Sunday, October 20, 2024

ठाणे जिल्ह्यातील १८ विधानसभा मतदार क्षेत्रात रासपचे उमेदवार लढतील

ठाणे जिल्ह्यातील १८ विधानसभा मतदार क्षेत्रात रासपचे उमेदवार लढतील

आगरी कुणबी व उत्तर भारतीय उमेदवारांना प्राधान्य

डोंबिवली (१/१०/२४) : राष्ट्रीय समाज पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष महादेव जानकर यांच्या आदेशानुसार महाराष्ट्र विधानसभा 2024 च्या निवडणुका राष्ट्रीय समाज पक्ष स्वबळावर लढविणार आहे. महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष काशिनाथ शेवते, महाराष्ट्र महासचिव ज्ञानेश्वर माऊली सलगर यांनी दिलेल्या आदेशनुसार ठाणे जिल्ह्यातील अठरा विधानसभा मतदारसंघातील बूथबांधणी व संभाव्य उमेदवारा संदर्भात प्रमुख पदाधिकारी कार्यकर्ते यांची बैठक डोंबिवली येथे पार पडली. बैठकीस ठाणे जिल्हाध्यक्ष रुपेश बबनराव थोरात, ठाणे जिल्हा महिला अध्यक्ष रीमा चेतन म्हात्रे, कोकण विभाग अध्यक्ष श्रीकांत भोईर, राज्य कार्यकारणी सदस्य भरत पाटील, अंबरनाथ तालुकाध्यक्ष अजय चौगुले, युवक अध्यक्ष तेजस बोंबले, सोशल मीडिया अध्यक्ष श्री औदुंबर कोळेकर,अजय कोकरे, अनुसूचित जमाती अध्यक्ष किरण कवटे तसेच इतर प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते. बैठकीत जिल्ह्यातील स्थानिक आगरी कुणबी व उत्तर भारतीय उमेदवारांना प्राधान्य देणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले.

No comments:

Post a Comment

चागंले संस्कार टिकविण्यासाठी वाचन संस्कृतीची गरज : डॉ. शंकर स्वामी वडेपुरीकर

चागंले संस्कार टिकविण्यासाठी वाचन संस्कृतीची गरज : डॉ. शंकर स्वामी वडेपुरीकर ‌पु.अहिल्यादेवी वाचनालयात " वाचन संकल्प महाराष्ट्राचा...