Friday, October 18, 2024

सर्वांना राम राम करणारा पाहुणा काळाच्या पडद्याआड

रासपचे निष्ठावंत कार्यकर्ते गोरक्षनाथ कोकरे यांना पितृशोक

सर्वांना राम राम करणारा पाहुणा काळाच्या पडद्याआड

रासपचे निष्ठावंत कार्यकर्ते गोरक्षनाथ कोकरे यांचे वडील श्री. रामहरी दाजी कोकरे मामा यांचे काल वार्धाक्याने पुकळेवाडी ता- माण जिल्हा सातारा येथे राहत्या घरी निधन झाले. कोकरे मामा हे स्वदेशी मील मध्ये कामाला होते. त्यानंतर त्यांनी गावात फॉरेस्ट रक्षक म्हणून काम केले. कोकरे मामा हे ग्रामपंचायतचे शिपाई होते. लिहिता वाचता येत नसले, तरी त्यांनी गावची सेवा, अत्यंत जबाबदारीने आणि प्रामाणिकपणे पार पाडली. लहान मुलांना गोळ्या बिस्कीट देऊन गावाला पाणीपुरवठा करणारी मोठी पाण्याची टाकी नेहमी स्वच्छ करून घेत होते. यांना टाकी धुवून घ्या, असे कधी सांगावे लागले नाही. कोणी सांगो अथवा न सांगो जन्ममृत्यूच्या नोंदीचे अर्ज, कोकरे मामा ग्रामसेवकापर्यंत पोहोचवायचे, पण बऱ्याचशा नोंदी ग्रामसेवकाने नोंदवल्याच नसल्याचे अनेक वेळा समोर आले. विठ्ठल बिरूदेवाची सेवा त्यांची असायची. लहान मुलगा असो किंवा मोठी व्यक्ती असो, त्यांना ते मोठे आवाजात खणखणीत माणदेशी रांगड्या भाषेत राम राम म्हणायचे. सर्वांना राम राम म्हणणारे कोकरे मामा यांनी काल अखेरचा श्वास घेतला, त्यांच्या स्मृतीस भावपूर्ण श्रद्धांजली. 💐

शोकाकुल : राष्ट्रीय समाज पक्ष, यशवंत नायक व राष्ट्रभारती परिवार

No comments:

Post a Comment

चागंले संस्कार टिकविण्यासाठी वाचन संस्कृतीची गरज : डॉ. शंकर स्वामी वडेपुरीकर

चागंले संस्कार टिकविण्यासाठी वाचन संस्कृतीची गरज : डॉ. शंकर स्वामी वडेपुरीकर ‌पु.अहिल्यादेवी वाचनालयात " वाचन संकल्प महाराष्ट्राचा...