राष्ट्रीय समाज पक्षाची नायगाव विधानसभा मतदासघांत बैठक
नायगाव (६/१०/२०२४) : उमरी येथे राष्ट्रीय समाज पक्षाची बैठक नांदेड जिल्हाध्यक्ष मा. भगवानराव मुंढे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. राष्ट्रीय संघटक गोविंदराम शूरनर यांनी मार्गदर्शन करताना म्हणाले, राष्ट्रनायक महादेवजी जानकर यांच्या आदेशानुसार नायगाव मतदारसंघात पक्षाची उमेदवारी देण्यात येणार आहे. राज्यात सर्व जागा स्वबळावरच लढवायचे आहेत, त्यासाठी प्रत्येक विधानसभा लढविण्याच्या दृष्टीने कार्यकर्त्यांनी कामाला लागावे, असे प्रतिपादन शूरनर यांनी केले. मराठवाडा विभागीय अध्यक्ष प्रा विष्णु गोरे म्हणाले, विधानसभा बांधनीसाठी तालुकाध्यक्षानी तालुका कार्यकारिणी, युवा आघाडी, महिला आघाडी, विद्यार्थी आघाडीने जोमाने कामास सुरुवात करावी. विधानसभेत उमेदवार उभा करण्याच्या दृष्टीने कामाला लागावे. जिल्हाध्यक्ष भगवानराव मुंढे म्हणाले, नांदेड जिल्ह्यात नऊ विधानसभा मतदारसंघ असून, सर्व जागेवर उमेदवार उभा करणार असून, कमित कमी तीन ते चार आमदार विधानसभेवर पाठवू असे आश्वासन दिले. तकार्यकर्त्यांनी आज पासुन पुर्णवेळ कामाला लागावे असे आवाहन केले.
बैठकीत कार्यकर्त्यांना पक्ष प्रवेश देण्यात आले. उमरी तालुकाध्यक्षपदी पंडित किसवे यांना नियुक्ती पत्र देवून सन्मान करण्यात आला. यावेळी नांदेड शहराध्यक्ष दिपक कोटलवार, सुर्यकांत गुंडाळे, निजामाबाद संपर्क प्रमुख सदाशिव पाटील, रामराम दबडे, डॉ . संतोष किसवे, अनेक कार्यकर्ते उपस्थितीत होते. आयोजक रामचंद्र हुलगुंडे यांनी सर्वांचे आभार मानले.
No comments:
Post a Comment