिळणार नाही. आज काँगेसची देशात काय अवस्था चाललेय बघा. आम्ही आमचा पक्ष काढला. मला भाजप किंवा काँग्रेसमध्ये कधीच जायचं नव्हतं. स्वतःचाच पक्ष तयार करायचा होता. मला काँग्रेसचा मंत्री होता आलं असत, भाजपचा मंत्री होता आल असता, पण नाही. कुठल्या पक्षाचा चमचा म्हणून वागणार नाही, तर ज्या गोरगरीब लोकांनी मला दहा दहा रूपये दिलेत, त्या लोकांचा मालक म्हणून नाहीतर सेवक म्हणून राहणार आहे. मी 2003 ला अहिल्याबाई होळकर यांच्या जन्म गावात पक्ष काढला, आज या पक्षाला चार राज्यात मान्यता मिळाली. उत्तर प्रदेशात शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांच्या पक्षापेक्षा माझ्या पक्षाला मतदान जास्त आहे. गुजरात मध्ये जाती-धर्माचे राष्ट्रीय समाज पक्षाचे 28 नगरसेवक आहेत.  तरीही मीडियाची लोक धनगर समाजाचे नेते महादेव जानकर असे टाकतात. माझी आई धनगर आहे. बाप धनगर आहे, त्यात मी काय करू. मी धगनर समाजात जन्मलोय. कोकणातील कार्यकर्त्यांना माझी विनंती आहे, सर्व समाजाच्या लोकांना सोबत घेऊन चला. सर्व समाजाला घेतलं तर पक्ष बनेल. पक्ष बनला तर आपण पंतप्रधान होऊ, मुख्यमंत्री होऊ. आज राष्ट्रीय समाज पक्षाला चांगले दिवस येत आहेत. शिवसेना आणि राष्ट्रवादीमध्ये भेद झाल्यामुळे आपला फायदा होत चालला आहे. आपल्या कार्यकर्त्यांनी पोलिंग बूथ, कार्यकारण्या तयार केल्या पाहिजेत. तरच दिवस चांगले येणार आहेत. 

मला नुसत आमदार, खासदार व्हायचं नाही, तर गोरगरिबांच्या हिताचं कायदे करण्यासाठी देशात आणि राज्यात आपली सरकार स्वतःच्या पक्षाची बनवायचे आहेत. आपल्या विचाराचे सरकार बनवायचे आहेत, आणि ते सोपे आहे. आम्ही पक्ष काढला तेव्हा लोक म्हणायचे सरपंच नाही, जानकर साहेब पंतप्रधानाची भाषा करतात. आज सांगू इच्छितो, खासदार सोडून सर्व निवडणुकात राष्ट्रीय समाज पक्षाने विजय मिळवला आहे. बांधवांनो, घर बांधताना त्रास होतो, पण स्वतःची झोपडी मालक बनवते. नेहरूंनी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना त्यांचा पक्ष विलीन करायला सांगितला, पण बाबासाहेबांनी सांगितले, मला राष्ट्रपती जरी केलं तरी मी पक्ष विलीन करणार नाही. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा स्वत:चा पक्ष होता, म्हणून 340, 341, 342 कलम लिहल. मराठा समाजाचे सारे मुख्यमंत्री झाले असताना, मराठा समाजाला आरक्षण का मिळत नाही? कारण मराठा मुख्यमंत्री त्यांच्या पातीचे नव्हते. म्हणून तुम्हाला पात धरावी लागेल. एखादा जातीचा मंत्री झाला, आमदार झाला, म्हणून जात सुधारत नाही. भाजप धनगर समाजाला आदिवासीची सवलत देणार नाही. दिल्लीत महादेव जानकर गेल्यानंतर, त्यांच्या बापाला देखील आरक्षण द्यावे लागेल, असा खणखणीत इशारा महादेव जानकर यांनी दिला. 

जोपर्यंत पंतप्रधानाची खुर्ची, मुख्यमंत्र्याची खुर्ची हलवणार नाही, तोपर्यंत तुमच्या समाजाचे भलं होणार नाही. वसंतराव नाईक मुख्यमंत्री होते, पण आजही बंजारा समाजाला आरक्षण नाही, कारण त्यांना कृष्ण सांगितलं होतं आम्ही आरक्षणाच्या विरोधात आहे. भारतीय जनता पार्टी ही चांगली पार्टी नाही. भाजप म्हणतात आम्ही जानकरांना मंत्री केलं, पण आम्ही तुम्हाला मुख्यमंत्री केलं ना? अशा शब्दात महादेव जानकर यांनी सुनावत आपला पैरा फिटल्याचे सांगितले. 

