Sunday, October 20, 2024

मराठवाड्यात रासप तुल्यबळ उमेदवार देणार : प्रा. विष्णू गोरे

मराठवाड्यात रासप तुल्यबळ उमेदवार देणार : प्रा. विष्णू गोरे 


लातूर (१८/१०/२४) : राष्ट्रीय समाज पक्ष आगामी विधानसभा निवडणूक स्वतंत्रपणे लढणार असून, मराठवाड्यातील सर्व जागावर पक्ष्याकडून तुल्यबळ उमेदवार दिले जाणार आहेत. इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती पार पडल्या आहेत. उमेदवारांची पहिली संभाव्य यादी जाहीर झाली असल्याची माहिती रासपचे मराठवाडा अध्यक्ष प्रा.विष्णू गोरे यांनी पत्रकार परिषदेत दिली. पत्रकारांशी वार्तालाप करताना प्रा. गोरे म्हणाले की, राष्ट्रीय राष्ट्रीय समाज पक्षाचे अध्यक्ष महादेव जानकर यांनी विधानसभा निवडणुका स्वतंत्रपणे लढण्याची घोषणा केली आहे. कुठल्याही किंवा आघाडीत सहभागी न होता, सर्व 288 जागावर पक्षाकडून उमेदवार उभे केले जाणार असल्याचे त्यांनी जाहीर केले आहे. प्रा. गोरे यांनी सांगितले की, मराठवाड्यातील 46 जागांसाठी इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती पार पडल्या आहेत. त्यापैकी आठ ठिकाणचे उमेदवार जाहीर झाले आहेत. यात निलंगा मतदारसंघासाठी नागनाथ बोडके यांच्या नावाचा समावेश आहे. आगामी काही दिवसात उमेदवारांची दुसरी यादी पक्ष अध्यक्ष जाहीर करणार आहेत. 

ते म्हणाले की, उमेदवारी देताना पक्षाच्या निष्ठावंत कार्यकर्त्यांना प्राधान्य दिले जाणार आहे. पहिल्या यादीवरून हे स्पष्ट होते. इतर पक्षातील अनेक उमेदवार संपर्कात आहेत. माजी आमदार तसेच सामाजिक राजकीय क्षेत्रातील वजनदार व्यक्तिमत्व उमेदवारीची मागणी करत आहेत. दिनांक 22 रोजी उमेदवारी अर्ज भरण्यास सुरुवात होणार आहे. तत्पूर्वी यादी जाहीर होईल. बहुतांश उमेदवार पहिल्या दिवशी अर्ज दाखल करणार असल्याचे त्यांनी सांगितले. या पत्रकार परिषदेत पक्षाचे ग्रामीण जिल्हाध्यक्ष नागनाथ बोडके, शहर जिल्हाध्यक्ष दादासाहेब करपे यांची उपस्थिती होती.

No comments:

Post a Comment

चागंले संस्कार टिकविण्यासाठी वाचन संस्कृतीची गरज : डॉ. शंकर स्वामी वडेपुरीकर

चागंले संस्कार टिकविण्यासाठी वाचन संस्कृतीची गरज : डॉ. शंकर स्वामी वडेपुरीकर ‌पु.अहिल्यादेवी वाचनालयात " वाचन संकल्प महाराष्ट्राचा...