Sunday, October 20, 2024

राष्ट्रीय समाज पक्ष महायुतीतून बाहेर; २८८ जागांवर रासप स्वबळावर लढणार

राष्ट्रीय समाज पक्ष महायुतीतून बाहेर; २८८ जागांवर रासप स्वबळावर लढणार 

रासपचे राष्ट्रीय अध्यक्ष महादेव जानकर यांची घोषणा 

मुंबई (१६/१०/२०२४) : राष्ट्रीय समाज पक्षाचे संस्थापक राष्ट्रीय अध्यक्ष अध्यक्ष महादेव जानकर यांनी महायुतीतून बाहेर पडण्याची घोषणा केली आहे. आगामी विधानसभेसाठी महादेव जानकर यांचा राष्ट्रीय समाज पक्ष स्वबळावर लढणार आहे. महादेव जानकर यांनी याबाबत माहिती जाहीर केली आहे. राज्यातील २८८ जागांवर राष्ट्रीय समाज पक्ष उमेदवार देणार असल्याची महादेव जानकर यांनी घोषणा केली आहे. 2019 च्या विधानसभा निवडणुकीपासून महादेव जानकर यांना महायुतीत डावले जात होते. भाजप सोबत राहिल्याने राष्ट्रीय समाज पक्षाच्या कार्यकर्त्यात नाराज होती. विधानसभा निवडणुकीचे बिगुल वाजले असताना, भाजपने महायुतीतील घटक पक्षांना विश्वासात घेतले नाही, याचाच परिणाम म्हणून महादेव जानकर यांनी महायुती सोडत असल्याचे जाहीर केले आहे. याचा फटका विधानसभेत काही अंशी महायुती आणि महाविकास आघाडीला बसू शकतो, असे जनतेमध्ये बोलले जात आहे.

नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत महादेव जानकर हे युतीसोबत होते. परंतु आता त्यांनी विधानसभा निवडणुकीत युतीतून बाहेर पडत असल्याची घोषणा केली आहे. महाविकास आघाडी किंवा महायुतीकडून कोणताही संपर्क नाही. आपण आपल्या पक्षासाठी बाहेर पडत आहोत. राष्ट्रीय समाज पक्षाचा देखील पंतप्रधान झाला पाहिजे. आपल्याला या देशाचा राज्यकर्ता बनायचा आहे. आम्हाला आमची ताकद आजमावायची आहे. भाजप आणि काँग्रेस एकच आहेत, त्यामुळे काँग्रेस सोबत जाण्यास महादेव जानकर यांनी स्पष्ट शब्दात नकार दिला आहे.

No comments:

Post a Comment

चागंले संस्कार टिकविण्यासाठी वाचन संस्कृतीची गरज : डॉ. शंकर स्वामी वडेपुरीकर

चागंले संस्कार टिकविण्यासाठी वाचन संस्कृतीची गरज : डॉ. शंकर स्वामी वडेपुरीकर ‌पु.अहिल्यादेवी वाचनालयात " वाचन संकल्प महाराष्ट्राचा...