यापूर्वी मला कोणी कोणी काय दिलं याची सर्व यादी माझ्याजवळ आहे. मी तुम्हाला विसरून मोठे होणार नाही. त्यामुळे माझी तुम्हाला विनंती आहे, आपलं घर राष्ट्रीय समाज पक्ष मोठे करा. असाल तुम्ही दुसऱ्याच्या घरात, पण त्या घराचा तुम्ही मालक नाहीत. आमदार प्रशांत ठाकूर देखील घराचा मालक नाही. घराचा मालक दुसराच आहे. प्रशांत ठाकूर जर घराचा मालक असता, तर मंत्री झाला असता. प्रशांत माझा मित्रच आहे. माझ्याकडे मराठा समाजाचे दोन आमदार झाले, आताचा आमदार वंजारी समाजाचा आहे. राष्ट्रीय समाज पक्ष टाटा बिर्ला उद्योगपतींच्या पैशावर चालत नाही तर सर्वसामान्यांच्या जनतेच्या पैशावर चालतो. त्यामुळे मला ईडी बिडीची भीती नाही. स्वच्छ चारित्र्य ठेवून चाललोय बांधवांनो, मला हजारो पोरं आमदार खासदार करायचेत. एकटा महादेव जानकर मंत्री नाही होणार. येत्या वीस वर्षात महादेव जानकर यांच्या राष्ट्रीय समाज पक्षाचा शिक्का चालणार आहे. मोठे पक्ष सत्ता मिळेपर्यंत छोट्या पक्षांना विचारतात, सत्ता मिळाली की लाथ मारतात. त्यामुळे मोठ्या पक्षांनादेखील लाथ मारायला शिकलं पाहिजे. ज्यावेळेस आपला नेता सांगतो, की त्यावेळेस ऐकलं पाहिजे. मला काही बायका, पोरं, काही नाही. माझं कोणीही नातेवाईक राजकारणात येणार नाही. जो चांगलं काम करेल, त्याला चांगले दिवस येतील. 

आपण राजकारणात आलं पाहिजे. आपल्याला सांगितलं जातं, राजकारण वाईट आहे, पण आमदाराचाच पोरगा परत आमदार होणार. खासदाराचाच पोरगा खासदार होणार, आपण केवळ मतेच देत राहणार. त्यांनाच मदत करणार, हे कुठेतरी बंद केले पाहिजे. राजकारणात ताकद असते. शेठकडे पैसा असेल आणि सत्ता नसेल तर शेठ पद कामाचं नाही. सत्तेशिवाय तुमचं भलं होणार नाही. आज आम्ही माथाडी कामगाराची पोर आहे, गरीब समाजाची पोर आहे, तुम्ही तुमची पोरगा आणि पोरगी इंग्लिश मीडियमला टाका, स्पर्धापरीक्षाना बसवा. राजकारण फार चांगले असते. राजकारण वाईट असतं तर नेहरूंनी स्वतःच्या पोरीला राजकारणात आणल असत का? पवार साहेबांनी सुप्रियाताईला राजकारणात आणल असत का? मग तुमच्या डोक्यात का घतलय खुळ. तुम्ही राजकारण करायला शिकले पाहिजे. कधी करायचे ते समजले पाहिजे. वर्षभर विरोध करतो आणि शेवटच्या दिवसी विकलो जातो. स्वतःची झोपडी मजबूत करा. सन्मानाने रहा. तरच तुम्हाला किंमत आहे. नाहीतर काही नाही. आपण बंगल्यात राहिले पाहिजे. हेलिकॉप्टरमध्ये फिरले पाहिजे. गरिबीत जन्म घेणे हा तुमचा दोष नाही, पण गरिबीत मरणार हा तुमचा दोष आहे.  


कुठलाही धर्म वाईट नसते. जगातील सर्व धर्म चांगले आहेत. हिंदू आम्ही आहे तर शंभर वर्षात आमचा खासदार का झाला नाही. हिंदू आम्ही आहे. तर सुप्रीम कोर्टाचा जज का आमचा झाला नाही. हिंदू आम्ही आहे तर केंद्रात आमचा मंत्री का नाही. आम्ही माखुबाई, बिरोबाला मानतो. आमच्या देवाला ते मानतात का? त्यांच्या घरात नागोबा, बिरोबाचा फोटो आहे का? याचा आपण विचार केला पाहिजे.  बांधवांनो दलित आणि मुसलमान आपला शत्रू नाही. दलित आणि मुसलमानांनी अपल काही घेतले नाही. किती  मुसलमानांची पोर आयएस, आयपीएस आहेत.? किती साखरकारखाने, किती सूतगिरण्या आहेत? काहीच नाही. एका गावातून दुसऱ्या गावात गेलं तर राम राम पाव्हण बोलतोय. राम आमच्या हृदयात आहे. रामाच्या नावानं राजकारण  होत असेल तर आपल्यातील बुध्दीजिवि लोकांनी याचा अभ्यास केला पाहिजे. कुणाचा फायदा कोण घेतय. कुणाची पोळी भाजून घेतय. आज विकास चांगला चाललाय. जरूर रस्ते झाले पाहिजेत. जरूर एअरपोर्ट झाले पाहिजेत. विकास होत असताना आपली माणस संपत असतील, आपल्याला आपला राजकिय वाटा मिळत नसेल तर असली सत्ता आपल्या कामाची नाही बांधवांनो. विमानतळ जरूर बनले पाहिजे, पण विमानतळाचा ठेका कुणाला मिळतोय? मंत्री म्हणून कोण येतोय, याचा आपण जरुर विचार केला पाहिजे.  तुमचा वाटा कुठे आहे ? तुमचा वाटा चोरलेली माणस शोधले पाहिजेत व त्याचा अभ्यास केला पाहिजे. राष्ट्रिय समाज पक्ष आपला म्हणून संभाळा. आपला भाऊ म्हणून सर्वांना सोबत घेतले पाहिजे.  शेतकऱ्यांसाठी सर्वात जास्त दुधाचे दर वाढवणारा मंत्री होतो. बरेच लोक म्हणतात धनगर समाजासाठी जानकर साहेबांनी काय केलं. जगात माझ्यासारखी योजना कुणीच आणलेली नाही, हे धनगर समाजाने लक्षात ठेवावे. आदिवासीच्या तेरा योजना महादेव जानकर यांनी दिलेले आहेत. दुर्दैवाने आमचं सरकार नसल्याने त्या योजनेला निधी अजित पवारांनी दिला नाही. माझं सरकार येऊ द्या, राष्ट्रिय समाज पक्षाच,  मग 1 हजार कोटी नाही तर एक 1 लाख कोटी रुपये देतो. जोपर्यंत तिजोरीचा मालक होणार नाही, तोपर्यंत तुमची प्रगती होणार नाही. 


