सिद्धप्पा अक्कीसागर, सत्यपाल महाराज यांना मौर्य क्रांती महा (सेवा) संघाचे पुरस्कार जाहिर
![]() |
मुंबई : यशवंत नायक ब्यूरो
राष्ट्रीय समाज एम्पलॉईज फेडरेशन (रासेफ)चे राष्ट्रीय अध्यक्ष सिद्धप्पा अक्कीसागर यांना मौर्य क्रांती महा (सेवा) संघाचा सत्य समाज प्रवाहक पुरस्कार जाहिर झाला आहे. सिद्धप्पा अक्कीसागर यांनी रिझर्व बँक ऑफ इंडियात नोकरी सांभाळून राष्ट्रीय समाजासाठी अतुलनीय योगदान दिलेले आहे. श्री. साहित्य क्षेत्रात, वैचारिक नवा विचार देण्याचे काम केले आहे. श्री. यांचे कार्य हे अतुलनीय अशा स्वरूपाचे आहे. तसेच सप्त खंजेरी वादक समाज प्रबोधनकार सत्यपाल महाराज यांना सत्यशोधक प्रबोधनकार पुरस्कार जाहीर झाला आहे. सत्यपाल महाराज यांनी संत तुकडोजी महाराज व गाडगेबाबा यांचे विचार विनोदी भजनाच्या माध्यमातुन पोहचले आहेत. मौर्य क्रांती महा(सेवा) संघाचे अधिवेशन दिनांक २६ व २७ नोव्हेंबर रोजी जेजुरी येथे पार पडत आहे. अधिवेशनात वेगवेगळ्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
No comments:
Post a Comment