Tuesday, March 21, 2023

रासपचे भूतपूर्व राष्ट्रीय अध्यक्ष एस एल अक्कीसागर यांच्या डोळ्यावरील शस्त्रक्रिया यशस्वी

रासपचे भूतपूर्व राष्ट्रीय अध्यक्ष एस एल अक्कीसागर यांच्या डोळ्यावरील शस्त्रक्रिया यशस्वी

मुंबई : राष्ट्रीय समाज पक्षाचे भूतपूर्व राष्ट्रीय अध्यक्ष एस एल अक्कीसागर यांच्या दोन्ही डोळ्यांवरील शस्त्रक्रिया यशस्वी झाले असल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांकडून देण्यात आली. एस एल अक्कीसागर हे गत अनेक वर्षांपासून डोळ्यांनी त्रस्त होते. त्यांना डाव्या डोळ्याने फारसे दिसत नव्हते. अक्कीसागर यांनी मासिक 'यशवंत नायक'च्या कामात स्वतःला गुंतवून घेतले होते.  संगणक हाताळणे, नोट्स काढणे, विविध विषयावर दर्जेदार लेखन करणे आदी कामात त्यांनी झोकून दिले. निरनिराळ्या नामांकित दैनिकात स्फुट लेखन केलेले आहे. त्यांचा बराचसा भार हा एका डोळ्यावरच होता. कित्येक वर्षांपासून त्यांना डोळ्यांची समस्या उद्भवली होती, परंतु त्यांनी त्याकडे दुर्लक्ष करून पक्ष, यशवंत नायकच्या कामात सतत लक्ष ठेवले. अलीकडे त्यांनी  रासेफचे काम हाती घेतले आहे. नुकतीच त्यांच्यावर पनवेल येथील खासगी रुग्णालयात डोळ्यांवर शस्त्रक्रिया करण्यात आली. अलीकडे त्यांच्या डाव्या डोळ्यांची शस्त्रक्रिया बरी होत असून, लवकरच त्यांची उजव्या डोळ्याची शस्त्रक्रिया देखील बरी होईल, असा आशावाद नातेवाईक यांनी व्यक्त केला. 

डोळ्यांवरील शस्त्रक्रिया यशस्वी होते न होते तोच अक्कीसागर यांचा कर्नाटक दौरा निश्चित

आपल्या दोन्ही डोळ्यांची शस्त्रक्रिया यशस्वी होते न होते तोच लगेचच येणाऱ्या २९ मार्च २०२३ रोजी कर्नाटक राज्याच्या दौऱ्यावर जाण्याचे श्री. अक्कीसागर यांनी निश्चित केले आहे. शस्त्रक्रिया होऊन देखील त्यांनी कोणत्याही प्रकारचा आराम विश्रांती न घेता आपले काम चालूच ठेवले होते. देशभरातील कार्यकर्ते यांच्यासाठी संदेश लिहिणे, सर्वांशी सुसंवाद साधणे हे सर्व काम त्यांचे सुरूच होते.  राष्ट्रीय समाज पक्ष व नेता महादेव जानकर यांच्यापाठीशी विचारांचे भक्कम पाठबळ उभे केले आहे आणि ते अंखंडपणे करताहेत. यशवंत नायकच्या माध्यमातून त्यांनी राष्ट्रीय समाज पक्षाचा पाया तयार करताना नवीन विषय, नवीन अजेंडा, राष्ट्रीय समाजाचा विचार पेरण्याचे काम केले आहे.

Monday, March 20, 2023

विश्वाचा यशवंत नायक : मार्च २०२३

               विश्वाचा यशवंत नायक : मार्च २०२३




*यशवंत नायक – मार्च 2023*
*वाचक मित्रानो, 🙏*
*या अंकात काय वाचाल...*

पान १
_*राजकीय जाण (Political Sense) नसलेला समाज आर्थिक, सामाजिक, शैक्षणिक क्षेत्रात मागे राहिल्याने 'गुलाम समाज' बनला.*_

पान -२
_*राजकीय जागृती (Political awareness) असलेला समाज आर्थिक संपदा आणि सामाजिक प्रतिष्ठा मिळवून 'स्वआधीन समाज' बनतो.*_

पान -३
_*राजकीय सत्ता (Political Power) असलेला समाज आपले, आपल्या समजाचे, आपल्या देशाचे सर्वगामी कल्याण साधून 'प्रगत समाज' बनतो.*_

*मुख्य बातम्या – पान 1* 

@ पनवेल : आम्हाला रासपची सत्ता पाहिजे; भाजप काँग्रेसची सत्ता नको  : महादेव जानकर*

> *राष्ट्रीय समाज पक्षाचा कोकण पदाधिकारी मेळावा उत्सहात* 

@ मुंबई : *शहा मोदींकडून मित्रपक्षांना धोका देण्याचे आणि संपवण्याचे काम : सिद्धप्पा अक्कीसागर*

@ कलबुर्गी : *राष्ट्रीय समाज पक्ष कर्नाटक राज्य विधानसभेच्या १५० जागांसाठी लढणार : किन्नूर*

पान : २
@ राहुरी : *हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त राष्ट्रीय समाज पक्ष कार्यालय राहुरी येथे विनम्र अभिवादन*

@ आष्टी : *आष्टी येथे राष्ट्रीय समाज पक्षाचा मेळावा संपन्न*

@ अकोला : *मुर्तिजापूरात राष्ट्रीय समाज पक्षाची अकोला जिल्हास्तरीय आढावा बैठक यशस्वी*

@ नाशिक : *राष्ट्रीय समाज पक्ष नाशिक जिल्हा पदाधिकारी बैठक उत्सहात संपन्न; नाशिक जिल्ह्यात मार्चमध्ये भव्य मेळावा घेणार*

@ नागपूर : *मूकनायक वृत्तपत्र सुरू करण्यासाठी नागपुरात बैठक*

@ गुवाहटी : *महादेव जानकर गुवाहटीला पोहचले; कामाख्या मातेचे दर्शन घेतले* 

@ मिराभाईंदर : *हिंदवी स्वराज्य संस्थापक, कुळवाडी भूषण, बहुजन प्रतिपालक छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त महादेव जानकर यांनी केले अभिवादन*

पान : ३ 
@ नागपूर : *राष्ट्रीय समाज पक्ष नागपूर जिल्हा आढावा बैठक पार पडली*

@ वर्धा : यशवंत नायक ब्यूरो
*रासपच्या वर्धा जिल्हाध्यक्षपदी वंदिले, सरचिटणीसपदी गुजरकर, किसान आघाडी अध्यक्षपदी देवतळे*

