Sunday, November 26, 2023

लाखो भाविकांच्या उपस्थितीत सिध्दनाथ - जोगेश्वरीचा शाही विवाह मोठ्या थाटात संपन्न

लाखो भाविकांच्या उपस्थितीत सिध्दनाथ - जोगेश्वरीचा शाही विवाह मोठ्या थाटात संपन्न 

म्हसवड : (दिलीपराज कीर्तने) लाखो भाविकांचे अराध्य व कुलदैवत तसेच येथील ग्रामदैवत श्री सिध्दनाथ - जोगेश्वरी यांचा शाही विवाह सोहळा तुलसी विवाहादिवशी रात्री 12 वाजता धार्मिक विधीपूर्वक, पारंपारिक पध्दतीने लाखो भाविकांच्या उपस्थितीत थाटात संपन्न झाला. 

    तब्बल महिनाभर चालणाऱ्या श्रींच्या मंगल विवाह सोहळ्याचा शुभारंभ दिवाळी पाडव्यादिवशी घटस्थापना,नवरात्रारंभ व श्रींच्याहळदी समारंभाने झाला. तुलसी विवाहादिवशी पहाटे साडेपाच वाजता मंदिराचे मुख्य पुजारी,सालकारी महेश गुरव यांच्या हस्ते आरती करुन मानकरी,सेवेकरी व नवरात्रकरींच्या उपस्थितीत श्रींचे 12 दिवसाचे घट उठविण्यात आले. घट उठविल्यानंतर 12 दिवसाच्या नवरात्राच्या उपवासाची सांगता होऊन उपवास सोडण्यात आले. 

 या सोहळ्यासाठी पहाटेपासूनच भाविकांनी मंदिरात गर्दी केली होती. विवाहासाठी श्री सिध्दनाथ हत्तीवरून गेले होते, अशी अख्यायिका असल्याने व मंदिरातील बाहेरच्या मंडपात सहा फूट लांब व साडेचार फूट उंचीचा अखंड पाषाणाचा हत्ती आहे.या हत्तीची आकर्षक अशी सजावट करण्यात आली. त्यानंतर सुशोभित केलेली अंबारी हत्तीवर बसविण्यात आली. संध्याकाळी पाच वाजता श्रींची पंचधातूची उत्सवमूर्ती हत्तीवरील अंबारीत विधीपूर्वक बसविण्यात आली. अर्थात विवाहाला जाण्यासाठी "वर" सज्ज झाला.            

नारळाची तोरणे, फुलांच्या माळा, ऊसाच्या मोळ्या, भव्य अशा दोन दीपमाळा आणि आकर्षक अशी विध्युत रोषणाई यांनी संपूर्ण हत्ती मंडप सुरेख सजविण्यात आला होता. दिवसभर हत्ती मंडपाच्या मागील मोकळ्या मैदानात पंचक्रोशीतील, खेड्यापाड्यातील भाविकांचा गजी- ढोलाचा कार्यक्रम अखंड सुरु होता. 

श्रींच्या मूर्तीसमोर चौक भरण्याचे व तेल उतरण्याचे काम परीट समाजातील महिलांनी केल्यानंतर सालकरी यांना हत्ती मंडपात आणण्यात आले. रात्री साडेअकराच्या सुमारास हत्तवरील अंबारीत स्थानापन्न केलेली श्रींची उत्सवमूर्ती सालकऱ्यांच्या छातीला बांधून मंदिरातील मुख्य गाभाऱ्यात नेण्यात आली. बाहेरील हत्ती मंडपातून आतील गभाऱ्यात श्रींची मूर्ती नेत असताना हजारो भाविक श्रींच्या मूर्तीस स्पर्श करण्यासाठी धडपडत होते आणि सालकऱ्यांसह श्रींची मूर्ती आतील गाभाऱ्यात विवाहाप्रित्यर्थ नेण्यासाठी पुजारी मंडळी पुढे जाण्यासाठी अटोकाट प्रयत्न करीत होते. ही रणधुमाळी सुमारे अर्धा तास सुरु होती. शेवटी मोठी रस्सीखेच होऊन श्रींची मूर्ती गाभाऱ्यात नेण्यात आली. त्यानंतर जोगेश्वरी देवीच्या मूर्तीसमोर आंतरपाट धरुन पारंपारिक पध्दतीने, विधीपूर्वक, पिंटू पाठक, प्रज्योत पाठक आदी पुरोहितांमार्फत मंगलाष्टका म्हणून श्रींचा शाही विवाहसोहळा रात्री 12 वाजता सनई-चौघडा, ढोल-ताशा, बँड, गजी झांज यांच्या जल्लोषात व फटाक्यांच्या आतषबाजीत, मोठ्या थाटात संपन्न झाला. 

पारंपारिक रिवाजानुसार श्रींच्या विवाहसोहळ्यानंतर मंदिरातील तुळसी विवाह तसेच पुजारी मंडळीच्या घरातील तुळसी विवाह संपन्न झाला. 

दरम्यान, यावेळी येथील, ए. पी. आय. राजकुमार भुजबळ देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष गणेश गुरव, उपाध्यक्ष वैभव गुरव, सर्व विश्वस्त, रविकिरण गुरव, सागर गुरव, मार्तंड गुरव, बजरंग गुरव, अजित गुरव, हरिभाऊ गुरव, महेश गुरव, सचिव दिलीप कीर्तने, (गुरव) श्रींचे मानकरी, सेवेकरी, नवरात्रकरी, दिवट्यांचे मानकरी, मानाच्या करवल्या, गावातील प्रतिष्ठीत नागरिक, पुरोहित, पुजारी मंडळी आणि हजारोंच्या संख्येने आवर्जून उपस्थित राहिलेल्या भाविकांच्या श्रींच्या नावाच्या व चांगभलेच्या जयघोषांनी मंदीर परिसर दुमदूमून गेला.

 श्रींच्या विवाहानंतरची "वरात" म्हणजे श्रींची "रथयात्रा"....ही रथयात्रा बुधवार दि.13 डिसेंबर रोजी  असून या दिवशी तब्बल एक महिना चालणाऱ्या श्रींच्या शाही मंगल विवाह सोहळ्याची सांगता होणार आहे.  या रथयात्रेसाठी दरवर्षी 6 ते 7 लाख भाविक आवर्जून उपस्थित असतात.

      श्रींचा विवाह मंदिराच्या गाभाऱ्यात संपन्न होतो, त्यामुळे बाहेरील भाविकांना तो पाहता येत नाही, ही अडचण ओळखून  देवस्थान ट्रस्टने हत्ती मंडपाच्या पाठीमागे मोठ्या पडद्यावर हा सोहळा सर्वांना पाहता येईल अशी सोय करण्यात आली आहे. शिवाय ज्या भाविकांना या सोहळ्यास उपस्थित राहता आले नाही त्या भाविकांना घरी बसून हा सोहळा पाहता येईल यासाठी ऑनलाईन, लाईव्ह पाहण्याची सोय देखील करण्यात आली असून, तमाम भाविकांनी यांचा लाभ घेण्याचे आवाहन देवस्थान ट्रस्टकडून करण्यात आले आहे.       

===============

छायाचित्र :::::

1) सुशोभित हत्तीवरील सजवलेल्या अंबारीत बसविलेली श्रींची मूर्ती,अर्थात विवाहाला जाण्यासाठी सज्ज झालेला " वर "

2) श्रीं सिद्धनाथ व माता जोगेश्वरी यांच्या विवाहासाठी आवर्जून उपस्थित असलेल्या भाविक भक्तांची प्रचंड गर्दी

3)विवाहासाठी सज्ज झालेल्या श्रींच्या पाषाण मूर्ती..

=========================

हेडाम : शिक्षणासाठी दाही दिशा शिकविणारा प्रेरणादायी संघर्ष

 ✍️🐏📚🐎📖✍️🐏📚🐎📖


हेडाम : शिक्षणासाठी दाही दिशा शिकविणारा प्रेरणादायी संघर्ष


***********************************************

साहित्यप्रकार : पुस्तक समीक्षण

*लेखन :* प्रा. डॉ. विजय शिरसाठ, अध्यक्ष, धनगर प्राध्यापक महासंघ, म.रा., चाळीसगाव, जि. जळगाव

मो. 8329830887

************************************************

        *अक्षरवाङमय* प्रकाशनाचे  संपादक *मा. बाळासाहेब घोंगडे* यांचा फोन आला आणि त्यांनी "सर, मी तुमच्यासाठी एक कादंबरी पाठवत आहे. ती आपण आवर्जून वाचावी." असं सांगितलं. काही दिवसांनी इतर पुस्तकांसोबत ती कादंबरी घरी येऊन धडकली आणि मीही बाळासाहेबांचे शब्द लक्षात ठेवून ती वाचून काढली. ती कादंबरी म्हणजे *नागु वीरकरांची " हेडाम "* "हेडाम" या शब्दाचा अर्थ होतो "देव व दानव यांच्यातील संघर्ष." कादंबरीचे शीर्षक अतिशय समर्पक आणि विषयाला न्याय देणारं आहे. अतिशय भयावह दारिद्र्य गाठीशी आणि अवघा संसार गाढववजा घोड्याच्या पाठीशी घेऊन रानोमाळ भटकणाऱ्या एका धनगर कुटुंबातील मुलाचं शिक्षणासाठी असलेला अविरत जीवघेणा संघर्ष "हेडाम" मध्ये बघायला मिळतो. *" हेडाम " कादंबरी ही तिचा नायक असणाऱ्या नागुची एकट्याची आत्मकथा नसून ती एका प्रकारे सतत भटकंतीचा कलंक माथी घेऊन जगणाऱ्या सर्वच भटक्या जमातींची आत्मकथा आहे.‌* नागु हा ग्रामीण, गरिबीने पिचलेल्या व भटक्या जमातीतील प्रत्येक व्यक्तीचं प्रतिनिधीत्व करतो. ग्रामीण भागात राहणाऱ्या शेतकरी, हातमजूर व पोटामागे पायपीट करत भटकंती करणार्‍या भटक्या जमातींच्या प्रत्येक तरुणाला नागु आपलासा वाटतो‌. कारण नागुच्या वाटेला आलेला संघर्ष हा कमी-अधिक प्रमाणात ग्रामीण भागातील खास करून भटकंती करणाऱ्या प्रत्येकाच्या वाटेला आलेला असतो. म्हणूनच, या सर्व जमातीतील प्रत्येक तरुणाचे प्रतिबिंब त्याच्यामध्ये आपल्याला बघायला मिळतं. शहरी विद्यार्थ्यांचा संघर्ष हा फक्त परीक्षा व्यवस्थेशीच असतो, मात्र ग्रामीण भागातील हात-मजूर, शेतकरी आणि विशेषतः भटक्या कुटुंबातील विद्यार्थ्यांचा संघर्ष हा चुलीपासून सुरू होतो. चूल, उंबरठा, अंगण, गल्ली, गाव, शिवार, दारिद्र्य, कुटुंबाचा अशिक्षितपणा आणि त्यातून आलेली भाऊबंदकी आणि द्वेष या अनेक राक्षसरुपी संकटांना शिक्षण घेणाऱ्या ग्रामीण विद्यार्थ्याला संघर्ष करावा लागतो. "हेडाम" मध्ये असा विविधांगी संघर्ष लेखकाने नेमकेपणाने टिपलेला आहे. तथापि, *हा संघर्ष इतका दाहक आणि वेदनादायी आहे की, कादंबरी संपेपर्यंत एखादा संवेदनशील वाचकाला किमान तीन-चारदा गहिवरून आल्याशिवाय राहत नाही.* तसेच, भटक्या जमातींचे काही वेगळे प्रश्न आहेत जे या कादंबरीत अधोरेखित होतात. दोन भटक्या जमातीतील टोळीयुद्ध (जसं हेडाममध्ये धनगर व पारध्यांमध्ये होतं), दरोडा, लूटमार, शेळी व मेंढी बांधावर गेली म्हणून शेतकऱ्यांकडून होणारी अमानुष मारहाण, गावगुंडांकडून शेळ्या-मेंढ्यांची चोरी, प्रसंगी महिलांवरील अत्याचार, लहान मुलांचं होणारं शैक्षणिक नुकसान, इ. भटक्यांचे अनेक प्रश्न हेडामच्या निमित्ताने समोर येतात. भटक्यांच्या या समस्यांची दखल ना कधी व्यवस्था घेत, ना कधी या भटक्यांना त्याची स्वतः जाणीव असते. याव्यतिरिक्त भटक्या जमातींच्या काही स्वतंत्र चालीरीती असतात. त्यांची संस्कृती व या चालीरीतींचं दर्शन हेडाममध्ये वाचकाला होतं.  

