बीड जिल्ह्यात शिरूर कासार येथे राष्ट्रीय समाज पक्षाची कार्यकर्ता बैठक
शिरूर कासार (५/१०/२४) : राष्ट्रीय समाज पक्ष सार्वत्रिक विधानसभा निवडणूक २०२४ आष्टी पाटोदा शिरूर विधानसभा राष्ट्रीय समाज पक्ष स्वबळावर लढण्यासाठी सज्ज असल्याचे स्पष्ट करण्यात आले. रासप पदाधिकारी कार्यकर्ता बैठक पार पडली. या बैठकीमध्ये नवनियुक्त पदाधिकाऱ्यांच्या नियुक्ती झाल्या त्यामध्ये मधुकर केदार सर यांची राष्ट्रीय समाज पक्षाच्या विद्यार्थी आघाडी तालुकाध्यक्षपदी, कृष्णा डोंगरे यांची राष्ट्रीय समाज पक्षाच्या शिरूर शहराध्यक्षपदी, रामनाथ केदार यांची किसान आघाडीच्या तालुकाध्यक्षपदी निवड करण्यात आली.
बैठकीचे मार्गदर्शक म्हणून राष्ट्रीय समाज पक्षाचे प्रदेश सरचिटणीस डॉ. शिवाजीराव शेंडगे, मराठवाड्याचे मराठवाडा अध्यक्ष प्रा. विष्णू गोरे,बीड जिल्हाध्यक्ष प्रा. अण्णासाहेब मतकर, जिल्हाध्यक्ष कपिलभाऊ गाडेकर, लोकसभा अध्यक्ष विक्रम बप्पा सोनसळे, बीड विधानसभा अध्यक्ष माऊली मारकड, जिल्हा उपाध्यक्ष साईनाथ विघ्ने, आष्टी तालुका अध्यक्ष भाऊ दिंडे, पाटोदा तालुका अध्यक्ष आसाराम महानवर, सोशल मीडिया शिरूर तालुकाध्यक्ष ओंकार भैय्या शिंदे, महिला आघाडी पाटोदा तालुकाध्यक्ष कविता राहिंज, महिला गाडी तालुका उपाध्यक्ष अनिता महानवर, आष्टी तालुका उपाध्यक्ष लक्ष्मण भिसे, अमोल विघ्ने, किसन महानोर, गोविंद केकान, गणेश महानोर आदी उपस्थित होते. राष्ट्रीय समाज पक्ष पदाधिकारी कार्यकर्ता बैठकीचे आयोजन श्यामभाऊ महारनोर तालुकाध्यक्ष शिरूर कासार यांनी केले.
No comments:
Post a Comment