@ यवतमाळ : *रासपची यवतमाळ जिल्हा आढावा बैठक संपन्न*

@ चंद्रपूर : *चंद्रपुरात राष्ट्रीय समाज पक्षाचे आढावा बैठक संपन्न व पक्षविस्तार*

@ गडचिरोली : *गडचिरोलीत राष्ट्रीय समाज पक्षाची आढावा बैठक संपन्न: लवकरच गडचिरोलीत मेळाव्याचे आयोजन*

@ अकोला :*कार्ली ग्रामपंचायत सदस्यांच्या आमरण उपोषणाला रासपचे जाहीर समर्थन*

पान : ४
@ शिरूर: *कांद्याला भाव नसल्याने पुणे - अहमदनगर महामार्गावर राष्ट्रीय समाज पक्षाचा रास्ता रोको*

> *शेतकरी वाचवा देश वाचवा : रासपची जोरदार घोषणाबाजी*

@ दिल्ली : *मुख्यमंत्री नव्हे तर प्रधानमंत्री व्हायचे आहे : महादेव जानकर*

@ दिल्ली : *दिल्लीत शेफर्ड इंडिया इंटरनॅशनल राष्ट्रीय कार्यकारणीची बैठक पार*

@ कानपूर : *एड. उमेश पाल हत्याकांड प्रकरणी उत्तर प्रदेशात राष्ट्रीय समाज पक्ष आक्रमक*

> गाझियाबाद, वाराणसी, कानपूर, बदायू, भडोही सह राज्यभरात आंदोलने मोर्चे निदर्शने

_*यशवंत नायक वाचा म्हणजे वाचाल*_
*यशवंत नायक आपला खरा आणि प्रथम प्रतिनिधि आहे*
*यशवंत नायक आपला राष्ट्र आणि समाज प्रतिनिधि आहे...*
_सिद्ध - सागर
कार्यकारी संपादक

महादेव जानकर गुवाहटीला पोहचले; कामाख्या मातेचे दर्शन घेतले

महादेव जानकर गुवाहटीला पोहचले; कामाख्या मातेचे दर्शन घेतले 


गुवाहटी :  राष्ट्रीय समाज पक्षाचे संस्थापक राष्ट्रीय अध्यक्ष महादेव जानकर हे आसाम राज्याच्या दौऱ्यावर आले होते. महादेव जानकर यांनी गुवाहटीत कामाख्या मातेचे दर्शन घेतले.  तसेच त्यांनी आसाम राज्याच्या दौऱ्यात चहाच्या मळ्यांना भेट देऊन पाहणी केली. समाज माध्यमाद्वारे महादेव जानकर यांनी सांगितले की, आसाम राज्यातील रासपच्या कार्यकर्त्यांच्या गाठीभेटी घेऊन बैठकाही पार पडल्या. यशवंत नायकला मिळालेल्या माहितीनुसार आसाम राज्याचे रासप अध्यक्ष गोपाल कहार हे दीबुगढ येथे राहतात.

Saturday, March 18, 2023

मूकनायक वृत्तपत्र सुरू करण्यासाठी नागपुरात बैठक

 मूकनायक वृत्तपत्र सुरू करण्यासाठी नागपुरात बैठक


 नागपूर :  येथे रवीभवन हॉलमध्ये डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी सुरू केलेले मूकनायक हे वृत्तपत्र पुन्हा एकदा सुरू करण्यासाठी, त्याच्या प्रकाशनाच्या निमित्ताने उपस्थित झालेल्या मान्यवरांची एक बैठक पार पडली. या बैठकीला राष्ट्रीय समाज पक्षाचे विदर्भ अध्यक्ष अॅड रमेश पिसे यांच्या माध्यमातून प्रदेश अध्यक्ष काशीनाथ शेवते, मुख्य महासचिव ज्ञानेश्वर सलगर यांनाही निमंत्रित केले होते. त्यावेळी मनोगत व्यक्त करताना या देशातील सर्व बहुजन समाजाला राष्ट्रीय समाज पक्ष हाच  एकमेव पर्याय आहे. त्यामुळे सर्व ओबीसी- एससी- एसटी- मायनॉरिटीसाठी काम करणा-या  सामाजिक संघटनांनी आपले राजकीय इप्सित साध्य करण्यासाठी राष्ट्रीय समाज पक्षाच्या पाठीमागे उभे रहावे असे आवाहन केले.  यावेळी मूकनायकचे संपादक तुषार गायकवाड, निवासी संपादक जावेद पाशा, संयुक्त मोर्चाचे अध्यक्ष भारती, भंडा-याचे माजी खासदार खुशाल बोपचे, राष्ट्रीय समाज पक्षाचे विदर्भ संपर्क प्रमुख राजेंद्र पाटील तसेच वेगवेगळ्या राज्यातील  संघटनाचे प्रमुख या बैठकीला उपस्थित होते.

एड. उमेश पाल हत्याकांड प्रकरणी उत्तर प्रदेशात राष्ट्रीय समाज पक्ष आक्रमक

एड. उमेश पाल हत्याकांड प्रकरणी उत्तर प्रदेशात राष्ट्रीय समाज पक्ष आक्रमक


बदायु, वाराणसी, कानपूर, गाझियाबाद, मिर्झापूर सह राज्यभरात आंदोलने, मोर्चे, निदर्शने 

कानपूर : |प्रा. आबासो पुकळे

प्रयागराज येथे खुलेआम गोळीबार करून एड. उमेश पाल हत्याकांड प्रकरणी बदायु शहरात राष्ट्रीय समाज पक्षाचे कार्यकर्ते आक्रमक झाले. संशयित आरोपींचा पुतळा जाळून निषेधाच्या घोषणा देत मुख्य चौकात एक तास रस्ता रोखून चक्काजाम केला. ज्ञानपुर दुर्गागंज येथे शोकसभा घेऊन रासप कार्यकर्त्यांनी भदोही पोलीस यांना निवेदन दिले. जनपद इटावा जिल्हाध्यक्ष राजीव पाल यांच्या नेतृत्वात आयुक्त यांना निवेदन दिले. कानपूर येथे प्रदेशाध्यक्ष चंद्रपाल यांच्या उपस्थितीत जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यात आले. निषेधाच्या घोषणा देत निदर्शने करण्यात आली. नरेश कुमार वाल्मिकी यांच्या नेतृत्वात गाझियाबाद येथे शेकडो कार्यकर्त्यांनी एकत्र येऊन विविध मागण्यांचे निवेदन जिल्हाधिकारी यांचेकडे सोपवले. शाहजांपुर येथे जिल्हाध्यक्ष एड. मनोज पाली यांच्या नेतृत्वात जोरदार निदर्शने करून जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यात आले. मिर्झापूर येथे जिल्हाध्यक्ष अनिलकुमार पाल यांच्या नेतृत्वात निषेधाच्या घोषणा देत आरोपींचे एन्काऊंटर करून हत्याकांडातील मृत सुरक्षारक्षक यांच्या घरातील एका सदस्याला नोकरी द्यावी अशा मागणीचे निवेदन जिल्हाधिकारी यांचेमार्फत मुख्यमंत्री यांना पाठवले.