        कादंबरीतील अस्सल ग्रामीण बोलीने कादंबरीला ग्रामीण बाज प्रदान केलेला आहे. कादंबरीतील भाषेचा विकासही नागुच्या शैक्षणिक विकासासोबत होत जात असल्याचं चफल्लक व चाणाक्ष वाचकाच्या नजरेतून न सुटणारी गोष्ट आहे. 

     कादंबरीच्या शेवटच्या पानापर्यंत वाचकाला गुंतवूण ठेवण्याइतकं सुंदर गुंफण लेखकाने कथानकाचं केलेलं आहे. कादंबरीच्या प्रत्येक पानावर संघर्ष आणि प्रेरणा कोरलेल्या आहेत. भाषाही अलंकारिक, विलक्षण आणि वाचकाला खिळवून ठेवणारी आहे. कादंबरीमध्ये असे अनेक प्रसंग आहेत की जे वाचकाला गहिवरून सोडतात, अंगावर शहारे उभी करणारे असतात. त्यात वाचकाला भावनाविवश करून सोडणारा सर्वात महत्त्वाचा प्रसंग म्हणजे *'जेव्हा जालिंदर पोळ गुरुजी मेंढ्या चारण्यासाठी कुटुंबासोबत भटकंतीला निघालेल्या घोड्यावर बसलेल्या कोवळ्या नागुला त्याच्या आईवडिलांच्या विरोधाला न जुमानता शाळा शिकण्यासाठी स्वत:कडे राहण्याचं साकळं घालतात आणि क्षणाचाही विलंब न करता नागु होकार भरतो आणि पोळ गुरुजींनी हात वर केल्यावर थेट त्यांच्या अंगाला जाऊन बिलगतो'.* यावेळी पोळ गुरूजींच्या धारिष्ट्याला, शौर्याला, निष्ठेला आणि गोरगरिबांची मुले शिकली पाहिजेत, या भावनेला सलामच ठोकावा वाटतो. येथून नागूच्या शिक्षणाचा संघर्ष सुरू होतो. आई-वडील गावापासून कोसो मैल लांब असताना शालेय व महाविद्यालयीन शिक्षण घेतानाचा संघर्ष हा माणसाला हादरूण सोडणारा आहे. 

      कादंबरीचा शेवटही असाच अतिशय समर्पक, रोमहर्षक आणि हृदयस्पर्शी आहे. नोकरी लागल्यानंतर पहिल्यांदाच घरी आल्यावर नागु गावात वाटण्यासाठी पेढे आणतो. घरी पेढे मागण्यासाठी आलेल्या चुलती व कोंढा मावशीला पहिला पेढा देणे थेट नाकारतो, त्याला तो मान त्याला शिक्षणाच्या पवित्र गंगेत पोहायला शिकविणाऱ्या आपल्या जालिंदर पोळ गुरुजींना द्यायचा असतो. तो थेट आनंद या मित्राच्या मोटरसायकलवर जालिंदर पोळ गुरुजींचं गाव गाठतो आणि चावडीवर बसलेल्या जालिंदर पोळ गुरुजींना स्वतःची ओळख देत पहिला पेढा भरवतो आणि त्याच्या यशाचं संपूर्ण श्रेय सगळ्यांसमोर गुरुजींना देऊन मोकळा होतो. हे सर्व लेखकाच्या भाषेत सांगायला जास्त परिणामकारक होईल. नुकतीच नोकरीला लागलेला नागु गुरूजींना म्हणतो *" _'गुरुजी तुम्हाला भेटायला तुमचा लाडका विद्यार्थी आलाय.' गुरुजींनी माझ्यावर एक कटाक्ष टाकला. त्यांनी मला पुर्त ओळखलं नाही. तरी विद्यार्थी म्हटल्यावर मला जवळ बोलवून खांद्यावर हात ठेवत म्हणालं, 'काय म्हणतूयस बाळ बोल.' त्यांचा तो स्पर्श माझ्या अंगाला होताच माझं डोळे भरून आलं. रुमालानं डोळं पुसत पेढ्याचा बॉक्स पुढं करत दाटक्या कंटानं बोललू, 'गुरुजी पेढे घ्या! मी मास्तर झालोय ठाणे जिल्ह्यात.' आजूबाजूची मंडळी हा प्रसंग पहाताना गडबडली. नोकरी लागल्याचं पेढं द्यायला आलाय अन् ह्यो पोरगा रडतोय का? सारीच बुचकाळ्यात पडली. आनंद पुढं होत म्हणाला, 'गुरुजी ओळखलं तुम्ही चौथीत असताना धनगराच्या एका पोराला घोड्यावरून उतरून घेतलं होतं.' गुरुजींना भूतकाळात जाऊन लगेच भानावर येत म्हणालं, 'आरं तू धनगराचा नागू काय रं?' मानेनंच मी हो म्हणालू, गुरुजींनी मला जवळ ओढून घेत पाठीवर शाबासकीची धाप टाकली. गुरुजींच्या खादीच्या कपड्यांचा गंध मला अठरा-वीस वर्षांपूर्वी मागं घेऊन गेला. चौथीत गुरुजींनी घोड्यावरून उतरून घेतलं तेव्हा मी असाच बिलगलो होतू._"* हा संवाद ज्याने कादंबरीचा आधीचा भाग वाचला असेल त्याला इतका भावतो की, डोळ्यांतून अश्रू ओरघडल्याशिवाय राहत नाहीत.  नंतरचाही प्रसंग तेवढाच हृदयस्पर्शी ठरतो. नंतर नागु घरी येतो आपल्या पहिल्या पगारातून त्याने आईला घेतलेलं 'लुगडं' नेसण्यासाठी आग्रह धरतो आणि आयुष्यभर दांडं केलेले लुगडं वापरणार्‍या आईने नेसलेल्या नव्या-कोर्‍या लुगड्याच्या पदरात पेढ्यांचा अख्खा बॉक्स पालथा करतो आणि आईला गावात पेढे वाटण्यासाठी पाठवतो. बऱ्याच वर्षांआधी नागुच्या शिक्षणासाठी व फाटका संसाराला ठिगळं लावण्यासाठी आईने आपल्या छातीवर मोठा दगड ठेवून आपला एकुलता एक दागिना मोडलेला होता. नोकरीच्या पहिल्या पगारात आईला तो दागिना करून देण्याचं नागुचं स्वप्न असतं. म्हणून आईला सुरुवातीच्या पगारातून पैसे साठवून तो दागिना करून देतो. कादंबरीच्या शेवटी आलेले हे प्रसंग प्रत्येक वाचकाला आसवांची अंघोळ घातल्याशिवाय राहत नाहीत. याव्यतिरिक्त कादंबरीत असे अनेक प्रसंग आहेत जे वाचकाला साद घालत असतात आणि संकटांना सामना करण्यासाठी प्रेरणा देत असतात. त्यासाठी प्रत्यक्ष कादंबरीच वाचली पाहिजे.

     हेडाम वाचकाला "झोंबी", "उपरा", "उचल्या", "कोल्हाट्याचं पोर", "अक्करमाशी",  "जगायचंय प्रत्येक सेकंद", "माझ्या जल्माची चित्तरकथा", "अग्निपंख", "भुरा", "धडपडणाऱ्या तरुणांसाठी" "फेसाटी", इ. अनेक आत्मकथनात्मक यशोगाथांची आठवण करून देते. झोंबीतील आनंद्या स्वतःच्या बापाविरुद्धच बंड पुकारून घर सोडून पळून जाऊन शिक्षणासाठी वाट्टेल ते करायला तयार होतो, भुराचा नायक शरद अठरा विश्व दारिद्र्याचा कलंक माथी घेऊन अगदी परदेशात शिकतो आणि शेवटी जे. एन. यु. दिल्ली येथे फ्रेंच तत्त्वज्ञानाचा प्राध्यापक होतो, कोल्हाट्याचं पोर चा नायक किशोर स्वतःचं आत्मकथनातूनच तो ज्या विस्थापित जातीतून येतो तिची स्वत:सकट भयावह अवस्था मांडतो, तशीच काहीशी परिस्थिती उचल्याकार लक्ष्मण गायकवाड उचल्या समाजाची मांडतात, तीच गोष्ट नवनाथ गोरेनेही फेसाटीतून मांडली आहे. तरीही "हेडाम"चा नायकाचा संघर्ष या सर्व नायकांपेक्षा वेगळा आणि वाचकाला ऊर्जा देणारा  आहे. यातच कादंबरीच वेगळं पण दडलेलं आहे. 