काँग्रेस आणि भाजप एकेक मंत्रीपद देते, पण तिथं जात आडवी येते. जुनी जातीयता काँग्रेस आणि भाजपने जपली आहे, असा घणाघाती आरोप महादेव जानकर यांनी केला. ते मते मिळवण्यासाठी पिवळा झेंडा वापरतात. मते मिळवण्यासाठी निळा झेंडा वापरतात. येथूनपुढे काँग्रेस आणि भाजपला पिवळा झेंडा वापरू देऊ नका कुठल्या पक्षांना, हे सांगण्यासाठी माझी आजची सभा आहे. प्रस्थापित पक्षांना विचारायचं आमचा वाटा कुठे आहे?, माझा पक्ष वाढला की, काँग्रेस आणि भाजप कुठल्यातरी धनगराला बुजगावन म्हणून उभ करणार. पण मी तुमच्या पुढचा आहे, तुम्ही त्या रोडने चाललायना, मग मी तुमच्या पुढच्या रोडणे चालणार. मुलायम सिंह यादव यांनी यादवांचा पक्ष काढला की, इंदिरा गांधीनी काँग्रेसचा एक यादव मुख्यमंत्री केला. पण मुलायमसिंह म्हणले, तो चमचा म्हणून येईल पण मी मालक बनून येणार. शिवाजीराजे आमचाय. शिवाजीसाठी आम्ही मेलोय. नाव शिवाजीचं घ्यायचं आणि काम ठाकरेच करायचं हा धंदा बंद करा. शिवाजीच वारसदार आम्ही आहोत, पण शिवाजीच्या नावावर राजकारण करून, आम्हाला सत्तेत वाटा मिळत नसेल तर आपल्याला त्या पक्षाचा विचार केला पाहिजे. काँग्रेस तुम्हाला विचारत नव्हत. तीन एम एकत्र यायचे आणि निर्णय घ्यायचे, तुमची काय गरज नाही म्हणायचे. गोपीनाथ मुंडे होते म्हणून आम्ही भाजप बरोबर युती केली. आमचे विचारधारा फुलेवादाची आहे आणि भाजपची विचारधारा दीनदयाळ उपाध्यायची, उच्चवर्णीयांची आहे. आम्ही म्हटल ठीक आहे. जे फुले, शाहू, आंबेडकर यांचे नाव घ्यायचे ते आम्हाला कधी जवळ करत नव्हते. बीडमध्ये रासपची एक जिल्हा परिषदेत जागा निवडून आली होती. मुंडे साहेब म्हणले, महादेवराव आपले जिल्ह्यापुरती युती करूया. आमच्यामुळे भाजपचा जिल्हा परिषद अध्यक्ष बनला. नंतर मुंडे साहेब म्हणले, महादेवराव आपण राज्यात युती करूया. आम्ही ठरवलं. आपली चळवळ गरीबाची आहे, पण राजकारण उजव्याबरोबर करू. भाजपची सत्ता आली नव्हती. मी, राजू शेट्टी, रामदास आठवले त्यांच्याबरोबर गेल्यावर भाजपला सरकार बनवताना जी मते कमी पडत होती, ती आमच्यामुळे मिळाल्यावर भाजपचा देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाला. आम्हाला त्यांनी डावलल की त्यांची अवस्था काय झाली बघा महाराष्ट्रात. आम्ही त्यागी माणस आहोत. भोगी माणस नाहीत. आम्हाला नाकारलं तर तुम्हाला जनतेच्या दारबारात नाकारल्याशिवाय आम्ही स्वस्थ बसणार नाही. म्हणून आपला पक्ष आपलं घरटं वाढवण्याचा प्रयत्न करा.

तुम्ही कुठल्याही पक्षात सत्तेत जावा, पण तुमचं दुसर तिसर कुणी भल करणार नाही. हा पट्ट्या महादेव जानकरच भलं करणार आहे. आम्ही भ्रष्टाचार केला नाही. जनतेच्या वर्गणीतुनच पक्ष चालवत आहे. राष्ट्रीय समाज पक्षाला टाटा बिर्लाचा सहारा नकोय, सामान्य जनतेचा सहारा पाहिजे. मराठा, आगरी, कोळी, दीनदलित, मुसलमान या लोकांनी आम्हाला पैसे दिले. त्यातून आम्ही स्वतःच घर चालवतोय. आपल्या पक्षाला दोन कार्यालये मिळालीत. तुम्ही जर थोडी साथ दिली तर आपल्याला कायमचा बंगला मिळेल. खासदार असू नाहीतर नसू मालक म्हणून सर्व पक्षांच्या अध्यक्षांशी बोलू शकतो. माझ्या संपर्कात सर्व पक्षांचे अध्यक्ष आहेत. तुमची मान खाली जाईल, असे कोणतेही कृत्य करणार नाही. जगात देखील माझा कार्यकर्ता सन्मानाने राहील अशीच भुमिका करण्याचा प्रयत्न करील. सुदामशेठच्या  शेठला सांगितलं या माणसाला सांभाळा, एक दिवस या माणसाला मंत्री करून तुमच्या ऑफिसला पाठवेन. 