वाराणसी येथे जिल्हाध्यक्ष शिवकुमार पाल यांच्या नेतृत्वात जिल्हाधिकारी यांना निवेदन देऊन पीडित कुटुंबीयांना कमीत एक करोड रुपयांची मदत करावी अशी मागणी करण्यात आली. जौनपुर येथे जिल्हाध्यक्ष रमाशंकर पाल यांच्या नेतृत्वात निदर्शने करत लवकरात लवकर पीडित कुटुंबीयांना न्याय देण्यात यावे अशी मागणीचे जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यात आले.

"हत्येच्या निषेधार्थ कोणताही राजकीय नेता घटनास्थळी पोहचला नाही. प्रदेशाध्यक्ष या नात्याने घटनास्थळी भेट देऊन पीडित कुटुंबीयांना धीर दिला. हत्याकांडाचा निषेध करत आतापर्यंत १८ जिल्ह्यात राष्ट्रीय समाज पक्षाचे कार्यकर्ते रस्त्यावर उतरले."- चंद्रपाल, अध्यक्ष उत्तर प्रदेश रासप.

दिल्लीत शेफर्ड इंडिया इंटरनॅशनल राष्ट्रीय कार्यकारणीची बैठक पार

दिल्लीत शेफर्ड इंडिया इंटरनॅशनल राष्ट्रीय कार्यकारणीची बैठक पार

राष्ट्रीय कार्यकारणी बैठकप्रसंगी देशभरातील विविध मान्यवर.


दिल्ली : यशवंत नायक ब्यूरो, प्रा. आबासो पुकळे 

दि. १२/०३/२३ रोजी शेफर्ड इंडिया इंटरनॅशनल राष्ट्रीय कार्यकारणीची बैठक कर्नाटक संघ भवन आर के पुरम दिल्ली येथे आयोजित केली होती. बैठकीस सागर रायका- पूर्व सांसद गुजरात, महादेव जानकर- राष्ट्रीय अध्यक्ष रासप, एच एम रेवन्ना- एमएलसी कर्नाटक, येगे मलेश्याम एमएलसी तेलंगणा, दिल्ली प्रदेशाध्यक्ष अत्तरसिंह पाल, जम्मू कश्मीर अध्यक्ष प्रवीण जरीयाल, उत्तर प्रदेश अध्यक्ष वीरेंद्र पाल, प्रोफेसर आनंद पाल, तामिळनाडूचे के मानीशंकर, कर्नाटकचे अध्यक्ष श्री नागप्पा, कनक ट्रस्टच्या अध्यक्षा डॉ विजयलक्ष्मी परमेश, श्री विशाल पाल व शेकडो सदस्य तथा देशभरातील प्रत्येक राज्यातील प्रतिनिधी उपस्थित होते.

दरम्यान सभेतील प्रस्तावावर अनुकूल मत व्यक्त करून भारताची राजधानी दिल्ली येथे आयएस आयपीएस उच्च केंद्रीय नोकऱ्यांसाठी धडपडणाऱ्या युवा विद्यार्थ्यांसाठी वसतीगृह बनवण्यासाठी राष्ट्रीय समाज पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष महादेव जानकर यांनी शेपर्ड इंडिया इंटरनॅशनल यांना पाच लवकर लाख रुपयाचा धनादेश सुपूर्द केला. यावेळी राष्ट्रीय समाज पार्टीचे राजस्थान, गुजरात मध्य प्रदेश ओडीसा नॉर्थ ईस्ट प्रभारी रामभाई पाल, माजी खासदार सागर रायका, माजी आमदार एच एम रेवना यांची शेपर्ड इंडिया इंटरनॅशनलच्या राष्ट्रीय उपाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली.

मुख्यमंत्री नव्हे तर प्रधानमंत्री व्हायचे आहे : महादेव जानकर

मुख्यमंत्री नव्हे तर प्रधानमंत्री व्हायचे आहे : महादेव जानकर

दिल्ली : इन्सेटमध्ये संत कनकदास जयंती कार्यक्रमात बोलताना महादेव जानकर, मंचावर इतर मान्यवर.

दिल्ली : आबासो पुकळे 

दि. १२/३/२३ रोजी कर्नाटक संघ भवन दिल्ली येथे क्रांतीविर संगोळी रायन्ना संघ तर्फे संतश्रेष्ठ कनकदास यांच्या ५३५ व्या जयंतीचे आयोजन केले होते. मंचावर कनकगुरू महापिठाचे महास्वामी श्री. सिद्धरामनंद विराजमान होते. राष्ट्रीय समाज पक्षाचे संस्थापक अध्यक्ष, माजी मंत्री महादेव जानकर म्हणाले, कर्नाटकात मुख्यमंत्रीपदाची चर्चा चालू आहे, परंतु आता मुख्यमंत्री नव्हे तर प्रधानमंत्री बनण्याचे ठरवले पाहिजे. आपणाला प्रधानमंत्री बनायचे आहे. आज जिकडे पहावे तिकडे राष्ट्रीय समाजाला मारले, दाबले जात आहे. नेहमी दानशूर असा देनेवला राष्ट्रीय समाज आज कुठे नोकरी, कुठे प्रस्थापित पक्षाकडे तिकिटाचे भिक मागत आहे. मालक न बनता चमचा बनून काम करत आहे. संत कनकदास जयंतीनिमित्त असा पण करावा, 'मागणाऱ्या समाजाला पुन्हा देणारा समाज बनवू'. राजकीय भागीदारी वाढली पाहिजे. आज येथे खासदार नाही बसलेलेपैकी माझ्यासह आमदारच आहेत.

दिल्लीची सत्ता काबीज करण्यासाठी व प्रधानमंत्री बनवण्यासाठी संत कणकदास यांचे थ्री डी - डीटरमिनेशन - डीवोशन आणि डेडीकेशन शिकले पाहिजे, असे उदगार श्री. जानकर यांनी काढले. कार्यक्रमासाठी गुजरातचे माजी खासदार सागर रायका, कर्नाटकचे माजी आमदार एच के रेवणा, तेलंगणाचे आमदार येगे मल्लेश्यम, शेफर्ड इंडिया इंटरनॅशनलचे राष्ट्रीय उपाध्यक्ष श्री. राम पाल व अन्य उपस्थित होते.