     कादंबरीमध्ये असे अनेक प्रसंग येतात की, 'आता नागूचं शिक्षण संपलं' असं वाचकाला वाटायला लागतं. परंतु प्रत्येक वेळी काहीतरी वेगळा चमत्कार घडतो आणि त्याच्या शिक्षणाची रुळावरून उतरलेली गाडी पुन्हा रुळावर चढते. फेसाटीचा नायक नवनाथ योगायोगाने शिकत जातो, तर झोंबीचा नायक आनंदा व भुराचा नायक शरद सारखाच नागुही जाणिवेने शिकतो. एक मात्र निश्चित की, *पुरोगामी म्हटल्या जाणाऱ्या महाराष्ट्रातही जात व्यक्तीचा पाठलाग सोडत नसतेच*, हे सत्य नागुच्याही बाबतीत तेवढंच प्रखरतेनं खरं ठरतं.

    शालेय व महाविद्यालयीन शिक्षण घेत असताना प्रत्येकाच्या आयुष्यात कमी-अधिक प्रमाणात प्रेम प्रकरणाचा रोमांच उभा राहतो. किंबहुना, वयात आल्यावर वाटणाऱ्या शारीरिक आकर्षणातून व सहवासातून मनात प्रेमभाव फुलून येणं स्वाभाविक असतं. त्याला नागु तरी कसा अपवाद ठरणार? शालेय शिक्षण घेताना 'बनगरांची संगीता' व महाविद्यालयीन शिक्षण घेताना 'रंजना फडतरे' या दोन तरुणींशी नागुचं सूत जुळतं की काय असं वाटायला लागतं. अतिशय हुशार आणि अष्टपैलू असल्याने वर्गातील कुठलीही मुलगी त्याच्या प्रेमात पडेल असं व्यक्तिमत्व असलेला नागु मात्र घरच्या आर्थिक परिस्थितीची तीव्र जाणीव असल्याने परिणामांची तमा बाळगून वेळीच स्वतःला सावरतो, आणि कुठल्याही प्रेमप्रकरणात न अडकता यशाची अनेक शिखरे पादाक्रांत करत राहतो. त्याच्या या संघर्षात अनेक लोकांनी अडथळे आणले तरी, संघर्षात त्याला आई-वडील, भाऊ-वहिनी, काही नातेवाईक व आप्तेष्ट, मित्र, मैत्रिणी आणि शिक्षकांची प्रचंड साथ लाभते. समाजाची अवहेलना, टोमणे-टोपले ऐकत, कुठलीही लाज न बाळगता प्रचंड कष्टाची कामे उपसीत संघर्षशाली नागू शेवटी मुंबईत शिक्षक होतो. गाढवाच्या पाठीवर बसेल एवढा संसार असणार्‍या, अठरा विश्व दारिद्र्य माथी घेऊन भटकंती करणाऱ्या, प्रसंगी प्रस्थापितांच्या व आप्तेष्टांच्याही अन्यायाला बळी पडणाऱ्या आपल्या कुटुंबातील तो पहिला सरकारी नोकर ठरतो. त्याचा संघर्ष नुसता वेदनादायी नव्हे तर प्रेरणादायी सुद्धा आहे!

      अल्पावधीतच कादंबरीच्या दोन आवृत्या संपून आता तिसर्‍या आवृत्तीकडे तिची वाटचाल होणं, यातच तिच्या यशाचं गमक आहे.  

     शेवटी, *"हेडाम" कुणी वाचावी? तर नागु होऊन शिक्षण घेणार्‍या प्रत्येक विद्यार्थ्याने वाचावी, प्रत्येक विद्यार्थ्याच्या पालकाने नागुचा पालक होऊन वाचावी, प्रत्येक शिक्षकाने जालिंदर पोळ गुरूजी होऊन वाचावी; "हेडाम" वाचली जावी घराघरांत, वाड्या-वस्त्यांवर, गावा-गावांत आणि वर्गा-वर्गांत. प्रत्येक ग्रंथालयात पहिल्या पंगतीतच तिचं स्थान असावं, इतकी सुंदर आणि प्रेरणादायीसुद्धा ती आहे.* "हेडामच्या" भावी वाटचालीस हार्दिक शुभेच्छा! 


पुस्तकाचं शीर्षक : हेडाम

लेखक : नागु विरकर

पृष्ठ सं.: 252

मुल्य : 270

पुस्तकासाठी संपर्क : मा. बाळासाहेब घोंगडे, संपादक, अक्षरवाङमय प्रकाशन, पुणे मो. 9834032015


Saturday, November 25, 2023

महादेव जानकर - शरद पवार भेट?

महादेव जानकर - शरद पवार भेट?

राष्ट्रीय समाज पक्ष स्वतंत्र लढणार : महादेव जानकर

दिल्ली (१९/१०/२३) : यशवंत नायक ब्यूरो

महादेव जानकर - शरद पवार यांच्या राजकीय भेटीच्या वृत्तामुळे महाराष्ट्राच्या राजकारणात चर्चांना उधाण आले होते. खुद्द महादेव जानकर यांनी दिल्लीत पत्रकारांशी बोलताना सांगितले की, मागच्या महिन्यात दिल्ली विमानतळावर शरद पवार साहेब यांची भेट झाली होती. पण त्या बैठकीत कोणतीही राजकीय चर्चा झाली नाही.  भेटीवेळी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, दिग्विजय सिंग देखील उपस्थित होते, याकडे महादेव जानकर यांनी लक्ष वेधत शरद पवार यांच्या राजकीय भेटीचा मुद्दा खोडून काढला.

महादेव जानकर म्हणाले, जम्मू काश्मीर येथे राष्ट्रीय समाज पक्षाची बैठक पार पडली. वैष्णवीदेवीचे दर्शन घेतले. गाझियाबाद येथे राष्ट्रीय समाज पक्षाचा कार्यक्रम पार पडला. दिल्लीत राष्ट्रीय समाज पक्षाचे सर्व पदाधिकारी यांची बैठक आयोजित केली आहे. जन स्वराज यात्रेच्या माध्यमातून देशभर राष्ट्रीय समाज पक्षाचे मिशन लोकसभा सुरू आहे. अद्याप राष्ट्रीय समाज पक्षाची कोणासोबतही युती आघाडीची चर्चा झाली नाही. जर तरला महत्व नाही. लोकसभा निवडणूक राष्ट्रीय समाज पक्ष स्वतंत्रपणे लढणार आहे. राष्ट्रीय समाज पक्षाची झोपडीचा महाल कसा होईल, हे आम्ही पहात आहोत.

बिहारमध्ये आता एकूण ७५ टक्के आरक्षण ; ऐतिहासिक विधेयक विधानसभेत मंजूर

बिहारमध्ये आता एकूण ७५ टक्के आरक्षण; ऐतिहासिक विधेयक विधानसभेत मंजूर

नितिशकुमार - मुख्यमंत्री बिहार 

पाटणा : मुंबई यशवंत नायक ब्यूरो 

बिहारमध्ये आता ७५  टक्के आरक्षण लागू होणार आहे. बिहार विधानसभेत आरक्षण दुरुस्ती विधेयक २०२३ बिनविरोध मंजूर करण्यात आले. या विधेयकाला सर्व पक्षांनी मंजूरी दिली. यामुळे बिहारमध्ये फक्त २५ टक्के अनारक्षित कोटा शिल्लक राहिला आहे. हिवाळी अधिवेशनाच्या चौथ्या दिवशी आरक्षण दुरुस्ती विधेयक विधानसभेत मांडण्यात आले. यामुले राज्यात आता ७५ टक्के आरक्षण लागू करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. जातीनिहाय सर्वेक्षणाच्या अहवालानंतर मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी याबाबत घोषणा केली होती.

दुरुस्ती विधेयकात अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती आणि इतर मागासवर्गीयांसाठी सरकारी सेवांमध्ये १५ टक्के अतिरिक्त आरक्षण देण्याची तरतूद करण्यात आली आहे. मागासवर्गीयांसाठी १८ टक्के आरक्षण, अनुसूचित जातींसाठी २० टक्के आरक्षण तर अनुसूचित जमातींना २ टक्के आरक्षणाचा लाभ देण्याचा प्रस्ताव मंजूर करण्यात आला. हे संपूर्ण आरक्षण ६५ टक्के पर्यंत जाणार आहे. EWS चे १० टक्के आरक्षनामुळे बिहार राज्यात ७५ टक्के पर्यंत आरक्षण होईल.

लोकसभा निवडणुकीत ताकदीने काम करा, विजय आपलाच : महादेव जानकर

लोकसभा निवडणुकीत ताकदीने काम करा, विजय आपलाच : महादेव जानकर 

प्रशिक्षण शिबिरप्रसंगी काठी उंचावत राष्ट्रीय समाजाने आपल्या हाती राजदंड हाती घ्यावा असे सुचवताना राष्ट्रीय समाज पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष महादेव जानकर, बाजूस बाळकृष्ण लेंगरे, सोमनाथ मोटे, ज्ञानेश्वर सलगर.

आगामी काळात देशाला रासप व महादेव जानकर तारु शकतात - निरगुडकर 

फलटण : यशवंत नायक ब्यूरो

आगामी लोकसभा निवडणुकीसाठी राष्ट्रीय समाज पक्षाच्या कार्यकर्त्यांनी ताकदीने काम करावे, विजय आपलाच आहे, असा आत्मविश्वास व्यक्त करताना कुठल्याही परिस्थितीत एक दिवस आपण या देशाच्या प्रधानमंत्रिपदी विराजमान होऊ, असा ठाम विश्वास रासपचे राष्ट्रीय अध्यक्ष महादेव जानकर यांनी रासपच्या शिबिरात उपस्थित पदाधिकाऱ्यांना दिला.

मातोश्री गार्डन मंगल कार्यालय बरड (ता. फलटण) येथे आ. महादेव जानकर यांच्या प्रमुख उपस्थितीत राष्ट्रीय समाज पक्षाचे प्रमुख पदाधिकाऱ्यांचे दोन दिवसीय शिबिर दिनांक ७ व ८ नोव्हेंबर २०२३ रोजी पार पडले. समारोपाच्या सत्रात मार्गदर्शन करताना आ. जानकर बोलत होते. यावेळी महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष काशिनाथ शेवते, प्रदेश सरचिटणीस सोमा मोटे, प्रदेश सचिव रवींद्र कोठारी, ज्‍येष्‍ठ पत्रकार अरविंद मेहता, राज्यातील सर्व विभाग व सर्व आघाडीचे विभागाध्यक्ष, राज्य कार्यकारिणी सदस्य, विभागीय कार्यकारिणी सर्व आघाडीचे जिल्हाध्यक्ष, जिल्हा संपर्क प्रमुख, लोकसभा अध्यक्ष उपस्थित होते.

दोन दिवसीय शिबिरात राष्ट्रीय समाज पक्षाचे उपस्थित पदाधिकारी/कार्यकर्ते.