बांधवांनो, तुमच्यामुळे मी मोठा झालो आहे, माझ्या घरचं आणून काय मी केलं नाही. त्यामूळे घरचीही माझ्यावर अवलंबून नाहीत. त्यामूळे मी त्यांना रुपयाची मदत करत नाही. आमची सून डिवाएसपी होती, आई मला सारखं सांगत होती, तिची बदली कर म्हणून, मी तिचं नावही घेतल नाही. शेवटी माझ्या पिए जोशीने सूनची बदली केली, मात्र मी नाही केली. माझ्या जीवावर ती अवलंबून नाहीत. मी त्यांना सांगितलं माझ्या जीवावर तुम्ही अवलंबून राहायचं नाही. मी तुमचं घरचं काही घेतल नाही. मला मोठे केले, ते तमाम जनतेने मोठे केले.  मी या लोकांसाठीच वाटून जाणार आहे. तुम्ही काय माझ्या जीवावर उड्या मारायचा प्रयत्न करू नका. म्हणून बांधवांनो, घराणेशाही हटवा आणि सामान्य माणसाला सत्तेत बसवा ही राष्ट्रीय समाज पक्षाची भूमिका आहे, हे राष्ट्रिय समाज पक्षाचे धोरण. आज भारतात जे नेता आहे त्याचाच पोरग आमदार खासदार होतय. बाकीच्यांनी काय करायचं. क्षमता असती पण तो माणूस घाबरतो. काही नाही माझं उदरहन ठेवा. जे लोक मला हसायची तिचं लोक फुल घेऊन स्वागताला हजर राहतात. जे हसत होते मला तेच लोक जेसीबी लावून फुल व्हायला तयार आहेत. म्हणून इतिहास घडवणारा माणूस तयार केला पाहिजे. निर्माता बनल पाहिजे. तुम्हाला संघर्ष करावा लागेल. व्यसनापासून बाजूला जावं लागल. लग्नावर लय खर्च करू नका. तो शिक्षणावर खर्च करा. उद्योगधंद्यावर खर्च करा. आपल्यात ह्याला साडी, त्याला साडी, मेव्हणीला अंगठी. यातच दोन्हीकडचे वडील ते फेडत बसतात. पाच वर्ष वर येत नाहीत. हे धंदे बंद करा. कशाला पाहिजे. त्यापेक्षा  तोच पैसा उद्योगात टाका. महादेव जानकरला कोणतच व्यसन नाही. मी अगोदर स्वतःवर कंट्रोल केलं. आता मला जग कंट्रोल करायचं आहे. सुदामशेठ दुसरा पक्ष अशी संधी कधीच देणार नाही. या पदाचा नीट वापर केला तर तुमचं सोनं होईल, नाहीतर कधी पद जाईल, सांगताही येणार नाही. स्वतःला फसवू नका. समाज मोठा करा. सर्व समाजाला जोडा. राष्ट्रिय समाज पक्षात सर्व समाजाने काम का करावे हे सांगता आले पाहिजे. कार्यकर्त्यांनी पक्ष कसा वाढवायचा, माणसे जोडता कशी येतील, हे सांगता आले पाहिजे. तुम्हाला खासदार बनले पाहिजे. समाजहिताचे कायदे दिल्लीला बनले जातात, मुबईला नाही. आमचं पहिल्यापासून दिल्ली ध्येय आहे. दिल्लीत सर्वात मोठी तिजोरी आहे. जे संख्येने कमी आहेत त्यांनी बहुसंख्याकाचे हानल तरी आम्ही खुशीत गाजर खातोय. आमच्या राष्ट्रिय समाज पक्षाने जातीनिहाय जनगणनेसाठी दिल्लीत मोर्चा काढला. मोदींना पत्र दिलं. मोदींच्या केंद्रीय गृहमंत्र्यांने सभागृहात जतनिहाय गणना करणार नाही असे सांगीतले. काँग्रेसच्या नेहरूंनी जातगणनेला विरोध केला. आता राहुल गांधी बोलायला लागलेत, आम्ही ओबीसीला पाठिंबा देतो. एसटी गेल्यावर हात करून उपयोग नाही. काँग्रेसच्या प्रणव मुखर्जींनी जातगणना होऊ दिली नाही. आमची लढाई मोठ्यांसाठी आहे, छोट्यासाठी नाही. मोठ्या तिजोरीच्या चाव्या तुम्हाला मिळाल्याशिवाय आपल भल होणार नाही. 


तुम्ही उद्योजक व्हा. आरक्षण जरी मिळालं तरी तुम्हाला नोकऱ्या लागणार नाहीत. कारण देशातल्या आणि राज्यातल्या सरकारने खासगीकरण करून टाकले आहे. आरक्षणाशिवाय देखील आम्हाला आमची लायकी वाढवता आली पाहिजे, हे राष्ट्रिय समाजाने लक्षात ठेवले पाहिजे. छोट्यातुनच तुम्ही मोठे होणार आहे. 