Wednesday, March 15, 2023

येणाऱ्या निवडणुकीत जिंकण्यासाठीचा विडा उचललाय : संपतराव ढेबे

येणाऱ्या निवडणुकीत जिंकण्यासाठीचा विडा उचललाय : संपतराव ढेबे


खालापूर : यशवंत नायक ब्यूरो 

येणाऱ्या निवडणुकीत रायगड जिल्ह्यात जिंकण्यासाठीचा विडा राष्ट्रीय समाज पक्षाने उचललाय, असे मत रासपचे उत्तर रायगड जिल्हा अध्यक्ष संपतराव ढेबे यांनी व्यक्त केले. श्री. ढेबे पुढे म्हणाले, राष्ट्रीय समाज पक्षाच्या माध्यमातून खालापूर, कर्जत तालुक्यामध्ये पक्ष वाढीसाठी सर्व कार्यकर्त्यांची मोठी पायपीट चालू आहे. राष्ट्रीय समाज पक्ष हा येणाऱ्या निवडणुकीला सामोरे जाण्यासाठी विजयाचा विडा उचलून मोठ्या संख्येने पक्ष बांधणीसाठी अहोरात्र प्रयत्न करीत आहे. नवनवीन कार्यकर्ते पक्षप्रवेश करून राष्ट्रीय समाज पक्ष वाढविण्यासाठी रात्रंदिवस प्रयत्न करीत आहेत. 

अशोक सिताराम पवार यांची खोपोली शहर अध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे. तसेच सुरज सोमासे यांची देखील कर्जत खालापूर युवा विधानसभा अध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे. या नियुक्तीवेळी पक्षाचे कार्यकर्ते यांनी पूर्णपणे पक्ष वाढीचा विचार करून नियुक्ती केली आहे. पक्षाचे उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष श्री. संपतराव ढेबे, पक्षाचे ज्येष्ठ कार्यकर्ते प्रदीप कोचरे, गजानन चंदने त्याचप्रमाणे राष्ट्रीय समाज पक्षाचे खालापूर तालुका अध्यक्ष आर आर बर्गे, युवा आघाडी उपाध्यक्ष लक्ष्मण हिरवे, युवा कार्यकर्ते विजय ढेबे रायगड जिल्हा सदस्य आनंद हिरवे आदी कार्यकर्ते उपस्थित होते.

कार्ली ग्रामपंचायत सदस्यांच्या आमरण उपोषणाला रासपचे जाहीर समर्थन

कार्ली ग्रामपंचायत सदस्यांच्या आमरण उपोषणाला रासपचे जाहीर समर्थन          

उपोषणस्थळी पाठिंबा देताना प्रदीप गावंडे उपाध्यक्ष अकोला जिल्हा राष्ट्रीय समाज पक्ष        
          

अकोला : मूर्तिजापूर तालुक्यातील कार्ली गावाचा पाणीपुरवठा  पूर्ववत करण्याकरिता नवीन विहिरीचे खोदकाम केले. या  खोदकामात भ्रष्टाचार झाला असून, त्याची  सखोल चौकशी तात्काळ  करण्यात यावी, अशी मागणी करत कार्ली ग्रामपंचायतच्या उपसरपंच प्रभाबाई वानखेडे,  ग्रामपंयात सदस्य  सुरज निघोट व देवानंद किर्दक यांनी गटविकास अधिकारी मूर्तिजापूर यांना निवेदन दिले आहे. चौकशीच्या मागणीसाठी बेमुदत आमरण उपोषण सुरु केले आहे. राष्ट्रीय समाज पक्षाचे अकोला जिल्हा उपाध्यक्ष प्रदीप गावंडे यांनी उपोषणस्थळी भेट देवून उपोषणकर्त्यास जाहीर पाठिंबा दिला.

Sunday, March 12, 2023

रासपच्या विदर्भ प्रदेश उपाध्यक्षपदी डॉ. मोहमद तोशिफ मोहमद युनिस यांची नियुक्ती

रासपच्या विदर्भ प्रदेश उपाध्यक्षपदी डॉ. मोहमद तोशिफ मोहमद  युनिस यांची नियुक्ती   

रासपची अमरावती विभागाची आढावा बैठक उत्सहात

अमरावती : यशवंत नायक ब्यूरो                            

आज दिनांक १२ मार्च २०२३ रोजी अमरावती विभागातील अकोला, यवतमाळ, वाशीम व बुलढाणा जिल्ह्यातील राष्ट्रीय समाज पक्ष कार्यकर्त्यांची आढावा बैठक शासकीय विश्रामगृह अमरावती येथे  पार पडली. ही आढावा बैठक राष्ट्रीय समाज पक्षाचे विदर्भ प्रदेश अध्यक्ष प्रा. एड. रमेश पिसे यांचे अध्यक्षतेत पार पडली. बैठकीत अमरावती विभागातील सर्व जिल्ह्यांत पक्ष बांधणी मजबूत करून आगामी निवणुकीला सामोरे जाण्याची तयारी करण्याचा निर्णय सर्वानुमते  घेण्यात आला. या बैठकीत राष्ट्रीय समाज पक्षाच्या विदर्भ प्रदेश उपाध्यक्ष व अमरावती विभागाचे  प्रभारी म्हणून डॉ. मोहमद तोशिफ मोहमद युसूफ यांची नियुक्ती करण्यात आली.

येणाऱ्या काळात होऊ घातलेल्या निवडणुकीत विदर्भातून राष्ट्रीय समाज पक्ष चांगले यश मिळवेल, असा आशावाद रासपचे विदर्भ संपर्क प्रमुख राजेंद्र पाटील यांनी यशवंत नायक ब्यूरो शी बोलताना व्यक्त केला.

बैठकीला विदर्भ प्रदेश अध्यक्ष प्रा. एड. रमेश पिसे यांचेसह कृषी सम्राट राजेंद्र पाटील संपर्क प्रमुख विदर्भ प्रदेश, पुरुषोत्तम कामडी - कोषाध्यक्ष विदर्भ प्रदेश, अमरावती पशुसंवर्धन विभागाचे निवृत्त सहायक आयुक्त डॉ. मोहन गोहत्रे साहेब, नागपूर जिल्हा उपाध्यक्ष दत्ता मेश्राम, वाशीम जिल्हा अध्यक्ष दिपक तिरके, अकोला जिल्हा उपाध्यक्ष प्रदीप गावंडे,जिल्हा महासचिव   आशिष कोल्हे, अमरावतीचे प्रदीप पाथुर्डे, विलास उमाळे, संदीप शिरसाठ, नवाब साहेब आदी मान्यवर उपस्थित होते.