सुमारे १० वर्षांपूर्वी राष्ट्रीय समाज पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष महादेव जानकर यांनी महिलांना राजकारणात ५० टक्‍के भागीदारी मिळाली पाहिजे ही भूमिका ठामपणे मांडली होती, तसेच जी जात या देशामध्ये ज्या प्रमाणात राहते, त्या प्रमाणात त्यांना सर्व क्षेत्रात भागीदारी मिळाली पाहिजे, याबाबत ठामपणे मतप्रदर्शन केले असल्याचा यावेळी राजकीय विश्लेषक प्रा. मनोज निगडकर यांनी निदर्शनास आणून दिले. आजची राजकिय परिस्थिती पाहता त्यांच्या पूर्वीच्या वरील वक्तव्यावरून त्यांच्या दूरदृष्टीचा अंदाज येत असल्याचे प्रा. निरगुडकर यांनी स्पष्ट केले. आगामी काळात राष्ट्रीय समाज पक्ष आणि महादेव जानकर हेच या देशाला तारू शकतात, यासाठी कार्यकर्त्यांनी ताकतीने कामाला लागावे व सत्तेत मोठ्या प्रमाणात सहभाग मिळवावा, असे आवाहन प्रा. निरगुडकर यांनी यावेळी केले. 

लोकहिताचा निर्णय घेण्याची संधी मिळताच, त्या संधीचा योग्य सदुपयोग करून  महादेव जानकर सर्वसामान्यांना दिलासा देणारा निर्णय घेतात.  ते दुग्धविकासमंत्री असताना दुधाचे दर खूप पडले होते, त्यामुळे दुग्ध व्यवसाय होतो. उत्पादक खूप आर्थिक अडचणीत आले होते, त्यावेळी मंत्री महादेव जानकर यांनी दुधाला पाच रुपये लिटर अनुदान व दूध पावडर पन्नास रुपये किलो अनुदान देण्याचा क्रांतिकारी निर्णय घेऊन दूध व्यवसायाला चांगले दिवस आनल्याचे  सोनाई उद्योग समूहाचे दशरथ माने यांनी निदर्शनास आणले. महादेव जानकर यांच्यामुळेच दुधाचा दर २२ रुपयावरून 38 रुपये पर्यंत वाढत गेला. शेतकरी हिताचे निर्णय महादेव जानकर यांनी घेतले. दूध उत्पादक शेतकऱ्यांच्या हातामध्ये पैसा आला.

भाषण कलेबाबत प्रा. शशांक मोहिते यांनी मार्गदर्शन केले. बाळासाहेब बिचुकले यांनी आर्ट ऑफ लिविंगचे धडे दिले. संतोष गायकवाड यांनी महाराष्ट्र केंद्र शासनाच्या योजनांसंदर्भात प्रशिक्षण दिले. कार्यकर्त्यांची शिबिर घेऊन प्रशिक्षण देण्याचे रासपच्या भूमिकेचे ज्येष्ठ पत्रकार अरविंद मेहता यांनी कौतुक केले. राष्ट्रीय संघटक बाळकृष्ण लेंगरे यांनी पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन केले. राष्ट्रीय समाज पक्ष अल्पसंख्याक आघाडी महाराष्ट्राचे अध्यक्ष ताजुद्दीन मनेर चाचा यांना पक्षाच्यावतीने भावपूर्ण श्रद्धांजली वाहण्यात आली.

रासप महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष काशिनाथ शेवते यांनी प्रारंभी सर्व उपस्थितांचे स्वागत व प्रास्ताविक केले. महाराष्ट्र प्रदेश मुख्य महासचिव ज्ञानेश्वर सलगर यांनी सूत्रसंचालन केले. सातारा जिल्हाध्यक्ष खंडेराव सरक आणि सोलापूर जिल्हाध्यक्ष रणजित सूळ यांनी शिबिराचे आयोजन व नियोजन करून उपस्थितांचे आभार मानले. दोन दिवसीय कार्यकर्ता प्रशिक्षण व मार्गदर्शन शिबिरात सुमारे शंभर पदाधिकारी उपस्थित होते. दोन्ही दिवस राष्ट्रीय अध्यक्ष जानकर यांनी शिबिर स्थळी कार्यकर्त्यासोबत जेवण केले आणि मुक्काम केल्याने सर्वांचा उत्साह दुणावल्याचे दिसून आले.

राजाबळी, राणी विंध्यावली आणि नवरात्र, दसरा, दिवाळी

राजाबळी, राणी विंध्यावली आणि नवरात्र, दसरा, दिवाळी

"बाणासुराने आपल्या सर्व धनाची मोजदाद करून अश्विन वैद्य त्रयोदशी धनपूजा केली. बाणासुराने वद्य चतुर्दशीस आणि वद्य अमावस्येस आपल्या सर्व सरदारांना उत्तम प्रकारचे खाणे देऊन मौजा मारल्या. नंतर कार्तिक शुद्ध प्रतिपदेस आपल्या सरदराना योग्यतेप्रमाणे देणग्या देऊन आपआपल्या मुलखी जाण्याचा हुकूम दिला. यावरून येथील एकंदर सर्व अबालवृद्ध स्त्रियास जो काय आनंद झाला की, त्यांनी कार्तिक शुद्ध द्वितीयेस आपआपल्या बांधवास यथाशक्ती भोजन घालून तृप्त केल्यावर स्त्रियांनी (रणांगणावरून परतलेल्या) पुरुषांना ओवाळून 'इडा पिडा जावो आणि बळीचे राज्य येवो' असे म्हणून राजा बळीची आठवण केली. त्यावेळेपासूनच आज दिवसपावेतो दरवर्षी दिपवाळीत भाऊबीजेस क्षत्रियांच्या कन्या आपापल्या बांधवांना येणाऱ्या बळीच्या आठवणीशिवाय दुसरा आशीर्वाद देत नाहीत. महात्मा ज्योतिराव फुले समग्र वाड्मय गुलामगिरीमध्ये राजा बळीच्या आठवणीसाठी दिवाळी साजरी केली जाते, हे स्पष्ट करतात. बाणासुर कोण होता?; बाणासूर राजा बळीचा पुत्र होता. राजा बळी कोण होता ? प्रल्हादाचा नातू तर हिरण्यकश्यपूचा पणतू होता. प्रल्हादाचा मुलगा विरोचन होता. विरोचनाचा मुलगा राजा बळी होता. हिरण्यकश्यपू प्रल्हादाचा पिता होता. हिरणाकक्ष आणि हिरण्यकप्यू यांनी इराणमधून आर्य- ब्राह्मण टोळीविरुद्ध लढा दिला होता. तत्पूर्वी, शंकासुराने इराणी लोकाविरुद्ध लढाया केल्या होत्या. बिरोबा, ज्योतिबा,  खंडोबा, म्हसोबा कोण होते?  हे सर्व राजा बळीचे सरदार होते.  महात्मा फुले आपल्या ग्रंथात लिहितात, याजकरिता एकंदर सर्व मराठ्यांनी हर एक शुभकार्य सुरू करण्याचे पूर्वी तळी उचलण्याचा संस्कार करण्याची सोडले नाही. त्यांनी त्या संस्कारात बिरोबा, धुळोबा, ज्योतिबा, खंडोबास दैवत मानून त्यांची नावाचे चांगभल बोलून 'तळी' उचलू लागले. (भंडारा, खोबरे पानाचा विडा तबकात मांडून ही तळी उचलली जात असे) यावरून हल्लीचे  मऱ्हाटे म्हणजे मांग, महार, कुणबी आणि माळी इत्यादी लोक दर आयतवारी (रविवारी) आपल्या कुलस्वामीच्या प्रतिमेवर पाणी घालून, त्यास कोरड्या भाकरीचा नैवेद्य दाखवल्याशिवाय आपल्या जिभेवर पाण्याचा थेंब सुद्धा ठेवीत नाहीत."

यंदाची नवरात्र झाली. दसरा झाला. नवरात्र- दसरा निमित्त टीव्हीवर अनेक कार्यक्रम झाले. वर्तमानपत्रात लेख आले, परंतु एकाही वर्तमानपत्रातून वा टीव्हीवरून नवरात्र आणि दसरा ज्यांच्यामुळे साजरा केला जातो, त्या राजा बळीच्या आणि राजा बळीची महासती पत्नी विंध्यावलीची एकानेही आठवण केली नाही. महाप्रतापी शेतकऱ्यांचा राजा - पशुपालकांचा राजा महाबळी, महासती विंध्यावलीने नऊ दिवस घटस्थापना करून, अग्नी समोर अन्न-पाण्याचा अंशही न घेता उपवास केला होता. तीच नवरात्र हिंदु बायका आजही साजरी करतात. राजा  बळी मोठा पराक्रमी, न्यायी, दानशूर राजा होता. सगळीकडे समृद्धी होती. प्रजा सुखी, समाधानी होती. राजाबळी क्षत्रिय राजा होता. आर्य, इराणी आणि क्षत्रिय राजे यांच्यामध्ये त्याकाळी निरंतर युद्ध चाले. कत्स, मत्स्य, वराह, नृसिंह, वामन, ब्रह्म आदी इराणी आर्य टोळ्यांचे राज्य होते. शंखासूर, हिरण्यकश्यपू, प्रल्हाद, विरोचन, कृष्ण, बळी, बाणासूर क्षत्रिय राजे होते. (बाणासूर कृष्णाचा व्याही होता. कृष्णाच्या प्रद्यूम नावाच्या मुलाबरोबर बाणासुराच्या उषा नावाच्या कन्येचा विवाह झाला होता.) शंखासूर आणि कत्स टोळी यांमधील युद्धात पराभव स्वीकारून शंखासूरासह दख्खनच्या डोंगराचा सहारा घ्यावा लागला होता.  राजा हिरण्यकश्यपने आपले क्षेत्र काबीज केले. तेव्हा कपटाने हिरण्यकश्यपूच्या मुलाला प्रल्हादाला फितवून नृसिंहाने हिरण्यकश्यपूचा खून केला. प्रल्हादाला आपली चूक कळाली. राजा प्रल्हादाचे राज्य वाढले. प्रल्हाद पुत्र विरोचन गादीवर बसला. राजा विरोचनाचा महाप्रतापी पुत्र म्हणजे राजा बळी होय. राजा बळीने नऊ खंडावर राज्य स्थापित केले. दहावा खंड काशीवर ब्रह्म वामनाचे राज्य होते. राजा बळीने प्रत्येक खंडावर एक खंडोबा नेमला. बिरोबा, ज्योतिबा, भैरोबा नावाचे सरदार नेमले.  महासुभा नेमला. तोच पुढे म्हसोबा म्हणून ओळखू जाऊ लागला. महाराष्ट्रदेशी देखील राजा बळीचे राज्य होते. दक्षिणेत केरळ राज्यात 'ओनम' नावाचा सण साजरा केला जातो. ओनम सण राजा बळीच्या स्वागतासाठी केला जाणारा केरळ राज्यातील सर्वात मोठा सण आहे. 'हर हर महादेव', 'महादेवाचे चांगभलं',  'खंडोबाचं चांगभलं', ' सिद्धनाथाच चांगभलं', 'धुळोबाच चांगभलं' बोलून खारीक, खोबर, भंडारा, गुलाल उधळत जय मल्हारचा घोष करीत संपूर्ण भारत राजा बळीने ताब्यात घेतला होता. काशीवर मात्र आर्य- ब्राम्हनांचे राज्य होते. काशी ताब्यात घेण्यासाठी राजा बळी आणि बटू वामन यामध्ये महायुद्ध लढले गेले. हे युद्ध नऊ दिवस चालले होते. युद्धावर गेलेल्या पुरुषांनी सुखरू परत यावे, आपला पती राजा बळी विजयी व्हावा, यासाठी राणी विंध्यावलीने सर्व माता- भगिनींच्या साथीने राजवाड्यासमोर खड्डा खणून लाकडे पेटवली, घटस्थापना केली. देवीचा जागर केला. फेर धरून रात्री जागली. आई जगदंबेची आळणी केली. ब्रह्म वामनाची इडा- पिडा जाऊन राजा बळी विजयी होऊन सुखरूप परत येवो, अशी आळवणी राणी विंध्यावली आणि भगिनींनी केली. हा देवाचा जागर नऊ दिवस चालला. हीच ती नवरात्र होय. दसऱ्याच्या दिवशी राजा बळीने विजय मिळवला. बटू वामन पळून गेला. वामनाच्या सैन्याचा पाडाव झाला. परंतु दुर्दैवाने वाने बळीला रणांगणावर वीरमरण आले. राज्य राखले पण राजा गमावला, असा तो विजयादशमीचा दिवस होता, तोच दसरा होय. (राज्यासाठी राजा बळीने बलिदान दिले, पुढे त्याची आठवण म्हणून बळी देण्याची प्रथा पडली असावी) राजा बळीचा पुत्र बाणासूर याला राजा नेमले. राजा बाणासुराने बटू वामनावर दसऱ्याच्या दिवशी शस्त्रपूजा करून सीमोल्लंघन करून काशीवर आक्रमण केले. अनेक दिवस युद्ध चालले. कपटी बटू वामनाचा पराभव केला. त्याचा वध केला. तोच अश्विन शुद्ध त्रयोदशीचा दिवस होय. विजयी राजा बाणासूराने त्या दिवशी काशीत प्रवेश केला. बाणासूराचा राज्याभिषेक झाला.

