महादेव जानकर - शरद पवार भेट?
राष्ट्रीय समाज पक्ष स्वतंत्र लढणार : महादेव जानकर
दिल्ली (१९/१०/२३) : यशवंत नायक ब्यूरो
महादेव जानकर - शरद पवार यांच्या राजकीय भेटीच्या वृत्तामुळे महाराष्ट्राच्या राजकारणात चर्चांना उधाण आले होते. खुद्द महादेव जानकर यांनी दिल्लीत पत्रकारांशी बोलताना सांगितले की, मागच्या महिन्यात दिल्ली विमानतळावर शरद पवार साहेब यांची भेट झाली होती. पण त्या बैठकीत कोणतीही राजकीय चर्चा झाली नाही. भेटीवेळी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, दिग्विजय सिंग देखील उपस्थित होते, याकडे महादेव जानकर यांनी लक्ष वेधत शरद पवार यांच्या राजकीय भेटीचा मुद्दा खोडून काढला.
महादेव जानकर म्हणाले, जम्मू काश्मीर येथे राष्ट्रीय समाज पक्षाची बैठक पार पडली. वैष्णवीदेवीचे दर्शन घेतले. गाझियाबाद येथे राष्ट्रीय समाज पक्षाचा कार्यक्रम पार पडला. दिल्लीत राष्ट्रीय समाज पक्षाचे सर्व पदाधिकारी यांची बैठक आयोजित केली आहे. जन स्वराज यात्रेच्या माध्यमातून देशभर राष्ट्रीय समाज पक्षाचे मिशन लोकसभा सुरू आहे. अद्याप राष्ट्रीय समाज पक्षाची कोणासोबतही युती आघाडीची चर्चा झाली नाही. जर तरला महत्व नाही. लोकसभा निवडणूक राष्ट्रीय समाज पक्ष स्वतंत्रपणे लढणार आहे. राष्ट्रीय समाज पक्षाची झोपडीचा महाल कसा होईल, हे आम्ही पहात आहोत.
No comments:
Post a Comment