पर्वती विधानसभा मतदारसंघात भाजप काँग्रेसच्या कार्यकर्त्यांचा रासपमध्ये प्रवेश
पुणे (८/१०/२४) : पुण्यातील पर्वती विधानसभा मतदारसंघात राष्ट्रीय समाज पक्षाची बैठक पार पडली. यावेळी भाजप आणि कॉंग्रेसमधील अनेक कार्यकर्त्यांनी रासपमध्ये प्रवेश केला. रासपचे पुणे शहराध्यक्ष बालाजी पवार यांच्या उपस्थितीत कार्यकर्त्यांनी रासपमध्ये प्रवेश केला. यावेळी पर्वती विधानसभा अध्यक्षपदी अक्षय खर्डेकर यांची नियुक्ती करण्यात आली. यावेळी पुणे शहराध्यक्ष बालाजी पवार यांनी पुण्यातील ८ मतदारसंघातून राष्ट्रीय समाज पक्ष निवडणूक लढविणार असा दावा केला आहे. पवार म्हणाले, पुण्यात रासपची मोठी ताकद आहे, पुण्यात राष्ट्रीय समाज पक्षाने अनेक कामे केली आहेत, त्यामुळे आमचे सर्व उमेदवार निवडून येतील, असा विश्वास रासपचे पुणे शहराध्यक्ष बालाजी पवार यांनी व्यक्त केला. तसेच मी खडकवासला विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढविण्यास इच्छूक आहे, महादेव जानकर यांनीही तयारी करण्याचे आदेश दिले आहेत. खडकवासला मतदारसंघात रासपची मोठी ताकद आहे. ओबीसी, धनगर समाज तसेच महादेव जानकर यांना मानणारा मोठा गरीब मराठा वर्ग आहे. ईशान्य भारत प्रभारी प्रा. मनोज निडरकर सर यांच्या मार्गदर्शनात पश्चिम महाराष्ट्राचे अध्यक्ष संजय माने, पुणे लोकसभा अध्यक्ष अंकुश अण्णा देवडकर, पुणे शहर सचिव राजेश लवटे, सोशल मीडियाचे लक्ष्मण ठोंबरे, शहर संघटक नारायण यमगर, सौरभ लोंढे, जगप्पा नवले आदी पदाधिकारी व माता भगिनी उपस्थित होते.
पर्वती विधानसभा कार्यकारिणी घोषित
अध्यक्षदी अक्षय खर्डेकर, उपाध्यक्षदी प्रफुल्ल कांबळे, कार्याधक्षपदी किरण वड्डी, संपर्कप्रमुखपदी अतिश चव्हाण, सचिवपदी विनोद नितीनवरे, सहसचिव रोहन बाचल, संघटक दर्पण पासलकर, सदस्य पदावर प्रकाश कोकरे, संदीप खर्डेकर, आनंद दहिवळे, स्वप्निल खर्डेकर, गजानन चौधरी, राज काद्बुले, मयूर आडागळे, राम जाधव, कृष्णा माडेवार, किरण मते, गणेश रणदिवे, राहुल कोथम्बीरे, मयूर घाणेक यांची नियुक्ती करण्यात आली. या निवडीबद्दल रासपचे राष्ट्रीय अध्यक्ष महादेव जानकर यांनी अभिनंदन केले आहे.
No comments:
Post a Comment