तुमच्यामुळेच राष्ट्रिय समाज पक्ष मोठा होत चाललेला आहे. जनतेचा आशीर्वाद हीच आमची शक्ती आहे. आचारसंहिता लागल्याने, मी माझ्या वाढदिवसाला येऊ शकलो नाही, म्हणून आज सुदामशेठच्या सत्काराला आलोय. सर्वपक्षीय लोकांची उपस्थिती पाहून महादेव जानकर म्हणाले, तुम्ही ज्या पक्षात आहेत. त्याच पक्षात रहावा, पण तुमची भाऊ बहीण आमच्या पक्षात द्या, कारण आम्ही इतिहास निर्माण करणारी माणस आहोत. इयत्ता ९ वीच्या पुस्तकात राष्ट्रिय समाज पक्षाचे नाव आहे, हा महादेव जानकरचा इतिहास आहे. माझं अंतिम ध्येय दिल्ली आहे. माझा देह दिल्लीत जावा, यासाठी प्रयत्न करत आहे. जरी माझं काही बर वाईट झालं तरी मला दिल्लीतच जागा मिळाली पाहिजे. महिलांनी राजकारणात पुढे आल पाहिजे. जपान मातृसत्ताक आहे. म्हणून जपान पुढे आहे. शेठ बनायचे असेल तर उद्योगधंद्यात आलं पाहिजे आणि राजा बनायचे असेल तर राजकारणात आलं पाहिजे.

यावेळी मंचावर भूतपूर्व राष्ट्रीय अध्यक्ष एस. एल. अक्कीसागर, राष्ट्रीय महासचिव कुमार सुशील, राष्ट्रीय खजिनदार मोहन माने, राज्य सचिव जिवाजी लेंगरे, पनवेल महानगरपालिका नगरसेवक मोनिकाताई महानवर, कोकण महिला आघाडी अध्यक्षा मनिषाताई ठाकुर, श्रीकांत भोईर, प. महाराष्ट्र युवक आघाडी अध्यक्ष अजित पाटील व अन्य मान्यवर उपस्थित होते. एस. एल. अक्कीसागर , कुमार सुशील, अजित पाटील, शरद दडस यांची भाषणे झाली. रासप कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहत महादेव जानकर यांचे कळंबोली नवी मुंबई शहरात जोरदार स्वागत केले.

Friday, February 16, 2024

देशातील काँग्रेस आणि भाजपची मक्तेदारी मोडीत काढणे, हाच रासपचा अजेंडा

देशातील काँग्रेस आणि भाजपची मक्तेदारी मोडीत काढणे, हाच रासपचा अजेंडा 

पत्रकार परिषदेत बोलताना महादेव जानकर, बाजूस एस. एल. अक्कीसागर

पत्रकार परिषदेत रासप संस्थापक राष्ट्रीय अध्यक्ष महादेव जानकर यांची घोषणा 

बेळगावी(२५/१/२४) :  "या देशावर रासपची सत्ता आणणे, घराणेशाही मोडीत काढणे, उपेक्षितांना अपेक्षित ठिकाणी सत्ता मिळाली पाहिजे. काँग्रेस आणि भाजपची मक्तेदारी मोडीत काढायची, हाच रासपचा अजेंडा आहे, असे प्रतिपादन रासपचे संस्थापक राष्ट्रीय अध्यक्ष महादेव जानकर यांनी पत्रकार परिषदेत केले. कन्नड साहित्य भवन येथे कर्नाटक राष्ट्रीय समाज पक्ष तर्फे पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी कर्नाटकचे सुपुत्र, रासपचे भूतपूर्व राष्ट्रीय अध्यक्ष एस. एल. अक्कीसागर उपस्थित होते. मा. जानकर  यांनी हिंदी मराठीत तर मा. अक्कीसागर यांनी कन्नड भाषेत पत्रकार परिषदेला सामोरे गेले.

पत्रकार परिषदेत बोलताना महादेव जानकर पुढे म्हणाले, भारतात सर्वच लोकसभा मतदारक्षेत्रात राष्ट्रीय समाज पक्ष उमेदवार निवडणुकीच्या आखाड्यात उतरवणार आहे. आम्ही स्वतंत्र लढणार आहे. कर्नाटकात आमची कुणाशीही युती नाही. गुलबर्गा, विजयपुर, बेळगांव, बिदर, चिकोडी येथे रासपकडून लढण्यास अनेकजण इच्छुक आहेत. महाराष्ट्र, गुजरात, मध्यप्रदेश, कर्नाटक, उत्तर प्रदेश येथे रासपच्या जन स्वराज यात्रेस चांगला प्रतिसाद मिळत आहे. १७ राज्यात राष्ट्रीय समाज पक्षाचे संघटन आहे. कलेकलेने पक्ष वाढत असल्याने, याचा आम्हाला सार्थ अभिमान आहे. दोन दिवसांपूर्वी हावेरी, बागलकोट, बेळगांव जिल्ह्याचा दौरा पूर्ण केला. 

आजच तिकिट देतो : जानकर

पत्रकारांना म्हणाले, तुमच्यापैकी कुणास खासदार होण्याची इच्छा असल्यास आजच तिकीट देतो, अशी मिश्किल टिप्पणी श्री. जानकर यांनी केली.]

