Sunday, October 20, 2024

...तरच शेतकऱ्यांचे राज येईल : महादेव जानकर

 ...तरच शेतकऱ्यांचे राज येईल : महादेव जानकर 

तिवसा (१/१०/२४) :  येथे राष्ट्रीय समाज पक्षाची भव्य जाहीर सभा पार पडली. सभेस राष्ट्रीय समाज पक्षाचे संस्थापक राष्ट्रीय अध्यक्ष महादेव जानकर यांनी संबोधित केले. रासपा नेते महादेव जानकर म्हणाले, राष्ट्रीय समाज पक्ष 2024 विधानसभा निवडणूक स्वबळावर लढणार आहे. घराणेशाही मोडीत काढून शेतकरी शेतमजूर लोकांच्या हातात राज्याची सत्ता तयार करा , तेव्हा खरे अर्थाने राज्यात शेतकऱ्यांचे राज्य येईल, हे मोठे मोठे राज्यकर्ते एकाच माळेचे मणी असून आतापर्यंत सत्तेत राहण्याचा उपयोग घेतला आहे.  कधी काँग्रेस तर कधी भाजप या दोघांचे सत्ता राज्यात आलेली आहे. एकदा राष्ट्रीय समाज पक्षाला संधी दिल्यास महाराष्ट्रातील शेतकरी शेतमजूर आणि बेरोजगारांना न्याय मिळण्याची शाश्वती देऊ. सध्या आम्ही राष्ट्रीय समाज पक्ष हे स्वबळावर लढण्याची ताकद निर्माण करीत असून 288 जागा आपण राष्ट्रीय समाज पक्षाचा तिकीटावर यावेळी आपले उमेदवार उभा करू, तिवसा येथील आयोजित जाहीर सभेत जाहीर केले.



अमरावती जिल्ह्यातील तिवसा विधानसभा क्षेत्रात जाहीर सभा घेण्यात आली. सभेच्या अध्यक्षस्थानी  अशोकराव देशमुख हे होते तर कार्यक्रमात विदर्भ प्रदेश संघटक प्रा. राजू गोरडे, डॉ. तौसीफ शेख - अध्यक्ष विदर्भ प्रदेश, विदर्भ महासचिव संजय कन्नावार, दत्ता मेश्राम व इतर मान्यवर उपस्थित होते.

No comments:

Post a Comment

विश्वाचा यशवंत नायक माहे : जून 2025

विश्वाचा यशवंत नायक माहे : जून 2025