Friday, March 10, 2023

अमरावतीत रविवारी राष्ट्रीय समाज पक्षाची विभागीय आढावा बैठक

अमरावतीत रविवारी राष्ट्रीय समाज पक्षाची विभागीय आढावा बैठक 

       

                   

राष्ट्रीय समाज पक्षाचा विदर्भाकडे मोर्चा आणि आढावा बैठकीतून पक्ष संघटनवर चर्चा

अमरावती : यशवंत नायक ब्यूरो

बदलत्या राजकीय परिस्थितीत राष्ट्रीय समाज पक्षाने स्वबळाचा नार दिला असून, आता विदर्भात लक्ष केंद्रित करताना राष्ट्रीय समाज पक्षाचे संस्थापक राष्ट्रीय अध्यक्ष महादेव जानकर व महाराष्ट्र राज्य कार्यकारणी यांच्या आदेशानुसार अमरावती विभागातील अकोला,  अमरावती, यवतमाळ, वाशीम, बुलढाणा जिल्ह्यातील रासप कार्यकर्त्याची रविवारदिनांक 12 मार्च  2023 रोजी दुपारी 1: 00 वा. "शासकीय विश्रामगृह अमरावती " येथे रासपचे विदर्भ प्रदेश अध्यक्ष प्रा. एड. रमेश पिसे यांचे अध्यक्षतेत आढावा बैठकीचे आयोजन केले आहे. या बैठकीत अमरावती विभागातील सर्व जिल्ह्यातील  आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या  निवडणुकीच्या संदर्भाने पक्षाची रणनीती ठरणार असून, पक्ष संघटन बांधणी मजबूत करण्यात येणार आहे. आढावा बैठकीत विदर्भ प्रदेश अध्यक्ष प्रा. एड. रमेश पिसे, विदर्भ संपर्क प्रमुख कृषी सम्राट राजेंद्र पाटील, विदर्भ प्रदेश मुख्य महासचिव संजय कन्नावार, विदर्भ कोषाध्यक्ष पुरुषोत्तम कामडी, डॉ. तोशिफ शेख, डॉ. प्रमोद पाथुर्डे आदी मान्यवर मार्गदर्शन करणार आहेत. अमरावती, अकोला, यवतमाळ, वाशीम, बुलढाणा जिल्ह्यातील रासप कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून सहकार्य करावे, असे जाहीर अवाहन राष्ट्रीय समाज पक्षाचे विदर्भ प्रदेश  अध्यक्ष प्रा. ऍड. रमेश पिसे यांनी केले. अधिक माहितीकरिता 8080648563 या भ्रमणध्वनीवर संपर्क साधावा. सदर आढावा बैठकीबाबत विदर्भ संपर्क प्रमुख राजेंद्र पाटील सर यांनी प्रसिध्दी माध्यमांना कळवले आहे. 

Sunday, March 5, 2023

राष्ट्रीय समाज पक्षाचे कर्नाटक राज्य महासचिवपदी शरणबसप्पा एस. दोडामणी यांची नियुक्ती

राष्ट्रीय समाज पक्षाचे कर्नाटक राज्य महासचिवपदी शरणबसप्पा एस. दोडामणी यांची नियुक्ती 

कलबुर्गी :  राष्ट्रीय समाज पक्षाचे कर्नाटक प्रदेशाध्यक्ष धर्मान्ना तोंटापूर यांनी प्रसिद्धीमाध्यमातून सांगितले की, शरणबसप्पा एस. दोडामनी यांची यांची कर्नाटक राज्य सरचिटणीसपदी आणि श्रीमंता मावनूर यांची कलबुर्गीच्या जिल्हा सरचिटणीसपदी नियुक्ती करण्यात आली आहे.

राष्ट्रीय समाज पक्षाचे संस्थापक अध्यक्ष महादेव जानकर यांच्या आदेशानुसार, नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांची राष्ट्रीय समाज पक्षाच्या संघटनेसाठी निवड करण्यात आली आहे, नव विचाराने स्थापन झालेल्या आणि लोकांच्या समस्या सोडवण्यासाठी आणि राज्य स्तरावर सर्व समाजाशी त्वरित संपर्क साधून त्यांच्या मागण्या पूर्ण करण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न करायचे आहेत.

प्रदेश वरिष्ठ सरचिटणीसपदी नियुक्ती केल्यावर, राष्ट्रीय समाज पक्षाच्या तत्त्वांचे पालन करण्याचे आदेश तसेच पक्षाच्या विभागांचे अध्यक्ष आणि जिल्हाध्यक्षांशी सल्लामसलत करून विभाग, जिल्हा आणि तालुकानिहाय पदाधिकाऱ्यांची नियुक्ती करून कार्यवाही करण्याचे आदेश दिले आहेत. पक्ष संघटना. सर्व कार्यकर्ते व समाज नेत्यांच्या सहकार्याने पक्षसंघटना अतिशय जोमाने सुरू असल्याचा विश्वास व्यक्त करून त्यांनी आजपासूनच कामाला लागण्याची विनंती केली आहे. यावेळी पक्षाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष शिवलिंगप्पा किन्नूर, कल्याण कर्नाटक विभागाचे अध्यक्ष शरणप्पा ए. पुजारी, जेवारगी तालुकाध्यक्ष मंतेश तलवार यांच्यासह पक्षाचे कार्यकर्ते उपस्थित होते.

Saturday, March 4, 2023

राष्ट्रीय समाज पक्ष कर्नाटक राज्य विधानसभेच्या १५० जागांसाठी लढणार : किन्नूर

राष्ट्रीय समाज पक्ष कर्नाटक राज्य विधानसभेच्या १५० जागांसाठी लढणार : किन्नूर

पत्रकार परिषदेत बोलताना राष्ट्रीय समाज पक्षाचे कर्नाटक प्रभारी शिवलिंगप्पा किन्नूर, उजवीकडे प्रदेशाध्यक्ष धर्माना तोंटापूर व अन्य.

४ मार्च २०२३ |प्रा. आबासो पुकळे 

कलबुर्गी : महादेव जानकर यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रीय समाज पक्ष येत्या कर्नाटक राज्य विधानसभा निवडणुकीत सुमारे १५० जागा लढवेल, असे राष्ट्रीय समाज पक्षाचे कर्नाटक प्रभारी शिवलिंगप्पा किन्नूर यांनी सांगितले. काल शुक्रवारी शहरातील पत्रकार भवनात पत्रकार परिषदेत बोलताना ते म्हणाले की, पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष महादेव जानकर यांनी गरीब व मागासलेल्या लोकांसाठी आयुष्य पणाला लावले आहे. उपेक्षित वंचित लोकांच्या सन्मानासाठी झटत आहेत. अशा पक्षाला सर्वांनी साथ देणे अत्यंत आवश्यक असल्याचे ते म्हणाले.

