आटपाडी येथे राष्ट्रीय समाज पक्षाची बैठक, संदेश खटके यांच्यावर तालुकाध्यक्ष जबाबदारी
आटपाडी (६/१०/२४) : राष्ट्रीय समाज पक्ष पश्चिम महाराष्ट्र संघटक कालिदास गाढवे, युवक आघाडी अध्यक्ष अजित पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत आटपाडी तालुका राष्ट्रीय समाज पक्षाची बैठक पार पडली. बैठकीत आटपाडी तालुकाध्यक्षपदी संदेश खटके तर आटपाडी युवक तालुकाध्यक्ष पदी शुभम हाके यांची नियुक्ती करण्यात आली. नूतन पदाधिकाऱ्यांचा सत्कार करून पक्षाची विचारधारा तालुक्यातील शेवटच्या घटकापर्यंत पोहोचवण्यासाठी आणि पुढील राजकीय वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. यावेळी सांगली जिल्हाध्यक्ष सत्यजित गलांडे, सांगली जिल्हा नियोजन समिती सदस्य लक्ष्मण सरगर, खानापूर-आटपाडी विधानसभा अध्यक्ष सुखदेव म्हारगुडे, समाधान घुटुकडे, विकास सरगर तसेच कार्यकर्ते उपस्थित होते.
No comments:
Post a Comment