राजा बळीचे नऊ खंडावर राज्य होते. परंतु दहावे खंड व्यापी बाकी होते. बाणासुराच्या वामनावरील विजयाने एका ऐतिहासिक विजयाने दहा खंडावर संपूर्ण भारतावर राजा बळीच्या वारसदारांचे राज्य स्थापले गेले. हा आनंदाचा सर्वोच्च क्षण होता. म्हणून दीपमाळ लावून मोठ्या प्रमाणात आनंदोत्सव साजरा होऊ लागला. यामुळेच 'दिवाळी, दसरा आनंदाला नाही तोटा' असा सारा बहुजन समाज बोलू लागला. अश्विन शुद्ध चतुर्दशीच्या दिवशी अमावस्येच्या दिवशी राजा बाणासूराने आपल्या पराक्रमी सरदारांना, सैन्यांना गोडधोड खाऊ घातले. कार्तिक वद्य प्रतिपदेच्या दिवशी सरदारांना- सैन्यांना देणग्या देऊन सन्मान केला. कार्तिक शुद्ध द्वितीयेच्या दिवशी बहिणींनी युद्धावर परतलेल्या भावांची भोजन घालून ओवळणी केली. 'इडा पिडा टळो राजा बळीच राज्य येवो' अशी प्रार्थना केली. राजा बळीची दसरा दिवाळीत आजही आठवण केली जाते. राजा बळीच्या स्वागतासाठी दिवा दिपमाळ लावली जाते. आजही कोकणात 'देव दिवाळी' आणि 'राक्षस दिवाळी' साजरी केली जाते. परस दारात उभे राहून बहुजन समाज राजा बळीची आठवण करतो. पुढील दरवाजावर उभा राहून राजा बळीची आठवण करण्यास हा कुणबी- बहुजन का घाबरतो.? केरळ महाराष्ट्रात 'राजा बळीचे राज्य येवो' असे का म्हटले जाते? बटू वामनाने राजा बळीला पाताळात गाडले असून असून त्याचा पराभव झाला आहे, असेच साधारणता मानले जाते. 'ओनम'च्या दिवशी राजा बळी प्रजेकडे ये, असे केरळमध्ये मानले जाते. 'राजा बळीचे राज्य येवो', असे आजपर्यंत साकडे घालण्यास भारतीय समाज राजा बळीची परंपरा हळूहळू विसरत आहे. परंपरा विसरून तो राजा बळीचे राज्य पुन्हा कसे स्थापणार? म्हणून राजा बळीची महान परंपरा समोर मांडण्यासाठी हा लेखन प्रपंच मी केला आहे. बटू वामनाचे वारसदार आजही 'आळी मीळी गुपचिळी, राजा बळीचे कान पिळी' असे म्हणत कणकेचा बळी करून त्याचे आपट्याच्या पानाने त्याचे पोट फाडत आहेत. दर दसऱ्याला राजा बळीचा सांकेतिक खून - वध करीत आहेत. बहुजन हिंदू मात्र तीच तीच आपट्याची पानं घेऊन सोने लूटून आनंद साजरा करीत आहेत. बळी तो कान पिळी हा जगाचा नियम असताना, बटू वामन राजा बळीचा कान पिळत आहेत. याला जबाबदार इतिहास परंपरा विसरणारा, बहुजन -हिंदू भारतीय समाज आहे.

भारताचा खरा इतिहास, भारताची खरी परंपरा फक्त महात्मा ज्योतिराव फुले यांनी ओळखली होती. आपल्या विविध ग्रंथाद्वारे समोर मांडली होती. राजा बळीची परंपरा महात्मा ज्योतिराव फुलेंनी जिवंत ठेवली, त्यांचा आजन्म प्रचार केला.

महाराष्ट्र निर्माता, महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजीराजांचाही विसर पडला होता. राजा बळीसारखा विसर पडला होता. रायगड येथे जाऊन ज्योतिबांनी शिवस्मारक शोधले. भारतातील पहिली सार्वजनिक शिवजयंती ज्योतिबांनी सुरू केली. शिवरायांचा पहिला पोवाडा ज्योतिबांनीच गाय, तर मल्हारचा घोष करत सत्यशोधक समाजाची स्थापना केली. संक्रातीला हळदी-कुंकू, नवरात्री, शिवजयंतीला जागर घालून समाज जागृती केली. राष्ट्रमाता सावित्रीमाई फुलेंनी ज्योतिबांना त्यावेळी सावलीसारखी साथ दिली. महात्मा फुलेंमुळे राजा बळीची परंपरा, छत्रपती शिवरायांचा इतिहास महाराष्ट्राला दिसत आहे. परंतु नकली वारसदारांनी राजा बळी आणि छत्रपती शिवरायांच्या वारसाला भेटीकरणाद्वारे भ्रष्ट केले आहे. भटांच्या आळी-मीळी गुपचिळीला शह देण्याचे सामर्थ्य केवळ महात्मा ज्योतिराव फुले यांच्या विचारात आहे, फुलेवादात आहे. फुलेवादावर आधारित भारतात केवळ एकमेव राजकीय पक्ष दिल्ली ते गल्लीपर्यंत सत्ता स्थापनेचे लक्ष घेऊन वाटचाल करीत आहे, त्या राजकीय पक्षाचे नाव आहे 'राष्ट्रीय समाज पक्ष',  राजा बळीच्या परंपरेला आणि छत्रपती शिवरायांच्या इतिहासाला मांनणाऱ्यांचे महाराष्ट्रमध्ये बहुमत आहे. मूलनिवासी बहुजन भारतीय समाजाला 'राष्ट्रीय समाज' असे बलवाचक, राष्ट्रवाचक नाव रासपाने दिले आहे. नवरात्र गेली, दसरा गेला, दिवाळी आली आहे. राजा बळी, खंडोबा, ज्योतिबा, रानी विंध्यावली, छत्रपती शिवराय आणि महात्मा ज्योतिराव फुले यांच्यामुळे परंपरेला साजेशी दिवाळी साजरी करूया आणि सर्वजण मिळून म्हणूया.

 "इडा पिडा हटवू या!

राजा बळीचे राज्य स्थापूया !!"

- एस. एल. अक्कीसागर

राष्ट्रीय अध्यक्ष, रासेफ.

माढा लोकसभा मतदारसंघात राष्ट्रीय समाज पक्ष ताकदीने लढणार : महादेव जानकर

माढा लोकसभा मतदारसंघात राष्ट्रीय समाज पक्ष ताकदीने लढणार : महादेव जानकर

राष्ट्रीय समाज पक्ष माढा लोकसभा पदाधिकारी चर्चासत्र उत्साहात

नातेपुते (८/१०/२३) :  यशवंत नायक ब्यूरो 

राष्ट्रीय समाज पक्षाच्या जनस्वराज्य यात्रेला महाराष्ट्रात चांगला प्रतिसाद मिळत असून,आपण भल्या भल्यांची सत्ता धोक्यात आणल्याशिवाय राहणार नाही. माढा लोकसभा हा माझा घरचा मतदारसंघ असून, येथून आपण ताकतीने लढणार असल्याचे, रासपचे संस्थापक/ राष्ट्रीय अध्यक्ष महादेव जानकर यांनी जाहीर केले.

नातेपुते येथील चैतन्य कार्यालयात राष्ट्रीय समाज पक्षाचे माढा लोकसभा पदाधिकारी चर्चासत्र महादेव जानकर यांच्या उपस्थितीत पार पडले. यावेळी लोकसभा निवडणूक 2024 या विषयावर विचारमंथन करण्यात आले. नातेपुते नगरीत जानकर यांचे आगमन झाल्यावर दहिगाव चौकात जेसीबीच्या साह्याने पुष्पष्टी करून कार्यकर्त्यांनी थाटामाटात जंगी स्वागत केले. यावेळी प्रवक्ते संजय वलेकर यांनी नोटाचा हार घालून महादेव जानकर यांचे स्वागत केले. माळशिरस विधानसभा मतदारसंघातील अकरा जिल्हा परिषद गट आणि चार नगरपंचायतचा आढावा वलेकर यांनी घेतला व निवडणुकीत जानकर यांना मोठे मताधिक्य देण्याचा निर्धार व्यक्त केला. यावेळी सर्वच तालुकाध्यक्षानी आपापल्या मतदारसंघाची माहिती सांगितली.