कल्याण कर्नाटकातील यदागिरी, कलबुर्गी, कोप्पल, बिदर, बेल्लारी आणि रायचूर आणि विजयनगर जिल्ह्यांसह सात जिल्ह्यांतील ४१ पैकी सुमारे ३० मतदारसंघात पक्षाकडून निवडणूक लढवण्यासाठी अनेकजण संपर्कात आहेत. त्यामुळे निवडणुकीत उतरू इच्छिणाऱ्यांनी तात्काळ संपर्क साधावा, कल्याण कर्नाटक विभागाचे अध्यक्ष शरणप्पा ए. पुजारी यांच्याशी 9448632017, 9900241962 या मोबाईल क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन केले.

देशात आणि राज्यात काँग्रेस आणि भाजप या राष्ट्रीय पक्षांची राजवट पाहून संपूर्ण जनता कंटाळली आहे. दोन्ही राष्ट्रीय पक्षांनी मागासलेल्या, शोषित आणि अल्पसंख्याक आणि पीडितांसाठी केवळ व्होट बँक बनवली असून, त्यांचे हित साधले नाही, असा आरोप त्यांनी केला.

दोन्ही पक्षांच्या कारभारात घराणेशाही, भ्रष्टाचार, बेकायदेशीरता, गैरकारभार आदी प्रकार सातत्याने सुरू आहेत. ते त्याच्यावर, हे त्याच्यावर आरोप करत आहेत. आतापर्यंत दोन्ही राष्ट्रीय पक्षांना पारदर्शक आणि प्रामाणिक, भ्रष्टाचारमुक्त कारभार करता आलेला नाही. विषमता वाढत असल्याबद्दल त्यांनी चिंता व्यक्त केली.

सर्व समाजांना सामाजिक न्याय मिळाला पाहिजे. मात्र, कोणतेही राष्ट्रीय पक्ष असे काम करत नाहीत.  सिद्धरामय्या यांच्या नेतृत्वाखालील काँग्रेस सरकारने जातनिहाय जनगणना केली होती. हा अहवाल जाहीर करावा, अशी मागणी त्यांनी केली. पत्रकार परिषदेत पक्षाचे प्रदेशाध्यक्ष धर्माना तोंटापूर, शरणप्पा पुजारी, बसप्पा दोड्डामणी, महंतप्पा दोड्डामणी, श्रीमंत देवराज, कलबुर्गी जिल्हाध्यक्ष देवेंद्र चिगरअल्ली आदी उपस्थित होते.

"कल्याण कर्नाटकात पायाभूत सुविधा आणि राहणीमानाच्या बाबतीत या प्रदेशाचा दर्जा उंचावण्यासाठी पुरेसे काम केले गेले नाही. राज्यातील बहुतांश जिल्हे सर्वाधिक मागासलेले आहेत". - धर्मांना तोंटापुर, प्रदेशाध्यक्ष कर्नाटक रासप




Friday, March 3, 2023

लोक साहित्याचा महान संशोधक हरपला..!

लोक साहित्याचा महान संशोधक हरपला..!

आई वडिलांच्या संस्कारातून खंडोबा देवाचे वेड लागले आणि 20 वर्षांच्या कठोर संशोधनानंतर महाग्रंथ 'कुलदैवत खंडोबा' जगासमोर नव्या पद्धतीनं मांडला. महाराष्ट्रात लोकप्रिय ठरलेल्या जय मल्हार मालिकेचे तज्ञ सल्लागार म्हणून काम केले. त्यांच्या मार्गदर्शनाखाली 'दख्खनचा राजा ज्योतीबा' हि महाराष्ट्रातील घराघरात पोहचलेली लोकप्रिय मालिका.

क्रांतिकारी विचारांचा मराठी मातीतला शेवटचा बंडखोर फरारी अर्थातच अत्याचारी गावगुंड व सावकारांचा कर्दनकाळ 'बापु बिरु वाटेगावकर आप्पा महाराज' यांचे वादळी आयुष्य नुकतंच 'कृष्णाकाठचं भयपर्व' या थरारक कादंबरीतून त्यांनी नुकतेच समोर आणलं होतं. 

डॉ. विठ्ठल बापूजी ठोंबरे सरांशी प्रत्यक्ष भेटायच राहुन गेल, परंतु समाज माध्यमातून अनेक वेळा बोलणं व्हायचं. आज सरांचं असं अकाली धक्कादायक निघून जाण्याने लोकसाहित्याचा संशोधक हरपला. श्री म्हाळसाकांतानं सरांच्या पुण्यात्म्यास चरणी जागा द्यावी. सरांच्या साहित्याला अमरत्त्व मिळावं!

भावपूर्ण श्रद्धांजली💐💐

डॉ. ठोंबरे सरांचे मूळ गाव दुधेभावी ता - फलटण जिल्हा सातारा हे आहे. ते सद्या पुणे या शहरात राहत होते. त्यांना सकाळी अचानक चक्कर आली होती. त्यांचे अकस्मात निधन झाले आहे. त्यांच्यावर मूळ गावी अंत्य संस्कार केले जाणार आहेत असे समजते.

--------

मित्रवर्य डॉ.विठ्ठल ठोंबरे यांच्या अचानक जाण्याने फार मोठी हानी निर्माण झाली आहे.साहित्य क्षेत्रातही फार मोठी पोकळी निर्माण झाली आहे. ही पोकळी यापुढे कशानेही भरून येणार नाही. याची खंत मनाला लागून राहिली आहे.

देशी रॉबिनहूड म्हणून समाजामध्ये बोरगावच्या ढाण्या वाघाची म्हणजे बापू बीरु वाटेगावकरांची ओळख आहे. त्यांच्या वादळी जीवनाविषयी संपूर्ण महाराष्ट्रालाच नव्हे तर महाराष्ट्राच्या बाहेरील राज्यातही कुतूहल आहे. विठ्ठल ठोंबरे यांनी बापू बीरू वाटेगावकर यांच्या वादळी व्यक्तिमत्त्वावर" कृष्णाकाठचं भयपर्व "नावाची महत्त्वपूर्ण कादंबरी लिहिली .ही कादंबरी नुकतीच प्रकाशित झाली आहे. खरं समाज भान काय असतं ते विठ्ठल ठोंबरे कडे बघितल्यानंतर कळतं.

