Sunday, October 20, 2024

रासपची भोकर मतदारसंघात बैठक; तालुका कार्यकारणी जाहीर

रासपची भोकर मतदारसंघात बैठक; तालुका कार्यकारणी जाहीर

भोकर (६/१०/२४ ) : येथे राष्ट्रीय समाज पक्षाची बैठक पार पडली. बैठकीस राष्ट्रीय संघटक गोविंदराव शिर्नर मराठवाडा अध्यक्ष प्राध्यापक विष्णू गोरे नांदेड जिल्हाध्यक्ष भगवानराव मुंढे उपस्थित होते. प्राध्यापक गोरे यांनी विधानसभा निवडणुकीचा आढावा घेऊन, विधानसभा उमेदवार तयार करावे, उमेदवार मिळाला नसेल तर तालुकाध्यक्ष स्वतः उमेदवार म्हणून उभा टाकण्याची तयारी करावी, असे आवाहन केले. राष्ट्रीय समाज पक्ष भोकर विधानसभा मतदारसंघात शड्डूूू ठोकणार याची चर्चा संपूर्ण मतदारसंघात आहे

बैठकीत कार्यकर्त्यांना पक्ष प्रवेश देण्यात आला. तसेच भोकर तालुका कार्यकारिणीची नियुक्ती पुढील प्रमाणे करण्यात आली. तालुकाध्यक्ष भिमराव टेकाळे, उपाध्यक्ष मारोती भरणे, साहेबराव गोरठकर, जगदीश पपुलवाड, महासचिव दिंगबर पपुलवाड, सचिव एकनाथ जिल्हेवाड, पांडुरंग चेवले, शेख मुस्तफा, कोषाध्यक्ष व्यंकट हामंद, संघटक महंमद गौस, संजय राठोड, संपर्क प्रमुख वसंत जाधव, सोशल मिडिया प्रमुख कृष्णा बनसोडे, कार्यकारिणी सदस्य सय्यद रिजवान, बालाजी अस्वलमारे, किशोर बनसोडे,जळबा क्षिरसागर, पुंडलिक बिरगाळे, पृथ्वीराज वाघमारे, विजयकुमार सलगरे यांना नियुक्ती देण्यात आली. यावेळी नांदेड शहराध्यक्ष दिपक कोटलवार, सुर्यकांत गुंडाळे, तसेच अनेक कार्यकर्ते उपस्थितीत होते. आयोजक मारोती वरणे यांनी सर्वांचे आभार मानले.

No comments:

Post a Comment

चागंले संस्कार टिकविण्यासाठी वाचन संस्कृतीची गरज : डॉ. शंकर स्वामी वडेपुरीकर

चागंले संस्कार टिकविण्यासाठी वाचन संस्कृतीची गरज : डॉ. शंकर स्वामी वडेपुरीकर ‌पु.अहिल्यादेवी वाचनालयात " वाचन संकल्प महाराष्ट्राचा...