यावेळी फुले पिठावर महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष काशिनाथ शेवते, राज्य महासचिव माऊली सलगर, प. महाराष्ट्र अध्यक्ष संजय माने, सोलापूर जिल्हा नियोजन समिती सदस्य सोमनाथ मोटे, राज्य कार्यकारणी सदस्य वैशालीताई विरकर, बबनदादा विरकर, प. महाराष्ट्र युवक आघाडी अध्यक्ष अजित पाटील, ताजुद्दीन मनेर, सातारा जिल्हाध्यक्ष खंडेराव सरक, राजाभाऊ वाघमोडे, सोलापूर जिल्हाध्यक्ष रणजित सुळ, बशीर काझी, उमाजी चव्हाण, शंकर शेंडगे अमरजीत जानकर, सहदेव कपने, नारायण देवकाते, आबा मिटकरी यांचेसह पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते. प्रास्ताविक सोलापूर रणजीत सुळे यांनी तर सूत्रसंचालन विकास किसवे यांनी केले.

छगन भुजबळ ओबीसी समाजाचे माईलस्टोन नेते : महादेव जानकर

 छगन भुजबळ ओबीसी समाजाचे माईलस्टोन नेते : महादेव जानकर
दोड्डी बुद्रुक येथे महादेव जानकर यांचे  नोटांचा हार घालून स्वागत केले. यावेळी सुदर्शन उगले व ग्रामस्थ.

नाशिक, दोंडोरी लोकसभा मतदार क्षेत्रात राष्ट्रीय समाज पक्षाची जन स्वराज यात्रा

नाशिक (१४/१०/२३) यशवंत नायक ब्यूरो : 

मंत्री छगन भुजबळ यांना धमकी देणं हे चूक आहे. ओबीसी समाजाचे माईलस्टोन नेते आहेत. भुजबळ आमचे दैवत असून असं काही होत असल्यास बाकीचा समाज गप्प बसणार नाही. माझं आवाहन आहे की, अशा धमकी देऊ नका, हे योग्य नाही.  छगन भुजबळांच्या भानगडीत पडू नका, नाहीतर आम्हाला विचार करावा लागेल, असा इशारा रासपचे महादेव जानकर यांनी दिला. 


राष्ट्रीय समाज पक्षाचे अध्यक्ष महादेव जानकर जन स्वराज यात्रेनिमित्त नाशिक दौऱ्यावर होते. त्यावेळी ते बोलत होते. राष्ट्रीय समाज पक्षाने सध्या राज्यभर जनस्वराज्य यात्रा सुरू केली असून, ही यात्रा कुणाला विरोध करण्यासाठी नसून जनतेच्या हितासाठी काढली असल्याचे महादेव जानकर यांनी म्हटले. आज सकाळी त्यांनी नाशिकच्या काळाराम मंदिरात  दर्शन घेत माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी छगन भुजबळांना आलेल्या धमकीचा जाहीर निषेध करत संबंधितांना सज्जड दमच दिला आहे. छगन भुजबळ यांच्या मागे लागू नका, आम्हाला विचार करावा लागेल असा इशारा जानकर यांनी दिला. 

महादेव जानकर यावेळी म्हणाले की, मराठ्यांना, धनगरांना, आदिवासींना आरक्षण  मिळाले पाहिजे, ही माझ्यासह अनेकांची भूमिका आहे. मात्र याआधी काँग्रेसने खेळवत ठेवलं, आता भाजप तेच करतं आहे. भाजप काँग्रेससारखे वागत असून आरक्षणासाठी लोकसभेत बील पास केले पाहिजे. यातून ओबीसींच्या आरक्षणाला धक्का न लागता मराठ्यांना आरक्षण द्या, अशी मागणी जानकर यांनी केली.  एकीकडे भाजपने धनगर समाजाला आरक्षणाचे आश्वासन द्यायचे, तर कोर्टात वनवासीच्या मार्फत याचिका दाखल करून धनगर समाजाला आरक्षण मिळू नये याचा बंदोबस्त करायचा, अशा शब्दात भाजपवर निशाणा साधला. कुठल्याही जातीत भेदभाव न करता सगळ्यांना आरक्षण मिळाले पाहिजे, अशी भूमिका जानकर यांनी मांडली. 

 राष्ट्रीय समाज पक्षाकडून मागील अडीच महिन्यापासून जन स्वराज यात्रेचा दौरा सुरू आहे. अनेक राज्यात आम्ही गेलो, जाणार आहे. जनतेचे राज्य आले पाहिजे, सगळे पक्ष साथ देत आहे, जन स्वराज यात्रेला लोकांचा प्रतिसाद मिळत असल्याचे जानकर म्हणाले. यावेळी महादेव जानकर यांच्या समवेत राष्ट्रीय समाज पक्षाचे राष्ट्रीय महासचिव कुमार सुशील, राष्ट्रीय संघटक बाळकृष्ण लेंगरे, राज्य महासचिव ज्ञानेश्वर सलगर, राज्य सचिव राजेंद्र पोथारे, नवनाथ शिंदे, विलास पलंगे आदी उपस्थित होते.

शेतकऱ्याला सरकारकडे भिक मागावी लागते हे दुर्दैवच - महादेव जानकर

शेतकऱ्याला सरकारकडे भिक मागावी लागते हे दुर्दैवच - महादेव जानकर

प्रीतिसंगमावर यशवंतराव चव्हाण यांच्या समाधीस्थळी अभिवादन करताना आ. महादेव जानकर, पंजाबराव पाटील, श्रीकांत देवकर, पुजाताई घाडगे व अन्य.

कऱ्हाड ( ९/११/२३) : यशवंत नायक ब्यूरो 

एका दाण्याचे हजार दाणे करण्याची ताकत असणाऱ्या शेतकऱ्याला राज्यकर्त्याकडे भिक मागावी लागते ही दुर्दैवाची बाब आहे. ही सिस्टीम बदलली पाहिजे. राज्याचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांनी शेतकऱ्यांची दिवाळी गोड होण्यासाठी शेतकऱ्यांच्या मागण्यांबाबत सकारात्मक निर्णय घ्यावा, अशी मागणी माजी मंत्री राष्ट्रीय समाज पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आ. महादेव जानकर यांनी कराड येथे केली.

बळीराजा शेतकरी संघटना व राष्ट्रीय समाज पक्ष यांच्यावतीने ऊस व दूध दराबाबत सरकारचे लक्ष वेधण्यासाठी कराड ते पाटण अशी रॅली काढण्यात आली. खास शेतकऱ्यांचा आवाज बुलंद करण्यासाठी आ. महादेव जानकर येथे आले होते. जेष्ठ नेते स्व. यशवंतराव चव्हाण यांच्या समाधिस्थळी अभिवादन करुन त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. ते म्हणाले, यशवंतराव चव्हाण यांनी सर्वसामान्य माणसांना राजकारणाची दारे खुली केली.

सत्तेचे विकेंद्रीकरण करण्याचे काम केले. शेतकरी हिताचे निर्णय घेतले. त्यामुळे संपूर्ण महाराष्ट्राला वीज पुरविण्याचे काम सातारा जिल्हा करत आहे. शेतकऱ्याला वीज, रस्ता देण्याचे काम त्यांनी केले. त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी या वर्षी शेतकऱ्यांची दिवाळी गोड करावी. सध्या शेतकरी संघटनेचे आंदोलन सुरू आहे. त्यांच्या मागणीनुसार उसाला पाच हजार दर टनाला द्यावा, दुधाला शंभर रुपये लिटर दर मिळावा, शेतकऱ्याला टोल माफी करावी, अशी अपेक्षा आहे. एका दाण्याचे हजार दाणे करण्याची ताकत शेतकऱ्यांत असून, जगाचा पोशिंद्याला आज राजकारण्यापुढे भीक मागावी लागत आहे, हे दुर्देवच आहे. शेतकरी व कामगारांच्या हिताचे निर्णय घेण्यासाठी मुख्यमंत्र्यांना सुबुद्धी द्यावी. ट्रॅक्टर रॅली पुढे एक शेतकरी आसूड उगारत होते. या रॅलीत गणेश शेवाळे, संदीप धुमाळ, श्रीकांत देवकर, पूजा घाडगे, कराड तालुका व पाटण तालुका रासप कार्यकर्ते व बळीराजा संघटना पदाधिकारी उपस्थित होते.

राष्ट्रीय समाज पक्षाला सत्ता द्या, दहा मिनिटात आरक्षणाचा प्रश्न मिटवू : महादेव जानकर

मराठा समाजाला आरक्षण मिळाले पाहिजे. संसदेत ओबीसी आरक्षणाचा कोटा वाढवला पाहिजे. 2009 साली मी पहिल्यांदा मराठा समाज हा ओबीसी आरक्षणाचा हक्कदार असल्याबाबत पुस्तक लिहले आहे. तामिळनाडूत 63 टक्के आरक्षण आहे, मग महाराष्ट्रात असे का होत नाही ? असा प्रश्न उपस्थित जनतेने हुशार झाले पाहिजे. आरक्षणाचा प्रश्न हा मी आमदार म्हणून अथवा राज्य शासनाच्या हातात नाही. तो दिल्लीच्या हातात आहे. मला खासदार करून पाठवा. दिल्लीत रासपचे सरकार आणा, पंजाबराव पाटील यांना कराडात रासपचे खासदार करा. मी तुमचा आरक्षणाचा प्रश्न दहा मिनिटात सोडवून टाकतो. आमच्या हातात सत्ता द्या. आमच्याजवळ आज सत्ता आहे का? आम्ही बाहेर आहोत. धनगर समाजाला सुद्धा न्याय मिळाला पाहिजे. देशात छत्रपती शाहू महाराज यांनी प्रथम आरक्षण सुरू केले. आज त्यांच्याच समाजाला 70 वर्षाने आरक्षण मागावे लागत असल्याची सांगत हे अपयश कोणाचे असा प्रश्नही माजी मंत्री महादेव जानकर यांनी उपस्थित केला आहे.