खंडोबा या लोकदैवताविषयी तमाम मराठी माणसाला विशेष भक्तीभाव आहे. हा भक्ती भाव महाराष्ट्राच्या तनामनात मुरला आहे.खंडोबा हे महाराष्ट्राचे लोक दैवत आहे. याची जाण विठ्ठल ठोंबरे यांना होती.त्यांनी कुलदैवत खंडोबा हा महत्वपूर्ण संशोधन ग्रंथ सिद्ध केला होता. या ग्रंथाचे मोल लक्षात घेऊनच त्यांना जय मल्हार मालिकेचे तज्ज्ञ सल्लागार म्हणून बहुमानही मिळाला. संशोधन कसे करावे याच्यासाठीचा आदर्श वस्तुपाठ त्यांनी या ग्रंथाच्या माध्यमातून निर्माण केला आहे. त्यामुळे तर त्यांच्याबद्दलचा आदर वाढतच जातो. 

जवळचा एक मित्र म्हणून मला विठ्ठल ठोंबरे बद्दल पहिल्यापासूनच खूप आस्था होती. आमचं फारसं बोलणं होत नसलं तरी महत्त्वाच्या ठिकाणी दूरध्वनीवर आम्ही संपर्कात असायचो.त्यांच्या लग्नासाठी मी जाणीवपूर्वक काही प्रयत्न केले होते. मात्र यश आलं नव्हतं. त्यांच्या प्रारब्धात अक्षदा लिहिल्याच नव्हत्या असं आता वाटतं. त्याच्या डोक्यावर अक्षता पडल्या असत्या तर किमान संसारी जीवन परिपूर्ण तरी झालं असतं. नियतीने ते सुखीही त्यांच्या नशिबात लिहिलं नव्हतं. त्यांचा कागद कोराच राहिला आणि जीवन पण कोरचं राहील. पण या कोऱ्या अवलियाने संशोधनाच असा ग्रंथ लिहिला की काळालाही त्याचा विचार करावाच लागतो. कुलदैवत खंडोबा या ग्रंथाने एक मापदंड प्रस्थापित केला आहे. 

मानदंडीय स्वरूपाचे काम करूनही या विठ्ठलाकडे साहित्यातील मोहरक्यांचे ,साहित्य संस्थांचे, विद्यापीठांचे फारसे लक्ष गेले नाही. अनुल्लेखाने मारणे, दखल न घेणे, असे प्रकार साहित्य वर्तुळात घडत असतात. विठ्ठल ठोंबरे च्या बाबतीत असे प्रसंग बरेच आले.पण त्याची खंत त्यांच्या मनाला लागून राहिली नाही. तसे कधी बोलताना ते दिसले ही नाहीत.वृत्तस्थ वृत्तीने ते संशोधन करत राहिले. नम्र आणि मोजके बोलणे हा त्यांचा स्थायीभाव होता.

फारशे पुरस्कार, कौतुक, लौकिक जीवनातील यशस्वी वाटचाल विठ्ठल ठोंबरेच्या वाटेला आलीच नाही. स्वतःचा जीवन प्रवास अर्ध्यावरतीच हा विठ्ठल सोडून गेला. याचे तीव्र दुःख होत आहे. 

कोणत्या शब्दात श्रद्धांजली अर्पण करावी हे समजत नाही. शेवटी नियतीपुढे कोणाचे काय चालते आहे का? चालत असते तर या संशोधकाला आपल्याला बोलावता आले असते. पण ते शक्य नाही. डाव अर्ध्यावर संपला आहे. पण आपल्या संशोधनाने साहित्य निर्मितीने विठ्ठल ठोंबरे यांनी आपली नाम मुद्रा अस्सल पणे कोरली आहे. हे मात्र नक्की.त्यांचे ग्रंथ अनेक पिढ्यांना आदर्शवत, दिशादर्शक ठरतील असा विश्वास आहे. अशा संशोधकास आणि उत्तम ललित लेखकास विनम्र पूर्वक आदरांजली अर्पण करतो.

डॉ.महेश खरात

छत्रपती संभाजीनगर


Thursday, March 2, 2023

राष्ट्रीय समाज पक्ष तरफ प्रयागराज के जघन्य अपराध उमेश पाल हत्याकांड आरोपियों के एनकाउंटर की मांग

राष्ट्रीय समाज पक्ष तरफ प्रयागराज के जघन्य अपराध उमेश पाल हत्याकांड आरोपियों के एनकाउंटर की मांग


आज २/३/२०२३ मिर्जापुर जनपद में राष्ट्रीय समाज पार्टी के तत्वाधान में प्रयागराज के जघन्य अपराध उमेश पाल हत्याकांड उनके दो सुरक्षाकर्मी आरक्षी संदीप निषाद एवं आरक्षी राघवेंद्र सिंह हत्याकांड को लेकर जिलाधिकारी मिर्जापुर के द्वारा मुख्यमंत्री को ज्ञापन सौंपा गया जिला अध्यक्ष अनिल कुमार पाल द्वारा आरोपियों के एनकाउंटर की मांग को लेकर अधिवक्ता उमेश पाल सुरक्षाकर्मी आरक्षी संदीप निषाद व आरक्षी राघवेंद्र सिंह के परिवार के  एक एक सदस्य को सरकारी नौकरी और आश्रित परिवार को कम से कम एक  करोड़ रुपए की आर्थिक सहायता प्रदान की जाए और उनके परिवार को सुरक्षा प्रदान किया जाए कार्यक्रम में उपस्थित रहे राष्ट्रीय समाज पार्टी जिला अध्यक्ष अनिल कुमार पाल जिला उपाध्यक्ष डॉ राजेश पाल जिला प्रभारी जय शंकर पाल जिला सचिव एडवोकेट जितेंद्र कुमार पाल जिला उपाध्यक्ष सतनारायण शिवदास महेंद्र छात्र नेता रवि पाल अमरेश बाहुबली शिवनारायण पाल  सुनील भदोही जिला अध्यक्ष राजाराम पाल राष्ट्रीय समाज पार्टी नेता संदीप पाल व अन्य लोग उपस्थित रहे।।

राष्ट्रीय समाज पक्ष ने शाहजहांपुर में प्रयागराज में हुई जघन्य हत्या के विरोध में जिलाधिकारी को ज्ञापन सौंपा

राष्ट्रीय समाज पक्ष ने शाहजहांपुर में प्रयागराज में हुई  जघन्य हत्या के विरोध में जिलाधिकारी को ज्ञापन सौंपा 

