कोकणात राष्ट्रीय समाज पक्ष तगडे उमेदवार मैदानात उतरवणार : श्रीकांत भोईर
पनवेल (१८/१०/२४) : कोकणात राष्ट्रीय समाज पक्षावर आणि रासपचे सर्वेसर्वा महादेव जानकर यांच्यावर श्रद्धा असणाऱ्यांची संख्या मोठी आहे. महायुती आणि महाआघाडीच्या राजकारणाला कोकणातली जनता कंटाळली असून, राष्ट्रीय समाज पक्षाच्या माध्यमातून नवा पर्याय जनतेला मिळणार आहे. संपूर्ण कोकण प्रांतातून अनेकांनी राष्ट्रीय समाज पक्षाकडे विधानसभा निवडणुक लढवण्याची इच्छा व्यक्त केली आहे. राष्ट्रीय समाज पक्षाने ठाणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पालघर जिल्ह्यात निष्ठावंतांना, स्थानिक भूमिपुत्रांना संधी देण्याचे ठरवले आहे. तुल्यबळ तगडे उमेदवार राष्ट्रीय समाज पक्षाच्या संपर्कात आहेत, असा दावा रासपचे कोकण प्रदेश अध्यक्ष श्रीकांत दादा भोईर यांनी यशवंत नायकशी बोलताना केला आहे.
पनवेल, कर्जत- खालापूर, पेण, अंबरनाथ, डोंबिवली, मुरबाड, महाड- पोलादपूर, दापोली-खेड, श्रीवर्धन, गुहागर, चिपळूण, कणकवली, कुडाळ, सावंतवाडी, संगमेश्वर, उरण आदी मतदारसंघात इच्छुकांची संख्या मोठी असून, संभाव्य उमेदवारांची यादी तयार आहे. उमेदवारांची अंतिम यादी पक्षाची केंद्रीय निवडणूक कार्यकारी समिती जाहीर करेल. कोकणातील कार्यकर्त्यांनी कोणत्याही अफवावर विश्वास ठेवू नये, राष्ट्रीय समाज पक्ष तगडे उमेदवार मैदानात उतरवून निवडणूक लढण्यावर ठाम आहे, असे श्रीकांत भोईर यांनी स्पष्ट केले आहे. विधानसभा निवडणुकिसाठी कोकणात राष्ट्रीय समाज पक्षाने विद्यार्थी आघाडी प्रदेश अध्यक्ष शरद दडस यांच्यावर पक्षाने मोठा विश्वास दाखवून जबाबदारी निश्चित केली आहे.
No comments:
Post a Comment