Saturday, November 25, 2023

माढा लोकसभा मतदारसंघात राष्ट्रीय समाज पक्ष ताकदीने लढणार : महादेव जानकर

माढा लोकसभा मतदारसंघात राष्ट्रीय समाज पक्ष ताकदीने लढणार : महादेव जानकर

राष्ट्रीय समाज पक्ष माढा लोकसभा पदाधिकारी चर्चासत्र उत्साहात

नातेपुते (८/१०/२३) :  यशवंत नायक ब्यूरो 

राष्ट्रीय समाज पक्षाच्या जनस्वराज्य यात्रेला महाराष्ट्रात चांगला प्रतिसाद मिळत असून,आपण भल्या भल्यांची सत्ता धोक्यात आणल्याशिवाय राहणार नाही. माढा लोकसभा हा माझा घरचा मतदारसंघ असून, येथून आपण ताकतीने लढणार असल्याचे, रासपचे संस्थापक/ राष्ट्रीय अध्यक्ष महादेव जानकर यांनी जाहीर केले.

नातेपुते येथील चैतन्य कार्यालयात राष्ट्रीय समाज पक्षाचे माढा लोकसभा पदाधिकारी चर्चासत्र महादेव जानकर यांच्या उपस्थितीत पार पडले. यावेळी लोकसभा निवडणूक 2024 या विषयावर विचारमंथन करण्यात आले. नातेपुते नगरीत जानकर यांचे आगमन झाल्यावर दहिगाव चौकात जेसीबीच्या साह्याने पुष्पष्टी करून कार्यकर्त्यांनी थाटामाटात जंगी स्वागत केले. यावेळी प्रवक्ते संजय वलेकर यांनी नोटाचा हार घालून महादेव जानकर यांचे स्वागत केले. माळशिरस विधानसभा मतदारसंघातील अकरा जिल्हा परिषद गट आणि चार नगरपंचायतचा आढावा वलेकर यांनी घेतला व निवडणुकीत जानकर यांना मोठे मताधिक्य देण्याचा निर्धार व्यक्त केला. यावेळी सर्वच तालुकाध्यक्षानी आपापल्या मतदारसंघाची माहिती सांगितली.

यावेळी फुले पिठावर महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष काशिनाथ शेवते, राज्य महासचिव माऊली सलगर, प. महाराष्ट्र अध्यक्ष संजय माने, सोलापूर जिल्हा नियोजन समिती सदस्य सोमनाथ मोटे, राज्य कार्यकारणी सदस्य वैशालीताई विरकर, बबनदादा विरकर, प. महाराष्ट्र युवक आघाडी अध्यक्ष अजित पाटील, ताजुद्दीन मनेर, सातारा जिल्हाध्यक्ष खंडेराव सरक, राजाभाऊ वाघमोडे, सोलापूर जिल्हाध्यक्ष रणजित सुळ, बशीर काझी, उमाजी चव्हाण, शंकर शेंडगे अमरजीत जानकर, सहदेव कपने, नारायण देवकाते, आबा मिटकरी यांचेसह पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते. प्रास्ताविक सोलापूर रणजीत सुळे यांनी तर सूत्रसंचालन विकास किसवे यांनी केले.

No comments:

Post a Comment

चागंले संस्कार टिकविण्यासाठी वाचन संस्कृतीची गरज : डॉ. शंकर स्वामी वडेपुरीकर

चागंले संस्कार टिकविण्यासाठी वाचन संस्कृतीची गरज : डॉ. शंकर स्वामी वडेपुरीकर ‌पु.अहिल्यादेवी वाचनालयात " वाचन संकल्प महाराष्ट्राचा...