नवी मुंबईत धनगर समाजाचे आंदोलन अटळ; ठिकठिकाणी बैठकांचे आयोजन
पनवेल : यशवंत नायक ब्यूरो
अनेक दशकांपासून धनगर समाज संविधानिक हक्कापासून वंचित आहे. धनगर समाजाला विविध आश्वासने देऊन सर्वच प्रस्थापित राजकिय पक्षांनी सत्ता भोगली. परंतु सत्तेवर येताच धनगर समाजाच्या संविधानिक मागण्यांकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले जात असल्याने, धनगर समाजात असंतोष निर्माण झाला आहे. राज्यभरातील धनगर समाज बांधवांकडून मोर्चे, रास्ता रोको, धरणे आंदोलन, उपोषण, निदर्शने अशी विविध आंदोलने चालू आहेत. नवी मुंबई शहरात धनगर समाज बहुसंख्येने राहतो. शेळ्या मेंढ्या हाकणाऱ्या धनगर समाजाने शहराची वाट धरल्यानंतर आपल्या सांस्कृतिक चालीरीती देखील जपल्या आहेत. नवी मुंबईत माथाडी कामगारांची मोठी संख्या आहे. पोटाची खळगी भरण्यासाठी छोटा मोठा काम धंदा, नोकरीसाठी धनगर समाज स्थायिक झाला आहे.
कुलस्वामीनी आई चिंचणी मायाक्कादेवी मंदिर कळंबोली येथील बैठकीत सकल धनगर समाज बांधव |
सकल धनगर समाज बांधवांची दिनांक २१/०९/२०२३ रोजी मायाक्कादेवी मंदिर कामोठे येथे पहिली बैठक, दिनांक २६/०९/२०२३ रोजी मायाक्कादेवी मंदिर कळंबोली येथे दुसरी बैठक पार पडली आहे. तीसरी बैठक आज दिनांक २९/०९/२०२३ रोजी 'सिरवी समाज मंदिर सेक्टर ३ करंजाडे' येथे पार पडली. दिनांक ३०/९/२०२३ रोजी सायंकाळी ७: ३० वाजता खांदेश्वर मंदिर खांदा कॉलनी येथे बैठक पार पडली. दिनांक १/१०/२०२३ रोजी उलवे येथे सायंकाळी ८: ३० वाजता येथे बैठक पार पडली. आज दिनांक ५/१०/२०२३ रोजी अर्थव ज्येष्ठ कल्याण मंडळ, सेक्टर १०, नेरूळ येथे बैठक पार पडणार आहे. शासनाने ५० दिवसांचा वेळ मागून घेतला आहे. लवकरात लवकर धनगर समाज बांधवांच्या हातात सर्टिफिकेट द्यावे. अन्यथा नवी मुंबईत धनगर समाजाचे आंदोलन अटळ आहे. ठिकठिकाणी सर्वपक्षीय धनगर पदाधिकारी, कार्यकर्ते, सर्व सामाजिक संघटना यांच्याकडून धनगर समाज बांधवांच्या बैठकांचे आयोजन करण्यात येत आहे. उत्तम गुणवत्ता असून देखील विविध क्षेत्रात संधी मिळत नसल्याने धनगर युवक- युवतीमध्ये रोष आहे. आपल्या न्याय मागण्यांसाठी आगामी काळात धनगर समाज पिवळ्या झेंड्याखाली गट तट विसरून एकत्र आलेला पहायला मिळेल.
अशा घडताहेत बैठका
कामोठे येथे धनगर समाज बांधवांची बैठक पार पडली. |
करंजाडे येथील बैठकीत उपस्थित धनगर समाज बांधव |
खांदेश्वर येथील बैठकीत धनगर समाज बांधव उपस्थित होते. |
उलवे येथील बैठकीत धनगर समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. |
ना आमच्यात कुठला भेद - आम्ही सारे धनगर बांधव एक
बैठक नियोजन : लागा तयारीला लाखो बांधव तुमच्या मदतीला
21/ 9 /2023 : कामोठे
26/ 9/ 2023 : कळंबोली
29 /9/ 2023 : करंजाडे
30/ 9/ 2023 : खांदा कॉलनी
1/ 10/ 2023 : उलवे
5/ 10/ 2023 : नेरूळ सायंकाळी ८ वाजता