Friday, November 24, 2023

सिद्धप्पा अक्कीसागर, सत्यपाल महाराज यांना मौर्य क्रांती महा (सेवा) संघाचे पुरस्कार जाहिर

सिद्धप्पा अक्कीसागर, सत्यपाल महाराज यांना मौर्य क्रांती महा (सेवा) संघाचे पुरस्कार जाहिर 

मुंबई : यशवंत नायक ब्यूरो

राष्ट्रीय समाज एम्पलॉईज फेडरेशन (रासेफ)चे राष्ट्रीय अध्यक्ष सिद्धप्पा अक्कीसागर यांना मौर्य क्रांती महा (सेवा) संघाचा सत्य समाज प्रवाहक पुरस्कार जाहिर झाला आहे. सिद्धप्पा अक्कीसागर यांनी रिझर्व बँक ऑफ इंडियात नोकरी सांभाळून राष्ट्रीय समाजासाठी अतुलनीय योगदान दिलेले आहे. श्री. साहित्य क्षेत्रात, वैचारिक नवा विचार देण्याचे काम केले आहे. श्री. यांचे कार्य हे अतुलनीय अशा स्वरूपाचे आहे. तसेच सप्त खंजेरी वादक समाज प्रबोधनकार सत्यपाल महाराज यांना सत्यशोधक प्रबोधनकार पुरस्कार जाहीर झाला आहे. सत्यपाल महाराज यांनी संत तुकडोजी महाराज व गाडगेबाबा यांचे विचार विनोदी भजनाच्या माध्यमातुन पोहचले आहेत. मौर्य क्रांती महा(सेवा) संघाचे अधिवेशन दिनांक २६ व २७ नोव्हेंबर रोजी जेजुरी येथे पार पडत आहे.  अधिवेशनात वेगवेगळ्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. 




Wednesday, November 22, 2023

ढाकणीत सिद्धनाथ-जोगेश्वरी उत्सव भक्तिमय वातावरणात संपन्न

ढाकणीत सिद्धनाथ-जोगेश्वरी उत्सव भक्तिमय वातावरणात संपन्न

कुकुडवाड : ढाकणी येथे श्री सिद्धनाथ माता जोगेश्वरी यांचा मूर्तीचा वज्रलेप केल्यानंतरचा कार्यक्रम उत्साहात पार पडला. कार्यक्रमासाठी ज्योत मंगळवारी पहाटे ५:३० वाजता खरसुंडीच्या श्री सिद्धनाथ माता जोगेश्वरी मंदिरातून गावातील बहुसंख्य युवक व भक्तगण यांच्या उपस्थितीमध्ये आणण्यात आली.  खरसुंडीतून ज्योत म्हसवड येथे सिद्धनाथ मंदिरात भेट घेऊन ढाकणी गावामध्ये आल्यानंतर फटाक्यांच्या आतषबाजीने ज्योतीचे स्वागत करण्यात आले. यानंतर मंदिरामध्ये मूर्ती-प्राणप्रतीस्थापना करून महापूजा व अभिषेक करण्यात आला. सायंकाळी पाच नंतर श्री. सिद्धनाथ माता जोगेश्वरी यांच्या पालखीचे मिरवणूक गावातून काढण्यात आली. यावेळी "सिद्धनाथाच्या नावानं चांगभलं, नाथसाहेबाच्या नावानं चांगभलं, वडाखालच्या राजाचं चांगभलं, देवाच्या घोड्याच चांगभलं, देवाच्या सासणाच चांगभलं" च्या गजरात भाविक भक्तांनी परिसर दणाणून सोडला व शेवटी महाप्रसाद घेऊन कार्यक्रमाची सांगता करण्यात आली. 


सायंकाळी म्हसवड येथील भजनी मंडळ कार्यक्रम ठेवण्यात आला होता, यामध्ये नाथाचे भजन झाले व रात्री ९ वाजता ह. भ. प. सतीश गोफणे महाराज यांचे कीर्तन ठेवण्यात आले होते. सर्व कार्यक्रम भक्तिमय वातावरणात पार पाडण्यासाठी सर्व ग्रामस्थ, भक्तगण तसेच पुजारी मंडळी यांनी मेहनत घेतली. 

संकलन - नामदेव शिंदे, २२/११/२३

Wednesday, November 8, 2023

धनगर आरक्षणासाठी २०१४ नंतर आतापर्यंत झालेली आंदोलनं आणि ठळक घटना









 धनगर आरक्षणासाठी २०१४ नंतर आतापर्यंत झालेली आंदोलनं आणि ठळक घटना

  • 2014 ला लोकसभा व विधानसभा निवडणुकांवेळी नरेंद्र मोदी यांनी भाजप उमेदवारांच्या प्रचार सभांमध्ये धनगर आरक्षणावर भाष्य केलं होतं. विशेषतः पश्चिम महाराष्ट्रातल्या पट्ट्यात झालेल्या या सभांमध्ये त्यांनी धनगर आरक्षणाला हवा दिली होती. सोलापूर, बारामतीच्या सभेचा वारंवार उल्लेख केला जातो.

  • जानेवारी 2015 मध्ये नागपुरात धनगर आरक्षण अंमलबजावणी अधिवेशनात मुख्यमंत्र्यांनी धनगर आरक्षणावरून आम्ही मागे हटणार नसल्याचं आश्वासन दिलं होतं.
  • 2015 च्या पावसाळी अधिवेशनात जुलैमध्ये विरोधकांनी धनगरी वेषात विधानसभेबाहेर निदर्शनं करत सरकारचं लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला. सत्तेत आल्यानंतर एक महिन्याच्या आत धनगरांना अनुसूचीत जमातीचं आरक्षण लागू करण्याचं आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलं होतं. त्याला वर्ष झाल्यानिमित्त हे आंदोलन होतं.

  • 2017 ला मार्चमध्ये दिल्लीत झालेल्या भाजप खासदारांच्या बैठकीत धनगर आरक्षणाचा मुद्दा खासदार डॉ. विकास महात्मे यांनी उपस्थित केला होता. मोदींनी या बैठकीत धनगर आरक्षणास नकार दिल्याचे वृत्त Z 24 तास या वृत्त वाहिनीवर प्रसारित केले होते. 
  • नागपूर इथं हिवाळी अधिवेशनादरम्यान धनगर युवक मंडळातर्फे मोर्चा काढण्यात आला होता.
  • मे 2018 मध्ये आझाद मैदानात ढोलगर्जना आंदोलन करण्यात आलं. 
  • चौंडी, अहमदनगरमध्ये अहिल्यादेवी होळकर यांच्या जन्मदिवसानिमित्त लोकसभा अध्यक्षा सुमित्रा महाजन यांच्या उपस्थितीत आयोजित कार्यक्रमात धनगर समाजाच्या कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी केली. कार्यक्रमात व्यत्यय आणल्याबद्दल 51 कार्यकर्त्यांवर गंभीर गुन्हे दाखल करण्यात आले.
  • 2018 च्या ऑगस्ट महिन्यात राज्यभरात धनगर समाजातर्फे चक्का जाम आंदोलन करण्यात आलं होतं. शेळ्या-मेंढ्यांसह ढोलताशे, हलगी, पिवळे झेंडे घेऊन लोक आंदोलनात सहभागी झाले होते.
  • पुण्यातील आदिवासी विकास आणि प्रशिक्षण संस्थेत 24 ऑगस्टला भंडारा उधळण्यात आला. 
  • औरंगाबादेत 31 ऑगस्टला धनगर आरक्षणावरून समाजाचा मेळावा आयोजित करण्यात आला होता. या मेळाव्यात राज्यभरातून धनगर समाजाचे कार्यकर्ते आले होते.
  • राज्यात एक ही धनगड जातीची व्यक्ती नसल्याचा दावा करताना संयोजन समितीचे उत्तमराव जानकर आणि गोपीचंद पडळकर यांनी धनगड जातीची व्यक्ती दाखवा असं आवाहन केलं होतं.

  • पावसाळी अधिवेशनात आमदार रामराव वडकुते यांनी नियम 97 अन्वये धनगर आरक्षणावर चर्चा उपस्थित केली. या चर्चेदरम्यान विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी TISS ही स्वायत्त संस्था असल्याचं सांगत या संस्थेला कोणताही घटनात्मक अधिकार किंवा दर्जा नाही. असं असताना त्यांनी दिलेला अहवाल कायदेशीर पातळीवर कसा ग्राह्य मानला जाईल असा प्रश्न उपस्थित केला होता.
  • पुण्यात झालेल्या धनगर आरक्षण कृती समितीच्या राज्यव्यापी बैठकीत आरक्षणाची मागणी मान्य करून घेण्यासाठी मास्टर प्लॅन तयार करण्यात आला. या बैठकीस तत्कालीन जलसंधारणमंत्री राम शिंदे, माजी मंत्री अण्णा डांगे आणि लोकप्रतिनिधी उपस्थित होते.
  • नोव्हेंबर 2018 मध्ये महिन्यात पार पडलेल्या हिवाळी अधिवेशनात मराठा आरक्षण जाहीर करत असताना धनगर आरक्षणाचा मुद्दा विरोधकांतर्फे उचलला गेला. विधानसभेत मुख्यमंत्र्यांनी पुन्हा एकदा आश्वासन दिलं.
  • 'टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्स' (टिस)चा बहूप्रतिक्षित अहवाल याच महिन्यात राज्य सरकारला मिळाला होता. हायकोर्टातही एका याचिकेवर उत्तर देताना राज्य सरकारने या अहवालाचा अभ्यास सुरू असल्याचं म्हटलं.
  • उद्धव ठाकरे यांचं सरकार आल्यानंतर या प्रकरणात विशेष काही होऊ शकलं नाही. यानंतर पुढील 2 वर्षे कोरोनामुळे हे प्रकरण प्रलंबित राहिलं.
  • धनगर आरक्षणासाठी सातत्याने आवाज उठवणारे गोपीचंद पडळकर यांना यादरम्यान भाजपच्या वतीने विधान परिषदेवर पाठवण्यात आलं.
  • पुढे, शिंदे-फडणवीस सरकार आल्यानंतर दोन महिन्यांत याप्रकरणी अंतिम सुनावणी होती. पण सरकार पक्षाने यादरम्यान महाधिवक्त्यांना बदललं. नंतर सुनावणी काही काळासाठी स्थगित झाली.
  • सध्या या प्रकरणाच्या सुनावणीसाठी कोणती तारीख देण्यात आली आहे, याबाबत अधिक माहिती मिळू शकली नाही, याचिकाकर्ते प्रबोधन मंचने शासन सहकार्य करत असल्याचे गोपीचंद पडळकर यांच्या सोबत जाहिर केले.
  • यशवंत सेनेच्यावतीने धनगर आरक्षणाच्या मागणीसाठी 6 सप्टेंबरपासून चौंडी येथे बेमुदत उपोषण सुरू करण्यात आलं.
  • 8 सप्टेंबर 2023 रोजी महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांना धनगर आरक्षणाचे निवेदन देण्यासाठी आलेल्या धनगर समाजाच्या शेखर बंगाळे या कार्यकर्त्याने निवेदन देत थेट अंगावर भंडारा उधळल्याची मोठी चर्चा झाली. 
  • दिनांक 21 सप्टेंबर 2023 ला धनगर आरक्षणाच्या प्रश्नावर राज्य सरकार आणि यशवंत सेनेचे प्रतिनिधी, समाज प्रतिनिधी यांची सह्याद्रीवर एक बैठक झाली. येत्या पन्नास दिवसात पुढील आरक्षणाची कार्यवाही  करू असं आश्वासनही सरकारने दिलं. या बैठकीत धनगर समाजाला एसटीचं प्रमाणपत्र देण्याबद्दल चर्चा झाली असल्याचं गोपीचंद पडळकर यांनी म्हटलं.
  • जत तालुक्यातील युवकाने आरक्षणासाठी आत्महत्या केली.
  • राज्यभरात धनगर समाजाचे वेगवेगळ्या जिल्ह्यात मोर्चे आंदोलने सुरू आहेत; सरकार गांभीर्याने घेत नसल्याने धनगर समाज अस्वस्थ. 

