विदर्भात रासपचा झटका.! भाजपला मोठा फटका..!!
मुंबई |१८ ऑक्टोबर २०२४: 2014 पासून महायुतीत घटक पक्ष असणाऱ्या राष्ट्रीय समाज पक्षाला 2019 च्या विधानसभा निवडणुकीपासून सातत्याने डावले जात असल्याची भावना, राष्ट्रीय समाज पक्षाच्या पदाधिकारी, कार्यकर्त्यांमध्ये होती. आणि हीच कार्यकर्त्यांची जनभावना लक्षात घेऊन राष्ट्रीय समाज पक्षाचे संस्थापक अध्यक्ष महादेव जानकर यांनी विधानसभा निवडणुकीची घोषणा होताच महायुतीतून बाहेर पडणार असल्याचे जाहीर करून राज्याच्या राजकारणात मोठी खळबळ उडवून दिली. महादेव जानकर यांच्या रासप पक्षाने बाहेर पडण्याच्या घोषणेनंतर महायुतीला एक मोठा झटका मानला जात आहे, राष्ट्रीय समाज पक्षाच्या झटक्याने महायुतीला पश्चिम महाराष्ट्र मराठवाड्यात मोठा फटका बसेल असे बोलले जात आहे.
जातीनिहाय जनगणना, देशात राहणाऱ्या प्रत्येक जात समूहाला संपूर्ण राष्ट्रीय भागीदारी, आरक्षणाचे सीलिंग हटाव, शिक्षणाचे एकात्म राष्ट्रीयकरण, बेरोजगारी, शेतमालाचे हमीभाव आदी मुद्यावर राष्ट्रीय समाज पक्षाने तीव्र आंदोलन छेडले आहेत.
विदर्भातील रासप नेत्याच्या दाव्याने खळबळ
महादेव जानकर यांनी केलेल्या स्वबळाच्या नाऱ्याने राज्याच्या राजकारणात निवडणुकीतील गणिते, समीकरणे बिघडले आहेत. मोठ्या प्रमाणात उलथापालथ घडत आहे. पश्चिम महाराष्ट्र, मराठवाड्यात महायुतीला फटका बसेल, अशी चर्चा चालू असतानाच भाजपची मदार आसलेल्या विदर्भात रासप नेते तोसिफ शेख यांनी केलेल्या दाव्याने मोठी खळबळ उडाली आहे. पत्रकार परिषद घेऊन शेख यांनी म्हटले आहे, उमेदवारांची यादी 19 तारखेला जाहीर करणार आहे. स्फोटक मतदार संघाची यादी 22 तारखेला जाहीर करणार असल्याचेही तौसीफ यांनी म्हटले आहे. यादरम्यान महायुतीतील अनेक इच्छुक उमेदवार राष्ट्रीय समाज पक्षाच्या संपर्कात असून विदर्भातील अकोला, वाशिम , बुलढाणा येथे पक्षाचं खातं निश्चितपणे उघडणार असल्याचा ठाम विश्वासही त्यांनी व्यक्त केला. त्यांच्या दाव्याने महायुतीतील अनेक तुल्यबळ नेते राष्ट्रीय समाज पक्षाच्या गळाला लागतात का? हे पहावे लागेल. असे झाले तर रासपचा झटका भाजपला बसणार मोठा फटका म्हणावे लागेल.
गत दोन-तीन वर्षापासून विदर्भात गडचिरोली, भंडारा, वर्धा, अमरावती, अकोला, चंद्रपूर, बुलढाणा जिल्ह्यात राष्ट्रीय समाज पक्षाने जोरदारपणे मोर्चेबांधणीस सुरुवात केली होती. नुकत्याच अकोला येथे मराठा भवन मध्ये पार पडलेल्या राष्ट्रीय समाज पक्षाच्या २१ व्या वर्धापनदिन कार्यक्रमात राष्ट्रीय समाज पक्षाच्या पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी आक्रमक भाषणे केली होती. रासपचे सर्वेसर्वा महादेव जानकर यांनीही स्वतःच्या ताकदीवर विधानसभा निवडणुकीला सामोरे जाण्याचे स्पष्ट संकेत मेळाव्यातून दिले होते.
No comments:
Post a Comment