Sunday, February 4, 2024

रायन्ना जन्मभूमीत क्रांतिवीर संगोळी रायन्ना उत्सव 2024 संपन्न

एस. एल अक्कीसागर यांची रायन्ना जन्मभूमी संगोळी गावास भेट

बैलहोंगल : राष्ट्र भारती द्वारा 

आद्य स्वातंत्रवीर रायन्ना जन्मभूमी संगोळी ता - बेलहोंगल जि बेळगाव येथे क्रांतिवीर संगोळी रायन्ना उत्सव दिनांक १७ जानेवारी २०२४ रायन्ना जन्मभूमी संगोळी ता. बैलहोंगल जि बेळगाव येथे संपन्न झाला. एस एल अक्कीसागर यांनी रायन्ना जन्मभूमी संगोळी गावास भेट दिली. यावेळी क्रांतिवीर संगोळी रायन्ना उत्सव कागिनेली कनकगुरुपीठचे निरंजनानंदपुरी स्वामीजी, रासेफ'चे राष्ट्रीय अध्यक्ष एस. एल. अक्कीसागर, शेफर्ड्स इंडिया इंटनॅशनल'चे राष्ट्रीय उपाध्यक्ष तथा माजी मंत्री एच. एम. रेवन्ना, मल्लेशप्पा होरपेटे आयुक्त, संगोल्ली आणि रायन्ना निगम कर्नाटक सरकार हे उपस्थितीत होते. राष्ट्रीय समाज पक्ष आयोजित संगोळी रायान्ना १६ वा राज्याभिषेक वार्षिकोत्सव कार्यक्रमाचे निमंत्रण वरील मान्यवरांना एस. एल. अक्कीसागर यांनी दिले.

महाराष्ट्रात राष्ट्रीय समाज पक्ष तर्फे लोकसभा निवडणुकीची मोर्चेबांधणी

महाराष्ट्रात राष्ट्रीय समाज पक्ष तर्फे लोकसभा निवडणुकीची मोर्चेबांधणी 


मुंबई : राष्ट्र भारती द्वारा 

आगामी 2024 च्या सार्वत्रिक लोकसभा निवडणुकीसाठी राष्ट्रीय समाज पक्षाचे पदाधिकारी कार्यकर्ते मोर्चेबांधणी लागले आहेत. महाराष्ट्रातील परभणी, माढा, बारामती, सांगली, अहमदनगर, शिर्डी, लोकसभा मतदारसंघ राष्ट्रीय समाज पक्षाने पिंजून काढण्यास सुरुवात केली आहे. राष्ट्रीय समाज पक्षाचे कार्यकर्ते लोकसभा मतदारसंघातील प्रत्येक गाव टू गाव जाऊन भेट देण्यावर जोर दिला आहे. घोंगडी बैठकाद्वारे जनतेचे प्रश्न समजावून घेत, राष्ट्रीय समाज पक्षाची भूमिका मांडत आहेत. राष्ट्रीय समाज पक्षाचे शीर्ष नेतृत्व महादेव जानकर यांनी परभणी, माढा, बारामती लोकसभा यापैकी एक व उत्तर प्रदेशातून एका मतदारसंघातून लढण्याचे जाहीर केले आहे. बीड येथे छत्रपती शिवाजी महाराज मैदानातून बोलताना, महादेव जानकर यांनी आपण 'इंडिया' व 'महायुती' सोबत राष्ट्रीय समाज पक्ष नसणार असल्याचे जाहीर केले आहे. महायुतीने आयोजित केलेल्या महामेळाव्याकडे राष्ट्रीय समाज पक्षाने पाठ फिरवली आहे. भाजपने आजवर काय भागीदारी दिली, याचा हिशोब मांडल्याशिवाय कसल्याही प्रकारची चर्चा करणार नसल्याचे निक्षून सांगितले आहे. अहमदनगर दक्षिण लोकसभा मतदार संघातून रविंद्र कोठारी व सांगली लोकसभा मतदार संघातून उच्च शिक्षित युवा नेते कालिदास गाढवे यांची उमेदवारी जाहीर करून स्वबळावर लोकसभा निवडणूक लढण्याचे संकेत दिले आहेत. २०२४ मिशन लोकसभा निवडणूकद्वारे राष्ट्रीय समाज पक्ष आपला आपला स्वतंत्र मतदारकौल जाणून घेईल का? हे काही दिवसातच स्पष्ट होईल. 

