ढाकणीत सिद्धनाथ-जोगेश्वरी उत्सव भक्तिमय वातावरणात संपन्न
कुकुडवाड : ढाकणी येथे श्री सिद्धनाथ माता जोगेश्वरी यांचा मूर्तीचा वज्रलेप केल्यानंतरचा कार्यक्रम उत्साहात पार पडला. कार्यक्रमासाठी ज्योत मंगळवारी पहाटे ५:३० वाजता खरसुंडीच्या श्री सिद्धनाथ माता जोगेश्वरी मंदिरातून गावातील बहुसंख्य युवक व भक्तगण यांच्या उपस्थितीमध्ये आणण्यात आली. खरसुंडीतून ज्योत म्हसवड येथे सिद्धनाथ मंदिरात भेट घेऊन ढाकणी गावामध्ये आल्यानंतर फटाक्यांच्या आतषबाजीने ज्योतीचे स्वागत करण्यात आले. यानंतर मंदिरामध्ये मूर्ती-प्राणप्रतीस्थापना करून महापूजा व अभिषेक करण्यात आला. सायंकाळी पाच नंतर श्री. सिद्धनाथ माता जोगेश्वरी यांच्या पालखीचे मिरवणूक गावातून काढण्यात आली. यावेळी "सिद्धनाथाच्या नावानं चांगभलं, नाथसाहेबाच्या नावानं चांगभलं, वडाखालच्या राजाचं चांगभलं, देवाच्या घोड्याच चांगभलं, देवाच्या सासणाच चांगभलं" च्या गजरात भाविक भक्तांनी परिसर दणाणून सोडला व शेवटी महाप्रसाद घेऊन कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.
सायंकाळी म्हसवड येथील भजनी मंडळ कार्यक्रम ठेवण्यात आला होता, यामध्ये नाथाचे भजन झाले व रात्री ९ वाजता ह. भ. प. सतीश गोफणे महाराज यांचे कीर्तन ठेवण्यात आले होते. सर्व कार्यक्रम भक्तिमय वातावरणात पार पाडण्यासाठी सर्व ग्रामस्थ, भक्तगण तसेच पुजारी मंडळी यांनी मेहनत घेतली.
संकलन - नामदेव शिंदे, २२/११/२३
No comments:
Post a Comment