५० दिवस संपले; धनगर समाज आरक्षणासाठी राज्य सरकारची कार्यवाही शून्य : धनगर समाज आक्रमक

५० दिवस संपले; धनगर समाज आरक्षणासाठी राज्य सरकारची कार्यवाही शून्य : धनगर समाज आक्रमक 


धनगर समाजाची दिवाळी गोडची जाहिरात करून शासनाकडून थट्टा 

मुंबई : आबासो पुकळे 

धनगर समाजाच्या अनुसुचित जमाती आरक्षणासाठी शासनाने मागून घेतलेला ५० दिवसांचा वेळ संपला असून, कोणतेही प्रकारची आरक्षणासाठी कार्यवाही न करता, बरोबर ५० दिवस संपल्याची संधी साधून धनगर समाजाला आरक्षणाच्या मुद्द्यावर भरकटवण्यासाठी  राज्य सरकारने धनगर समाजाच्या उन्नतीकरिताच्या योजना प्रभावीरित्या राबविणार; शक्तीप्रदत्त समिती योजनांचे संनियंत्रण करणार असल्याचे सांगत वेळ मारून नेण्याचे धोरण अवलंबिले आहे.

कर्नाटक, गोवा राज्य सरकारने केंद्र सरकारकडे धनगर समाज अनुसुचित जमाती आरक्षणासाठी शिफारस केली आहे. मात्र महाराष्ट्रात खोटी आश्वासने देऊन धनगर समाजाची प्रत्येक सरकारने फसवणूक केली आहे. अनेक दशकांपासून धनगर समाज भाषिक, प्रांतिक, शाब्दिक भेद व राजकिय उदासीनता यामुळे अनुसुचित जमाती आरक्षनाच्या लाभापासून वंचित आहे. आपल्या मागण्याना घेऊन धनगर समाज वेळोवेळी उपोषण, आंदोलने, मोर्चाद्वारा शासनाकडे संघर्ष करत आहे.

धनगर समाजाची आरक्षण अंमलबजावणीची प्रमुख मागणी असताना महाराष्ट्र राज्य सरकारने पुन्हा एकदा योजनांचे गाजर दाखवून, धनगर समाजाला दिवाळी भेट, धनगर समाजाची दिवाळी गोड होणार अशा प्रकारची जाहिरातबाजी करून थट्टाच केली आहे.  एकीकडे मराठा समाजाला ओबीसींचे आरक्षण मिळावे यासाठी राज्य सरकार सर्वोत्परी प्रयत्न करत आहे. मात्र धनगर समाजाच्या हक्काचे आरक्षण एसटी आरक्षण अंमलबजावणी मागणीकडे दुर्लक्ष करून केवळ योजनांची जाहिरातबाजी प्रचार प्रसार माध्यमात करत आहे. यामुळे धनगर समाजात असंतोषाचे वातावरण तयार झाले आहे.



Thursday, November 2, 2023

👆 उपेक्षित माणदेशा- दुष्काळदेशा👆

दुष्काळाच्या झळांनी होरपळलेल्या माण खटाव तालुक्यातील जनेतच्या जखमेवर चोळले मीठ..?

शेजारच्या कर्नाटक शासनाने तातडीने दुष्काळ जाहीर केला, परंतू दोन महिने उलटल्यानंतर उशिरा का होईना महाराष्ट्र शासनाने ३५८ पैकी १९४ तालुक्यात दुष्काळाची भयावह परिस्थिती असताना केवळ ४० तालुक्यात दुष्काळ जाहिर केला. विशेष म्हणजे नेहमी सुजलाम सुफलाम असे विकासाचे मॉडेल म्हणून राज्यभर बोभाटा केला जातो अशा बारामती तालुक्यात गंभीर स्वरूपाचा दुष्काळ जाहीर करण्यात आला आहे. याच दुष्काळी तालुक्यात राज्याच्या उपमुख्यमंत्री महोदयांना साखर कारखान्यावर ऊस मोळी पूजनाला आरक्षणाची प्राणांतिक मागणी करणाऱ्या उपेक्षित मराठा समाज बांधवांनी रोखल्याचे वृत्त प्रसार माध्यमात सर्वत्र झळकले. जिथे ऊसाचे मोळी पूजन होते, अशा ठिकाणी गंभीर स्वरूपाचा दुष्काळ जाहीर झाला. गंभीर स्वरूपाचा दुष्काळ जाहीर करताना कोणते निकष लावले..? याचा उलगडा होणे आवश्यक आहे.

सांगली जिल्ह्यात कृष्णेच्या तिरावर वसलेल्या मिरजेत दुष्काळ जाहीर झाला. पण लागून असलेल्या कायम दुष्काळ असणाऱ्या जत, कवठेमहांकाळ तालुक्याला, आटपाडी तालुक्याला दुष्काळ यादीतून वगळले. 

सातारा जिल्ह्यात तर आक्रित घडलं..?

ज्या पूर्व माण तालुक्यातील लोक वाईदेश म्हणजे वाई तालुक्यात चारा पाण्याच्या शोधात आपली जनावर घेऊन जातात त्या वाई तालुक्यात दुष्काळ जाहीर झाला. पण माण तालुक्यात पशुसंवर्धन, महसूलमंत्री येऊन देखील दुष्काळ जाहीर झाला नाही.

नोव्हेंबर २०२२ मध्ये पोटाची खळगी भरण्यासाठी गाव सोडलेल्या मेंढपाळ बांधवांनी २०२३ च्या जून महिन्यात गावची वाट धरली.  पण पाऊसाचा थांगपत्ता लागत नसल्याने एका आठवडयात पुन्हा आलेल्या वाटेने मेंढपाळांना माघारी परतावे लागले. पशुपालक, मेंढपाळांची जून, जुलै, ऑगस्ट महिन्यात परिस्थिती इतकी गंभीर होती की, अक्षरशः सर्वच लोक अस्वस्थ झाले होते. ऊसतोड मजूर, शेतमजूर, कामगार, रोजगारी महिला यांचे हाल पहावत नव्हते. पाऊस येईल या आशेवर शेतकऱ्यांनी शेतात बी पेरले, पण कुणाचे हवेच्या आद्रतेने उगवले तर कुणाचे उगवलेच नाही. ज्यांचं बी उगवलं त्यांचं पुढं करपून गेले. काही शेतकऱ्यानी चार रूपये मिळतील या आशेने केलेल्या टोमॅटो पिकाला टँकरने पाणी आणून जगवण्याचा प्रयत्न केला. पुढे केंद्र सरकारच्या धोरणामुळे टोमॅटो पीक मातीमोल झाले, शेतकऱ्यांच्या डोक्यावर कर्ज वाढले. पाऊसाने दडी मारल्याने हतबल झालेला शेतकरी वर्ग चिंताग्रस्त बनला. खरिप हंगामाचा शेवट होत असताना, गणरायाच्या आगमनानंतर काही ठिकाणी थोडा फार पाऊस झाला. कुठेतरी खुरट गवत उगवलं आणि ते खाऊन कशीबशी जितराब पशुपालकांनी जगवली. पुर्ण खरीप हंगाम वाया गेला. शेतकरी उद्धवस्त झाला तरीही मोठ्या हिंमतीने आजही उभा आहे. 

दरसाल दुष्काळमुळे माण खटाव तालुक्यातील जनता गाव सोडत असते, मिळेल ते काम करून, काबाड कष्ट करते. माथाडी, ऊसतोडी, मेंढपाळ भटकंती, रंगकामगार, रोजंदारीची कामे करतात. स्वतःच्या गावात कमी अन बाहेर गावीच बहुतांश आयुष्य जगत असते. 

माण मध्ये जाणीवपूर्वक दुष्काळ जाहीर झाला नाही..?

माण खटाव तालुक्यातील बऱ्याचश्या गावात पाण्याचे टँकर सुरू होते. काही ठिकाणी पाण्याचे टँकर सुरू करा? चारा उपलब्ध करा ? दुष्काळ जाहीर करा?  विद्यार्थ्यांची फी माफ करा?, राऊतवाडी बंधाऱ्यात उरमोडीचे पाणी सोडा म्हणून शेतकऱ्यांनी म्हसवड येथे महात्मा फुले पुतळ्यासमोर आमरण उपोषण केले? अशा प्रकारच्या मागण्या निवेदने शासन, प्रशासन दरबारी होत होती, मात्र या सर्व गोष्टींकडे जाणीपूर्वक दुर्लक्ष करून बेजबाबदार अधिकारी, शोबाज लोकप्रतिनिधी, डोळे झाकून कारभार करणारे  राज्यकर्ते यांच्या नाकर्तेपणामुळे अंत्यंत गंभीर स्वरूपाचा वास्तवात दुष्काळ असताना देखील माण तालुका दुष्काळ यादीत समावेश होऊ शकलेला नाही. पारतंत्र्य भारतात देखील दुष्काळग्रस्त जनतेवर अन्याय झाला नसेल इतका छळ स्वत्रंत्र भारतात चालू आहे.  दुष्काळाच्या झळांनी होरपळलेल्या माण खटाव तालुक्यातील जनतेच्या भळभळणाऱ्या जखमेवर मीठ चोळले, अशाच प्रकारच्या जनभावना उफाळून आल्या आहेत.  

ज्याप्रमाणे बारामतीचा सर्व्हे झाला तशाप्रकारचा तिथला अभ्यास करून सरकारचे गुलाम राहीलेल्या अधिकारी वर्गाने शोबाज लोकप्रतिनिधींचे न ऐकता जनतेचे म्हणण ऐकून थेट ग्राउंडवर जाऊन माण खटावचा खराखुरा सर्व्हे करून तातडीने दुष्काळ जाहीर करावा.

✍️ आबासो पुकळे (०२/११/२०२३)



चागंले संस्कार टिकविण्यासाठी वाचन संस्कृतीची गरज : डॉ. शंकर स्वामी वडेपुरीकर

चागंले संस्कार टिकविण्यासाठी वाचन संस्कृतीची गरज : डॉ. शंकर स्वामी वडेपुरीकर ‌पु.अहिल्यादेवी वाचनालयात " वाचन संकल्प महाराष्ट्राचा...