उत्तर प्रदेशात राष्ट्रिय समाज पक्ष ८० जागावर लढणार : बाळकृष्ण लेंगरे

उत्तर प्रदेशात राष्ट्रिय समाज पक्ष ८० जागावर लढणार : बाळकृष्ण लेंगरे

शाहजहांपुर ११/१/२४ : राष्ट्रिय समाज पक्षाचे सर्वेसर्वा महादेव जानकर यांच्या मार्गदर्शनखाली राष्ट्रिय समाज पक्ष तर्फे अवध प्रदेश अध्यक्ष गौरव सिंह यांच्या नेतृत्वात लाल इमली चौक हरदोई बायपास येथून जन स्वराज यात्रा काढण्यात आली. जन स्वराज यात्रेचा समारोप बिजलीपुरा स्थित अटल बिहारी वाजपेयी सभागृहात जाहीर सभेने झाला. प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहिलेले राष्ट्रीय संघटक बाळकृष्ण लेंगरे (मामा) यांनी राज्य व जिल्हा पदाधिकारी व कार्यकर्ते यांना शपथ दिली. उत्तर प्रदेशात राष्ट्रिय समाज पक्ष स्वतंत्रपणे ८० जागावर लढणार असल्याचे जाहीर केले. यावेळी प्रदेश प्रवक्ता एड. मनोजकुमार पाल, जिल्हाध्यक्ष शिवदीप पाल, महिला आघाडी जिल्हाध्यक्षा ज्योती वर्मा, जिल्हा कोषाध्यक्ष आदित्य प्रताप सिंह तसेच सेंट्रल बार असोसिएशनचे राजीव शर्मा, तस्लिम अन्सारी, अंकित कनौजिया आदी उपस्थितीत होते.

भुजबळ साहेब, जोपर्यंत तुम्ही पक्ष काढणार नाही तोपर्यंत न्याय मिळणार नाही : जानकर

भुजबळ साहेब, जोपर्यंत तुम्ही पक्ष काढणार नाही तोपर्यंत न्याय मिळणार नाही : महादेव जानकर

पंढरपूर (६/१/२४) : राष्ट्र भारती द्वारा 

मंत्री छगन भुजबळ यांच्या उपस्थितीत पंढरपूर येथे ओबीसी एल्गार महामेळावा पार पडला. या मेळाव्यात राष्ट्रीय समाज पक्षाचे सर्वेसर्वा महादेव जानकर म्हणाले, या राज्यात ओबीसिंची अतिशय भेदरलेली परिस्थिती होती. महाराष्ट्रात विधानसभा आणि प्रशासनात आवाज उठवण्याच काम सर्वप्रथम छगन भुजबळ यांनी केले, त्याबद्दल त्यांचे अभिनंदन केले पाहिजे. त्यांनी कुठल्याही समाजाच्या विरोधातले बोलले नाहीत. किंवा इथे आलेली मंडळी कुणाच्या विरोधात बोलत नाही. फक्त आमचं म्हणन एवढं आहे, ज्यांना अजून काही मिळालाच नाही, त्यांच्या ताटातली भाकरी काढू नये, एवढं साधं सोपं गणित आहे. म्हणून या मेळाव्याच्या माध्यमातून दिलासा देण्याचं काम आम्ही मंडळी करतोय. आमच्या लिंगे साहेबांनी सांगितले, तसे झाले तरच आम्हा ओबीसींना न्याय मिळणार आहे. यश मिळणार आहे. तुमची ओबीसींची फार मोठी ताकद आहे. आम्ही ८५ टक्के आहे म्हणतोय. विचार करतोय, आपण किती लोक येतोय. याचही चिंतन झालं पाहिजे. इथून स्टेजच्या खाली गेलो की, आपआपल्या पक्षात जाणार. म्हणून भुजबळ साहेब माझं तुम्हाला पुन्हा साकड आहे, जोपर्यंत तुम्ही पक्ष काढणार नाही, तोपर्यंत तुम्हाला न्याय मिळणार नाही. आमचं म्हणन आहे, आपण सार करतोय, जर आपला देणारा माणूस नसेल तर करायचं काय. म्हणून याचा विचार झाला पाहिजे. भुजबळ साहेब या मुद्याशी मी तुमच्या बरोबर आहे. राष्ट्रीय समाज पक्ष ताकतीने तुमच्याबरोबर असेल, एवढे आम्ही सांगू इच्छितो. क्रांती होत असेल तर हे होणार आहे. उद्या आपल्याला पंतप्रधान व्हावं लागल. मुख्यमंत्री व्हावं लागलं. आरक्षण कुणाला मागायचे आपण. जर देणारच माणूस आपला नसेल तर करायचं काय. तुमच्या जागृतीच मतात रूपांतर झालं पाहिजे. भुजबळ साहेब पूर्ण हयात तुमच्याबरोबर असेल, असा विश्वास देतो. जय भारत.

देशात मागासवर्गीय (BC)समाजावर अन्याय झाला : महादेव जानकर

देशात मागासवर्गीय (BC) समाजावर अन्याय झाला : महादेव जानकर

भिवंडी : राष्ट्र भारती द्वारा 

दिनांक १७ डिसेंबर २०२३ रोजी ओबीसी महासंघ ठाणे जिल्हा आयोजितओबीसी निर्धार मेळावा भिवंडी येथे आयोजित केला होता. या मेळाव्यात राष्ट्रीय समाज पक्षाचे संस्थापक राष्ट्रीय अध्यक्ष महादेव जानकर माजी मंत्री यांनी सर्वप्रथम भाषण करून कार्यक्रमाची सुरुवात केली. भाषण केल्यानंतर भूतपूर्व मंत्री महादेव जानकर यांचा आयोजकांतर्फे सत्कार करण्यात आला.