राष्ट्रीय समाज पार्टी जिला शाहजहांपुर  कार्यकारिणी व प्रदेश प्रवक्ता तथा जिला अध्यक्ष शाहजहांपुर एडवोकेट मनोज कुमार पाली के नेतृत्व में आज शाहजहांपुर में प्रयागराज में हुई  जघन्य हत्या के विरोध में जिलाधिकारी को ज्ञापन सौंपा । माँग की की आरोपियों को  फास्टट्रैक गठित कर तत्काल फांसी की सजा दी जाए। अधिवक्ता उमेश पाल सुरक्षाकर्मी संदीप निषाद ,राघवेंद्र सिंह  के विधवा पत्नियों को उनकी योग्यता के अनुसार सरकार में नौकरी दें तथा सभी के आश्रित परिवार को कम से कम एक करोड़ रुपए की सहायता प्रदान की जाए ।आपका अपना ठाकुर प्रदीप सिंह तोमर प्रदेश संगठन मंत्री राष्ट्रीय समाज पार्टी उत्तर प्रदेश

अधिवक्ता उमेश पाल तथा पुलिस के शहीद जवान संदीप निषाद की नृशंस हत्या के विरोध में राष्ट्रीय समाज पार्टी इकाई गाजियाबाद उत्तरप्रदेश द्वारा उत्तरप्रदेश के मुख्यमंत्री को संबोधित ज्ञापन सौंपा

अधिवक्ता उमेश पाल तथा पुलिस के शहीद जवान संदीप निषाद की नृशंस हत्या के विरोध में राष्ट्रीय समाज पार्टी इकाई गाजियाबाद उत्तरप्रदेश द्वारा उत्तरप्रदेश के मुख्यमंत्री को संबोधित ज्ञापन सौंपा

१/३/२३अधिवक्ता उमेश पाल तथा पुलिस के शहीद जवान संदीप निषाद की नृशंस हत्या के विरोध में राष्ट्रीय समाज पार्टी इकाई गाजियाबाद उत्तरप्रदेश द्वारा उत्तरप्रदेश के मुख्यमंत्री को संबोधित ज्ञापन  गाजियाबाद के जिलाधिकारी को राष्ट्रीय समाज पक्ष के प्रतिनिधि मंडल द्वारा निम्न मांगो के साथ सौंपा गया ।

सेवा में 

मा योगी आदित्यनाथ जी 

मुख्य मंत्री उत्तरप्रदेश सरकार 

लखनऊ उत्तरप्रदेश 

द्वारा 

जिला अधिकारी गाज़ियाबाद 

विषय : प्रयागराज में अधिवक्ता उमेश पाल व पुलिस सिपाही संदीप निषाद के नृशंस हत्या के संदर्भ में ।

महोदय 

जैसा की आपको विदित है की दिनाक़ 24 फरवरी 2023  को प्रयागराज उप्र में थाना धूमनगंज के बगल में जीटी रोड पर भरी दोपहरी में स्वचालित हथियारों से अंधाधुंध फायरिंग तथा बमबाजी करते हुए दहशतगर्दो ने अधिवक्ता उमेश पाल की हत्या कर दी तथा अधिवक्ता उमेश पाल की सुरक्षा में शासकीय कर्त्तव्य का निर्वहन करते हुए संदीप निषाद ढाल बनके लड़े और बदमाशो ने उन्हे भी निशाना बनाया और उनकी भी नृशंस हत्या कर दी । महोदय सभ्य समाज में इस घटना से बहुत भय व्याप्त है । सभ्य समाज आपकी तरफ आशा भरी निगाहों से देख रहा है । ऐसी घटनाएं सभ्य समाज , राज्य तथा देश की प्रतिमा को कलंकित करती है । आपसे राष्ट्रीय समाज पार्टी मांग करती है कि

1) दोषियों को तत्काल गिरफ्तार कर फास्ट ट्रैक कोर्ट गठित कर कठोरतम सजा दी जाए जो इतिहास में एक नजीर बने ।

2) स्व अधिवक्ता उमेश पाल तथा शहीद संदीप निषाद के आश्रित परिवार  को मुख्यमंत्री सहायता कोष से रुपए एक एक करोड़ की निधि प्रदान की जाय । 

3) स्व अधिवक्ता उमेश पाल तथा शहीद संदीप निषाद के आश्रित विधवा पत्नियों को अनुकंपा के आधार पर शासकीय सेवा में समायोजित किया जाए। 

4) स्व अधिवक्ता उमेश पाल तथा शहीद संदीप निषाद के आश्रित परिवारों को सुरक्षा मुहैया कराई जाए। 

महोदय आप मुख्यमंत्री होने के नाते हम सबके अभिभावक भी है और आप योगी / संत होने के नाते मानवीय संवेदनाओं के सागर भी है अतः आपसे अपेक्षा है की आप उपरोक्त मांगो पर गंभीरता पूर्वक विचार कर ,अवश्य पूर्ण करेगे । 

आपका 

नरेश वाल्मीकि

शारदासरण सिंह

रामभुल पाल

जयदीप सिंह 

श्री फौजी साहब 

व राष्ट्रीय समाज पक्ष के सम्मानित पदाधिकारी





गडचिरोलीत राष्ट्रीय समाज पक्षाची आढावा बैठक संपन्न: लवकरच गडचिरोलीत मेळाव्याचे आयोजन

गडचिरोलीत राष्ट्रीय समाज पक्षाची आढावा बैठक संपन्न: लवकरच गडचिरोलीत मेळाव्याचे आयोजन 

१/३/२०२३ रोजी राष्ट्रीय समाज पक्ष गडचिरोली जिल्हा आढावा बैठक गडचिरोली येथे पार पडली. मागील पंचवार्षिक निवडणूकीत गडचिरोली जिल्ह्यतून राष्ट्रीय समाज पक्षाचे २ जिल्हा परिषद सदस्य, ४ पंचायत समिती सदस्य आणि १ नगरसेवक निवडून आले होते, तर यावेळी आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत जास्तीत जास्त उमेदवार निवडून आणण्यासाठी आमची तयारी सुरु आहे. लवकरच राष्ट्रनायक मा महादेव जानकर साहेब यांच्या नेतृत्वाखाली अतुलभाऊ गण्यार पवार यांच्या नियोजनाखाली गडचिरोली जिल्हाचा मेळावा घेणार असल्याचे येथील पदाधिका-यांनी सांगितले.



चागंले संस्कार टिकविण्यासाठी वाचन संस्कृतीची गरज : डॉ. शंकर स्वामी वडेपुरीकर

चागंले संस्कार टिकविण्यासाठी वाचन संस्कृतीची गरज : डॉ. शंकर स्वामी वडेपुरीकर ‌पु.अहिल्यादेवी वाचनालयात " वाचन संकल्प महाराष्ट्राचा...