Sunday, October 20, 2024

राष्ट्रीय समाज पक्षाच्या तिकिटावर निवडणूक लढवून सत्तेत भागीदारी मिळवा : महादेव जानकर

राष्ट्रीय समाज पक्षाच्या तिकिटावर निवडणूक लढवून सत्तेत भागीदारी मिळवा : महादेव जानकर 

राष्ट्रीय समाज पक्ष उत्तर भारतीय आघाडीची अंधेरीत बैठक 

मुंबई (२/१०/२४) : घर, कपडे, भाकरी कोणीही देईल, पण राजसत्ता कोणी देणार नाही, राजसत्ता मिळवायची असेल तर ती स्वत:च्या ताकदीवर मिळवावी असे गुरु गोविंद सिंह यांनी सांगितले आहे, असे विचार राष्ट्रीय समाज पक्षाचे संस्थापक राष्ट्रीय अध्यक्ष महादेव जानकर यांनी मांडले. मुंबईत राहणाऱ्या उत्तर भारतीयांनी राष्ट्रीय समाज पक्षाचे तिकीट घेऊन आपली भागीदारी निश्चित करावी, असे प्रतिपादन रासप सर्वेसर्वा महादेव जानकर यांनी केले. राष्ट्रीय समाज पक्ष उत्तर भारतीय आघाडीची अंधेरी पश्चिम विधानसभा कार्यकर्ता बैठकीचे आयोजन रा.स.पा. उत्तर भारतीय आघाडी अध्यक्ष संजय उपाध्याय यांच्या अध्यक्षतेखाली केले होते. उत्तर भारतीय मेळाव्यात महादेव जानकर यांनी खास उपस्थित राहून उत्तर भारतीय राष्ट्रीय समाज पक्ष पदाधिकारी कार्यकर्ते यांना मार्गदर्शन केले. मेळाव्यात परिदाजी फिल्म निर्माता निर्देशक एड. सुश्री निशा अरोराजी, ऋषि दुबे, म्यूजिक डायरेक्टर गायक साहिल रयान, विलासमूर्ति, संजय बोरीकर, रासपा मुंबई अध्यक्ष विट्ठल यमकर, अंधेरी अध्यक्ष लक्ष्मण लेंगरे, लल्लन पाल, जीवाजी लेंगरे, रामलाल यादव, रामपाल, इकबाल अंसारी, रणजित मुळे, अमोल गोरड व अन्य राष्ट्रीय समाज पक्ष उत्तर भारतीय आघाडी शेकडो कार्यकर्ता उपस्थित होते. सर्वांनी एकमताने सांगितले की आगामी सार्वत्रिक विधानसभा निवडणुकीत मुंबईमध्ये राष्ट्रीय समाज पक्षाच्या पाठीशी ठामपणे राहून एक रणनीती तयार करण्यात आली.

No comments:

Post a Comment

चागंले संस्कार टिकविण्यासाठी वाचन संस्कृतीची गरज : डॉ. शंकर स्वामी वडेपुरीकर

चागंले संस्कार टिकविण्यासाठी वाचन संस्कृतीची गरज : डॉ. शंकर स्वामी वडेपुरीकर ‌पु.अहिल्यादेवी वाचनालयात " वाचन संकल्प महाराष्ट्राचा...