महादेव जानकर आपल्या भाषणात म्हणाले, ओबीसी बांधवाला कळकळीची विनंती आहे. इथे आगरी कोळी बहुसंख्य आहेत. आपण ज्यावेळेस ओबीसी(BC)ची लढाई लढतो. आपल्या पक्षीय भूमिका बाजूला असतील, पण समाजाच्या हक्कावर गदा येते, तेव्हा आपल्या आई बहिणीसह मुला बाळासह उपस्थित राहणे गरजेचे असते. परंतु आपण जागे नाही झालो, तर कॅप्टन प्रमुख म्हणून जो काम करतो, त्याला नाउमेद करण्याची भूमिका होतीया. खऱ्या अर्थाने या देशांमध्ये कोणावर अन्याय झाला असेल तर तो ओबीसी (BC) समाजावर झालेला आहे.  कारण 340 वे कलम हे आमच्यासाठी मृत कलम आहे. या देशात ओबीसींची 52% संख्या असताना प्रशासकीय भागीदारी, राजकीय भागीदारी कुठे आहे. ओबीसींनो कॅबिनेटमंत्र्यांमध्ये तुम्ही नाही, राज्यमंत्र्यामध्ये तुम्ही आहात. एवढा मोठा समाज असताना, आपण मागतकऱ्यागत मागत का बसतो? हा सवाल करतोय. माझी तुम्हाला विनंती आहे, ओबीसीच्या लढ्यामध्ये आपण एकत्र आले पाहिजे. आपली ताकद दाखवली पाहिजे. आपण गणपतीला एकत्र येतो, आपण सणासुदीला एकत्र येतो, पण आपल्या हक्कासाठी लढाई लढायची वेळ येते, तेव्हा आपण कोसो दूर असतो आणि आपल्या हक्कावर दुसराच डल्ला मारत असतो. ओबीसींनो या देशात तुमची अवस्था फार खराब आहे. तमिळनाडू राज्यामध्ये मुख्यमंत्री ओबीसी समाजाचा असतो. विरोधी पक्षनेता देखील ओबीसी समाजाचाच असतो. पक्ष देखील ओबीसीचाच असतो, म्हणून तमिळनाडू राज्यामध्ये सर्वात जास्त आरक्षण आहे. जिथं शाहू, फुले, आंबेडकर म्हटले जाते. तिथंच अन्याय होतोय. तुमचा धड मालक कुठेच नाही. पाटील साहेब इथं मंत्री आहेत, कथोरे साहेब आहेत, आपण आमदार खासदार, मंत्री होतो, पण मुख्य वाढपी आपण होत नाही, म्हणून ही ओबीसींची अवस्था वाईट आहे.  म्हणून ओबीसिंनो तुम्ही तुमचं पात्र कुठल आहे ते ओळखा?. तुमची सत्ता नाही. एखादा पंचायत समितीत, नगरपालिकेत असतो, ती सत्ता नाही. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलेली पार्लमेंटची सत्ता आहे. सुप्रीम सत्ता आहे. आणि आज कायदा पार्लमेंटच्या हातात हाय. आमचा मराठा समाजाला विरोध नाही, पण ज्याला मिळालेच नाही, त्याच्याच ताटातील भाकरी तुम्ही घ्यायला लागलेला आहे. म्हणून एकतर आरक्षण वाढवावं लागेल. 70%, 80% करावे लागेल, मग हे कुणाच्या ताब्यात आहे?. केंद्राच्या हातात आहे. केंद्राने जर ठरवले तर हे होऊ शकत. ओबीसींनो आपली लोक जागृत करा. आयएएस/आयपीएस बनली पाहिजेत, उद्योगपती बनली पाहिजेत. खासदार, आमदार सुध्दा बनली पाहिजेत, तरच तुमचा प्रश्न सुटणार हाय. 

आता कुठला पक्ष तुम्हाला विरोध करतोय, त्याचा अभ्यास करा. मंडल आयोगाला कुणी विरोध केला. मंडलचा बंडल कुणी फेकून द्यायला लावला, म्हणून तुम्हाला विचार करावा लागेल. आमचा पक्ष कुठलाय. आमची भूमिका कोण मांडतय. एकटे भुजबळ साहेब भुमिका मांडतात तर त्यांना खलनायक ठरवलं जातं, पण छगन भुजबळ साहेब तुम्ही एकटे नाही, आम्हीपण तुमच्या बरोबर आहे. हे सांगण्यासाठी इथ आलेलो आहे. बांधवानो,  तुम्ही सुद्धा आपल्या हक्कासाठी एकत्र आले पाहिजे. मला पुढे जायचं असल्याने, सर्वांची माफी मागतो. ओबीसींनो सर्वांनी एकत्र येऊन ताकद दाखवा. नाही तर उद्या माध्यम दाखवणार आहेत. ओबिसिंच्या 342 जाती आणि खुर्च्या रिकाम्या. म्हणून माझी तुम्हाला विनंती आहे. पुढच्या लढाईला तर जाग राहवा. आणि जे नेतृत्व करतात त्यांना भरोसा द्यायचं काम करा. येवढीच अपेक्षा व्यक्त करून रजा घेतो. जय भारत. यावेळी मंचावर बबनराव तायवाडे, दशरथ पाटील, यशवंत सौर, विश्वनाथ जाधव व अन्य मान्यवर उपस्थित होते.

चागंले संस्कार टिकविण्यासाठी वाचन संस्कृतीची गरज : डॉ. शंकर स्वामी वडेपुरीकर

चागंले संस्कार टिकविण्यासाठी वाचन संस्कृतीची गरज : डॉ. शंकर स्वामी वडेपुरीकर ‌पु.अहिल्यादेवी वाचनालयात " वाचन संकल्प महाराष्ट्राचा...