५० दिवस संपले; धनगर समाज आरक्षणासाठी राज्य सरकारची कार्यवाही शून्य : धनगर समाज आक्रमक
धनगर समाजाची दिवाळी गोडची जाहिरात करून शासनाकडून थट्टा
मुंबई : आबासो पुकळे
धनगर समाजाच्या अनुसुचित जमाती आरक्षणासाठी शासनाने मागून घेतलेला ५० दिवसांचा वेळ संपला असून, कोणतेही प्रकारची आरक्षणासाठी कार्यवाही न करता, बरोबर ५० दिवस संपल्याची संधी साधून धनगर समाजाला आरक्षणाच्या मुद्द्यावर भरकटवण्यासाठी राज्य सरकारने धनगर समाजाच्या उन्नतीकरिताच्या योजना प्रभावीरित्या राबविणार; शक्तीप्रदत्त समिती योजनांचे संनियंत्रण करणार असल्याचे सांगत वेळ मारून नेण्याचे धोरण अवलंबिले आहे.
कर्नाटक, गोवा राज्य सरकारने केंद्र सरकारकडे धनगर समाज अनुसुचित जमाती आरक्षणासाठी शिफारस केली आहे. मात्र महाराष्ट्रात खोटी आश्वासने देऊन धनगर समाजाची प्रत्येक सरकारने फसवणूक केली आहे. अनेक दशकांपासून धनगर समाज भाषिक, प्रांतिक, शाब्दिक भेद व राजकिय उदासीनता यामुळे अनुसुचित जमाती आरक्षनाच्या लाभापासून वंचित आहे. आपल्या मागण्याना घेऊन धनगर समाज वेळोवेळी उपोषण, आंदोलने, मोर्चाद्वारा शासनाकडे संघर्ष करत आहे.
धनगर समाजाची आरक्षण अंमलबजावणीची प्रमुख मागणी असताना महाराष्ट्र राज्य सरकारने पुन्हा एकदा योजनांचे गाजर दाखवून, धनगर समाजाला दिवाळी भेट, धनगर समाजाची दिवाळी गोड होणार अशा प्रकारची जाहिरातबाजी करून थट्टाच केली आहे. एकीकडे मराठा समाजाला ओबीसींचे आरक्षण मिळावे यासाठी राज्य सरकार सर्वोत्परी प्रयत्न करत आहे. मात्र धनगर समाजाच्या हक्काचे आरक्षण एसटी आरक्षण अंमलबजावणी मागणीकडे दुर्लक्ष करून केवळ योजनांची जाहिरातबाजी प्रचार प्रसार माध्यमात करत आहे. यामुळे धनगर समाजात असंतोषाचे वातावरण तयार झाले आहे.
आता म्हणे,
ReplyDelete" योजना *प्रभावीरीत्याने* राबविणार..."
म्हणजे या पूर्वी ज्या योजना राबविले गेले...माफ करा, सांगितले गेले त्या प्रभावीरीत्याने राबविले गेलेले नव्हते, हे आता असे समजावे का ? असो धन्यवाद, स्वतः अशी एका प्रकारे कबुली दिल्याबद्दल.
दरवेळी प्रमाणे याही वेळी एका नवीन शब्दाची भर...
शब्द : प्रभावीरीत्या.
बस एवढेच. जय मल्हार !